२०१४ च्या निवडणूकीत पाटण
विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून देत मतदारसंघाचा आमदार
म्हणून काम करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करीत मतदारसंघात गेली अनेक वर्षे
प्रलंबीत राहिलेला विकास पुर्णत्वाकडे नेणेकरीता गत साडेतीन वर्षात मी कशोसीने
प्रयत्न केले आणि पुर्णत्वासही नेले गत साडेतीन वर्षात मतदारसंघाच्या कानाकोप-यात
विकास पोहचविण्याचे मी प्रामाणिक कार्य केले असून मतदारांनी माझे या कार्याला
भरघोस अशी साथ दिली असल्याने आमदार म्हणून काम करताना समाधान वाटत असल्याचे
प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शिद्रुकवाडी पोहोच रस्ता या १ कोटी ७१ लाख १० हजार
रुपये खर्चाच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे भूमिपूजन आमदार देसाई यांच्या
हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव
चव्हाण,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सीमा
मोरे,माजी सदस्य रघुनाथ माटेकर,शिवदौलत बँकेचे संचालक मधूकर पाटील,शिद्रुकवाडी
सरपंच तात्यासो डुबल, काढणे सरपंच अंजली पाटील,उपसरपंच अमित पाटील,खळे सरपंच संदिप
टोळे,आसवलेवाडी सरपंच सिताराम आसवले, आनंदराव पाटील,संजय शिद्रुक आदी प्रमुख पदाधिकारी
यांच्यासह शिद्रुकवाडी काढणे, खळे व कोरीवळे येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची
मोठया संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,काढणे,खळे,व
कोरीवळे यांच्या वाडया असणारे वरचे शिद्रुकवाडी हे गाव पठारावर वसले आहे.या
गावांच्या तिन्ही वाडयां आपल्या विचारांच्या नाहीत म्हणून विरोधकांनी जाणिवपुर्वक अनेक
वर्षे या गावाचा व वाडयांचा विकास केला नाही.नाडे ढेबेवाडी मार्गाच्या काही कोस
अंतरावर असणारे गांव विरोधकांना आतापर्यंत का दिसले नाही.या गांवाला इतक्या वर्षे
विरोधक का रस्ता देवू शकले नाहीत.असा प्रश्न करुन ते म्हणाले, शिद्रुकवाडी
ग्रामस्थांची मागणी होती आमचा अंतर्गत रस्ता करा तो गतवर्षी आपण केला या
रस्त्याच्या भूमिपुजन कार्यक्रमांतच गतवर्षी येथील ग्रामस्थांनी माझेकडे आमचे
गावचा प्रमुख रस्ता करुन देण्याची मागणी केली होती १० ते १५ लाख रुपयांत हा रस्ता
होणार नाही त्याकरीता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गतच या रस्त्याचे काम घेणे
गरजेचे असल्याने सन २०१७-१८ च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शिद्रुकवाडी
गावपेाहोच रस्त्याचे काम प्रस्तावित करुन त्यास मान्यता घेतली व या रस्त्याच्या
कामांकरीता सुमारे १ कोटी ७१ लाख १० हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला. येथील
ग्रामस्थांना दिलेला शब्द एक वर्षाच्या आत मी पुर्ण केला.अशाचप्रकारे
मतदारसंघाच्या विविध भागामध्ये गावे, वाडयावस्त्या जोडणारे रस्ते करण्याचे काम
प्रथम प्राधान्याने मी गेल्या साडेतीन वर्षात हाती घेतले आणि ते पुर्णत्वाकडे
नेण्याचे काम करीत आहे.सातारा जिल्हयात सर्वाधिक निधी पाटण विधानसभा मतदारसंघातील
विविध विकासकामांकरीता आणण्यात मला गत साडेतीन वर्षात यश मिळाले शिद्रुकवाडी या
तिन्ही वाडयांनी मला नेहमीच सहकार्याची भूमिका घेतल्याने या वाडयांनाही विकासाच्या
बाबतीत झुकते माप देण्याचे काम मी केले आहे व करीत आहे.याचे मला समाधान वाटत असून आज
मतदारसंघात जाईल त्या भागात विविध विकासकामे सुरु असल्याचे आपणांस दिसून येत आहेत.
विरोधकांना आपली कामे दिसत नाहीत ती त्यांना दिसावीत अशी अपेक्षाही करणे चुकीचे
आहे.निवडणूका जवळ आल्या की मतदारांचा बुध्दीभेद करण्याचे काम विरोधक करणार हे
ओळूखनच मतदारसंघातील मतदारांनी आपआपल्या गांवामध्ये वाडीवस्तीमध्ये याअगोदरच्या
लोकप्रतिनिधींनी एवढया वर्षे कोणती विकासकामे केली आणि आताच्या लोकप्रतिनिधींनी
गेल्या साडेतीन वर्षात कोणकोणती विकासकामे केली आहेत आणि सुरु आहेत याचा सारासार
विचार करुन मतदारांनी दोन लोकप्रतिनिधींच्या कामांतील तुलना करावी असे आवाहन करुन
ते म्हणाले,गत साडेतीन वर्षात विविध गांवामध्ये विविध विकासकामे करताना या गांवात
आपल्याला किती मतदान पडले भविष्यात किती पडेल याचा विचार न करता जनतेची असणारी
अडचण ओळखून कामे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे.मताचे राजकारण विकासकामात
आणून आतापर्यंत कोणतेही विकासकाम गावांना आणि वाडयांना दिले नाही.विरोधकांच्या
हातात आता देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे मतदारसंघातील गांवानी आणि
वाडयावस्त्यांनीही आपला विकास कोण साधू शकते याचाही विचार करुन भविष्यातील आपला
लोकप्रतिनिधी निवडावा असेही आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे
स्वागत संजय शिद्रुक यांनी करुन आभार मानले.
चौकट:-
एकदाच मागितले पावणेदोन कोटीचे काम दिले. संजय शिद्रुक
इतक्या वर्षे आमच्या वाडयांना
पक्का रस्ता बघायला मिळाला नव्हता आम्ही ग्रामस्थांनी मागील वर्षी कार्यक्रमात
आमचा रस्ता करा अशी मागणी एकदाच आमदार शंभूराज देसाईसाहेब यांचेकडे केली.रस्त्याचे
काम एकदाच मागितले तर आमदारसाहेबांनी १० किंवा १५ लाख नाहीतर पावणेदोन कोटी रुपयांचे
काम आम्हाला दिले.असे संजय शिद्रुक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment