मतदारसंघाचा आमदार हा मतदारसंघातील जनतेची सुखदुख्: जाणणारा आमदार
पाहिजे मतदारसंघातील जनतेला त्यांच्या मुलभूत सुविधा मिळवून देण्याकरीता त्या आमदारांनी
आपली आमदारकीची राजकीय ताकत वापरली पाहिजे नाहीतर आपल्याकडे एकदा मते मागून गेलेले
परत पाच वर्षे आपल्याकडे फिरकण्याचे नावच घेत नाहीत मग जनतेचे प्रश्न सुटणार तरी कसे
याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक आहे.ही निवडणूक ते ती निवडणूक आपल्या दारात येणा-या
पुढा-यांना पाच वर्षात तुम्ही आमच्यासाठी केले काय? हा प्रश्न मतदारांनी विचारणे गरजेचे
आहे. २०१४ च्या निवडणूकीत मी मते मागायला आलेनंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनांची ७०
ते ८० टक्के पुर्तता या तालुक्याचा आमदार म्हणून मी केली आहे.त्यामुळे येणा-या २०१९
चा आमदार हा पाटण तालुक्यातील मतदारांनी त्यांच्या गांवामध्ये झालेल्या विकासकामे पाहूनच
निवडावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाई यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या गुढे ते शिबेवाडी
पाटीलवाडी या दोन कोटी १३ लाख २३ हजार रुपये खर्चाच्या रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचे
भूमिपूजन आमदार देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी
कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव
चव्हाण,पंचायत समितीचे गटनेते पंजाबराव देसाई,पंचायत समिती सदस्या सौ.सीमा मोरे,माजी
सदस्य रघुनाथ माटेकर, विश्रांत कदम (सर),शामराव कदम(गुरुजी),कारखान्याचे संचालक बबनराव
भिसे,आबासाहेब भांडवलकर,शिवसमर्थचे संस्थापक ॲड.जनार्दन बोत्रे,गणेश महाडिक,सुभाष महाडिक
(शेठ),आबासाहेब शिबे,सुरेश पवार,आत्माराम पाचुपते,खळे सरपंच संदिप टोळे,शोभा बोत्रे,स्नेहल
पाटील,शंकर कदम आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची मोठया
संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना आमदार
देसाई म्हणाले, विधानसभेच्या असो वा इतर कोणत्याही निवडणुकीत कोणत्या गावातून किती
मते मिळाली,याचा विचार न करता जिथे गरज आणि मागणी आहे,तिथ तिथ विकास कामे पोचविण्याचा
दृष्टिकोन माझा पूर्वीपासूनच आहे. विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान व त्यानंतर येथील काळंबादेवी
कलशारोहन कार्यक्रमप्रसंगी आलेनंतर येथील ग्रामस्थांनी गुढे ते शिबेवाडी ते पाटीलवाडी
या रस्त्याबाबत माझेकडे मागणी केली होती ग्रामस्थांना हा रस्ता लवकरात लवकर केला जाईल
असे आश्वासन मी दिले होते.गतवर्षी २० लक्ष रुपयांचा निधी येथील कामांसाठी दिला शिबेवाडीचे
रस्त्याचे अंतर हे जास्त असल्याने हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गतच प्रस्तावित
करुन याकरीता निधी मंजुर करणे गरजेचे होते यामध्ये वनविभागाची थोडीफार अडचण आली परंतू
यावर अधिका-यांना बोलावून ही अडचण दुर करीत या रस्त्याचे काम मंजुर केले ग्रामस्थांना
दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचे मोठे समाधान मला आहे. असे सांगून ते म्हणाले कोणतीही
निवडणूक आली की अनेकजण अचानक उगवतात.जनतेचा बुध्दीभेद करतात. पोळी भाजत नाही,म्हंटल्यावर
शेवटच्या चार दिवसांत चिरीमिरीचा वापर करतात. अनेक वर्षे तालुक्यात विरोधकांकडून अशी
दुकाने मांडली गेली आहेत.येणा-या निवडणूकीत ही अशाचप्रकारे दुकाने मांडली जातील परंतू
या खेपेला आपल्याला त्यांची हि दुकाने येथील मतदारांनीच बंद करावी लागतील. आम्ही विकास
केला असे सांगणारे माजी आमदार यांना तब्बल २१ वर्षे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि काही
वर्षे मंत्री राहण्याची संधी मिळाली होती त्या माजी आमदारांना आणि मंत्रयांना गुढे
ते शिबेवाडी या रस्त्यांचे दैन्य का दिसले नाही, माजी आमदारांच्या आणि माझ्या आमदारकीची
फक्त पाच वर्षांच्या कारकिर्दीची तुलना मतदारसंघातील
मतदारांनी करावी, जो विकास कामांमध्ये सरस ठरेल त्यानेच तालुक्याचे नेतृत्व करावे,
अशी भूमिका आता जनतेनेच घ्यायला पाहिजे, जे सत्ता असताना काही करु शकले नाहीत, ते आता
हातात काहीच नसताना कसला विकास करणार आहेत ? जनतेसमोर जायला त्यांच्याकडे कोणताही मुद्दा
राहिलेला नाही.२०१४ पासून तीन वर्षात ३१० कोटींची विकास कामे करता आली सत्ताधारी सरकारमुळे
मोठया निधी हा सातारा जिल्हयात सर्वाधिक पाटण तालुक्याला मिळाला आहे.यापूर्वी २१ वर्षे
आमदार व ५ वर्षे मंत्री असणा-यांमुळे आपला किती विकास झाला हे मतदारांनी तपासून पहावे.
असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले.याप्रसंगी डॉ.दिलीपराव चव्हाण यांचे भाषण झाले.
आमदार देसाई यांचा मानपत्र देऊन सत्कार केला.काढणे फाटा येथून दुचाकी रॅली काढून आमदार
देसाई यांना मिरवणूकीने कार्यक्रमस्थळी नेले. उपस्थितांचे स्वागत संदीप डाकवे यांनी
करुन आभार मानले.
चौकट:- श्रेय
घेण्याची कुणीही गरज नाही.
शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ते सुचविण्याचा
आणि ती मंजुर करुन आणण्याचा अधिकार शासनाने तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना दिला आहे.
या रस्त्याचे काम कुणाच्या शिफारशीवरुन शासनाने मंजुर केले आहे हे या गावातील ग्रामस्थांना
चांगलेच माहिती असून कुणी या कामांचे श्रेय लाटण्यासाठी येवू नये त्यांना या गावातील
ग्रामस्थच थारा देणार नाहीत असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment