पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे सर्वसामान्य जनतेचा
कळवळा आणि समाजासाठी तळमळ असणारे आमदार असून सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी जास्तीचा
निधी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवूणक करण्याकरीता त्यांची सातत्याची सुरु
असणारी तळमळ मी जवळून पाहिली आहे.मतदारसंघातील गोरगरीब कुटुंबातील मुलींचे शिक्षण त्यांच्या
कुटुंबातील गरीबीमुळे थांबू नये याकरीता त्यांनी त्यांचे फौंडेशनमधून त्यांचे आज्जी
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु केलेली शिष्यवृत्ती योजना ही
एक आदर्शवत व गरीब कुटुंबातील मुलींना प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हयाच्या
जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी करुन कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)
यांचे ५९ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सातारा जिल्हयातील कर्तबगार महिला अधिका-यांच्या
हस्ते या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले ही बाब तर समाजाकरीता आदर्शवत असल्याचे गौरवउदगारही
त्यांनी यावेळी बोलताना काढले.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ५९ वी पुण्यतिथी कार्यक्रम व पुण्यतिथीच्या
निमित्ताने आयोजीत कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात प्रमुख
अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल या बोलत होत्या.याप्रसंगी कार्यक्रमास पाटण
मतदारसंघाचे उकृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे सोबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या
उपसंचालक विनीता व्यास,पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायुगडे,सातारा सिंचन मंडळाच्या
अधिक्षक अभियंता वैशाली नारकर,पोलिस उपअधिक्षक गृह विभाग सातारा राजलक्ष्मी शिवणकर,पाटणच्या
उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी,या सर्व महिला अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या,एक कर्तबगार
व सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शंभूराज देसाई
यांना त्यांचे आजोबा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई व आज्जी
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे खुप खुप आर्शिवाद आहेत. म्हणूनच आमदार म्हणून
ते नवनवीन कल्पना राबवून पाटण मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी अगदी तळमळीने
काम करीत आहेत. आपल्या आज्जी यांचे नावाने त्यांनी पाटण मतदारसंघातील गरीब कुटुंबातील
मुलींच्या शिक्षणाकरीता जी शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे या योजनेमुळे मुलींना त्यांच्या
शिक्षणासाठी प्रेरणा मिळत आहे.आमदार शंभूराज देसाई यांच्यासारखे समाजामध्ये असे कमी
लोक पहायला मिळतात जे समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भूमिकेतुन समाजाच्या प्रश्नासाठी
स्वत:च्या खिशातून खर्च करुन मग ते फौडेंशनच्या माध्यमातून असो किंवा स्वत:जवळचे असो
ते देवून समाजाला अडचणीच्या काळात हातभार लावण्याचे कार्य करीत असतात.आज गरीब कुटुंबातील
मुलींना केवळ त्यांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती देण्याकरीता
म्हणून नव्हे तर सर्वसामान्य महिला किती सक्षम असू शकते याचे दर्शन ग्रामीण भागातील
मुलींना घडविण्याकरीता त्यांनी आपले सातारा जिल्हयातील सर्वसामान्य कुटुंबातून संघर्ष
करीत कर्तबगार अधिकारी बनलेल्या सर्व महिला अधिकारी यांना बोलवून त्यांचे हस्ते ही
शिष्यवृत्ती देण्याची त्यांची कल्पना अतिशय स्तुत्य असून आमदार शंभूराज देसाई यांचेकडे
समाजाप्रति एक व्हिजन आहे.त्या व्हिजनच्या माध्यमातूनच ते आमदार म्हणून मतदारसंघात
कार्य करीत आहेत.याचा अभिमान वाटतो.आजच्या कार्यक्रमास सर्वस्तरातील कर्तबगार अधिकारी
यांना पाचारण करुन आमदार शंभूराज देसाई यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. सातत्याने
त्यांच्या मनात एक खंत होती की, रविवार सुट्टीच्या दिवशी महिला अधिकारी यांना कार्यक्रमास
बोलावून त्यांचा सुट्टीचा दिवस वाया घालविला याची. परंतू आम्हा सर्व महिलांना याचे
समाधान आहे की एका चांगल्या कार्यक्रमाकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी आम्हा सर्वांना
बोलविले. आपण ज्यांना शिष्यवृत्ती देत आहात त्यातील किमान दोन मुली जरी हिमतीने आपल्या
पायावर उभ्या राहून कर्तबगार अधिकारी झाल्या तर एक महिला म्हणून आम्हास याचा खुप अभिमान
वाटेल. असे सांगून त्या म्हणाल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारक पुर्ण
झाले या स्मारकामध्ये गरीब कुटुंबातील मुलामुलींना ई-लर्निंगचे शिक्षण मिळावे याकरीता
सर्व सोयीनीयुक्त अभ्यासिका असावी असा आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याचा आग्रह होता
तो त्यांनी पुर्ण करुन दाखविला या अभ्यासिकेचा ग्रामीण भागातील मुलांमुलींना खरोखरच
चांगला उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करुन आमदार शंभूराज देसाई यांना पुढील
वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांनी कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) यांना ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करुन उपस्थित सर्व महिला
अधिकारी यांचे मानाची शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले आणि कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीची माहिती दिली त्यांनतर विनीता व्यास,निलीमा धायुगडे,
वैशाली नारकर,राजलक्ष्मी शिवणकर,निता पाडवी यांनी मनोगते व्यक्त करुन आम्ही कसे घडलो
याचे उपस्थित शिष्यवृत्ती धारक मुलींना मार्गदर्शन केले. मनोगतानंतर मान्यवर महिला
अधिकारी यांच्या हस्ते पाटण मतदारसंघातील २० मुलींना कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)
शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.उपस्थितांचे आभार पाटण पंचायत समितीच्या सदस्या निर्मला
देसाई यांनी मानले.
चौकट:- कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) यांचे अर्धाकृती पुतळयास प्रथमत: अभिवादन.
मरळी हायस्कुलच्या प्रांगणात कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)
यांचे अर्धाकृती पुतळयास त्यांचे ५९ व्या पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्ताने कार्यक्रमास
उपस्थित सर्व महिला अधिकारी यांनी प्रथमत: विनम्र अभिवादन केले. सर्व महिलांच्या वतीने
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
चौकट:- व्यासपीठावर
सर्व महिला अधिकारी यांचाच प्रभाव.
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रमात सर्व
कर्तबगार महिला अधिकारी यांनाच आमदार शंभूराज देसाई यांनी पाचारण केल्याने व्यासपीठावर
सर्व महिला अधिकारी यांचाच प्रभाव मोठया प्रमाणात जाणवला. प्रत्येक उपस्थित मान्यवर
महिलांनी आपण कसे घडलो आणि मुली कशा घडू शकतात याचे मार्गदर्शन उपस्थितांना केल्याने
कार्यक्रमामध्ये भावनिकता निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
No comments:
Post a Comment