आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून राज्याच्या
अर्थसंकल्पातून पाटण विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग १४८ वरील डिचोली नवजा हेळवाक
मोरगिरी साजुर तांबवे रस्ता या रस्त्यावरील साजुर ते तांबवे हा सुमारे ६.३०० किलोमीटरचा
रस्त्याचा भाग करणेकरीता ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या रस्त्याचे
भूमिपुजनाचा कार्यक्रम आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शुक्रवार दि.२५ मे रोजी
सायंकाळी ५.०० वा तांबवे याठिकाणी आयोजीत करण्यात आला आहे.
पाटण विधानसभा
मतदारसंघातील राज्य मार्ग १४८ वरील डिचोली नवजा हेळवाक मोरगिरी साजुर तांबवे रस्ता
या रस्त्यावरील साजुर ते तांबवे हा सुमारे ६.३०० किलोमीटरचा रस्त्याचे काम करण्याची
या विभागातील ग्रामस्थांची सातत्याची मागणी आमदार शंभूराज देसाई यांचेकडे होती.आमदार
शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून साजुर ते तांबवे या रस्त्याचे
मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, मुरुम बाजुपट्टी, कच्चे गटर्स, मोरींची पुर्नबांधणी व
रस्त्याची दोन वर्षे देखभाल व दुरुस्ती करणे या कामांचा समावेश असून या रस्त्याच्या
कामाकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी एकूण ३ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजुर करुन
आणला आहे.या कामांची प्रशासकीय मान्यता होवून निविदा होवून कामाचे आदेशही देवून ठेकेदार
निश्चित करण्यात आला असून आमदार शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते शुक्रवार दि. २५ मे
रोजी सायंकाळी ५.०० वा तांबवे याठिकाणी भूमिपुजनाचा समारंभ तांबवे व साजूर गावाच्या
वतीने आयोजीत करण्यात आला आहे. भूमिपुजन होताच या कामांस प्रांरभ करण्याच्या सुचना
आमदार शंभूराज देसाई यांनी सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता मानसिंग पाटील व शाखा
अभियंता मोटे तसेच संबधित ठेकेदार यांना दिल्या आहेत.या भूमिपुजन कार्यक्रमास जिल्हा
परिषद सदस्य व रयत संघटनेचे उदयसिंह पाटील,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,कराड
पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील,जिल्हा
परिषद सदस्य प्रदीप पाटील,कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण,पंचायत
समिती सदस्या सविताताई संकपाळ, सुरेखाताई पाटील, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी
व्हा.चेअरमन प्रभाकर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य आण्णासाे पाटील,रयत सहकारी साखर
कारखान्याचे शिवाजीराव गायकवाड व कोयना सहकारी बँकेचे संचालक अविनाश पाटील हे मान्यवर
कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास तांबवे, साजूर भागातील ग्रामस्थांनी
मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment