Friday 11 May 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान - आमदार शंभूराज देसाई चोपडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते उदघाटन.



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्रयासाठी अनेक लढयातून लढत राहिले.शोषित वंचितांची अंधकाराच्या गुहेतून सुटका करण्याचे काम त्यांनी केले.त्यांचे लढे हे सर्वस्तरातील लोकांसाठी होते,त्यांचे लढे परिवर्तनासाठी होते.त्यांनी वृत्तपत्रे प्रकाशित करुन दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्रयाचा पुरस्कार मिळवून दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान ठरले.त्याच संविधानानुसार देशाचा कारभार आज सुरु असल्याचे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
चोपडी ता.पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे स्थानिक विकास निधीतून आणि बौध्द विकास तरुण मंडळ,चोपडी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उदघाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२७ व्या जयंती सोहळयाचे औचित्य साधून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सौ.दिपाली जाधव,बौध्द विकास तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष वीर,उपाध्यक्ष सत्यवान वीर,संपत माने, रवींद्र वीर,बाळासाहेब नांगरे,तात्यासो जाधव,जयवंत जाधव,श्रीरंग जाधव,राजाराम जाधव,नाथासो जाधव,बौध्द विकास तरुण मंडळातील चंद्रकांत वीर,वैभव वीर,नितीन वीर,मधूकर वीर यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव भारताच्या सीमारेषा ओलांडत जगाच्या नकाशावर झळकले. सामाजिक विषमता दुर करुन शोषित, वंचीत, दलित, उपेक्षिंताची सामाजिक आर्थिक उन्नती व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला.सामाजिक समतेचा लढा उभारणारे डॉ.बाबासाहेब हे केवळ भारतीय स्वातंत्रय लढयाचे नव्हे तर सर्वस्तरातील लोकांच्या लढयाचे सरसेनापती होते म्हणूनच त्यांना सर्वसामान्यांचे कैवारी असे अभिमानाने आणि स्वाभिमानाने संबोधले जाते भारताच्या स्थापनेसाठी त्यांचे योगदान महत्वपुर्ण आणि मोलाचे ठरले आहे. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानातून केवळ दलितांचेच हित न साधता सर्वस्तरातील सर्व सामान्य जनतेचे हित साधण्याचे काम त्यांनी केले.स्वातंत्रय, समता, बंधूता, न्याय यावर आधारित संविधानातून एक व्यक्ती एक मत याप्रमाणे सर्वसामान्य जनतेला मतदानाचा हक्क त्यांनी मिळवून दिला.म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचा प्रभाव संपुर्ण जगभर दिसून येतो असे त्यांनी शेवठी बोलताना स्पष्ट केले.
प्रांरभी आमदार शंभूराज देसाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२७ व्या जयंती सोहळयानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. बौध्द विकास तरुण मंडळाच्या वतीने आमदार शंभूराज देसाई यांचा मानाची शाल,श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान दुसरे दिवशी या सभागृहात तथागत भगवान गौतम बुध्द यांचा जयंती उत्सव व मुर्ती स्थापना सोहळा साजरा करण्यात आला.


No comments:

Post a Comment