Tuesday, 2 July 2019

कोयना भूकंप पुनर्वसन निधीच्या २० कोटीपैकी पाटण तालुक्यातील विकासकामांना ०७ कोटी रुपये मंजुर. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निधी मंजुर- आमदार शंभूराज देसाईंची माहिती.


                                       





दौलतनगर दि.०२:-  कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामार्फत प्रतिवर्षी भूकंपप्रवण तालुक्याकरीता देण्यात येणाऱ्या निधीमधून यंदाच्या वर्षी महाजेनकोकडून प्राप्त रु १५ कोटी व बचत खात्यावरील जमा व्याज रक्कम रु ०५ कोटी असे एकूण २० कोटी रुपये कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडे जमा झाले असून या २० कोटी रुपयांचा निधी या समितीतंर्गत येणाऱ्या तालुक्यांना अनुज्ञेय टक्केवारीच्या मर्यादेत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आदेशाने मंजुर करुन वितरीत करण्यात आला. एकूण २० कोटी निधीमध्ये पाटण तालुक्याला ३५ टक्के प्रमाणे देय असणाऱ्या ०७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना समितीमार्फत मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीचे कोषाध्यक्ष, पाटणचे आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीस दिली आहे.
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासाचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक सोमवार दि.०१ जुलै, २०१९ रोजी मुख्यमंत्र्याचे समिती कक्ष विधानभवन याठिकाणी पार पडली या बैठकीत वरीलप्रमाणे निधी मंजुर करण्यात येवून भूकंपप्रवण तालुक्यांना अनुज्ञेय टक्केवारीच्या मर्यादेत निधी वितरीत करण्याचे आदेश मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी न्यासाचे सचिव सुरेश खाडे यांना दिले. यावेळी सातारा जिल्हयातील सर्व विधानसभा सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामार्फत प्रतिवर्षी भूकंपप्रवण तालुक्याकरीता महाजेनकोकडून प्राप्त होणाऱ्या निधीतून अनुज्ञेय टक्केवारीच्या मर्यादेत निधी वितरीत करण्यात येतो.राज्याचे मुख्यमंत्री हे या न्यासाचे पदसिध्द अध्यक्ष असून प्रतिवर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली या सार्वजनीक न्यासाची बैठक पार पडल्यानंतरच हा निधी भूकंपप्रवण तालुक्याला वितरीत करण्यात येतो.पाटण तालुक्याला कोयना भूकंप पुनर्वसन निधी समिती या सार्वजनीक न्यासामार्फत ३५ टक्के रक्कम देणे अनुज्ञेय आहे. त्यामुळे प्रतिवर्षी समितीकडे येणाऱ्या निधीमधून ३५ टक्के प्रमाणे निधी वितरीत करण्यात येतो.यंदाच्या वर्षी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीकडे महाजेनकोकडून १५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून बचत खात्यावरील जमा व्याज रक्कम रु ०५ कोटी झाली असून समितीकडे प्राप्त एकूण २० कोटीपैकी पाटण तालुक्याच्या वाटयाला येणाऱ्या ०७ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या ०७ कोटी रुपयांच्या निधीमध्ये पाटण तालुक्यातील भूकंपप्रवण ग्रामीण आणि डोंगरी भागातील ग्रामीण रस्ते, शाळांच्या इमारती, पिण्याच्या पाण्याच्या योजना, सार्वजनीक सभागृह या कामांचा समावेश असून मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये भूकंपप्रवण तालुक्यातील विधानसभा सदस्याकडून त्यांना देय असणाऱ्या रक्कमेच्या विकासकामांच्या यादया घेतल्या असून या विविध विकासकामांना तात्काळ प्रशासकीय मान्यता देवून सदरची कामे लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश न्यासाच्या सचिवांना दिले असून पाटण तालुक्यातील विविध विकासकामांच्या यादया मुख्यमंत्री यांच्याबरोबर न्यासाचे सचिव यांच्याकडे देण्यात येवून सदरची कामे करणारी यंत्रणांना या कामांचे अंदाजपत्रक लवकरात लवकर समितीकडे सादर करुन समितीची मान्यता घेण्याचे आदेश देण्यात आल्याने लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होईल अशी अपेक्षा आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केली आहे.
चौकट:- सातत्याच्या पाठपुराव्यामुळे समितीला प्रतिवर्षी ५ कोटी एैवजी १० कोटींचा निधी मंजुर.
              सन २०१४ ला विधानसभा सदस्य झालेनंतर राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी माझी कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीच्या कोषाध्यक्ष पदी निवड केल्यानंतर मुख्यमंत्री यांचेकडे मी सातत्याने पाठपुरावा करुन ०५ कोटी रुपये ही रक्कम अल्प असून यामध्ये ०५ कोटी रुपयांची वाढ करुन एकूण १० कोटींचा निधी या समितीमार्फत भूकंपप्रवण तालुक्यांना देण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी माझी मागणी तात्काळ मान्य केल्याने समितीमार्फत आता प्रतिवर्षी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येत असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.


No comments:

Post a Comment