Saturday 26 May 2018

जनतेची विकासात्मक कामे करायला कुठेही कमी पडलो नाही आणि पडणारही नाही.आमदार शंभूराज देसाईंची ग्वाही.





दौलतनगर दि. २६ (आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालय):
सन २०१४ च्या निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला भरघोस मताधिक्क्याने पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर गत साडेतीन वर्षात मतदारसंघातील जनतेची विकासात्मक असो वा वैयक्तीक कामे करण्याकरीता मी कुठेही कमी पडलो नाही याचे साक्ष या विभागातील जनतेने दिली असून भविष्यात देखील वैयक्तीक असो वा जनतेच्या विकासात्मक कामे करायला मी कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही पाटण मतदारसंघाचा आमदार म्हणून आपणांस देत असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले.
पाटण विधानसभा मतदारसंघातील तांबवे ता.कराड येथे आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या साजुर ते तांबवे या रस्त्याचे भूमिपुजन त्यांचे हस्ते करण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांसाठी आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातून ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य ॲड.उदयसिंह पाटील,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील,शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,पंचायत समिती सदस्या सविताताई संकपाळ,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाे पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे शिवाजीराव गायकवाड व कोयना सहकारी बँकेचे संचालक अविनाश पाटील,लक्ष्मण देसाई,पाटण पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ॲड.उदयसिंह पाटील म्हणाले, सन २००९ पुर्वी या विभागाचे माजी आमदार आणि माजी मंत्री विलासराव काका उंडाळकर यांनी ज्याप्रमाणे मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून गावागावात,वाडीवस्तीवर विकासाचे काम केले.त्यांच्या कामाप्रमाणेच आताचे या विभागाचे आमदार शंभूराज देसाई हे हा विभाग आपल्याकडे नव्याने जोडला आहे म्हणून कोणताही दुजाभाव न करता काकांच्या पावलावर पाऊल ठेवून या विभागातील जनतेची विकासात्मक कामे करीत आहेत. माजी मंत्री विलासरावकाका उंडाळकर यांचेसारखा हक्काचा आमदार या विभागाला आणि विभागातील जनतेला मिळाला आहे. विलासराव काका उंडाळकर यांनी २००९ पुर्वी केलेल्या या रस्त्यावर आमदार शंभूराज देसाई यांनी निधी देण्याचे काम केले आहे आमदार म्हणून त्यांनी या विभागातील जनतेची विकासाची तसेच वैयक्तीक अनेक कामे मार्गी लावली आहेत. काही लोक काही काम न करताच जनतेचा बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न करतात अशा बुध्दीभेद करणा-यांपासून सावधच रहा असे सांगत त्यांनी चांगल्या लोकप्रतिनिधींच्या मागे उभे राहण्याची या विभागाची परंपरा आहे ती परंपरा या विभागातील जनतेने कायमस्वरुपी कायम ठेवावी असे आवाहन शेवठी बोलताना केले.
याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सन २००९ साली कराड तालुक्यातील सुपने मंडल हे पाटण विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आले.या विभागात २००९ पुर्वी माजी आमदार आणि माजी मंत्री विलासराव काका उंडाळकर यांनी उभे केलेले विकासाचे पर्व उल्लेखनीय आणि कधीही न विसरता येणारे आहे.हा विभाग पाटण विधानसभा मतदारसंघात आल्याने मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री विलासराव काका उंडाळकर यांचेप्रमाणेच या विभागात त्यांचे एवढे नाही परंतू माझेपरीने जनतेची विकासात्मक कामे करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.गत साडेतीन वर्षात या विभागातील एकदोन गांवे सोडली तर प्रत्येक गांवामध्ये विविध विकासाची कामे मार्गी लावण्यात मला यश आले आहे.जनतेची कामे करायला गेल्या ३० वर्षात मी कुठे कमी पडलो नाही आणि भविष्यात देखील कमी पडणार नाही.काकांना राज्याचे मंत्रीपद मिळाले होते त्याचप्रमाणे आमचे तालुक्यातही राज्याचे बांधकाम मंत्रीपद मिळाले होते परंतू आमच्या माजी मंत्री यांना काकांच्याप्रमाणे तालुक्यात काम करणे जमले नाही त्यामुळे मोठया प्रमाणात विकासाचा अनुशेष शिल्लक राहिला होता तो अनुशेष मी सन २००४ ते २००९ या कालावधीत विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील भरुन काढण्याचा प्रयत्न केला तर आता २०१४ ला आमदार झालेपासून गत साडेतीन वर्षात मी ३१० हुन अधिक कोटींची विकासकामे मंजुर करुन आणली आहेत या विभागात साडेतीन वर्षात १२.५० कोटी रुपयांची कामे मार्गी लावली तर ४ ते साडेचार केाटी रुपयांची कामे यंदाच्या वर्षी प्रस्तावित केली आहेत. जनतेने न मागता विकासाची कामे मार्गी लावणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य मी आमदार म्हणून पुर्ण करीत आहे याचे मला समाधान आहे. २०१९ ची निवडणूक लांब असली तरी २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत या सुपने मंडलमधील मतदारांनी मला ज्याप्रमाणे चांगले मताधिक्क देवून सहकार्य केले त्याचपध्दतीने २०१९ लाही चांगले मताधिक्कय दयावे असे आवाहन करुन आपली प्रलंबीत राहिलेली विकासकामे मार्गी लावणेकरीता मी कटीबध्द असल्याचे आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.उपस्थितांचे स्वागत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांनी केले व आभार जयदीप पाटील यांनी मानले

Wednesday 23 May 2018

मंत्री नसताना माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटींचा निधी विकासासाठी आणला- आमदार शंभूराज देसाई.


मी सध्या केवळ पाटण विधानसभा मतदारसंघाचा सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आहे. आमदारांना मिळणारा निधी यावरच समाधान मानले असते तर मतदारसंघात प्रलंबीत राहिलेली विविध विकासकामे मार्गी लागली नसती. मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावयची असतील तर शासनाशी भांडून आपले प्रश्न विधानसभेत मांडून शासनाच्या तिजोरीतून जादाचा निधी आणणारा आमदार आपल्या सारख्या डोंगरी तालुक्याला पाहिजे. गत साडेतीन वर्षात मी केवळ आमदार म्हणून ३१० कोटींहून अधिकचा निधी शासनाच्या तिजोरीतून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामां करीता मंजुर करुन आणला असल्याचे प्रतिपादन करीत आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्री नसताना माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटींचा निधी मतदारसंघातील विकासासाठी मंजुर करुन आणला असल्याचा टोला माजीमंत्री पाटणकर यांचे नाव न घेता लगाविला.
गारवडे ता.पाटण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत गारवडे पोहोच रस्ता व विशेष घटक योजनेतंर्गत मागासवर्गीय रस्त्यावर साकव असे अनुक्रमे ८८.६५ लाख व २८.६४ लाख रुपयांच्या निधीच्या कामांची भूमिपुजने आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बॅकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुग्रा खोंदू,विजय पवार,प्रदीप पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे शिवाजीराव गायकवाड,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, संतोष गिरी,माजी विरोधी पक्ष नेते ॲड.डी.पी.जाधव,माजी सदस्य प्रकाशराव जाधव, कारखाना संचालक व्यंकटराव पाटील, पांडूरंग नलवडे, बबनराव भिसे, माजी जि.प.सदस्य बशीर खोंदू,दादा जाधव,ॲड. मारुती नांगरे,कोयना सहकारी बँकेचे संचालक अविनाश पाटील,हणमंतराव निकम (नाना),मोहनराव पानस्कर,नवनाथ पाळेकर, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच उपअभियंता विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात यापुर्वी सलग पाच वेळा आमदारपद आणि एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री होण्याची संधी तालुक्यातील जनतेने विरोधकांना दिली. या २६ वर्षात विरोधकांकडून विकासाचे राजकारण तालुक्यात झाले नाही म्हणूनच तालुक्यातील अनेक विकासकामे प्रलंबीत राहिली. याच गावचे उदाहरण घ्या ना मागील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत माजी आमदार या गांवात येवून गावची सत्ता पाटणकर गटाच्या ताब्यात दया गावाचे रोड मॉडेल करतो म्हणून घोषणा करुन गेले.त्यांच्या कार्यकाळात हे गांव झाले का रोल मॉडेल.याचा विचार गावक-यांनीच करावा.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये सरपंचपद विरोधी गटात गेले असले तरी सदस्यांचे बहूमत आपल्या बाजुने आहे.सरपंचपदाचा अपघात समजुन नव्या उमेदीने गावातील ग्रामस्थांनी कामाला लागावे. हातात सत्ता असताना विरोधकांना जे जमले नाही ते हातात सत्ता नसताना त्यांना शक्यच नाही हे तालुक्यातील प्रत्येक गांवाने आणि वाडीवस्तीने आता ओळखले आहे.तालुक्याच्या अनेक गांवामध्ये गावाला डोळयाला दिसतील अशी विविध विकासकांमे आपण गत तीन वर्षात मार्गी लावली आहेत. ते माजी आमदारांना जमले नाही त्यांनी केलेली डोळयाला दिसतील अशी कामे प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये दाखवून दयावीत असे आवाहन करीत आमदार देसाई म्हणाले,माजी आमदार हे राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.बांधकाम मंत्री असताना देखील स्वत:च्या मतदारसंघातील प्रमुख रस्ता त्यांनी दोन ठिकाणी टोल बसविला यावरुनच त्यांची कार्यक्षमता लक्षात येते. बांधकाम खात्याच्या किल्लया त्यांच्या हातात असताना देखील ते बिनटोलचा रस्ता मतदारसंघातील जनतेला देवू शकले नाहीत मी आमदार म्हणून राज्याच्या नाहीतर केंद्राच्या तिजोरीतून ३२० कोटी रुपयांचा प्रमुख रस्ता मंजुर करुन आणला त्याचे काम सध्या सुरु आहे या रस्त्यावर एकाही ठिकाणी टोल नाही.हा फरक त्यांच्या आणि माझे कामांमधील आहे.त्यांच्या २६ वर्षाच्या आमदारकीची कारकीर्द आणि माझे केवळ १० वर्षाची आमदारकीची कारकीर्द पाहिली तर माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटयावधी रुपयांची विविध विकासकांमे मी शासनाकडून मंजुर करुन आणली आहेत येणा-या निवडणूकीत त्यांच्या कामांचा आणि माझे कामांची तुलना करुनच मतदारसंघातील जनतेने तालुक्याचा आमदार निवडावा.जो विकासाच्या कामांमध्ये उजवा असेल तोच या तालुक्याचे नेतृत्व करेल ही खुणगाठ मतदारसंघातील मतदारांनी मनाशी घट्ट बांधावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. याप्रसंगी ॲड.मिलींद पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली.
चौकट:- समाजाच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार हाणून पाडा. शंभूराज देसाई.
निवडणूका आल्या की, फोडाफोडी,जनतेचा बुध्दीभेद व मतांचा सौदा यामध्ये आपले विरोधक तरबेज आहेत. पाच वर्षातून एकदा मतदान मागायला यायचे.स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा करतोय त्यांच्या कामांसंदर्भात बुध्दीभेद करायचा. स्वत: काहीही न करता जनतेच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार पारावर बसून,चौकाचौकात बसून सुज्ञ जनतेने हाणून पाडणे गरजेचे असल्याचे मत आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केले.


Tuesday 22 May 2018

आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपुजन कार्यक्रम.


 आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याच्या अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग १४८ वरील डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजुर तांबवे रस्ता या रस्त्यावरील साजुर ते तांबवे हा सुमारे ६.३०० किलोमीटरचा रस्त्याचा भाग करणेकरीता ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या रस्त्याचे भूमिपुजनाचा कार्यक्रम आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शुक्रवार दि.२५ मे रोजी सायंकाळी ५.०० वा तांबवे याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे.
पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग १४८ वरील डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजुर तांबवे रस्ता या रस्त्यावरील साजुर ते तांबवे हा सुमारे ६.३०० किलोमीटरचा रस्त्याचे काम करण्याची या विभागातील ग्रामस्थांची सातत्याची मागणी आमदार शंभूराज देसाई यांचेकडे होती.आमदार शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून साजुर ते तांबवे या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मुरुम बाजुपट्टी, कच्चे गटर्स, मोरींची पुर्नबांधणी व रस्त्याची दोन वर्षे देखभाल व दुरुस्ती करणे या कामांचा समावेश असून या रस्त्याच्या कामाकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी एकूण ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.या कामांची प्रशासकीय मान्यता होवून निविदा होवून कामाचे आदेशही देवून ठेकेदार निश्चित करण्यात आला असून आमदार शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. २५ मे रोजी सायंकाळी ५.०० वा तांबवे याठिकाणी भूमिपुजनाचा समारंभ तांबवे व साजूर गावाच्या वतीने आयोजीत करण्यात आला आहे. भूमिपुजन होताच या कामांस प्रांरभ करण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता मानसिंग पाटील व शाखा अभियंता मोटे तसेच संबधित ठेकेदार यांना दिल्या आहेत.या भूमिपुजन कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य व रयत संघटनेचे उदयसिंह पाटील,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,पंचायत समिती सदस्या सविताताई संकपाळ, सुरेखाताई पाटील, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाे पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे शिवाजीराव गायकवाड व कोयना सहकारी बँकेचे संचालक अविनाश पाटील हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास तांबवे, साजूर भागातील ग्रामस्थांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही संयोजकांनी केले आहे.

आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण् समुहाच्यावतीने आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते जाहीर सत्कार. दौलतनगर दि. २१ (आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालय):


सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना त्यांच्या प्रशासनिक कामाची दखल घेवून नव भारत ग्रुपकडून "आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन" या सन्मानाने राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेबद्दल पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने समुहाचे प्रमुख व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा मानाची शाल,चांदीचा नारळ व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
दौलतनगर ता.पाटण येथे पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ५९ व्या पुण्यतिथी सोहळयाचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा समुहाचे प्रमुख व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,संचालिक विश्रांती जंबुरे,दिपाली पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी,सदस्या सौ.निर्मला देसाई, सौ.सिमा मोरे, माजी विरोधी पक्षनेते ॲड.दिपक जाधव,सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास,पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायुगडे,सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,पोलिस उपअधिक्षक गृह विभाग सातारा राजलक्ष्मी शिवणकर,पाटणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून उल्लेखनीय असे कार्य करीत जिल्हयातील टंचाईग्रस्त भागात त्यांनी जलयुक्त  शिवार अभियानात विशेष लक्ष दिले आहे.आज त्यांच्यामुळे कायम टंचाईग्रस्त असणा-या तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चांगली कामे झाली असून गावे पाण्याने स्वंयपुर्ण होऊन टँकरच्या संख्येत घट झाली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या आयएएस म्हणून ज्या बॅचमधून उर्त्तीण झाल्या त्या बॅचच्या त्या पहिल्या क्रमांकाच्या महिला आहेत. सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.गेले अनेक वर्षे प्रलंबीत असणारे धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या महत्वाची भूमिका बजावत आहेत.त्याचे उत्तम उदाहरण कोयना धरणातील प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले संकलन दुरुस्ती,वारसाच्या नोंदी तसेच १८ नागरी सुविधांच्या कामांना तात्काळ निधी देणेकरीता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. यासारख्या अनेक उल्लेखनीय सर्व कामांची दखल घेवून कर्तबगार स्त्रियांमध्ये सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची निवड करण्यात आली.त्या पुरस्काराचे दोन दिवसापुर्वी मुंबई येथे भव्य कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले.नवभारत ग्रुपकडून २४ विविध क्षेत्रात उललेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.त्यातील प्रशासकीय सेवा या विभागातला पुरस्कार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आला.ही कौतुकाची गोष्ट आहे.एक आदर्श आणि कर्तबगार महिला या आमचे जिल्हयाच्या जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांना त्यांच्या कामांची दखल घेवून इतक्या कमी कालावधीत "आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन" या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.ही बाब सातारा जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानाची असल्याचे सांगत आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना प्रशासकीय सेवेतील पुढील कालावधीकरीता शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी सिंघल मॅडम यांनी अजुन मोठा पल्ला गाठायचा असून राज्यस्तरावर विविध खात्यांचे सचिव तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील सचिवपदी त्यांची नियुक्ती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने समुहाचे प्रमुख व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते माझा "आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन" म्हणून झालेल्या सन्मानाबद्दल केलेला जाहीर सत्कार व सन्मान हा माझेसाठी अविस्मरणीय असल्याचे सांगत मी कायमस्वरुपी सातारा जिल्हयाच्या ऋृणात राहणार असून सातारा जिल्हयाने मला खुप काही दिले आहे हे कधीही विसरता येणार नाही.असे सांगून त्यांनी या सत्काराबद्दल आमदार शंभूराज देसाई यांचे व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे जाहीर आभार व्यक्त केले.

आमदार शंभूराज देसाईंनी त्यांचे आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांचे नावाने सुरु केलेली शिष्यवृत्ती मुलींना प्रेरणादायी.- जिल्हाधिकारी श्वेता सिंघल. कर्तबगार महिला अधिकारी यांच्या हस्ते कै.सौ.वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्तीचे वितरण



पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे सर्वसामान्य जनतेचा कळवळा आणि समाजासाठी तळमळ असणारे आमदार असून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी जास्तीचा निधी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवूणक करण्याकरीता त्यांची सातत्याची सुरु असणारी तळमळ मी जवळून पाहिली आहे.मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण त्यांच्या कुटुंबातील गरीबीमुळे थांबू नये याकरीता त्यांनी त्यांचे फौंडेशनमधून त्यांचे आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना ही एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी करुन कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ५९ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सातारा जिल्हयातील कर्तबगार महिला अधिका-यांच्या हस्ते या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले ही बाब तर समाजाकरीता आदर्शवत असल्याचे गौरवउदगारही त्यांनी यावेळी बोलताना काढले.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ५९ वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या बोलत होत्या.याप्रसंगी कार्यक्रमास पाटण मतदारसंघाचे उकृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे सोबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास,पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायुगडे,सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,पोलिस उपअधिक्षक गृह विभाग सातारा राजलक्ष्मी शिवणकर,पाटणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी,या सर्व महिला अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या,एक कर्तबगार व सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंभूराज देसाई यांना त्यांचे आजोबा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई व आज्जी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे खुप खुप आर्शिवाद आहेत. म्हणूनच आमदार म्हणून ते नवनवीन कल्पना राबवून पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अगदी तळमळीने काम करीत आहेत. आपल्या आज्जी यांचे नावाने त्यांनी पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील मुलींच्या शिक्षणाकरीता जी शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे या योजनेमुळे मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.आमदार शंभूराज देसाई यांच्यासारखे समाजामध्ये असे कमी लोक पहायला मिळतात जे समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतुन समाजाच्या प्रश्नासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करुन मग ते फौडेंशनच्या माध्यमातून असो किंवा स्वत:जवळचे असो ते देवून समाजाला अडचणीच्या काळात हातभार लावण्याचे कार्य करीत असतात.आज गरीब कुटुंबातील मुलींना केवळ त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्याकरीता म्हणून नव्हे तर सर्वसामान्य महिला किती सक्षम असू शकते याचे दर्शन ग्रामीण भागातील मुलींना घडविण्याकरीता त्यांनी आपले सातारा जिल्हयातील सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष करीत कर्तबगार अधिकारी बनलेल्या सर्व महिला अधिकारी यांना बोलवून त्यांचे हस्ते ही शिष्यवृत्ती देण्याची त्यांची कल्पना अतिशय स्तुत्य असून आमदार शंभूराज देसाई यांचेकडे समाजाप्रति एक व्हिजन आहे.त्या व्हिजनच्या माध्यमातूनच ते आमदार म्हणून मतदारसंघात कार्य करीत आहेत.याचा अभिमान वाटतो.आजच्या कार्यक्रमास सर्वस्तरातील कर्तबगार अधिकारी यांना पाचारण करुन आमदार शंभूराज देसाई यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. सातत्याने त्यांच्या मनात एक खंत होती की, रविवार सुट्टीच्या दिवशी महिला अधिकारी यांना कार्यक्रमास बोलावून त्यांचा सुट्टीचा दिवस वाया घालविला याची. परंतू आम्हा सर्व महिलांना याचे समाधान आहे की एका चांगल्या कार्यक्रमाकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी आम्हा सर्वांना बोलविले. आपण ज्यांना शिष्यवृत्ती देत आहात त्यातील किमान दोन मुली जरी हिमतीने आपल्या पायावर उभ्या राहून कर्तबगार अधिकारी झाल्या तर एक महिला म्हणून आम्हास याचा खुप अभिमान वाटेल. असे सांगून त्या म्हणाल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक पुर्ण झाले या स्मारकामध्ये गरीब कुटुंबातील मुलामुलींना ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे याकरीता सर्व सोयीनीयुक्त अभ्यासिका असावी असा आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याचा आग्रह होता तो त्यांनी पुर्ण करुन दाखविला या अभ्यासिकेचा ग्रामीण भागातील मुलांमुलींना खरोखरच चांगला उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करुन आमदार शंभूराज देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांना ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करुन उपस्थित सर्व महिला अधिकारी यांचे मानाची शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आणि कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीची माहिती दिली त्यांनतर विनीता व्यास,निलीमा धायुगडे, वैशाली नारकर,राजलक्ष्मी शिवणकर,निता पाडवी यांनी मनोगते व्यक्त करुन आम्ही कसे घडलो याचे उपस्थित शिष्यवृत्ती धारक मुलींना मार्गदर्शन केले. मनोगतानंतर मान्यवर महिला अधिकारी यांच्या हस्ते पाटण मतदारसंघातील २० मुलींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.उपस्थितांचे आभार पाटण पंचायत समितीच्या सदस्या निर्मला देसाई यांनी मानले.
चौकट:- कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे अर्धाकृती पुतळयास प्रथमत: अभिवादन.
मरळी हायस्कुलच्या प्रांगणात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे अर्धाकृती पुतळयास त्यांचे ५९ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित सर्व महिला अधिकारी यांनी प्रथमत: विनम्र अभिवादन केले. सर्व महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
चौकट:- व्यासपीठावर सर्व महिला अधिकारी यांचाच प्रभाव.
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात सर्व कर्तबगार महिला अधिकारी यांनाच आमदार शंभूराज देसाई यांनी पाचारण केल्याने व्यासपीठावर सर्व महिला अधिकारी यांचाच प्रभाव मोठया प्रमाणात जाणवला. प्रत्येक उपस्थित मान्यवर महिलांनी आपण कसे घडलो आणि मुली कशा घडू शकतात याचे मार्गदर्शन उपस्थितांना केल्याने कार्यक्रमामध्ये भावनिकता निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.

Saturday 19 May 2018

आदर्शवत वात्सल्यमुर्ती कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)


महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ५९ वा पुण्यस्मरण सोहळा व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रम रविवार दि.२० मे २०१८ रोजी दौलतनगर (मरळी) ता.पाटण येथे सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,पाटण मतदारसंघाचे उकृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास,पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायुगडे,सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी आऱती भोसले, पोलिस उपअधिक्षक गृह विभाग सातारा राजलक्ष्मी शिवणकर,पाटणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
      पाटण तालुक्यातील मरळीच्या इनामदार घराण्यातील कुलदिपक लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी अनेक आपत्तींना तोंड देवून आपल्या ध्येयाप्रत अत्यंत निष्ठेने आणि निकराने तोंड दिले.म्हणूनच ते महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयसिंहासनावरचे अनिभिषीक्त सम्राट बनले.याच सर्व श्रेय आहे.ते त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच.निपाणी जवळच्या बेनाडीच्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या क्षात्रजगतगुरुच्या कन्या वत्सलादेवी यांच्याकरीता त्यांचे वडीलांनी कोल्हापुरच्या प्रागणांत चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारं एक राजबिंड स्वरुप मनोमन हेरुन ठेवले होते.ते म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेबांनी आपल्या बुध्दीमत्तेच्या चुणकेवर अमोघ कर्तृत्वावर सा-या कोल्हापूरातील जनतेबरोबरच प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराजांचे लक्ष वेधून घेतले होतं.बेन्नाडीकरांच्या लक्ष्मीनं मरळीकर देसाईंच्या उंबरठ्यावर ठेवलेंल धान्यांच माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलानं गृहप्रवेश करावा असे शाहू महाराजांनी मनोमन ठरविले होते.आणि त्यांनी त्यांची ही इच्छा पुर्ण केली.
संसार चिमणी पाखऱ सुध्दा करतात.आपल घरटं बांधतात.काडी काडीनं कणा कणानं वाढवितात.ताईसाहेबांच्या मनाने निश्चित असा विचार केला की,देशाचा प्रपंच उभारणारे आपले महत्वकांक्षी पती स्वत:च्या घरप्रपंच्यात अडकून पडणे योग्य नाही. आणि ताईसाहेबांची हिच दूरदृष्टी खऱी ठरली आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर आपल कुशल बुध्दीमत्तेने राज्य केलं. लोकनेतेसाहेबांच्या आणि ताईसाहेबांच्या संसारवेलीवर पाच मुले आणि एक मुलगी अशी सहा फुले उमलली होती.आपल्या वडिलांच्या प्रमाणे तीही यशस्वी झाली आहेत.लोकनेते साहेबांनी राजकारणाच्या उलाढालीतून आपल्या मुलांकडे लक्ष देत ताईसाहेबांनी मुलांना मोठ करीत वडिलांप्रमाणे कर्तृत्ववान बनविले, जयसिंगराव, अशोकराव,शिवाजीराव,अरुणराव,शरदराव आणि मंगलाताई या सर्वांनी लोकनेतेसाहेब व ताईसाहेबांचे नाव उज्वल केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात १९५७ ला मंत्री म्हणून विराजमान झाले आणि ताईसाहेब या लोकनेते साहेबांबरोबर सातारा सोडून मलबार हिलवरील मेघदूत बंगल्यात गेल्या. कुणीतरी मोठं होण्याची ताईसाहेबांनी महत्वकांक्षा पार पाडली आणि लोकनेतेसाहेब महाराष्ट्राच्या अमोल कोंदणात रत्नाप्रमाणे चमकू लागले. परंतू ताईसाहेबांना या धकाधकीच्या काळात शारिरीक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. शारिरीक आजाराने ग्रासल्याने त्यांनी आपले पती आणि मुलांना सोडून इहलोकीची यात्रा संपविली.ताईसाहेबांच्या निधनानंतर लोकनेते साहेबांनी चढत्या क्रमाची मंत्रीपदे भूषविली.आणि आपल्या मुलांचे त्यांनी चांगले संगोपन केले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबरोबर संसार करताना सौ.वत्सलादेवी यांनी गोरगरीबांची सेवा करुन अनेकांचे संसार सुखी झालेले पाहण्यास धन्यता मानली.नावातच वात्सल्य असणा-या वात्सल्यमुर्ती ताईसाहेबांची पुण्याई आणि भक्ती यामुळेच लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी प्रगतीची अनेक शिखरे गाठली हे आजही कोणी विसरले नाही.कर्तृत्ववान पुरुषामागे एक कर्तृत्ववान स्त्री असते हे ताईसाहेबांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची पुण्यतिथी २० मे रोजी साजरी करण्यात येत असून त्यांचे नातू पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी आपल्या आज्जी कै. ताईसाहेब यांच्या आदर्श विचारांनी त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे याकरीता त्यांच्या नावाने गत आठ वर्षापासून पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू कुटूबांतील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता आर्थिकते अभावी अडचण येवू नये याकरीता त्यांनी कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना राबवून या मुलींचे पालकत्व घेतले आहे.आज या शिष्यवृ्त्तीचा मतदार संघातील सुमारे १०० हुन अधिक गरीब मुलींना याचा फायदा मिळत आहे.यंदाच्या वर्षी यामध्ये २० मुलींची संख्या वाढली आहे आमदार देसाई यांनी राबविलेल्या या योजनेमुळे ख-या अर्थाने कै.ताईसाहेब यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन करण्यात येत आहे.कै.ताईसाहेब यांचे ५९ व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्ताने पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र अभिवादन.
                                      मिलींद माळी 
                                  विशेष कार्यासन अधिकारी.


Monday 14 May 2018

डोंगरपठारावील गावांना दिलेल्या कामांच्या दुप्पट कामे यंदाच्या वर्षी देणार. डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळाव्यात आमदार शंभूराज देसाईंची ग्वाही. काठीटेक याठिकाणी डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळावा उत्साहात संपन्न.



गेली २६ वर्षे डोंगरपठारावरील गांवानी आणि वाडयावस्त्यांनी माजी आमदारांना पोत्याने भर-भरुन मते दिली त्या माजी आमदारांनी डोंगरपठारावरील गावांमध्ये किती विकास केला?असा सवाल करीत गेली साडेतीन वर्षे मी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करताना डोंगरपठारावरील या विभागातील सुमारे १५ ते २० गावांमध्ये कोटयावधी रुपयांची विकासकामे करुन दाखविली आहेत.डोंगरी परिषद आणि कार्यकर्ते मेळाव्याला येताना मी या विभागात केलेल्या विविध विकासकामांचा लेखी पुरावाच सोबत घेवून आलो असून यापुर्वी डोंगरपठारावरील गांवाना आणि वाडयावस्त्यांना दिलेल्या कामांच्या दुप्पट कामे यंदाच्या वर्षी देवून डोंगरपठारावरील या गांवाचा विकास साधणार असल्याची ग्वाही आमदार शंभूराज देसाईंनी डोगंरपठारावरील गांवे व वाडयांवस्त्यांकरीता आयोजीत डोंगरी परिषद व कार्यकर्ते मेळाव्यात बोलताना ग्रामस्थांना दिली.
डोंगरपठारावरील संपुर्ण गावांच्या व वाडयावस्त्यांमधील जनतेच्या समस्या व अडीअडचणींचे निरसण करणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली काटीटेक ता.पाटण याठिकाणी डोंगरी परिषद व कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.यावेळी मेळाव्यास शंभूराज डोंगरी युवा संघटनेचे संपर्क प्रमुख रामचंद्र पवार,अध्यक्ष हणमंत पिसाळ,कार्याध्यक्ष संतोष पवार,उपाध्यक्ष जगन्नाथ शिर्के,सचिव धर्मेंद्र पवार,उपसचिव राम झोरे,बबनराव माळी या प्रमुख पदाधिकारी यांचेबरोबर कुसवडे, वाटोळे, गावडेवाडी,काठी,जाईचीवाडी बोंद्री,घेरादातेगड,म्हारवंड,निवकणे व घाणबी येथील ग्रामपंचायतीचे सदस्य व शिवसेना पाटण तालुका,शंभूराज डोंगरी युवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,यापुर्वी या विभागातील डोंगरपठारावर आम्हाला बसायला घोंगड टाकलं तरी त्या ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचे प्रकार विरोधकांकडून घडत होते परंतू या विभागातील ग्रामस्थांनी विरोधकांची दडपशाही धुडकारुन निर्भिड झाल्यामुळे कोटयावधी रुपयांची विकासकामे पठारावर होवू शकली.गत साडेतीन वर्षात मला या विभागातील असो वा तालुक्यातील प्रत्येक विभागातील गांवामधून असो विधानसभेच्या निवडणूकीला किती मते पडली याचा कधीच विचार न करता ज्यां ज्या गांवानी माझेकडे कामे मागितली त्या त्या गावांना आणि वाडयावस्त्यांना कामे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.आज पठारावर येताना विकास घेवूनच आलो आहे.यापुर्वीचे माजी आमदार कधी कुठल्या भागात जनतेच्या दारात माझेकडे विकासकामे मागा म्हणून आल्याचे पठारावरील जनतेने कधी अनुभवले तरी आहे काय? पठारावर राहू दया परंतू तालुक्यातील जनतेच्या पुढे मला विकासकामे मागा म्हणूनही ते कधी गेल्याचे एैकिवात नाही असे सांगून ते म्हणाले,माजी आमदारांकडे काम मागायला जायचे म्हटंल्यावर गावेच्या गावे घेवून वाडयाच्या पाय-या चढून जावे लागायचे, मग पुढारी मध्यस्थी करायचा तो आत जावून माजी आमदारांना भेटून यायचा जनतेची भेट झाली न झाली परंतू तोच मध्यस्थी पुढारी तुमचे काम झाले म्हणून सांगत यायचा प्रत्यक्षात मात्र काहीच काम पदरात पडायचे नाही अशी अवस्था यापुर्वी होती.यामुळे आपल्या सर्वांची २५ वर्षे वाया गेली.आज मी आपल्या समस्या जाणून आणि समजुन घेवून त्या सोडविण्यासाठी तुमच्या दारात आलो आहे.आपण मागेल ती कामे देवू पण भविष्यात कुणाच्या दबावाला बळी पडू नका. दडपशाहीचा जमाना गेला.आता केवळ हाक दया.आमदारांकडे काम मागायला कशाला गेला असे जरी कुणी विचारले तरी घाबरू नका कारण जे तुमच्यावर दबाव आणणार आहेत त्यांच्या हातात देण्यासारखे असताना ते आपल्याला काही देवू शकले नाहीत आता त्यांच्या हातात देण्यासारखे काही नसताना ते आपल्याला काय देणार आहेत? याचा सारासार विचार पठारावरील ग्रामस्थांनी करावा.जो देवू शकतोय त्याची पाठराखण केल्यास आपल्या पदरात बरच काही पडणार आहे. परंतू जो काहीच देवू शकत नाही त्याची पाठराखण करुन काही एक उपयोग होणार नाही हे ग्रामस्थांबरोबर महिला व युवक वर्गाच्याही आता चांगलेच लक्षात आले आहे.राहिलेली विकासकामे पुर्ण करण्याकरीता मी कटीबध्द असून गत तीन वर्षात जेवढी कामे डोंगरपठारावर झाली आहेत येत्या वर्षात त्या कामांच्या दुप्पट कामे पठारावरील उर्वरीत राहिलेल्या गावामध्ये व वाडयावस्त्यांना देण्यात येतील अशी ग्वाही देत या विभागातील घाणबी येथील ग्रामदैवताचे देवालयाकरीता निधी देतो म्हणून सांगून विरोधकांनी उलघडण्यास सांगितलेले देवालयाचे काम मी आमदार नसताना देखील पुर्ण करुन दिले. तसेच मरड धनगरवाडी येथील पुलाची मोठी गैरसोय विरोधकांना इतक्या वर्षात दुर करता आली नाही मी ते काम करुन दाखविले आज हे काम सुरुदेखील झाले असल्याचे सांगून अपेक्षेप्रमाणे पठारावरील गांवाना कामे देण्याचा शब्द त्यांनी शेवठी बोलताना ग्रामस्थांना दिला.उपस्थितांचे स्वागत बबनराव माळी यांनी केले व आभार रामचंद्र पवार यांनी मानले.
चौकट:- पाटण तालुक्यात पहिल्यांदाच डोंगरी परिषद घेतल्याने डोंगरपठारावरील जनतेने मानले आमदार शंभूराज देसाईंचे आभार.
डोंगरपठारावरील लोकांच्या समस्या जाणून,समजून घेवून त्या सोडविण्यासाठी यापुर्वीच्या माजी आमदारांनी कधीच डोंगरी परिषद किंवा कसला मेळावा घेतला नाही.पाटण तालुक्यात पहिल्यांदाच आमदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली पठारावरील जनतेच्या समस्या सोडविण्याकरीता डोंगरी परिषद घेतल्याने डोंगरपठारावरील जनतेने आमदार शंभूराज देसाईंचे जाहीर आभार मानून डोंगरी परिषदेचे कौतुक करीत पुर्वीच्या माजी आमदारांनी आमची आठवण मतापुरतीच ठेवली असल्याचा टोलाही डोंगरी परिषद संपलेनंतर लगाविला.

Friday 11 May 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान - आमदार शंभूराज देसाई चोपडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते उदघाटन.



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्रयासाठी अनेक लढयातून लढत राहिले.शोषित वंचितांची अंधकाराच्या गुहेतून सुटका करण्याचे काम त्यांनी केले.त्यांचे लढे हे सर्वस्तरातील लोकांसाठी होते,त्यांचे लढे परिवर्तनासाठी होते.त्यांनी वृत्तपत्रे प्रकाशित करुन दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्रयाचा पुरस्कार मिळवून दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान ठरले.त्याच संविधानानुसार देशाचा कारभार आज सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
चोपडी ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे स्थानिक विकास निधीतून आणि बौध्द विकास तरुण मंडळ,चोपडी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२७ व्या जयंती सोहळयाचे औचित्य साधून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.दिपाली जाधव,बौध्द विकास तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष वीर,उपाध्यक्ष सत्यवान वीर,संपत माने, रवींद्र वीर,बाळासाहेब नांगरे,तात्यासो जाधव,जयवंत जाधव,श्रीरंग जाधव,राजाराम जाधव,नाथासो जाधव,बौध्द विकास तरुण मंडळातील चंद्रकांत वीर,वैभव वीर,नितीन वीर,मधूकर वीर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारताच्या सीमारेषा ओलांडत जगाच्या नकाशावर झळकले. सामाजिक विषमता दुर करुन शोषित, वंचीत, दलित, उपेक्षिंताची सामाजिक आर्थिक उन्नती व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला.सामाजिक समतेचा लढा उभारणारे डॉ.बाबासाहेब हे केवळ भारतीय स्वातंत्रय लढयाचे नव्हे तर सर्वस्तरातील लोकांच्या लढयाचे सरसेनापती होते म्हणूनच त्यांना सर्वसामान्यांचे कैवारी असे अभिमानाने आणि स्वाभिमानाने संबोधले जाते भारताच्या स्थापनेसाठी त्यांचे योगदान महत्वपुर्ण आणि मोलाचे ठरले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानातून केवळ दलितांचेच हित न साधता सर्वस्तरातील सर्व सामान्य जनतेचे हित साधण्याचे काम त्यांनी केले.स्वातंत्रय, समता, बंधूता, न्याय यावर आधारित संविधानातून एक व्यक्ती एक मत याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला मतदानाचा हक्क त्यांनी मिळवून दिला.म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रभाव संपुर्ण जगभर दिसून येतो असे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले.
प्रांरभी आमदार शंभूराज देसाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२७ व्या जयंती सोहळयानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. बौध्द विकास तरुण मंडळाच्या वतीने आमदार शंभूराज देसाई यांचा मानाची शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान दुसरे दिवशी या सभागृहात तथागत भगवान गौतम बुध्द यांचा जयंती उत्सव व मुर्ती स्थापना सोहळा साजरा करण्यात आला.


मतदारसंघाच्या कानाकोप-यात साडेतीन वर्षात विकास पोहचविला. आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.



२०१४ च्या निवडणूकीत पाटण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून देत मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करीत मतदारसंघात गेली अनेक वर्षे प्रलंबीत राहिलेला विकास पुर्णत्वाकडे नेणेकरीता गत साडेतीन वर्षात मी कशोसीने प्रयत्न केले आणि पुर्णत्वासही नेले गत साडेतीन वर्षात मतदारसंघाच्या कानाकोप-यात विकास पोहचविण्याचे मी प्रामाणिक कार्य केले असून मतदारांनी माझे या कार्याला भरघोस अशी साथ दिली असल्याने आमदार म्हणून काम करताना समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शिद्रुकवाडी पोहोच रस्ता या १ कोटी ७१ लाख १० हजार रुपये खर्चाच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सीमा मोरे,माजी सदस्य रघुनाथ माटेकर,शिवदौलत बँकेचे संचालक मधूकर पाटील,शिद्रुकवाडी सरपंच तात्यासो डुबल, काढणे सरपंच अंजली पाटील,उपसरपंच अमित पाटील,खळे सरपंच संदिप टोळे,आसवलेवाडी सरपंच सिताराम आसवले, आनंदराव पाटील,संजय शिद्रुक आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिद्रुकवाडी काढणे, खळे व कोरीवळे येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,काढणे,खळे,व कोरीवळे यांच्या वाडया असणारे वरचे शिद्रुकवाडी हे गाव पठारावर वसले आहे.या गावांच्या तिन्ही वाडयां आपल्या विचारांच्या नाहीत म्हणून विरोधकांनी जाणिवपुर्वक अनेक वर्षे या गावाचा व वाडयांचा विकास केला नाही.नाडे ढेबेवाडी मार्गाच्या काही कोस अंतरावर असणारे गांव विरोधकांना आतापर्यंत का दिसले नाही.या गांवाला इतक्या वर्षे विरोधक का रस्ता देवू शकले नाहीत.असा प्रश्न करुन ते म्हणाले, शिद्रुकवाडी ग्रामस्थांची मागणी होती आमचा अंतर्गत रस्ता करा तो गतवर्षी आपण केला या रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमांतच गतवर्षी येथील ग्रामस्थांनी माझेकडे आमचे गावचा प्रमुख रस्ता करुन देण्याची मागणी केली होती १० ते १५ लाख रुपयांत हा रस्ता होणार नाही त्याकरीता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गतच या रस्त्याचे काम घेणे गरजेचे असल्याने सन २०१७-१८ च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शिद्रुकवाडी गावपेाहोच रस्त्याचे काम प्रस्तावित करुन त्यास मान्यता घेतली व या रस्त्याच्या कामांकरीता सुमारे १ कोटी ७१ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला. येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द एक वर्षाच्या आत मी पुर्ण केला.अशाचप्रकारे मतदारसंघाच्या विविध भागामध्ये गावे, वाडयावस्त्या जोडणारे रस्ते करण्याचे काम प्रथम प्राधान्याने मी गेल्या साडेतीन वर्षात हाती घेतले आणि ते पुर्णत्वाकडे नेण्याचे काम करीत आहे.सातारा जिल्हयात सर्वाधिक निधी पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांकरीता आणण्यात मला गत साडेतीन वर्षात यश मिळाले शिद्रुकवाडी या तिन्ही वाडयांनी मला नेहमीच सहकार्याची भूमिका घेतल्याने या वाडयांनाही विकासाच्या बाबतीत झुकते माप देण्याचे काम मी केले आहे व करीत आहे.याचे मला समाधान वाटत असून आज मतदारसंघात जाईल त्या भागात विविध विकासकामे सुरु असल्याचे आपणांस दिसून येत आहेत. विरोधकांना आपली कामे दिसत नाहीत ती त्यांना दिसावीत अशी अपेक्षाही करणे चुकीचे आहे.निवडणूका जवळ आल्या की मतदारांचा बुध्दीभेद करण्याचे काम विरोधक करणार हे ओळूखनच मतदारसंघातील मतदारांनी आपआपल्या गांवामध्ये वाडीवस्तीमध्ये याअगोदरच्या लोकप्रतिनिधींनी एवढया वर्षे कोणती विकासकामे केली आणि आताच्या लोकप्रतिनिधींनी गेल्या साडेतीन वर्षात कोणकोणती विकासकामे केली आहेत आणि सुरु आहेत याचा सारासार विचार करुन मतदारांनी दोन लोकप्रतिनिधींच्या कामांतील तुलना करावी असे आवाहन करुन ते म्हणाले,गत साडेतीन वर्षात विविध गांवामध्ये विविध विकासकामे करताना या गांवात आपल्याला किती मतदान पडले भविष्यात किती पडेल याचा विचार न करता जनतेची असणारी अडचण ओळखून कामे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे.मताचे राजकारण विकासकामात आणून आतापर्यंत कोणतेही विकासकाम गावांना आणि वाडयांना दिले नाही.विरोधकांच्या हातात आता देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे मतदारसंघातील गांवानी आणि वाडयावस्त्यांनीही आपला विकास कोण साधू शकते याचाही विचार करुन भविष्यातील आपला लोकप्रतिनिधी निवडावा असेही आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत संजय शिद्रुक यांनी करुन आभार मानले.
चौकट:- एकदाच मागितले पावणेदोन कोटीचे काम दिले. संजय शिद्रुक
इतक्या वर्षे आमच्या वाडयांना पक्का रस्ता बघायला मिळाला नव्हता आम्ही ग्रामस्थांनी मागील वर्षी कार्यक्रमात आमचा रस्ता करा अशी मागणी एकदाच आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचेकडे केली.रस्त्याचे काम एकदाच मागितले तर आमदारसाहेबांनी १० किंवा १५ लाख नाहीतर पावणेदोन कोटी रुपयांचे काम आम्हाला दिले.असे संजय शिद्रुक यांनी सांगितले.

Saturday 5 May 2018

२०१९ चा आमदार, गावागावात झालेली विकासकामे पाहून निवडा. आमदार शंभूराज देसाईंचे मतदारसंघातील मतदारांना आवाहन.



मतदारसंघाचा आमदार हा मतदारसंघातील जनतेची सुखदुख्: जाणणारा आमदार पाहिजे मतदारसंघातील जनतेला त्यांच्या मुलभूत सुविधा मिळवून देण्याकरीता त्या आमदारांनी आपली आमदारकीची राजकीय ताकत वापरली पाहिजे नाहीतर आपल्याकडे एकदा मते मागून गेलेले परत पाच वर्षे आपल्याकडे फिरकण्याचे नावच घेत नाहीत मग जनतेचे प्रश्न सुटणार तरी कसे याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक आहे.ही निवडणूक ते ती निवडणूक आपल्या दारात येणा-या पुढा-यांना पाच वर्षात तुम्ही आमच्यासाठी केले काय? हा प्रश्न मतदारांनी विचारणे गरजेचे आहे. २०१४ च्या निवडणूकीत मी मते मागायला आलेनंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनांची ७० ते ८० टक्के पुर्तता या तालुक्याचा आमदार म्हणून मी केली आहे.त्यामुळे येणा-या २०१९ चा आमदार हा पाटण तालुक्यातील मतदारांनी त्यांच्या गांवामध्ये झालेल्या विकासकामे पाहूनच निवडावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गुढे ते शिबेवाडी पाटीलवाडी या दोन कोटी १३ लाख २३ हजार रुपये खर्चाच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सीमा मोरे,माजी सदस्य रघुनाथ माटेकर, विश्रांत कदम (सर),शामराव कदम(गुरुजी),कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,आबासाहेब भांडवलकर,शिवसमर्थचे संस्थापक ॲड.जनार्दन बोत्रे,गणेश महाडिक,सुभाष महाडिक (शेठ),आबासाहेब शिबे,सुरेश पवार,आत्माराम पाचुपते,खळे सरपंच संदिप टोळे,शोभा बोत्रे,स्नेहल पाटील,शंकर कदम आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले, विधानसभेच्या असो वा इतर कोणत्याही निवडणुकीत कोणत्या गावातून किती मते मिळाली,याचा विचार न करता जिथे गरज आणि मागणी आहे,तिथ तिथ विकास कामे पोचविण्याचा दृष्टिकोन माझा पूर्वीपासूनच आहे. विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान व त्यानंतर येथील काळंबादेवी कलशारोहन कार्यक्रमप्रसंगी आलेनंतर येथील ग्रामस्थांनी गुढे ते शिबेवाडी ते पाटीलवाडी या रस्त्याबाबत माझेकडे मागणी केली होती ग्रामस्थांना हा रस्ता लवकरात लवकर केला जाईल असे आश्वासन मी दिले होते.गतवर्षी २० लक्ष रुपयांचा निधी येथील कामांसाठी दिला शिबेवाडीचे रस्त्याचे अंतर हे जास्त असल्याने हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गतच प्रस्तावित करुन याकरीता निधी मंजुर करणे गरजेचे होते यामध्ये वनविभागाची थोडीफार अडचण आली परंतू यावर अधिका-यांना बोलावून ही अडचण दुर करीत या रस्त्याचे काम मंजुर केले ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचे मोठे समाधान मला आहे. असे सांगून ते म्हणाले कोणतीही निवडणूक आली की अनेकजण अचानक उगवतात.जनतेचा बुध्दीभेद करतात. पोळी भाजत नाही,म्हंटल्यावर शेवटच्या चार दिवसांत चिरीमिरीचा वापर करतात. अनेक वर्षे तालुक्यात विरोधकांकडून अशी दुकाने मांडली गेली आहेत.येणा-या निवडणूकीत ही अशाचप्रकारे दुकाने मांडली जातील परंतू या खेपेला आपल्याला त्यांची हि दुकाने येथील मतदारांनीच बंद करावी लागतील. आम्ही विकास केला असे सांगणारे माजी आमदार यांना तब्बल २१ वर्षे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि काही वर्षे मंत्री राहण्याची संधी मिळाली होती त्या माजी आमदारांना आणि मंत्रयांना गुढे ते शिबेवाडी या रस्त्यांचे दैन्य का दिसले नाही, माजी आमदारांच्या आणि माझ्या आमदारकीची फक्त पाच वर्षांच्या  कारकिर्दीची तुलना मतदारसंघातील मतदारांनी करावी, जो विकास कामांमध्ये सरस ठरेल त्यानेच तालुक्याचे नेतृत्व करावे, अशी भूमिका आता जनतेनेच घ्यायला पाहिजे, जे सत्ता असताना काही करु शकले नाहीत, ते आता हातात काहीच नसताना कसला विकास करणार आहेत ? जनतेसमोर जायला त्यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही.२०१४ पासून तीन वर्षात ३१० कोटींची विकास कामे करता आली सत्ताधारी सरकारमुळे मोठया निधी हा सातारा जिल्हयात सर्वाधिक पाटण तालुक्याला मिळाला आहे.यापूर्वी २१ वर्षे आमदार व ५ वर्षे मंत्री असणा-यांमुळे आपला किती विकास झाला हे मतदारांनी तपासून पहावे. असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.याप्रसंगी डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे भाषण झाले. आमदार देसाई यांचा मानपत्र देऊन सत्कार केला.काढणे फाटा येथून दुचाकी रॅली काढून आमदार देसाई यांना मिरवणूकीने कार्यक्रमस्थळी नेले. उपस्थितांचे स्वागत संदीप डाकवे यांनी करुन आभार मानले.
चौकट:- श्रेय घेण्याची कुणीही गरज नाही.
शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ते सुचविण्याचा आणि ती मंजुर करुन आणण्याचा अधिकार शासनाने तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना दिला आहे. या रस्त्याचे काम कुणाच्या शिफारशीवरुन शासनाने मंजुर केले आहे हे या गावातील ग्रामस्थांना चांगलेच माहिती असून कुणी या कामांचे श्रेय लाटण्यासाठी येवू नये त्यांना या गावातील ग्रामस्थच थारा देणार नाहीत असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.

आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते महिंद धरणाच्या विशेष दुरुस्तीचे कामाचा शुभारंभ. आमदार शंभूराज देसाईंनी सांडवा दुरुस्तीच्या कामांस आणला ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी.



महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत कार्यरत असणा-या पाटण तालुक्यातील महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाचा सांडवा नादुरुस्त झाल्याने सांडव्यास मोठया प्रमाणात गळती लागली होती.यामुळे या सांडव्यातून मोठया प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने या सांडव्याच्या दुरुस्तीकरीता पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचा जलसंपदा विभाग व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा करुन या दुरुस्तीच्या कामांकरीता ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते महिंद धरणाच्या सांडव्याचे विशेष दुरुस्तीचे कामांचा शुभारंभ दि.०१ मे,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आला.
याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते शुभारंभ कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे,उपअभियंता दाभाडे, कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी, वसंतराव कदम, बबनराव भिसे , नारायण कारंडे, शिवाजीराव शेवाळे, टी.डी.जाधव,  जयवंतराव जानुगडे,पोपटराव पाटील,मनोहर निकम,नाना साबळे दत्तात्रय कदम,सुनिल देसाई,उत्तमराव बोर्गे,सळवे सरपंच शंकर कुंभार,किसन घाडगे व नवनाथ बोर्गे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटण तालुक्यात महिंद येथे शासनाच्या जलसंपदा विभागातंर्गत व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने बांधलेल्या लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याची दुरावस्था झाली असल्याने तलावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तलावातून होणारी गळती थांबविणेकरीता शासनाच्या जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास या तलावाची विशेष दुरुस्ती करणेसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा याकरीता मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने सन २०१५ पासून शासनाच्या जलसंपदा विभागाकडे प्रयत्न करीत आहे.या कामांकरीता निधी मिळणेसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांना प्रत्यक्ष भेटून दि.१३.०३.२०१५ व दि.१५.०७.२०१६ रोजी पत्रव्यवहारही केला होता तर दि.१६.१२.२०१६ रोजी यासंदर्भात नागपुरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला आलेल्या तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी देणेबाबतची मागणी केली होती.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांनी या तारांकीत प्रश्नास उत्तर देताना आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीवरुन महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे आश्वासन दिले होते.त्यानुसार राज्याच्या जलसंपदा विभागाने महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबविणे व या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांस आवश्यक असणारा ७६.४१ लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला असून महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ,सातारा यांचे अखत्यारित लघू पाटबंधारे विभाग,सातारा यांचेकडून महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाच्या सांडव्याच्या विशेष दुरुस्तीच्या कामांची निविदा काढून ठेकेदारही निश्चित करण्यात आला आहे. सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजयराव घोगरे यांचे मार्गदर्शनाखाली येत्या महिन्याभरात या सांडव्याच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागेल असे अधिकारी यांचेकडून सांगण्यात येत आहे.या कामांमध्ये सांडवा,पुच्छ कालवा मजबुतीकरण करणेकरीता पुर्ण सांडव्यास संधानकामध्ये जॅकेटींग करणे,पुच्छ कालव्यामध्ये चेकवॉल बांधणे,सर्व्हीस गेटजवळ मातीचा भराव करणे व तलावाच्या वरील बाजूचे अश्मपटल दुरुस्ती करणे या कामांचा समावेश करण्यात आला आहे.महिंद येथील लघू पाटबंधारे तलावामधून होणारी पाण्याची गळती थांबलेनंतर या तलावामध्ये मोठया प्रमाणात पाणीसाठा होवून या पाण्याचा उपयोग महिंदसह, सणबूर, बाचोली, बनपुरी,भालेकरवाडी,शितपवाडी,जानुगडेवाडी,मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द या गांवाना व वाडयांना होणार असल्याचेही शेवठी बोलताना सांगितले.प्रारंभी लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांनी आमदार शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देवून याठिकाणी स्वागत केले.

Friday 4 May 2018

आमदार शंभूराज देसाईंमुळे घाटेवाडी गावातील ८४ कुटुंबाचा नवीन घरांमध्ये वास्तूप्रवेश. पुर्नवसित गावठाणातील ८४ कुटुंबांना आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते घरांचा ताबापत्र प्रदान.



सन २००५-२००६ ला झालेल्या अतिवृष्टीत डोंगरावरील जमिन खचलेल्या तारळे विभागातील घाटेवाडी या गांवातील एकूण ९८ घरांचे याच गावाच्या वर योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे शिवधनुष्य उचलणारे महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट संसदपटु पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामूळे मंजुर झालेल्या घाटेवाडी पुर्नवसन गावठाणात घाटेवाडी गावांतील ८४ कुटुंबाचा नवीन घरांमध्ये वास्तूप्रवेश करण्याचा योग जुळुन आला.या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सुरवातीपासून शेवठपर्यंत झोकून देवून काम करणारे आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज दि.०१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने घाटेवाडी या गांवातील ८४ कुटुंबांना पुनर्वसीत गावठाणांतील घरांचा ताबापत्र प्रदान करण्याचा सोहळा तहसिल कार्यालय,पाटण येथे संपन्न झाला.
 सन २००५-२००६ च्या अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील तारळे विभागात मालोशी गावाच्या वर डोंगरपठारावर डोंगरद-यात सातारा तालुक्याच्या हद्ीला लागून वसलेल्या व डोंगरावरील जमिन खचल्यामुळे बाधित झालेल्या घाटेवाडी गांवातील बाधितांचे पुर्नवसन आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे पुर्ण झाले या गांवातील या ८४ कुटुंबांना त्यांच्या घरांचा ताबा देण्याचा सोहळा आमदार शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत दि.०१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तहसिल कार्यालय,पाटण याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते या बाधित ८४ कुटुंबांतील कुटुंबप्रमुखांना पुनर्वसित गावठाणातील घराचे ताबापत्राचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, नायब तहसिलदार विजय माने,निवासी नायब तहसिलदार राजेश जाधव हे अधिकारी उपस्थित होते.
सन २००५-२००६ ला पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील घाटेवाडी आणि चेवलेवाडी या दोन गांवातील जमिनी खचण्याचे प्रकार घडले होते त्यामुळे या गांवातील घरांना मोठा धोका निर्माण झाल्याने तात्काळ तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख यांना या विषयासंदर्भात तात्काळ बैठक घेवून या दोन्ही गांवाचे तातडीने योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यास निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासरावजी देशमुख यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून तात्काळ या दोन्ही गांवाच्या पुनर्वसनास मान्यता देवून निधी उपलब्ध करुन दिला होता.सन २००७ साली या दोन्ही गांवाचे पुर्नवसनाच्या कामांस सुरुवात झाली यातील चेवलेवाडी गांवाचे पुनर्वसन तात्काळ होवून या गांवातील बाधित सर्व कुटुंबे ही नवीन पुर्नवसित गावठाणांत वास्तव्यास देखील गेली मात्र घाटेवाडी गांवाचे पुर्नवसनाचे नवीन गावठाणांचे काम पुर्णत्वाकडे जावून देखील येथील बाधित नवीन गावठाणात वास्तव्यास गेली नव्हती. दरम्यान २००९ साली आमदार शंभूराज देसाई यांचा विधानसभेत पराभव झालेनंतर २००९ ते २०१४ या कालावधीत या पुनर्वसित गावठाणांसंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याने या ८४ कुंटुंबांचे पुनर्वसन याठिकाणी होवू शकले नाही मात्र २०१४ ला पुनश्च: आमदार शंभूराज देसाई हे आमदार झालेनंतर त्यांनीच पुढाकार घेवून घाटेवाडी गांवाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आपण जे शिवधनुष्य उचलले होते ते पुर्ण करायचेच हा चंग बांधून यासंदर्भात बाधितांच्या संबधित अधिका-यांसमवेत दोन तीन बैठका घेवून हा पुर्नवसन गावठाणातील प्रश्न मार्गी लावला व या बाधितांना वास्तव्यास जाणेकरीता त्यांनी पुर्नविसित गावठाणांतील घराचे ताबापत्र देखील दिले. व पुनर्वसित गावठाणांतील काही घरामध्ये करण्यात आलेल्या सुविधांची मोडतोड झाली आहे त्या सुविधा तात्काळ दुरुस्त करुन देणेसंदर्भात आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणणेकरीता मी कटीबध्द असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी सांगितले असून तात्काळ प्रातांधिकारी व तहसिलदार यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून या सुविधांचे कामांचे अंदाजपत्रक तयार करुन ते सादर करण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाईंनी दिल्या आहेत.
आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते दगडू जाधव, जगू घाटे, सिताराम घाटे, मारुती जाधव, लक्ष्मण घाटे, रामचंद्र जाधव, पांडू घाटे, कलाबाई घाटे जाधव, रामचंद्र जाधव, रघुनाथ घाटे, हणमंत भोसले, लक्ष्मण भोसले, गणपत जाधव, श्रीपती जाधव, विष्णू जाधव, बाळू जाधव, किसन जाधव, पांडू घाटे, विष्णू घाटे, ज्ञानदेव घाटे, बाळकू घाटे, गणपत घाटे, कोंडीबा जाधव, लक्षमण घाटे, बंडू घाटे,गणपत जाधव, यशवंत जाधव, खाशाबा जाधव, कोंडीबा घाटे, शामराव जाधव, मारुती घाटे, श्रीरंग साळूंखे, जोतिराम घाटे, मारुती चव्हाण, रामचंद्र चाळके, कांताबाई घाटे, लिंबाजी घाटे, दगडू जाधव, यशवंत घाटे, बाळु घाटे, खाशाबा घाटे, धोंडीराम घाटे, लक्ष्मण घाटे, शिवाजी घाटे,हौसाबाई घाटे, चंदु घाटे, गुणबाई घाटे, गणपत घाटे, रामचंद्र दुधाने,लक्ष्मण दुधाने, धोंडीबा घाटे, रामचंद्र घाटे, मारुती घाटे, श्रीपती घाटे, लक्ष्मण जाधव,शंकर जाधव, लक्ष्मण जाधव, तात्याबा घाटे, कोंडीबा घाटे, मानाजी जाधव, श्रीरंग जाधव, नारायण जाधव, राजाराम जाधव, सर्जेराव जाधव, शंकर जाधव,जालिंदर घाटे, बंडू घाटे, खाशाबा जाधव, जगन्नाथ घाटे, सर्जेराव घाटे, यशवंत जाधव, श्रीपती जाधव,शंकर जाधव,कोंडीबा जाधव, बबन जाधव,राजाराम जाधव,बाळु जाधव,बजरंग जाधव, उत्तम जाधव, गुलाबराव जाधव, साहेबराव जाधव, हंबीरराव जाधव, आनंदा साळूंखे, ज्ञानदेव साळूंखे या ८४ कुटुंबप्रमुखांना घराचे ताबापत्र देण्यात आले.
चौकट :- मी दोन गावे वसविली माजी आमदारांनी एक घर तरी वसविले का? आमदार शंभूराज देसाई.
सन २००५-२००६ च्या अतिवृष्टीत जमीन खचलेल्या चेवलेवाडी आणि घाटेवाडी या दोन गांवाचे आमदार म्हणून पाच वर्षातच मी योग्य ठिकाणी पुनर्वसन करुन घेतले. चेवलेवाडी गावातील ७९ कुटुंबे आणि घाटेवाडी गावातील ८४ कुटुंबे यांचे पुनर्वसन होणेकरीता सातत्याने प्रयत्न केले. चेवलेवाडीचे पुर्नवसन झाले परंतू २००९ ला माझेनंतर आमदार झालेल्या माजी आमदारांना घाटेवाडी पुनर्वसनांची एक वीटही रचता आली नाही.आमदार म्हणून मी दोन गांवे वसविली माजी आमदार व मंत्री राहिलेल्यांनी एक घर तरी वसविले का ? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी उपस्थित केला आहे.

Thursday 3 May 2018

महिंद ल पा.तलाव गाळमुक्त करणेकरीता तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ. आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते गाळ काढण्याचे कामाचा शुभारंभ. शेतक-यांनी गाळ नेण्याचे आमदार देसाईंकडून आवाहन.


       महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत कार्यरत असणा-या पाटण तालुक्यातील महिंद येथील लघू पाटबंधारे तलावाचे काम ब-याच वर्षापुर्वी करण्यात आले असून या तलावांमध्ये मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठवण क्षमता कमी होत होती दरम्यान राज्य शासनाने गाळमुक्त धरणे या योजनेतंर्गत धरण,तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही योजना सुरु केली असून या योजनेतंर्गत महिंद लघू पाटबंधारे तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ करण्यात आला असून गाळ काढण्याचे कामांचा शुभारंभ दि.०१ मे,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ही योजना पाटण तालुक्यात राबविणारे पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे,उपअभियंता दाभाडे,कारखान्याचे संचालक विकास गिरीगोसावी,वसंतराव कदम,बबनराव भिसे,नारायण कारंडे,शिवाजीराव शेवाळे, टी.डी.जाधव, जयवंतराव जानुगडे, पोपटराव पाटील,नाना साबळे, दत्तात्रय कदम,सुनिल देसाई,सळवे सरपंच शंकर कुंभार,किसन घाडगे,यंत्रणा पुरविणारा ठेकेदार महेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
       मागील १५ दिवसापुर्वी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता विजयराव घोगरे,पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांची संयुक्त अशी बैठक पाटण येथे घेतली होती. या बैठकीत तात्काळ या कामांना सुरुवात करावी अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी क़ृष्णा खोरे व सिंचन मंडळाच्या अधिका-यांना केल्या होत्या. त्यानुसार दि.०१ मे,महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने याचा प्रारंभ करण्यात येवून याचा शुभारंभही आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
      यावेळी आमदार शंभूराज देसाई यांनी येत्या दोन महिन्यावर पावसाळा येवून ठेपला असून शासनाने पुढाकार घेवून गाळमुक्त धरणे व तलाव करण्याचे धोरण राज्य शासनाने आखले आहे. या योजनेमध्ये धरण, तलावातील गाळ काढणे व पाणी साठवण क्षमता वाढविणे ही कामे हाती घेतली आहेत याकरीता आवश्यक असणारी यंत्रणा पुरविण्याचे काम सिंचन मंडळ व महसूल विभागामार्फत करण्यात येणार आहे. धरणातील व तलावातील गाळ काढणेकरीता लागणारे पोकलॅन्ड, जेसीबी ही यंत्रणा सिंचन मंडळ व महसूल विभागाकडून देण्यात येणार असून याकरीता लागणारे इंधनही शासन देणार आहे. शेतक-यांनी आणि ज्यांना आवश्यक आहे अशा व्यक्तींनी केवळ धरणातून आणि तलावातून काढण्यात आलेला गाळ उचलून नेण्याचे काम करावयाचे आहे.ज्या शेतक-यांना हा गाळ आवश्यक आहे त्यांनी तो नेण्यात यावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी या विभागातील शेतक-यांना केले असून सोन्यासारखे धान्य पिकविण्याची ताकत धरणातील आणि तलावातील गाळामध्ये असून शासनाने राबविलेल्या या योजनेचा लाभ शेतक-यांनी घ्यावा. विभागातील शेतक-यांनी हा गाळ नेणेकरीता आपण आवाहनही करीत असून या योजनेमध्ये महसूल विभागाच्या प्रांताधिकारी व तहसिलदार यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांचे मंडलाधिकारी तसेच तलाठी यांना या कामांमध्ये हातभार लावण्याच्या तसेच अशाचप्रकारे चाफळ विभागातील डेरवण या तलावातीलही गाळ काढण्याकरीता महसूल विभागामार्फत प्रशासकीय मान्यता देवून या तलावातील गाळ काढण्यास लवकर सुरुवात करण्याच्या सुचना प्रांताधिकारी व तहसिलदार यांना केल्या आहेत असेही आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना सांगितले.
    चौकट:- मी नाही माजी आमदारांनी झोपा काढल्याने तलावातील गाळ निघाला नाही.
           पाटणच्या माजी आमदारांनी राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात गाळ काढणेसंदर्भात इतक्या वर्षे झोपा काढल्या का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंना केला होता. यासंदर्भात त्यांना विचारले असता मी जागा आहे म्हणूनच या तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली परंतू इतक्या वर्षे माजी आमदारांनीच झोपा काढल्याने महिंद असो वा डेरवण असो या तलावातील गाळ काढणे त्यांना जमले नाही असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी बोलताना लगाविला.


Wednesday 2 May 2018

विकासकामातूनच मतदारसंघाचा आमदार ठरला पाहिजे: आमदार शंभूराज देसाईंचे प्रतिपादन.


मतदार संघातील एखाद्या गावाने मतदान दिले नाही म्हणून त्या गावात विकासकाम द्यायचे नाही अशी माझी भूमिका कधीच नव्हती आणि नाही.जनतेने निवडून दिलेला आमदार हा संपूर्ण मतदारसंघाचा असतो. त्यामुळे तालुक्याच्यादृष्टीने विकास कामांत सातत्य राखणे हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते.तेच कर्तव्य गत साडेतीन वर्षे मी करीत आहे.गत साडेतीन वर्षात कोटयावधी रुपयांचा निधी पाटण तालुक्याच्या विकासाकरीता शासनाच्या तिजोरीतून आणला आहे.पाटण तालुक्याच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवून येणा-या निवडणूकीत विकासकामांचा लेखाजोखा घेवूनच मी मतदारांपुढे मते मागायला जाणार आहे.विकासकामांची तुलना होणे गरजेचे असून काम करणा-या लोकप्रतिनिधीलाच मतदारांनी ताकत देणे गरजेचे असून मतदारसंघाचा आमदार हा विकास कामातूनच ठरला पाहिजे,असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आबदारवाडी ता.पाटण गावपोहोच रस्त्याचे मंजुर करण्यात आलेल्या कामांचे भूमिपुजन तसेच अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते घेण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या रस्त्याच्या कामांसाठी आमदार शंभूराज देसाई यांनी १ कोटी २६ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, उद्योजक के.आर.शिंदे,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बॅकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे, पांडूरंग नलवडे,अशोकराव डिगे,शशिकांत निकम,उद्योजक दिगंबर शिंदे,चंद्रकांत पाटील,सुनिल पवार,संभाजी पाटील विहेकर,प्रकाश पाटील या प्रमुख्‍ मान्यवरांसह विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीच्या मातब्बर मंडळींनी पाटण तालुक्यात येवून हल्लाबोल केला.याच मंडळीनी राज्याच्या समस्येवर चार आणे तर पाटणच्या राजकारणावर बाराआणे बोलले.विरोधकांनी जरुर बोलावे पण ते कशावर तर मतदारसंघाच्या विकासकामांवर.पण आपले विरोधक विकासकामांवर बोलत नाहीत.कारण मतदारसंघातील जनतेला विकासकामे दयावीत असे आता विरोधकांच्या हातात काहीही नाही.जेव्हा होते तेव्हा काही दिले नाही.देण्यासारखे हातात त्यांच्या बरेच काही होते.सलग पाचवेळा आमदार आणि एकदा राज्याचे मंत्री अशी त्यांना संधी मिळूनही त्यांच्या आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा मतदारसंघातील जनतेला आणि मतदारांना शुन्य उपयोग झाला.मी केवळ आमदार आहे तरी सत्ताधारी सरकारच्या तिजोरीतून तालुक्याच्या विकासासाठी कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.याच आबदारवाडी गावचे उदाहरण घ्या ना.मागील २००९ ते २०१४ या कालावधीत आमदार असणा-या माजी आमदारांनी या गांवासाठी गेल्या पाच वर्षात किती कोटी रुपयांचा निधी दिला. मी आबदारवाडी गावाच्या १ कोटी २६ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला.पिण्याच्या पाण्याची योजना होणेकरीता २६ लाख रुपयांची योजना मंजुर केली आहे याची निविदा लवकरच प्रसिध्द होईल.म्हणजे सुमारे दीड कोटी रुपयांची कामे या गावांत मंजुर केली आहेत. अशाचप्रकारे विभागाच्या गांवामध्ये याप्रकारे कामे मंजुर केली आहेत. मग या कामांची तुलना करणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात आपल्याला माजी आमदारांनी काही दिले नाही या आमदारांनी कोटयावधी रुपयांचा निधी दिला. याचा सारासार विचार आबदारवाडी गावाप्रमाणे तालुक्यातील इतर गावानींही करणे आवश्यक आहे. सध्या विधानसभेच्या निवडणूकीचा प्रचार नाही जेव्हा प्रचाराकरीता गावामध्ये येईन तेव्हा विधानसभेच्या निवडणूकीकरीता मतदान करताना ग्रामस्थांनी आपल्या विकासासाठी कोण आपल्या मदतीला धावून येत आहे त्याच आमदारांच्या मागे आपली ताकत उभी करण्याचा निर्णय घ्यावा कारण मतदारसंघाचा आमदार ठरविताना तो विकासाच्या मुद्यावर ठरणे गरजेचे आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नसल्याने विकासापासून जनतेचे लक्ष विचलीत करण्याकरीता विरोधकांची धडपड सुरु आहे ती हाणून पाडावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरंपच विश्वासराव शिंदे यांनी केले. याप्रसंगी आबदारवाडी ग्रामपंचायतीस ५० वर्षे होत असल्याने सर्व हयात सरपंचांचा सत्कार आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत सरपंच विजय शिंदे यांनी केले. सुरेश शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमास विजय जंबुरे, मल्हारपेठचे उपसरपंच सुर्यकांत पानस्कर,मनोज पानस्कर, संजय माने, आबदावाडीचे उपसरपंच हणमंतराव गायकवाड, संभाजी गायकवाड,तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम राणे, सदस्य आबासाहेब शिंदे,पंढरीनाथ माने,रुक्मिणी गायकवाड,रेश्मा चव्हाण,जयश्री शिंदे,अंजना माने यांच्यासह देसाई कारखान्याचे पदाधिकारी,ग्रामस्थ युवक महिला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट:- संताजी धनाजीसारखे पाण्यात मला पहात आहेत.
 मोगलांना संताजी आणि धनाजी कायम पाण्यात दिसत होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या राज्यातील मात्तबरांना आणि तालुक्यातील आपल्या विरोधकांना हा शंभूराज सातत्याने पाण्यात दिसत आहे.संताजी धनाजीसारखे मलाही पाण्यात पहात आहेत.राष्ट्रवादीच्या सर्वांनीच माझी धास्ती घेतली आहे असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.