मतदार संघातील एखाद्या गावाने मतदान दिले नाही म्हणून
त्या गावात विकासकाम द्यायचे नाही अशी माझी भूमिका कधीच नव्हती आणि नाही.जनतेने निवडून
दिलेला आमदार हा संपूर्ण मतदारसंघाचा असतो. त्यामुळे तालुक्याच्यादृष्टीने विकास कामांत
सातत्य राखणे हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते.तेच कर्तव्य गत साडेतीन वर्षे मी करीत
आहे.गत साडेतीन वर्षात कोटयावधी रुपयांचा निधी पाटण तालुक्याच्या विकासाकरीता शासनाच्या
तिजोरीतून आणला आहे.पाटण तालुक्याच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवून येणा-या निवडणूकीत
विकासकामांचा लेखाजोखा घेवूनच मी मतदारांपुढे मते मागायला जाणार आहे.विकासकामांची तुलना
होणे गरजेचे असून काम करणा-या लोकप्रतिनिधीलाच मतदारांनी ताकत देणे गरजेचे असून मतदारसंघाचा
आमदार हा विकास कामातूनच ठरला पाहिजे,असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
आमदार शंभूराज देसाई यांचे प्रयत्नातून मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतंर्गत आबदारवाडी ता.पाटण गावपोहोच रस्त्याचे मंजुर करण्यात आलेल्या
कामांचे भूमिपुजन तसेच अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते
घेण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.या रस्त्याच्या कामांसाठी आमदार शंभूराज
देसाई यांनी १ कोटी २६ लाख १९ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.यावेळी मोरणा
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते यशराज देसाई, उद्योजक के.आर.शिंदे,लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकार साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बॅकेचे चेअरमन
ॲड.मिलींद पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,व्हा.चेअरमन
राजाराम पाटील,संचालक बबनराव भिसे, पांडूरंग नलवडे,अशोकराव डिगे,शशिकांत निकम,उद्योजक
दिगंबर शिंदे,चंद्रकांत पाटील,सुनिल पवार,संभाजी पाटील विहेकर,प्रकाश पाटील या प्रमुख्
मान्यवरांसह विविध संस्थाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, काही
दिवसापुर्वी राष्ट्रवादीच्या मातब्बर मंडळींनी पाटण तालुक्यात येवून हल्लाबोल केला.याच
मंडळीनी राज्याच्या समस्येवर चार आणे तर पाटणच्या राजकारणावर बाराआणे बोलले.विरोधकांनी
जरुर बोलावे पण ते कशावर तर मतदारसंघाच्या विकासकामांवर.पण आपले विरोधक विकासकामांवर
बोलत नाहीत.कारण मतदारसंघातील जनतेला विकासकामे दयावीत असे आता विरोधकांच्या हातात
काहीही नाही.जेव्हा होते तेव्हा काही दिले नाही.देण्यासारखे हातात त्यांच्या बरेच काही
होते.सलग पाचवेळा आमदार आणि एकदा राज्याचे मंत्री अशी त्यांना संधी मिळूनही त्यांच्या
आमदारकीचा आणि मंत्रीपदाचा मतदारसंघातील जनतेला आणि मतदारांना शुन्य उपयोग झाला.मी
केवळ आमदार आहे तरी सत्ताधारी सरकारच्या तिजोरीतून तालुक्याच्या विकासासाठी कोटयावधी
रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.याच आबदारवाडी गावचे उदाहरण घ्या ना.मागील २००९
ते २०१४ या कालावधीत आमदार असणा-या माजी आमदारांनी या गांवासाठी गेल्या पाच वर्षात
किती कोटी रुपयांचा निधी दिला. मी आबदारवाडी गावाच्या १ कोटी २६ लाख १९ हजार रुपयांचा
निधी मंजुर करुन आणला.पिण्याच्या पाण्याची योजना होणेकरीता २६ लाख रुपयांची योजना मंजुर
केली आहे याची निविदा लवकरच प्रसिध्द होईल.म्हणजे सुमारे दीड कोटी रुपयांची कामे या
गावांत मंजुर केली आहेत. अशाचप्रकारे विभागाच्या गांवामध्ये याप्रकारे कामे मंजुर केली
आहेत. मग या कामांची तुलना करणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षात आपल्याला माजी आमदारांनी
काही दिले नाही या आमदारांनी कोटयावधी रुपयांचा निधी दिला. याचा सारासार विचार आबदारवाडी
गावाप्रमाणे तालुक्यातील इतर गावानींही करणे आवश्यक आहे. सध्या विधानसभेच्या निवडणूकीचा
प्रचार नाही जेव्हा प्रचाराकरीता गावामध्ये येईन तेव्हा विधानसभेच्या निवडणूकीकरीता
मतदान करताना ग्रामस्थांनी आपल्या विकासासाठी कोण आपल्या मदतीला धावून येत आहे त्याच
आमदारांच्या मागे आपली ताकत उभी करण्याचा निर्णय घ्यावा कारण मतदारसंघाचा आमदार ठरविताना
तो विकासाच्या मुद्यावर ठरणे गरजेचे आहे. विरोधकांकडे बोलण्यासारखे काही नसल्याने विकासापासून
जनतेचे लक्ष विचलीत करण्याकरीता विरोधकांची धडपड सुरु आहे ती हाणून पाडावी असे आवाहनही
त्यांनी शेवठी बोलताना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरंपच विश्वासराव शिंदे
यांनी केले. याप्रसंगी आबदारवाडी ग्रामपंचायतीस ५० वर्षे होत असल्याने सर्व हयात सरपंचांचा
सत्कार आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत सरपंच विजय शिंदे यांनी
केले. सुरेश शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमास विजय जंबुरे, मल्हारपेठचे उपसरपंच
सुर्यकांत पानस्कर,मनोज पानस्कर, संजय माने, आबदावाडीचे उपसरपंच हणमंतराव गायकवाड,
संभाजी गायकवाड,तंटामुक्ती अध्यक्ष राजाराम राणे, सदस्य आबासाहेब शिंदे,पंढरीनाथ माने,रुक्मिणी
गायकवाड,रेश्मा चव्हाण,जयश्री शिंदे,अंजना माने यांच्यासह देसाई कारखान्याचे पदाधिकारी,ग्रामस्थ
युवक महिला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
चौकट:- संताजी
धनाजीसारखे पाण्यात मला पहात आहेत.
मोगलांना संताजी
आणि धनाजी कायम पाण्यात दिसत होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या राज्यातील मात्तबरांना
आणि तालुक्यातील आपल्या विरोधकांना हा शंभूराज सातत्याने पाण्यात दिसत आहे.संताजी धनाजीसारखे
मलाही पाण्यात पहात आहेत.राष्ट्रवादीच्या सर्वांनीच माझी धास्ती घेतली आहे असेही आमदार
शंभूराज देसाई म्हणाले.
No comments:
Post a Comment