Wednesday 23 May 2018

मंत्री नसताना माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटींचा निधी विकासासाठी आणला- आमदार शंभूराज देसाई.


मी सध्या केवळ पाटण विधानसभा मतदारसंघाचा सत्तेत असणा-या सत्ताधारी पक्षाचा एक आमदार आहे. आमदारांना मिळणारा निधी यावरच समाधान मानले असते तर मतदारसंघात प्रलंबीत राहिलेली विविध विकासकामे मार्गी लागली नसती. मतदारसंघातील विविध कामे मार्गी लावयची असतील तर शासनाशी भांडून आपले प्रश्न विधानसभेत मांडून शासनाच्या तिजोरीतून जादाचा निधी आणणारा आमदार आपल्या सारख्या डोंगरी तालुक्याला पाहिजे. गत साडेतीन वर्षात मी केवळ आमदार म्हणून ३१० कोटींहून अधिकचा निधी शासनाच्या तिजोरीतून पाटण मतदारसंघातील विविध विकासकामां करीता मंजुर करुन आणला असल्याचे प्रतिपादन करीत आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्री नसताना माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटींचा निधी मतदारसंघातील विकासासाठी मंजुर करुन आणला असल्याचा टोला माजीमंत्री पाटणकर यांचे नाव न घेता लगाविला.
गारवडे ता.पाटण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत गारवडे पोहोच रस्ता व विशेष घटक योजनेतंर्गत मागासवर्गीय रस्त्यावर साकव असे अनुक्रमे ८८.६५ लाख व २८.६४ लाख रुपयांच्या निधीच्या कामांची भूमिपुजने आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आली याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,शिवदौलत बॅकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुग्रा खोंदू,विजय पवार,प्रदीप पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे शिवाजीराव गायकवाड,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, संतोष गिरी,माजी विरोधी पक्ष नेते ॲड.डी.पी.जाधव,माजी सदस्य प्रकाशराव जाधव, कारखाना संचालक व्यंकटराव पाटील, पांडूरंग नलवडे, बबनराव भिसे, माजी जि.प.सदस्य बशीर खोंदू,दादा जाधव,ॲड. मारुती नांगरे,कोयना सहकारी बँकेचे संचालक अविनाश पाटील,हणमंतराव निकम (नाना),मोहनराव पानस्कर,नवनाथ पाळेकर, यांच्यासह प्रमुख पदाधिकारी तसेच उपअभियंता विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.  
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात यापुर्वी सलग पाच वेळा आमदारपद आणि एकदा राज्याचे कॅबिनेट मंत्री होण्याची संधी तालुक्यातील जनतेने विरोधकांना दिली. या २६ वर्षात विरोधकांकडून विकासाचे राजकारण तालुक्यात झाले नाही म्हणूनच तालुक्यातील अनेक विकासकामे प्रलंबीत राहिली. याच गावचे उदाहरण घ्या ना मागील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत माजी आमदार या गांवात येवून गावची सत्ता पाटणकर गटाच्या ताब्यात दया गावाचे रोड मॉडेल करतो म्हणून घोषणा करुन गेले.त्यांच्या कार्यकाळात हे गांव झाले का रोल मॉडेल.याचा विचार गावक-यांनीच करावा.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये सरपंचपद विरोधी गटात गेले असले तरी सदस्यांचे बहूमत आपल्या बाजुने आहे.सरपंचपदाचा अपघात समजुन नव्या उमेदीने गावातील ग्रामस्थांनी कामाला लागावे. हातात सत्ता असताना विरोधकांना जे जमले नाही ते हातात सत्ता नसताना त्यांना शक्यच नाही हे तालुक्यातील प्रत्येक गांवाने आणि वाडीवस्तीने आता ओळखले आहे.तालुक्याच्या अनेक गांवामध्ये गावाला डोळयाला दिसतील अशी विविध विकासकांमे आपण गत तीन वर्षात मार्गी लावली आहेत. ते माजी आमदारांना जमले नाही त्यांनी केलेली डोळयाला दिसतील अशी कामे प्रत्येक गांवामध्ये व वाडीवस्तीमध्ये दाखवून दयावीत असे आवाहन करीत आमदार देसाई म्हणाले,माजी आमदार हे राज्याचे बांधकाम विभागाचे कॅबिनेट मंत्री होते.बांधकाम मंत्री असताना देखील स्वत:च्या मतदारसंघातील प्रमुख रस्ता त्यांनी दोन ठिकाणी टोल बसविला यावरुनच त्यांची कार्यक्षमता लक्षात येते. बांधकाम खात्याच्या किल्लया त्यांच्या हातात असताना देखील ते बिनटोलचा रस्ता मतदारसंघातील जनतेला देवू शकले नाहीत मी आमदार म्हणून राज्याच्या नाहीतर केंद्राच्या तिजोरीतून ३२० कोटी रुपयांचा प्रमुख रस्ता मंजुर करुन आणला त्याचे काम सध्या सुरु आहे या रस्त्यावर एकाही ठिकाणी टोल नाही.हा फरक त्यांच्या आणि माझे कामांमधील आहे.त्यांच्या २६ वर्षाच्या आमदारकीची कारकीर्द आणि माझे केवळ १० वर्षाची आमदारकीची कारकीर्द पाहिली तर माजी मंत्रयांना लाजवेल एवढया कोटयावधी रुपयांची विविध विकासकांमे मी शासनाकडून मंजुर करुन आणली आहेत येणा-या निवडणूकीत त्यांच्या कामांचा आणि माझे कामांची तुलना करुनच मतदारसंघातील जनतेने तालुक्याचा आमदार निवडावा.जो विकासाच्या कामांमध्ये उजवा असेल तोच या तालुक्याचे नेतृत्व करेल ही खुणगाठ मतदारसंघातील मतदारांनी मनाशी घट्ट बांधावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. याप्रसंगी ॲड.मिलींद पाटील,डॉ.दिलीपराव चव्हाण यांची भाषणे झाली.
चौकट:- समाजाच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार हाणून पाडा. शंभूराज देसाई.
निवडणूका आल्या की, फोडाफोडी,जनतेचा बुध्दीभेद व मतांचा सौदा यामध्ये आपले विरोधक तरबेज आहेत. पाच वर्षातून एकदा मतदान मागायला यायचे.स्वत: काही करायचे नाही आणि दुसरा करतोय त्यांच्या कामांसंदर्भात बुध्दीभेद करायचा. स्वत: काहीही न करता जनतेच्या मनामध्ये विष पेरणा-यांचा प्रचार पारावर बसून,चौकाचौकात बसून सुज्ञ जनतेने हाणून पाडणे गरजेचे असल्याचे मत आमदार शंभूराज देसाईंनी व्यक्त केले.


No comments:

Post a Comment