Sunday, 12 July 2026

स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या विचारांचा वारसा शिक्षणातून जपला जात आहे.पालकमंत्री शंभूराज देसाई स्व.शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांचा 40 वी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.

 

        दौलतनगर दि.12: पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहे.दरम्यान पाटण तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले. दौलतनगर परिसरासह तालुक्यात विविध प्रकारची शैक्षणिक दालने उभी करून सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून स्व.शिवाजीराव देसाई यांच्या विचारांचा वारसा शिक्षणातून जपला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी केली.

               ते  दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या 40 व्या पुण्यतिथी व कै.सौ.वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.रविराज देसाई,चि.आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अशोकराव पाटील, सभापती सौ.सविता विजय पवार,उपसभापती विजय पवार, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव पाटील,स्वप्ना पाटील, मृणाल पाटील,सुनिता चाळके,पंचायत समिती सदस्य पंबाजराव देसाई,सचिन यादव,मंगल माने,प्रियांका देसाई,प्रशांत पवार,नितीन काळे, ॲङ डी. पी. जाधव, प्रशांत पाटील,संतोष गिरी, अभिजित पाटील,भरत साळुंखे,चंद्रकांत पाटील,विजयराव देशमुख,बशीर खोंदू,बाळासो पाटील,विलास गोडांबे,प्रशांत पाटील, बळीराम साळुंखे, शंकरराव पाटील, सुरज चव्हाण,अधिकराव देसाई, सौ.दिपाली पाटील, श्रीमती जयश्री कवर, विजय सरगडे व कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.सुहास देसाई यांचेसह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील पदाधिकारी व अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी स्व.आबासाहेबांच्या पुतळ्यास तसेच समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रमाणपत्र परीक्षेत प्रत्येक केंद्रातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र, गौरवचिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कै. सौ. वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले.

                यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सहकार व शिक्षण क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत काम कसे करायचे याची शिकवण खऱ्या अर्थाने स्व.आबासाहेब यांनी दिली. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी कारखाना चालवला आणि अल्पावधीमध्येच हा कारखाना कर्जमुक्त करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या मालकीचा करून दिला. स्वर्गीय शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांनी पाटण तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, हा ध्यास घेत शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रेरणेतून कोयना शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती. मात्र काही विरोधकांनी फसवणूक करून ती संस्था स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यानंतरही न खचता स्व.आबासाहेबांनी मोरणा शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच आयटीआय महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील युवकांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. आज या संस्थांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असून अनेक युवक पुणे, मुंबईसह विविध शहरांमध्ये चांगल्या पदांवर कार्यरत आहेत. सध्या स्पर्धेचे युग आहे. आपण स्वतः शी स्पर्धा केली पाहिजे. ग्रामीण भागात मुल मुली अव्वल कामगिरी करत आहेत.शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे त्यांचे स्वप्न पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम हा त्याच विचारांचा एक भाग आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.पांडूरंग नलवडे यांनी केले तर आभार श्री.विजय पवार यांनी मानले.

No comments:

Post a Comment