दौलतनगर दि.०3:- पाटण विधानसभा मतदारसंघातील कोयना धरणातून
विस्थापित झालेल्या ५४ गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर
दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे तसेच बरेच अंशी प्रलंबीत राहिलेले विविध प्रश्न
सोडविणेसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विश्वासात
घेवूनच सर्वसमावेशक असे काम शासकीय अधिकाऱ्यांनी करावे. राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी
फडणवीस यांचे सुचनेवरुन कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक
करणेकरीता विभागीय आयुक्तांच्या
अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. त्या विभागाचे आमदार शंभूराज
देसाईंनी या विषयासंदर्भात जो औचित्याचा मुद्दा विधानसभेत मांडला त्यावर
अधिकाऱ्यांनी प्राधान्याने कार्यवाही करावी असे आदेश मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय (बाळा)
भेगडे यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
आमदार शंभूराज देसाईंनी कोयना
धरणातून विस्थापित झालेल्या ५४ गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या
पुनर्वसनाचे, संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे तसेच बरेच अंशी
प्रलंबीत राहिलेले विविध प्रश्न सोडविणेसंदर्भात विधानसभेत औचित्याचा मुद्दा
उपस्थित केला होता या औचित्याच्या मुद्दयाच्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन,भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री ना.संजय (बाळा)
भेगडे यांनी तात्काळ बैठक घेण्याचे आश्वासन दिलेप्रमाणे त्यांचे अध्यक्षतेखाली
विधानभवन,मुंबई येथे बैठक घेण्यात आली यावेळी राज्यमंत्री ना.भेगडे यांनी
वरीलप्रमाणे आदेश दिले.बैठकीस आमदार शंभूराज देसाई, उपायुक्त पुर्नवसन दिपक
नलवडे,अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड,जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती
रुपाली आवळे,कोयना पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता गायकवाड, पुनर्वसन
विभागाचे उपसचिव,माजी पंचायत समिती सदस्य हरीष भोमकर,कोयना विभागातील पुनर्वसित
गावठाणांतील स्थानिक दत्तात्रय देशमुख,संजय लाड, बाजीराव कदम,दगडू कदम,नरसिंग
देशमुख,शैलेश सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बैठकीत आमदार शंभूराज देसाईंनी विधानसभेत मांडलेल्या
औचित्याच्या मुद्दयातील माहिती राज्यमंत्री
ना.संजय (बाळा) भेगडे यांच्या निदर्शनास आणून दिली यामध्ये कोयना धरणातून
विस्थापित झालेल्या ५४ गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या
पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे तसेच बरेच अंशी
प्रलंबीत राहिलेले विविध प्रश्न सोडविणेसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री
ना.देवेंद्रजी फडणवीस यांना मी सन २०१८ च्या अधिवेशन काळात उच्चस्तरीय बैठक
घेण्याची मागणी केली होती तेव्हा दि.२०.०३.२०१८ रोजी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी
फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्याचे
समिती कक्ष विधानभवन याठिकाणी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांच्या
विविध प्रश्नाची सोडवणूक करणेकरीता
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी
यांचे देखरेखीखाली टास्क फोर्सची निर्मिती करुन जिल्हाधिकारी,सातारा यांना कोयना
धरण प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नाची माहिती संकलित करुन या प्रश्नासंदर्भात
कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्यमंत्री यांचेकडून देण्यात आल्या होत्या. त्यावेळी
या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणुन मीही बैठकीस उपस्थित होतो.टास्क फोर्सच्या
माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन
वाटपाचे कामांचा निपटारा करीत असताना ९०
टक्के गावांतील प्रकल्पग्रस्तांना तसेच या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींना विश्वासात
न घेता काम करण्यात येत असून यामुळे ९० टक्के गांवातील प्रकल्पग्रस्तांचा या कार्यपध्दतीवर
सातत्याने आक्षेप असून टास्क फोर्सच्या माध्यमातून आमचे प्रश्न मार्गी लावताना
आम्हाला तसेच येथील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून सर्वसमावेशक असे
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे,शिल्लक जमिन वाटपाचे
काम करण्यात यावे व हे प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची एखादी
पुर्नवसन समिती स्थापन करावी अशी या प्रकल्पग्रस्तांची आग्रही भूमिका असल्याचे
आमदार देसाईंनी यावेळी बैठकीत सांगितले.
यावेळी मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन
राज्यमंत्री ना.संजय (बाळा) भेगडे यांनी कोयना धरणातून विस्थापित
झालेल्या मुळ ५४ गांवातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे,संकलन रजिस्टर दुरुस्तीचे
तसेच शिल्लक जमिन वाटप करताना या विभागाचे आमदार शंभूराज देसाईंनी मांडलेल्या
औचित्याच्या मुद्दयातील बाबींचा प्राधान्याने विचार करुन त्यांच्या मुद्दयांवर
प्राधान्याने कार्यवाही करावी तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये स्थानिक आमदार शंभूराज
देसाई तसेच ५४ पुनर्वसित गांवातील स्थानिक मुळ प्रकल्पग्रस्त यांना सदरचे काम
करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रथम प्राधान्याने विश्वासात घ्यावे व कोयना
प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची सर्वसमावेशक अशी सोडवणूक करावी असे आदेश या
बैठकीत उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. बैठकीत धोरणात्मक निर्णय
घेतलेबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी राज्यमंत्री
ना.संजय (बाळा) भेगडे यांचे जाहीर आभार मानले.
No comments:
Post a Comment