दौलतनगर दि.०3:- महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कालच संपले असून
अधिवेशन संपताच मुंबईतून रात्री उशीरा मतदारसंघात येवून अधिवेशन संपल्याच्या
दुसऱ्या दिवशीच पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी मतदार संघातील जनतेच्या कामांना
सुरुवात केली. राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा
पाटण मतदारसंघातील प्रारंभ उरुल ता.पाटण येथे त्यांच्या हस्ते करण्यात आला तर
तातडीने त्यांचे अध्यक्षतेखाली पाटण तहसिल
कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात आली.बैठकीपुर्वी पाटण याठिकाणी
त्यांनी पंढरपुरकडे मौजे त्रिपुडी येथून प्रस्थान करणाऱ्या पायी दिंडीमध्ये दर्शन
घेवून वारकऱ्यांसह पायी दिंडीमध्ये सहभाग घेतला व बैठकीनंतर आपल्या समस्या घेवून
आलेल्या जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी तहसिल कार्यालयात तातडीने सोडविले.
सतर्क आमदार म्हणून आमदार शंभूराज देसाईंच्या कार्यपध्दतीचे
नेहमीच कौतुक केले जाते.महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशनाच्या शनिवार व
रविवारच्या सुट्टीच्या कालावधीतही ते मुंबईहून मतदारसंघात येवून जनतेच्या असणाऱ्या
समस्या सोडवित होते.कालच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच मुंबईहून ते रात्री
उशीरा मतदारसंघात आले व दुसऱ्या दिवशी मतदारसंघातील कामांना त्यांनी सुरुवात देखील
केल्याचा प्रत्यय आज तहसिल कार्यालयात
पहावयास मिळाला.पाटण तालुक्यात दोन ते तीन दिवसापुर्वी पावसाने दमदार हजेरी लावली
असून पाटण तालुका अतिवृष्टीचा तालुका म्हणून ओळखला जातो.अतिवृष्टीच्या काळात
करावयाच्या उपाययोजना या तातडीने होणेकरीता आमदार देसाई हे नेहमीच सतर्क असतात हे
गत चार वर्षात पाटण मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे. अतिवृष्टीच्या काळात
वेळप्रसंगी कोणत्याही ठिकाणी अडचणी
निर्माण झाल्या तर त्याठिकाणी आमदार शंभूराज देसाई हे जातीने स्वत: जातात व त्या
संकटावर उपाययोजना करतात हेही पाटण मतदारसंघातील जनतेला ज्ञात आहे.
पावसाळयात निर्माण होणाऱ्या
अडीअडचणी सोडविण्याकरीता तालुका प्रशासन सतर्क राहणेकरीता सुरुवातीसच उपाययोजना
करणेसाठी त्यांनी आज सकाळी स्वत: तालुका प्रशासनाचे प्रमुख व महसूल विभागाचे प्रांताधिकारी,
तहसिलदार यांना दुरध्वनी करुन तातडीने आज आपत्ती व्यवस्थानाची तातडीची बैठक आयोजीत
करण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार त्यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल
कार्यालयाच्या प्रतिक्षालय इमारतीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेण्यात
आली.पाटण मतदारसंघात पावसाळयात यापुर्वी ज्या ज्या ठिकाणी अडीअडचणी निर्माण होवून
जनतेला नाहक त्रास होतो त्याचा आढावा त्यांनी यावेळी प्रथमत: घेतला व यासंदर्भात
संबधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.आपत्ती काळात तालुका
प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा करु नये अशा सक्त सुचना आमदार
शंभूराज देसाईंनी तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.डोंगर खचण्याचे
प्रकार ज्या ज्या गांवात होत आहेत तेथे आत्ताच उपाययोजना कराव्यात. महसूल आणि
बांधकाम तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून येणाऱ्या अडीअडचणीवर
तात्काळ मात करावी याकरीता लागणारा निधी मंजुर करणेकरीता मी कुठेही कमी पडणार
नाही.पावसाचा जोर बऱ्यापैकी असून अजुन पंधरा दिवसांनी यासंदर्भात मा.जिल्हाधिकारी
यांच्या उपस्थितीत आपण पुन्हा बैठक घेवून येणाऱ्या अडचणी सोडवू असे आश्वासनही
त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे,
तहसिलदार रामहरी भोसले यांच्यासह पाटण तालुक्यातील तालुका प्रशासनातील सर्व
खात्यांचे खातेप्रमुख यांची उपस्थिती होती.
दरम्यान आपत्ती व्यवस्थापन
बैठकीपुर्वी आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते राज्य शासनाने राबविलेला ३३ कोटी
वृक्ष लागवडीचा पाटण मतदारसंघातील शुभारंभ उरुल याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता.
आमदार देसाई यांच्या हस्ते उरुल येथील वनविभागाच्या हद्दीत तसेच जंगबदा
हायस्कुलच्या प्रांगणात तसेच उरुल ग्रामपंचायतीच्या हद्दीत वृक्षारोपण करुन वृक्ष
लागवडीस प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर आमदार देसाईंनी पाटण येथे पंढरपुरला
निघालेल्या पायी दिंडीमध्ये वारकऱ्यासह सहभाग घेतला. व बैठकीनंतर तहसिल
कार्यालयामध्ये त्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक केली. आमदार शंभूराज
देसाई पाटण मतहसिल कार्यालयात आल्यानंतर तिथेच सुमारे दीड तास त्यांचा जनता दरबार
पहावयास मिळाला.यावरुनच आमदार शंभूराज देसाई हे किती सतर्क आणि जनतेच्या
प्रश्नाविषयी तळमळ असणारे आमदार आहेत याचा प्रत्यय मतदारसंघातील जनतेला यादिवशी
आला.
No comments:
Post a Comment