दौलतनगर दि.०१:- दि.१९
जुन रोजी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात राज्याचे अर्थमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार
यांनी मांडलेल्या ०१ हजार ५८६ कोटींच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये पाटण विधानसभा
मतदारसंघातील प्रलंबीत राहिलेल्या विविध मांगण्यांसंदर्भात पाटणचे आमदार शंभूराज
देसाईंनी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधत पाटण मतदार संघातील बांधकाम,जलसंपदा व
ग्रामीण विभागाकडील काही अंशी प्रलंबीत राहिलेल्या कामांना आवश्यक असणारा निधी
मंजुर करावा व शासनाने यापुर्वी या विभागाकडे मंजुर केलेल्या विविध विकासकामांच्या
निधींच्या कामांना गती देवून मुदतीत ही कामे पुर्ण करुन घेणेचे आदेश शासनामार्फत
देण्यात यावेत अशी आग्रही मागणी विधानसभा सभागृहात केली.
सन
२०१९-२० च्या अतिरिक्त
अर्थसंकल्पावरील सार्वजनीक बांधकाम,जलसंपदा व ग्रामविकास विभागाच्या अनुदानाच्या मागण्यावर
आमदार शंभूराज देसाई विधानसभा सभागृहात बोलत होते.यावेळी त्यांनी सार्वजनीक बांधकाम
जलसंपदा व ग्रामीण विभागाकडील पाटण मतदारसंघातील प्रलंबीत राहिलेली कामे विधानसभेत
मांडली व या कामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करण्याची मागणी करीत या विभागाकडील
काही धोरणात्मक निर्णय शासनाने घेणे अपेक्षित आहेत यावर निर्णय करुन याही कामांना
सुरुवात करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली.
सार्वजनीक बांधकाम विभागाकडील मागण्यामध्ये
पाटण विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे जाळे निर्माण करणेकरीता
प्राधान्यांने ग्रामीण रस्त्यांच्या कामांना नॉनप्लॅनमधून निधी मंजुर करावा तसेच
मतदारसंघात १६ अवर्गीकृत ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाचे रस्ते या रस्त्यांना प्रमुख
जिल्हा मार्गांचा दर्जा देवून १६ ग्रामीण रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग करण्याचा
प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना देवूनही प्रस्ताव अद्याप सादर नाही सदरचे प्रस्ताव
तात्काळ मागवून घेवून यास बांधकाम मंत्र्यांनी मान्यता दयावी. तर पाटण हे
तालुक्याचे ठिकाण असून या तालुक्याच्या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभी करणेकरीता
विशेष बाब म्हणून निधी दयावा.पाटण न्यायालयाच्या इमारतीचे काम पुर्ण झाले असून
फर्नीचरकरीता निधी मंजुर करावा तर नेरळे गांवाजवळ छोटया पुलाची आवश्यकता असून या
पुलाकरीता आवश्यक निधी दयावा.
जलसंपदा विभागाच्या मागण्यांवर बोलताना ते म्हणाले,प्रधानमंत्री कृषी सिचाई
योजनेमध्ये पाटण मतदारसंघातील तारळी व मोरणा गुरेघर या मध्यम धरण प्रकल्पांचा
समावेश असून तारळी धरण प्रकल्पातील ५० मीटरवरील जमिन क्षेत्राला पाणी देणेकरीता
शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता देवून मंजुर केलेल्या निधीमधून या कामांना
सुरुवात करणेकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
ई-भूमिपुजन करण्यात आले असून याचे काम विभागाने गतीने सुरु केले मात्र लोकसभेच्या
आचारंसहिंतेमुळे हे काम संथगतीने सुरु होते त्यास गती देवून मुदतीत काम पुर्ण करण्याच्या
सुचना संबधितांना देणे गरजेचे आहे जलसंपदा मंत्री यांनी या सुचना दयाव्यात तसेच मोरणा
गुरेघरच्या प्रकल्पातून या विभागातील
शेतकऱ्यांच्या वाढीव क्षेत्राला इरिगेशनच्या माध्यमातून पाणी देणेकरीता वाढीव
निधीची गरज आहे यास सुधारित प्रशासकीय मान्यता देवून निधी मंजुर करावा तर माझे
सातत्याच्या मागणीवरुन शासनाने कोयना नदीकाठच्या गावांना सरंक्षण देणेकरीता एकूण
१० कामांपैकी संरक्षक भिंती व घाटांची सात कामे मंजुर केली आहेत यातील तीन कामांचे
प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरीता प्रलंबीत आहेत यास तात्काळ निधी मंजुर करावा व या
कामांमध्ये १० टक्के रक्कमेची अट शिथील करण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री यांनी
दिले आहे याच्यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही मी दि.०५.१२.२०१७ व दि.१९.०९.२०१८
रोजी यासंदर्भात जलंसपदा मंत्री यांचेकडे पत्रव्यवहार देखील केला असून यासंदर्भात
तात्काळ सुचना करण्यात याव्यात तसेच हुंबरळी लघू पाटबंधारे तलाव बांधणेच्या
उर्वरीत कामांस सुधारित प्रशासकीय मान्यता देवून निधी देण्याची आवश्यकता आहे.
असे
सांगत ग्रामीण विकास विभागाच्या मागण्यामध्ये मरळी आणि नाडे या मुख्य गावांकरीता
ग्रामसचिवालय बांधणेकरीता गत तीन वर्षापासून निधीची मागणी ग्रामीण विकास विभागाकडे
करीत असून या कामांना आवश्यक निधी मंजुर करावा तसेच पाटण मतदारसंघातील डोंगर पठारावरील
काही गांवाच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याची बरेच वर्षाची मागणी आहे हा प्रस्ताव
शासनाकडे सादर करण्यात आले आहेत यास मान्यता दयावी स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती
मातोश्री योजनेंर्गत ग्रामपंचायतीच्या इमारती उभारण्याकरीता यंदाच्या वर्षी काही
ग्रामपंचायतीची कामे शासनाकडे प्रस्तावित केली आहेत या ग्रामपंचायतीना या आर्थिक
वर्षात निधी मंजुर करण्यात यावा अशा विविध प्रलंबीत मागण्या शासनापुढे मांडून
आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी शासनाने पाटण मतदारसंघात यापुर्वी विविध योजनांच्या कामांना मंजुर करुन दिलेल्या
निधीच्या संदर्भात शासनाचे जाहीर आभार मानले.
चौकट:-
येराड व जळव दोन तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा दयावा.
पाटण विधानसभा मतदारसंघात येराड व जळव ही दोन मोठी तीर्थक्षेत्र
या विभागातील प्रसिध्द अशी तीर्थक्षेत्र असून याठिकाणी मोठया प्रमाणात यात्रा
भरते. महाराष्ट्रातील अनेक भाविक या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनाकरीता येत
असतात या दोन्ही तीर्थक्षेत्रांना शासनाने ब वर्ग दर्जा देवून आवश्यक असणारा निधी मंजुर
करावा अशीही मागणी आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत केली.
No comments:
Post a Comment