सन २००५-२००६ ला झालेल्या अतिवृष्टीत डोंगरावरील
जमिन खचलेल्या तारळे विभागातील घाटेवाडी या गांवातील एकूण ९८ घरांचे याच गावाच्या वर
योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे शिवधनुष्य उचलणारे महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट
संसदपटु पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामूळे मंजुर झालेल्या घाटेवाडी
पुर्नवसन गावठाणात घाटेवाडी गावांतील ८४ कुटुंबाचा नवीन घरांमध्ये वास्तूप्रवेश करण्याचा
योग जुळुन आला.या पुनर्वसनाच्या प्रक्रियेत सुरवातीपासून शेवठपर्यंत झोकून देवून काम
करणारे आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज दि.०१ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने
घाटेवाडी या गांवातील ८४ कुटुंबांना पुनर्वसीत गावठाणांतील घरांचा ताबापत्र प्रदान
करण्याचा सोहळा तहसिल कार्यालय,पाटण येथे संपन्न झाला.
सन २००५-२००६
च्या अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील तारळे विभागात मालोशी गावाच्या वर डोंगरपठारावर डोंगरद-यात
सातारा तालुक्याच्या हद्ीला लागून वसलेल्या व डोंगरावरील जमिन खचल्यामुळे बाधित झालेल्या
घाटेवाडी गांवातील बाधितांचे पुर्नवसन आमदार शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नामुळे
पुर्ण झाले या गांवातील या ८४ कुटुंबांना त्यांच्या घरांचा ताबा देण्याचा सोहळा आमदार
शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत दि.०१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून तहसिल
कार्यालय,पाटण याठिकाणी आयोजीत करण्यात आला होता याप्रसंगी आमदार शंभूराज देसाई यांचे
हस्ते या बाधित ८४ कुटुंबांतील कुटुंबप्रमुखांना पुनर्वसित गावठाणातील घराचे ताबापत्राचे
वाटप करण्यात आले.याप्रसंगी पाटणचे प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले,
नायब तहसिलदार विजय माने,निवासी नायब तहसिलदार राजेश जाधव हे अधिकारी उपस्थित होते.
सन २००५-२००६ ला पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात
झालेल्या अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील घाटेवाडी आणि चेवलेवाडी या दोन गांवातील जमिनी
खचण्याचे प्रकार घडले होते त्यामुळे या गांवातील घरांना मोठा धोका निर्माण झाल्याने
तात्काळ तालुक्याचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.विलासरावजी
देशमुख यांना या विषयासंदर्भात तात्काळ बैठक घेवून या दोन्ही गांवाचे तातडीने योग्य
ठिकाणी पुनर्वसन करण्यास निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री
स्व.विलासरावजी देशमुख यांनी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून तात्काळ या दोन्ही गांवाच्या
पुनर्वसनास मान्यता देवून निधी उपलब्ध करुन दिला होता.सन २००७ साली या दोन्ही गांवाचे
पुर्नवसनाच्या कामांस सुरुवात झाली यातील चेवलेवाडी गांवाचे पुनर्वसन तात्काळ होवून
या गांवातील बाधित सर्व कुटुंबे ही नवीन पुर्नवसित गावठाणांत वास्तव्यास देखील गेली
मात्र घाटेवाडी गांवाचे पुर्नवसनाचे नवीन गावठाणांचे काम पुर्णत्वाकडे जावून देखील
येथील बाधित नवीन गावठाणात वास्तव्यास गेली नव्हती. दरम्यान २००९ साली आमदार शंभूराज
देसाई यांचा विधानसभेत पराभव झालेनंतर २००९ ते २०१४ या कालावधीत या पुनर्वसित गावठाणांसंदर्भात
कोणताही निर्णय झाला नसल्याने या ८४ कुंटुंबांचे पुनर्वसन याठिकाणी होवू शकले नाही
मात्र २०१४ ला पुनश्च: आमदार शंभूराज देसाई हे आमदार झालेनंतर त्यांनीच पुढाकार घेवून
घाटेवाडी गांवाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आपण जे शिवधनुष्य उचलले होते ते पुर्ण
करायचेच हा चंग बांधून यासंदर्भात बाधितांच्या संबधित अधिका-यांसमवेत दोन तीन बैठका
घेवून हा पुर्नवसन गावठाणातील प्रश्न मार्गी लावला व या बाधितांना वास्तव्यास जाणेकरीता
त्यांनी पुर्नविसित गावठाणांतील घराचे ताबापत्र देखील दिले. व पुनर्वसित गावठाणांतील
काही घरामध्ये करण्यात आलेल्या सुविधांची मोडतोड झाली आहे त्या सुविधा तात्काळ दुरुस्त
करुन देणेसंदर्भात आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणणेकरीता मी कटीबध्द असल्याचे आमदार
शंभूराज देसाई यांनी सांगितले असून तात्काळ प्रातांधिकारी व तहसिलदार यांनी सार्वजनीक
बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सोबत घेवून या सुविधांचे कामांचे अंदाजपत्रक तयार करुन
ते सादर करण्याच्या सुचना आमदार शंभूराज देसाईंनी दिल्या आहेत.
आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते दगडू जाधव, जगू
घाटे, सिताराम घाटे, मारुती जाधव, लक्ष्मण घाटे, रामचंद्र जाधव, पांडू घाटे, कलाबाई
घाटे जाधव, रामचंद्र जाधव, रघुनाथ घाटे, हणमंत भोसले, लक्ष्मण भोसले, गणपत जाधव, श्रीपती
जाधव, विष्णू जाधव, बाळू जाधव, किसन जाधव, पांडू घाटे, विष्णू घाटे, ज्ञानदेव घाटे,
बाळकू घाटे, गणपत घाटे, कोंडीबा जाधव, लक्षमण घाटे, बंडू घाटे,गणपत जाधव, यशवंत जाधव,
खाशाबा जाधव, कोंडीबा घाटे, शामराव जाधव, मारुती घाटे, श्रीरंग साळूंखे, जोतिराम घाटे,
मारुती चव्हाण, रामचंद्र चाळके, कांताबाई घाटे, लिंबाजी घाटे, दगडू जाधव, यशवंत घाटे,
बाळु घाटे, खाशाबा घाटे, धोंडीराम घाटे, लक्ष्मण घाटे, शिवाजी घाटे,हौसाबाई घाटे, चंदु
घाटे, गुणबाई घाटे, गणपत घाटे, रामचंद्र दुधाने,लक्ष्मण दुधाने, धोंडीबा घाटे, रामचंद्र
घाटे, मारुती घाटे, श्रीपती घाटे, लक्ष्मण जाधव,शंकर जाधव, लक्ष्मण जाधव, तात्याबा
घाटे, कोंडीबा घाटे, मानाजी जाधव, श्रीरंग जाधव, नारायण जाधव, राजाराम जाधव, सर्जेराव
जाधव, शंकर जाधव,जालिंदर घाटे, बंडू घाटे, खाशाबा जाधव, जगन्नाथ घाटे, सर्जेराव घाटे,
यशवंत जाधव, श्रीपती जाधव,शंकर जाधव,कोंडीबा जाधव, बबन जाधव,राजाराम जाधव,बाळु जाधव,बजरंग
जाधव, उत्तम जाधव, गुलाबराव जाधव, साहेबराव जाधव, हंबीरराव जाधव, आनंदा साळूंखे, ज्ञानदेव
साळूंखे या ८४ कुटुंबप्रमुखांना घराचे ताबापत्र देण्यात आले.
चौकट :- मी
दोन गावे वसविली माजी आमदारांनी एक घर तरी वसविले का? आमदार शंभूराज देसाई.
सन २००५-२००६ च्या अतिवृष्टीत जमीन खचलेल्या चेवलेवाडी
आणि घाटेवाडी या दोन गांवाचे आमदार म्हणून पाच वर्षातच मी योग्य ठिकाणी पुनर्वसन करुन
घेतले. चेवलेवाडी गावातील ७९ कुटुंबे आणि घाटेवाडी गावातील ८४ कुटुंबे यांचे पुनर्वसन
होणेकरीता सातत्याने प्रयत्न केले. चेवलेवाडीचे पुर्नवसन झाले परंतू २००९ ला माझेनंतर
आमदार झालेल्या माजी आमदारांना घाटेवाडी पुनर्वसनांची एक वीटही रचता आली नाही.आमदार
म्हणून मी दोन गांवे वसविली माजी आमदार व मंत्री राहिलेल्यांनी एक घर तरी वसविले का
? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment