Tuesday 22 May 2018

आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग व शिक्षण् समुहाच्यावतीने आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते जाहीर सत्कार. दौलतनगर दि. २१ (आमदार शंभूराज देसाई यांचे कार्यालय):


सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना त्यांच्या प्रशासनिक कामाची दखल घेवून नव भारत ग्रुपकडून "आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन" या सन्मानाने राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेबद्दल पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने समुहाचे प्रमुख व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा मानाची शाल,चांदीचा नारळ व पुष्पगुच्छ देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
दौलतनगर ता.पाटण येथे पाटण तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे ५९ व्या पुण्यतिथी सोहळयाचे औचित्य साधून लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा समुहाचे प्रमुख व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांचेसोबत लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,संचालिक विश्रांती जंबुरे,दिपाली पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,सदस्य संतोष गिरी,सदस्या सौ.निर्मला देसाई, सौ.सिमा मोरे, माजी विरोधी पक्षनेते ॲड.दिपक जाधव,सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता व्यास,पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायुगडे,सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,पोलिस उपअधिक्षक गृह विभाग सातारा राजलक्ष्मी शिवणकर,पाटणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी,प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यापासून उल्लेखनीय असे कार्य करीत जिल्हयातील टंचाईग्रस्त भागात त्यांनी जलयुक्त  शिवार अभियानात विशेष लक्ष दिले आहे.आज त्यांच्यामुळे कायम टंचाईग्रस्त असणा-या तालुक्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चांगली कामे झाली असून गावे पाण्याने स्वंयपुर्ण होऊन टँकरच्या संख्येत घट झाली आहे. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या आयएएस म्हणून ज्या बॅचमधून उर्त्तीण झाल्या त्या बॅचच्या त्या पहिल्या क्रमांकाच्या महिला आहेत. सातारा जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.गेले अनेक वर्षे प्रलंबीत असणारे धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या महत्वाची भूमिका बजावत आहेत.त्याचे उत्तम उदाहरण कोयना धरणातील प्रकल्पग्रस्तांचे रखडलेले संकलन दुरुस्ती,वारसाच्या नोंदी तसेच १८ नागरी सुविधांच्या कामांना तात्काळ निधी देणेकरीता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. यासारख्या अनेक उल्लेखनीय सर्व कामांची दखल घेवून कर्तबगार स्त्रियांमध्ये सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची निवड करण्यात आली.त्या पुरस्काराचे दोन दिवसापुर्वी मुंबई येथे भव्य कार्यक्रमात त्यांना गौरविण्यात आले.नवभारत ग्रुपकडून २४ विविध क्षेत्रात उललेखनीय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.त्यातील प्रशासकीय सेवा या विभागातला पुरस्कार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना देण्यात आला.ही कौतुकाची गोष्ट आहे.एक आदर्श आणि कर्तबगार महिला या आमचे जिल्हयाच्या जिल्हाधिकारी आहेत आणि त्यांना त्यांच्या कामांची दखल घेवून इतक्या कमी कालावधीत "आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन" या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.ही बाब सातारा जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानाची असल्याचे सांगत आमदार शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना प्रशासकीय सेवेतील पुढील कालावधीकरीता शुभेच्छा देताना जिल्हाधिकारी सिंघल मॅडम यांनी अजुन मोठा पल्ला गाठायचा असून राज्यस्तरावर विविध खात्यांचे सचिव तसेच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील सचिवपदी त्यांची नियुक्ती व्हावी अशा शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्या वतीने समुहाचे प्रमुख व पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते माझा "आयकॉनिक इन्सपायरेशन वुमन" म्हणून झालेल्या सन्मानाबद्दल केलेला जाहीर सत्कार व सन्मान हा माझेसाठी अविस्मरणीय असल्याचे सांगत मी कायमस्वरुपी सातारा जिल्हयाच्या ऋृणात राहणार असून सातारा जिल्हयाने मला खुप काही दिले आहे हे कधीही विसरता येणार नाही.असे सांगून त्यांनी या सत्काराबद्दल आमदार शंभूराज देसाई यांचे व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे जाहीर आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment