महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब
यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची ५९ वा पुण्यस्मरण सोहळा
व कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती कार्यक्रम रविवार दि.२० मे २०१८ रोजी
दौलतनगर (मरळी) ता.पाटण येथे सातारा जिल्हयाच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,पाटण मतदारसंघाचे
उकृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक विनीता
व्यास,पुरवठा विभागाच्या उपायुक्त निलीमा धायुगडे,सातारा सिंचन मंडळाच्या अधिक्षक अभियंता
वैशाली नारकर,सातारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी आऱती भोसले, पोलिस उपअधिक्षक गृह विभाग
सातारा राजलक्ष्मी शिवणकर,पाटणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी यांचे प्रमुख
उपस्थितीत संपन्न होत आहे.
पाटण तालुक्यातील मरळीच्या इनामदार घराण्यातील
कुलदिपक लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी अनेक आपत्तींना तोंड देवून आपल्या ध्येयाप्रत
अत्यंत निष्ठेने आणि निकराने तोंड दिले.म्हणूनच ते महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयसिंहासनावरचे
अनिभिषीक्त सम्राट बनले.याच सर्व श्रेय आहे.ते त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) यांच.निपाणी जवळच्या बेनाडीच्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या क्षात्रजगतगुरुच्या
कन्या वत्सलादेवी यांच्याकरीता त्यांचे वडीलांनी कोल्हापुरच्या प्रागणांत चंद्रकोरीप्रमाणे
वाढत जाणारं एक राजबिंड स्वरुप मनोमन हेरुन ठेवले होते.ते म्हणजे लोकनेते बाळासाहेब
देसाई.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेबांनी आपल्या बुध्दीमत्तेच्या चुणकेवर अमोघ कर्तृत्वावर
सा-या कोल्हापूरातील जनतेबरोबरच प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराजांचे लक्ष वेधून घेतले
होतं.बेन्नाडीकरांच्या लक्ष्मीनं मरळीकर देसाईंच्या उंबरठ्यावर ठेवलेंल धान्यांच माप
ओलांडून लक्ष्मीच्या पावलानं गृहप्रवेश करावा असे शाहू महाराजांनी मनोमन ठरविले होते.आणि
त्यांनी त्यांची ही इच्छा पुर्ण केली.
संसार चिमणी पाखऱ सुध्दा करतात.आपल घरटं बांधतात.काडी काडीनं कणा
कणानं वाढवितात.ताईसाहेबांच्या मनाने निश्चित असा विचार केला की,देशाचा प्रपंच उभारणारे
आपले महत्वकांक्षी पती स्वत:च्या घरप्रपंच्यात अडकून पडणे योग्य नाही. आणि ताईसाहेबांची
हिच दूरदृष्टी खऱी ठरली आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर
आपल कुशल बुध्दीमत्तेने राज्य केलं. लोकनेतेसाहेबांच्या आणि ताईसाहेबांच्या संसारवेलीवर
पाच मुले आणि एक मुलगी अशी सहा फुले उमलली होती.आपल्या वडिलांच्या प्रमाणे तीही यशस्वी
झाली आहेत.लोकनेते साहेबांनी राजकारणाच्या उलाढालीतून आपल्या मुलांकडे लक्ष देत ताईसाहेबांनी
मुलांना मोठ करीत वडिलांप्रमाणे कर्तृत्ववान बनविले, जयसिंगराव, अशोकराव,शिवाजीराव,अरुणराव,शरदराव
आणि मंगलाताई या सर्वांनी लोकनेतेसाहेब व ताईसाहेबांचे नाव उज्वल केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळात १९५७
ला मंत्री म्हणून विराजमान झाले आणि ताईसाहेब या लोकनेते साहेबांबरोबर सातारा सोडून
मलबार हिलवरील मेघदूत बंगल्यात गेल्या. कुणीतरी मोठं होण्याची ताईसाहेबांनी महत्वकांक्षा
पार पाडली आणि लोकनेतेसाहेब महाराष्ट्राच्या अमोल कोंदणात रत्नाप्रमाणे चमकू लागले.
परंतू ताईसाहेबांना या धकाधकीच्या काळात शारिरीक हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले.
शारिरीक आजाराने ग्रासल्याने त्यांनी आपले पती आणि मुलांना सोडून इहलोकीची यात्रा संपविली.ताईसाहेबांच्या
निधनानंतर लोकनेते साहेबांनी चढत्या क्रमाची मंत्रीपदे भूषविली.आणि आपल्या मुलांचे
त्यांनी चांगले संगोपन केले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याबरोबर संसार करताना सौ.वत्सलादेवी
यांनी गोरगरीबांची सेवा करुन अनेकांचे संसार सुखी झालेले पाहण्यास धन्यता मानली.नावातच
वात्सल्य असणा-या वात्सल्यमुर्ती ताईसाहेबांची पुण्याई आणि भक्ती यामुळेच लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांनी प्रगतीची अनेक शिखरे गाठली हे आजही कोणी विसरले नाही.कर्तृत्ववान
पुरुषामागे एक कर्तृत्ववान स्त्री असते हे ताईसाहेबांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून कै.सौ.वत्सलादेवी
देसाई (ताईसाहेब) यांची पुण्यतिथी २० मे रोजी साजरी करण्यात येत असून त्यांचे नातू
पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी आपल्या आज्जी कै. ताईसाहेब यांच्या
आदर्श विचारांनी त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे याकरीता त्यांच्या नावाने गत आठ वर्षापासून
पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू कुटूबांतील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता
आर्थिकते अभावी अडचण येवू नये याकरीता त्यांनी कै.सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब)
शिष्यवृत्ती योजना राबवून या मुलींचे पालकत्व घेतले आहे.आज या शिष्यवृ्त्तीचा मतदार
संघातील सुमारे १०० हुन अधिक गरीब मुलींना याचा फायदा मिळत आहे.यंदाच्या वर्षी यामध्ये
२० मुलींची संख्या वाढली आहे आमदार देसाई यांनी राबविलेल्या या योजनेमुळे ख-या अर्थाने
कै.ताईसाहेब यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन करण्यात येत आहे.कै.ताईसाहेब
यांचे ५९ व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्ताने पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने विनम्र
अभिवादन.
मिलींद
माळी
विशेष कार्यासन अधिकारी.
No comments:
Post a Comment