Saturday 29 December 2018

माजी मंत्री पाटणकरसाहेब, विकास केला म्हणता तर मी सांगतो त्या रस्त्यांची कामे तुम्हाला का करता आली नाहीत? आमदार शंभूराज देसाईंचा सवाल.





दौलतनगर दि.29:- माझी विकासकामे कागदावर असल्याची टिका करणारे माजी मंत्री पाटणकरसाहेब यांचे सुपुत्र तुमच्या पिताश्रींनी खरोखरच विकास केलाय तर मग मी सांगतो त्या डोंगरपठारावरील मौजे केळेवाडी,म्हारवंड, गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी,हुंबरणे,आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली, जांभेकरवाडी या रस्त्यांची कामे माजी मंत्री पाटणकरसाहेबांना का करता आली नाहीत? याचे उत्तर तालुक्यातील जनतेला दया असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकरांना केला आहे.
                सन 2018-19 च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे म्हारवंड ता.पाटण या ५ किमी अंतराच्या गावपोहोच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी ३ कोटी ८९ लक्ष ३४ हजार रुपये एवढी रक्कम मंजुर केली आहे.याप्रसंगी कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, माजी पंचायत समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, यशवंत जाधव, माजी पं.स. सदस्य सुरेश जाधव,लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे संचालक बबनराव भिसे, म्हारवंड गावचे संजय निकम सर, संतोष निकम शामराव निकम,लक्ष्मण कदम,उमेश सावंत,दत्तात्रय निकम, शामराव निकम,लक्ष्मण कदम,नाथा निकम मुंबई रहिवाशी कार्यकर्ते विकास निकम,यशवंत निमक,बापूराव निकम, रमेश निकम,दिलीप महाडीक अशोक महाडिक,रघुनाथ निकम,वसंत निकम,रामभाऊ बावधाने,जोतिबा बावधाने, रमेश निकम,अंकूश महाडीक, बबनराव माळी,ग्रामसडक योजनेचे उपअभियंता विलास पानस्कर,शाखा अभियंता जाधव आदी मान्यवरांसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले, मतदारसंघाचा आमदार आणत असलेला विकासकामांचा निधी प्रत्यक्षात आहे का कागदावरचा तो मतदारसंघातील जनतेला चांगलाच माहिती आहे. विकास कागदावरचा असता तर एवढया मोठया संख्येने डोंगर आणि ग्रामीण भागातील जनतेने माझे एवढे मोठे जंगी स्वागतच मतदारसंघात केले नसते एका गांवाला एक नाहीतर दोन दोन- तीन तीन विकासकांमे करण्याकरीता निधी मंजुर करुन दिला आहे मंजुर केलेल्या निधीचे पुरावे या जनतेकडे उपलब्ध आहेत माझे माध्यमातून कामे होतायत म्हणूनच मतदारसंघातील जनता माझेकडे कामे मागायला येत आहे जो देवू शकतो त्याच्याकडे जनता कामे मागते आपल्या विरोधकांकडे देण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांना कोण काय मागणार. माजी मंत्री राहिलेल्या पाटणकरसाहेबांना या विभागाने गेल्या अनेक निवडणूकीत पोत्याने भरभरुन मते दिली.मग म्हारवंड गावच्या रस्त्याची ही अवस्था का? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी म्हारवंड ग्रामस्थांना विचारला. मी गांवात येताना मोकळया हाताने आलो नाही सोबत रस्त्याचे काम घेवून आलोय तेही पावणे चार कोटीचे आज माझे हस्ते भूमिपुजन होतय संबधित रस्त्याचे काम करणारी शासकीय यंत्रणा माझे सोबत आली आहे. या गावाचा पाण्याचा प्रश्न होता रस्त्यात वयस्कर आज्जी भेटल्या त्या म्हणाल्या पाण्याचा प्रश्न कधी सुटणार मी त्यांना तिथेच सांगितले आज्जी मी मोकळा आलो नाही रस्त्याबरोबर तुमच्या पाण्याच्या योजनेच्या कामांचा शासनाने दिलेला कार्यारंभ आदेशच सोबत घेवून आलोय. राष्ट्रीय पेयजल योजनेमधून २६ लक्ष रुपयांचा निधी आपण या पिण्याच्या पाण्याच्या कामांकरीता मंजुर केला आहे एवढे सगळे होत असताना मग माजी आमदारपुत्रांना हा विकास कागदावरचा कसा वाटतोय. चार आठ दिवसात रस्त्याचे काम सुरु होईल तेव्हा त्यांनी या गांवात यावे आणि हा रस्ता केवळ कागदावर आहे का प्रत्यक्षात आहे याची उघडया डोळयांनी पहाणी करावी. कोल्हयाला द्राक्षे आंबटच लागतात तशी परिस्थिती या मंडळीची झाली असून आम्ही हे केले, आम्ही ते केले असा विकास केला तसा विकास केला असे सांगणारे माजी मंत्री पाटणकरसाहेब आणि त्यांचे सुपुत्र विकासच केला म्हणताय तर डोंगरी भागातील म्हारवंडसारख्या मौजे केळेवाडी, गाढखोप,शिद्रुकवाडी,गुढे शिबेवाडी,गणेवाडी,हुंबरणे, आंबेघर ते पाळशी,घोट जन्नेवाडी व सडादाढोली,जांभेकर वाडी या महत्वाच्या रस्त्यांची कामे तुम्हाला या २१ वर्षात का करता आली नाहीत याचे उत्तर जनतेला दया असे जाहीर आवाहन त्यांनी बोलताना केले.उपस्थितांचे स्वागत संजय निकम तर विकास निकम यांनी आभार मानले.
चौकट:- आज्जीने शिकवले नातवाला आमदार शंभूराजाचा विजय असो म्हणायला.
रस्त्याच्या भूमिपुजनाकरीता येत असताना आमदार शंभूराज देसाईंचे म्हारवंड या डोंगरी भागातील गावांतील महिलांनी आमदार देसाईंचे रस्त्यावर ठिकठिकाणी स्वागत केले यावेळी येथील महिलांनी औक्षण करताना सोबत घरातील लहानग्या मुलांनाही आणले होते वयस्कर आज्जी कमरेवर नातवांला घेवून धावत आल्या आणि नातवाला आमदार शंभूराजांचा विजय असो असे म्हणायला लावले लहानग्या नातवांनेही बोबडया बोलीत विजय असो असे उद्गार काढले.

१९८३ पासून गोळाबेरीज करुन माजी आमदारांची विकासकामे शुभेच्छांच्या फलकावर. तुलना तुमच्या पाच वर्षाची आणि माझे चार वर्षातील कामांची करा. आमदार शंभूराज देसाईंचा टोला.





दौलतनगर दि.२९:- आमच्या कार्यकर्त्यांनी माझे वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देताना केवळ शुभेच्छा नाहीतर त्या त्या गांवामध्ये माझे माध्यमातून जी कांमे झाली त्याचा पुरावाच शुभेच्छांच्या फलकावर टाकण्याचे काम केले तीच री माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी ओढली असून माजी आमदारांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रम होत असताना जे आमच्या कार्यकर्त्यांनी केले तेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले परंतू त्यांच्या आणि माझे कार्यकर्त्यांची विचारसरणी पाहिली तर मी केवळ या चार वर्षात केलेल्या कामांची माहिती माझे  शुभेच्छांच्या फलकावर दिसेल उलट बाजूला माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी सन १९८३ पासून २०१४ पर्यंत केलेल्या कामांची गोळाबेरीज करुन शुभेच्छा फलकावर टाकली आहेत १९८३ पासूनची कामे टाकण्याची वेळ पाटणकरांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर का आली? मी पोकळ घोषणा करीत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकर पितापुत्रांना लगाविला आहे.
सन 2018-19 च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या ढोरोशी फाटा ते घोट ते जुगाईवाडी ता.पाटण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी ३ कोटी २७ लक्ष ३७ हजार रुपये एवढी रक्कम मंजुर केली आहे.याप्रसंगी कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सेामनाथ खामकर,बबनराव भिसे, शिवदौलत बँकेचे संचालक अभिजीत पाटील,संजय देशमुख,माणिकशहा पवार,विजय पवार फौजी,घोट सरंपच मधुकर आरेकर,उपसरपंच सागर सोनवले, तुकाराम सावंत, पतंग सावंत,मारुती सावंत, रघूनाथ सावंत, विलास सावंत,धोंडीराम सावंत,तानाजी सावंत,अशोक सावंत,शंकर सावंत,शंकर चव्हाण,किसन साळुंखे,शंकर सावंत, बाळू सावंत,सभांजी फडतरे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,माजी आमदारांना स्वत:चा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांचे मागील पाच वर्षात मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसेल असे एकही काम करता आले नाही त्यामुळेच त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन १९८३ पासून केलेल्या कामांचे फोटो टाकून शुभेच्छा देण्याची वेळ आली आहे. आमच्या दादांनी डोंगराएवढा विकास केला असे सांगणारे त्यांचे सुपुत्र, दादांनी जर डोंगराएवढा विकास केला असता तर तालुक्यात विकासाचा एवढा अनुशेष का शिल्लक राहिला असता, सन २००९ ते २०१४ या काळात आपण अल्पशा मतांनी पराभूत झालो त्यावेळी पाटणकर आमदार होते आणि त्यांचेच पक्षाचे सरकार सत्तेत होते, २००९ पासून पुढील पाच वर्षात त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारकडून तालुक्यासाठी किती निधी आणला आणि २०१४ पासून गत साडेचार वर्षात मी युतीच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून किती निधी आणला हे मतदारसंघातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे.माजी आमदार पाटणकर त्यांच्या सरकारकडून त्या पाच वर्षात आवश्यक असणारा निधी तालुक्यासाठी आणण्यास अयशस्वी झाल्यानेच मी आणलेल्या निधीवर पाटणकर पितापुत्रांचा पोटसुळ उठला आहे.माझे त्यांना जाहीर आवाहन आहे की,माजी आमदार पाटणकरांनी २००९ ते २०१४ या काळात आणलेल्या निधीची माहिती पाटण मतदारसंघातील जनतेला दयावी. तुलनाच करायची आहे तर पाच वर्षातील कामांची करा. आम्हीही सत्तेत नसताना तत्कालीन शासनाकडून तसेच सहकार परिषदेचा अध्यक्ष असताना तत्कालीन मंत्रीमहोदयांकडून लाखो रुपयांचा निधी तालुक्यात आणला तर २००४ ते २००९ या काळात आमदार असताना २१७ कोटी रुपयांचा निधी विरोधी पक्षाचा आमदार असताना आणला पण त्या कामांचे फलक माझे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला लावले नाहीत तर या साडेचार वर्षातील कामांचे फलक लावले आहेत हा तुमच्या आणि माझे कामांमधील फरक आहे. तुमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गोळाबेरीज करुन फलकावर टाकलेली कामे जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे त्यामुळे ओढूनताणून आम्हीही काहीतरी केले असे पाटणकरांनी दाखविण्याची काही गरज नसल्याची टिकाही आमदार देसाईंनी शेवठी बोलताना केली. उपस्थितांचे स्वागत रणजित शिंदे यांनी तर भानुदास शिंदे यांनी आभार मानले.
चौकट:- एका दिवसात ९ कोटींची भूमिपुजने.
माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना तालुक्यातील जनतेला काहीतरी दाखविण्याकरीता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी दोन वर्षापुर्वी दिला होता. परंतू मी एका दिवसात ९ कोटी रुपयांच्या कामांची भूमिपुजन करीत आहे. पाटणकर वाढदिवसात मग्न असताना तालुक्याचे आमदार ९-९ कोटींची भूमिपुजने करीत आहे हे तालुक्यातील जनतेला चांगलेच ओळखले आहे.

Wednesday 26 December 2018

वरची केळेवाडी या डोंगरपठारावरील गावाने रस्त्याच्या भूमिपुजनामुळे साजरी केली दिवाळी. आमदार शंभूराज देसाईंमुळे वरची केळेवाडी गावच्या रस्त्याच्या प्रश्न मार्गी. भूमिपुजनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा, रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी १४ लाख ३४ हजार निधी मंजुर.





दौलतनगर दि.२6:- स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी पाटण तालुक्यातील पाटण आणि सातारा या जिल्हयाच्या मध्यावर्ती डोंगरपठारावर वसलेल्या वरची केळेवाडी या गांवास रस्ता नव्हता तो रस्ता युतीच्या राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर करुन देवून या रस्त्याचा प्रश्न तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्यामुळे मार्गी लागला.काल या रस्त्याचे भूमिपुजन आमदार शंभूराज देसाईंच्या हस्ते पार पडले.यावेळी वरची केळेवाडी गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी व युवकांनी भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी अक्षरक्ष: गावामध्ये दिवाळीच साजरी केली.या रस्त्याच्या ५ किलोमीटरच्या कामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.
सन 2018-19 च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे कडवे खुर्द ते वरची केळेवाडी ता.पाटण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे,लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सेामनाथ खामकर,बबनराव भिसे,शिवदौलत बँकेचे संचालक अभिजीत पाटील, संजय देशमुख,माणिकशहा पवार,विजय पवार फौजी,कडवे खुर्द सरपंच रविंद्र सपकाळ,उपसरपंच गुलाबराव सपकाळ, शिवसेना तारळे उपविभाग प्रमुख धनाजी लिंगाळे,चिन्मय कुलकर्णी,तानाजी सपकाळ फौजी,विजय सपकाळ,शंकर सपकाळ,खाशाबा सपकाळ,अंकुश सपकाळ,पांडुरंग सपकाळ,बापू सपकाळ शेठ,महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उपअभियंता विलास पानस्कर,शाखा अभियंता मासेरे,या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार महेश पाटील आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते तसेच केळेवाडी सुधार समितीचे सर्व सदस्य यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी वरची केळेवाडी या गावांस रस्ता नव्हता ही वस्तूस्थिती आहे.आपल्या तालुक्यात विरोधकांच्या रुपाने राज्याचे सार्वजनीक बांधकाम खाते सलग पाच वर्षे मिळाले होते. आज त्यांचे चिरंजीव आमच्या दादांनी हे केले,आमच्या दादांनी ते केले अशा बतावण्या करीत आहेत. त्यांना सलग २१ वर्षे आमदार आणि ५ वर्षे राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना त्यांना वरची केळेवाडी येथील रस्ता करता आला नाही हे दुर्दैव आहे. आज या वाडीचे एकूण मतदान पाहिले तर केवळ १६७ आहे यातील मला किती पडते व विरोधकांना किती पडते याचा विचार मी केला नाही. कडवे खुर्द ते वरची केळेवाडी या ५ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर दिला. अशाप्रकारचे पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील अनेक‍ गांवाचे आणि वाडयावस्त्यांचे प्रलंबीत आणि दुर्लक्षित राहिलेले रस्ते या चार वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी मंजुर केले अनेक रस्त्यांची कामेही मार्गी लागली.आज या रस्त्याचे भूमिपुजन झाले उद्यापासून या रस्त्याचे काम सुरु होईल.कधीही न होणारा हा रस्ता उद्यापासून सुरु होतोय हे पाहून या वाडीतील ग्रामस्थांनी,महिलांनी आणि युवकांनी माझे वाडीमध्ये जंगी स्वागत करुन वाडीमध्ये दिवाळीचा सणच साजरा केला याचे मला आत्मीक समाधान आहे.गतवेळी विरोधी पक्षाचा आमदार असताना २१७ कोटी रुपयांचा विकास या तालुक्यात केला. यावेळी सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना जिल्हयाच्या निधीबरोबर राज्याच्या तिजोरीतून आपल्या मतदार संघातील प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांना खेचून आणण्यात मला या चार वर्षात चांगले यश मिळाले आहे. म्हणूनच जे माजी आमदारांना करता आले नाही ते आपण या चार वर्षात साध्य करुन दाखविले आहे. तालुक्याच्या प्रंलबीत कामांसाठी मरळीत बसून मला निधी मिळाला नाही त्याकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागला आणि तो पाठपुरावा सातत्याने केल्यानेच एवढा मोठा निधी तालुक्यात आला आहे.केळेवाडी ग्रामस्थांनीही हा निधी किती प्रयत्नातून मंजुर झाला हे पाहून येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत वाडीत जी एकी केली आहे ती कायमस्वरुपी ठेवावी असे आवाहनही त्यांनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत संपत सपकाळ यांनी तर रुपेश यादव यांनी आभार मानले.
चौकट:- सिंहासनाधिश्वर हिंदूस्थानात एकच होवून गेले ते छत्रपती शिवाजी महाराज.
तालुक्याचे माजी आमदार यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे.वाढदिवसाचे किती गुणगाण गाऊन घ्यावे यालाही मर्यादा आहेत.आजच्या एका वृत्तपत्रात माझे वाचनात माजी आमदारांना सिंहासनाधिश्वर संबोधण्यात आले आहे.हिंदुस्थानात एकच सिंहासनाधिश्वर होवून गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.आता आपले माजी आमदार यांना सिंहासनाधिश्वर संबोधणे व छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी करणे कितपत योग्य आहे? सरदार मंडळीनी सरदारांसारखेच रहावे,सिंहासनावर बसलेल्या मान्यवरांची बरोबरी करु नये असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणात पाटणकरांना लगाविला.

Monday 24 December 2018

मोरगिरी ते गारवडे रस्त्यांच्या कामांकरीता केंद्रीय मार्ग निधीमधून 68.60 कोटी निधी देणार. केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरीनी दिली आमदार शंभूराज देसाईंना ग्वाही.


 मोरगिरी ते गारवडे रस्त्यांच्या कामांकरीता केंद्रीय मार्ग निधीमधून 68.60 कोटी निधी देणार.
केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरीनी दिली आमदार शंभूराज देसाईंना ग्वाही.


                  गुहाघर-चिपळूण-कराड-जत-विजापूर हा रस्ता कराड चिपळुण रस्त्याला जोडणारा पाटण मतदारसंघातील प्रमुख राज्यमार्ग असून अनेकदा पावसाळयामध्ये हा रस्ता बंद झालेनंतर याला पर्यायी म्हणून नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे असा रस्ता अस्तित्वात आहे. या मार्गाला राज्यमार्ग असा दर्जा दयावा अशी मागणी सातत्याने करीत होतो त्यास राज्य शासनाने नुकतेच १४८ क्रमांकाचा राज्यमार्ग म्हणून मान्यता दिली आहे.या राज्यमार्गाची सुधारणा करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी सातत्याने मी केंद्रीय रस्ते व ग्रामीण विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे करीत होतो कालही सातारा येथील कार्यक्रमात या रस्त्याच्या सुधारणा करणेच्या कामांस निधी दयावा अशी आग्रही मागणी केली तेव्हा ना.नितीन गडकरी यांनी या मार्गावरील भाग मोरगिरी ते गारवडे या रस्त्यांच्या २० कि.मी अंतराच्या सुधारण्याच्या कामांस केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ) योजनेतून लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल अशी ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
            पत्रकात त्यांनी म्हंटले आहे केंद्रीय रस्ते व ग्रामीण विकास मंत्री ना.नितीन गडकरी हे दि.23 रोजी सातारा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळयाकरीता आले असताना समारंभस्थळी ना.गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे राज्यमार्ग १४८ या रस्त्यांच्या सुधारणाकामी या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करुन दयावा अशी लेखी मागणी केली त्यावर ना.गडकरी यांनी  केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ) योजनेतून मोरगिरी ते गारवडे या २० कि.मी रस्त्यास केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ) योजनेतून आवश्यक असणारा 68.60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देणेत येईल असे सांगण्यात आले. दरम्यान सार्वजनीक बांधकाम विभाग सातारा यांनी आपण मागे सुचना दिल्याप्रमाणे या रस्त्यांचा अंदाजपत्रकासह प्रस्ताव सत्वर आपले केंद्रीय मार्ग व रस्ते विभागाकडे सादरही केला आहे. ही बाब मी ना.नितीन गडकरी यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच हा निधी या रस्त्याच्या कामांस देण्यात येईल असे सांगितले.एवढा मोठा निधी मंजुर करीत असलेबद्दल मी ना.नितीन गडकरी यांचे आभार व्यक्त केले असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.

Friday 21 December 2018

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील 14 गावे बफर झोनमध्ये घेण्यासंदर्भात 60 दिवसांत कार्यवाही करावी.

आमदार शंभूराज देसाई यांची बरीच वर्षांची असणारी मागणी.

सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमधील 14 गावे बफर झोनमध्ये घेण्यासंदर्भात 60 दिवसांत कार्यवाही करावी. यासंदर्भात शासन निर्णय 60 दिवसाच्या आत पारीत केला जाईल अशी वनमंत्री     ना. सुधीर मुनगंटीवार (भाऊ) यांची कराड येथील सहयाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नविन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी घोषणा.

शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील 39 गावांना ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १९ डिसेंबर, २०१८ रोजी शासन निर्णय पारित. आमदार शंभूराज देसाई.



शासनाकडे केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील 39 गावांना
०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १९ डिसेंबर, २०१८ रोजी शासन निर्णय पारित.
आमदार शंभूराज देसाई.

­­
          पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी विविध विकास कामांकरीता सन २०१८-१९  या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री यांनी पाटण मतदारसंघातील एकूण ३९ विविध विकासकामांना ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून सदरचा निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामीण विकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे आभार मानले आहेत.
               प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा मतदारसंघातील ३९ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी मंजूर होणेबाबत दि.०३.०९.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.१९ डिसेंबर,२०१८ रोजीचे शासन निर्णया नुसार एकूण ३९ विविध विकास कामांकरीता ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये मल्हारपेठ येथील कराड पाटण रस्ता ते वनारसे हॉस्पीटल रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १५.०० लाख,आडूळ गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १५.०० लाख,आडूळ पेठ, अंतर्गत रस्ता खडीकरण, डांबरीकरण १५.०० लाख,डफळवाडी (मणदुरे),अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण.१५.०० लाख,ढोरोशी जोतिर्लिंग मंदिर रस्ता खडी, डांबरीकरण १०.००लाख, मालदन अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.०० लाख,कोळगेवाडी (चौगुलेवाडी), अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, गुढे काळगाव रस्ता ते अलीकडची धामणी रस्ता खडी,डांबरीकरण करणे. १०.०० लाख,चेणगेवाडी (सळवे), पोहोच रस्ता खडी,डांबरीकरण. १०.०० लाख,चिखलेवाडी (कुभारगाव) चव्हाणवाडी अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, बांबवडे, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.०० लाख,माजगाव, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.०० लाख, जानुगडेवाडी, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.०० लाख,काढोली चिरंबे, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, चिरंबे मणेरी, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, दौलतनगर (निसरे), अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, चाफेर मणेरी पोहोच रस्ता खडी.,डांबरीकरण ०७.०० लाख, मणेरी, तळीये पुर्व अंतर्गत रस्ता खडी.,डांबरीकरण ०७.०० लाख, जमदाडवाडी,अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख,वेखंडवाडी, अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.००लाख,सुतारवस्ती (झाकडे),पोहोच रस्ता खडी, डांबरीकरण २०.०० लाख,उधवणे,पोहोच रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, कळंत्रेवाडी कुंभारगाव,अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.०० लाख, कुठरे, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, धायटी, येथे सभामंडप बांधणे ०८.०० लाख, आंब्रुळे, येथे ०२ शाळा खोल्या इमारतींचे बांधकाम १५.०० लाख, कुसरुंड, येथे ०२ शाळा खोल्या इमारतींचे बांधकाम १५.०० लाख, कवडेवाडी, येथे ०१ शाळा खोली इमारतींचे बांधकाम ०७.०० लाख व पाटण मतदारसंघातील कराड तालुक्यातील म्होप्रे गावपोहोच रस्ता खडी डांबरीकरण ३०.०० लाख, भोळेवाडी, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण २०.०० लाख,केसे नविन गावठाण अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण २०.०० लाख,वस्ती साकुर्डी, भवानीचौक ते जोतिर्लिंग मंदिर रस्ता खडी,डांबरीकरण २०.०० लाख, कळंबेमळा (पश्चिम सुपने), येथील अंतर्गत रस्ता खडी.डांबरीकरण करणे.१०.०० लाख,थोरात मळा (पश्चिम सुपने),येथील अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण ०८.००लाख, सुपने अंतर्गत रस्ता खडी डांबरीकरण १०.०० लाख, बेलदरे,अंतर्गत रस्ता खडी डांबरीकरण १०.०० लाख, डेळेवाडी येथे सभामंडप बांधणे ०८.०० लाख,उत्तर तांबवे, येथे सभामंडप बांधणे ०८.००लाख, आरेवाडी, येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे ०७.०० लाख या विकासकामांचा समावेश असून या कामांना एकूण ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या तातडीने  निविदा प्रसिध्द कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.

Thursday 20 December 2018

२०१९ चा आमदार, गावागावात झालेली विकासकामे पाहून निवडा. आमदार शंभूराज देसाईंचे धडामवाडी केरळ गांवातील भूमिपुजन कार्यक्रमात जनतेला आवाहन.


२०१९ चा आमदार, गावागावात झालेली विकासकामे पाहून निवडा.
आमदार शंभूराज देसाईंचे धडामवाडी केरळ गांवातील भूमिपुजन कार्यक्रमात जनतेला आवाहन.



दौलतनगर दि.२0:- मतदारसंघाचा आमदार हा मतदारसंघातील जनतेची सुखदुख्: जाणणारा आमदार पाहिजे मतदारसंघातील जनतेला त्यांच्या मुलभूत सुविधा मिळवून देण्याकरीता त्या आमदारांनी आपली आमदारकीची राजकीय ताकत वापरली पाहिजे नाहीतर आपल्याकडे एकदा मते मागून गेलेले परत पाच वर्षे आपल्याकडे फिरकण्याचे नावच घेत नाहीत मग जनतेचे प्रश्न सुटणार तरी कसे याचा विचार मतदारांनी करणे आवश्यक आहे.ही निवडणूक ते ती निवडणूक आपल्या दारात येणाऱ्यां पुढाऱ्यांना पाच वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय केले? हा प्रश्न मतदारांनी विचारणे गरजेचे आहे.२०१४ च्या निवडणूकीत मी मते मागायला आलेनंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनांची ७० ते ८० टक्के पुर्तता या तालुक्याचा आमदार म्हणून मी केली आहे.त्यामुळे येणाऱ्यां २०१९ चा आमदार हा पाटण तालुक्यातील जनतेने त्यांच्या गांवामध्ये झालेल्या विकासकामे पाहूनच निवडावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले असून धडामवाडी केरळ या गावाच्या विकासासाठी आपण कायम झुकते माप दिले आहे आणि यापुढेही देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सन 2019-20 च्या जिल्हा वार्षिक आराखडयातून मंजूर झालेल्या मौजे धडामवाडी (केरळ), ता. पाटण येथे वळण बंधारा बांधणे या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमास शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, संचालक वाय. के. जाधव, पी. डी.घाडगे,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश जाधव,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक मधुकर भिसे,बापूराव सावंत,लक्ष्मण संपकाळ,दादा जाधव,अजय पवार,शिवाजी सुतार,विष्णू लोहार,गोविंद लोहार आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,विधानसभेच्या असो वा इतर कोणत्याही निवडणुकीत कोणत्या गावातून किती मते मिळाली,याचा विचार न करता जिथे गरज आणि मागणी आहे,तिथ तिथ विकास कामे पोचविण्याचा दृष्टिकोन माझा पूर्वीपासूनच आहे.विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान येथील ग्रामस्थांनी अंतर्गत तसेच स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत माझेकडे मागणी केली होती ग्रामस्थांना हा रस्ता लवकरात लवकर केला जाईल असे आश्वासन मी दिले होते.सन 2015-16 चे माझे स्थानिक विकास निधीमधून 07 लक्ष रुपयांचा निधी येथील कामांसाठी दिला हे काम पुर्ण झाले. आता वळण बंधारा बांधणे या  कामाकरीता 13.39 लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.तेही काम लवकरात लवकर सुरु होईल  असे सांगून ते म्हणाले कोणतीही निवडणूक आली की अनेकजण अचानक उगवतात.जनतेचा बुध्दीभेद करतात.पोळी भाजत नाही,म्हंटल्यावर शेवटच्या चार दिवसांत चिरीमिरीचा वापर करतात.अनेक वर्षे तालुक्यात विरोधकांकडून अशी दुकाने मांडली गेली आहेत.येणाऱ्या निवडणूकीत ही अशाचप्रकारे दुकाने मांडली जातील परंतू या खेपेला आपल्याला त्यांची हि दुकाने येथील मतदारांनीच बंद करावी लागतील.आम्ही विकास केला असे सांगणारे माजी आमदार यांना तब्बल २१ वर्षे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि काही वर्षे मंत्री राहण्याची संधी मिळाली होती त्या माजी आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातील विविध प्रलंबीत विकासकामे मार्गी लावता आली नाहीत माजी आमदारांच्या आणि माझ्या आमदारकीची फक्त पाच वर्षांच्या  कारकिर्दीची तुलना मतदारसंघातील मतदारांनी करावी,जो विकास कामांमध्ये सरस ठरेल त्यानेच तालुक्याचे नेतृत्व करावे, अशी भूमिका आता जनतेनेच घ्यायला पाहिजे, जे सत्ता असताना काही करु शकले नाहीत, ते आता हातात काहीच नसताना कसला विकास करणार आहेत ? जनतेसमोर जायला त्यांच्याकडे कोणताही मुद्दा राहिलेला नाही.असा टोलाही त्यांनी शेवठी बोलताना लगाविला उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत कदम यांनी तर हणमंत कदम यांनी आभार मानले.

आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण तहसिलमध्ये मराठा दाखल्यांच्या वितरणाचा शुभारंभ. वितरणासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवावा.


आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण तहसिलमध्ये मराठा दाखल्यांच्या वितरणाचा शुभारंभ.
वितरणासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवावा.


दौलतनगर दि.२0:- मराठा आरक्षण जाहीर झालेनंतर आज पहिल्यांदाच पाटण तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पाटण उपविभागीय कार्यालयाच्या वतीने मराठा समाजाच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाच ते सहा मराठा समाजातील युवकांना प्रातिनिधीक स्वरुपात दाखल्याचे वितरण करुन सदरचे दाखले देण्याचा शुभारंभ करण्यात आला.मराठा समाजाच्या दाखल्यांसाठी उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावे व लवकरात लवकर मागणी होईल त्याच दिवशी मराठा समाजाचे दाखले उपविभागीय कार्यालयाने दयावेत अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी केल्या.
               मराठा समाजाचे दाखल्यांचे प्रातिनिधीक स्वरुपातील वितरण तहसिल कार्यालयात केल्यानंतर आमदार शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,नानासो पवार,बबनराव माळी,आयेशा सय्यद विजयराव देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.
                  यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,शासनाने नोकरीची महाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या महाभरतीमध्ये आपले मतदारसंघातील मराठा समाजातील युवकांना या दाखल्यांचा लाभ व्हावा याकरीता उपविभागीय कार्यालयात मराठा दाखला देणेसंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करुन ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करावी व लवकरात लवकर मागणी होईल त्याच दिवशी मराठा समाजाचे दाखले उपविभागीय कार्यालयाने दयावेत तसेच भूकंपाच्या दाखल्यांची मागणी नोकर महाभरतीच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात आपले तालुक्यात होणार आहे त्यामुळे तहसिल तसेच उपविभागीय कार्यालयानेही भूकंपाच्या दाखले देण्याची प्रक्रिया जलग गतीने ठेवावी असेही आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.
                मराठा समाजाचे दाखले देण्याची प्रक्रिया मंडलनिहाय मेळावे आयोजीत केल्यास जास्तीत जास्त मराठा समाजातील युवकांना सदरचे दाखले लवकरात लवकर मिळतील. मराठा समाजाचे दाखले देण्याची प्रक्रिया उपविभागीय कार्यालयात सुरु करण्यात आली असून याचा शुभारंभ माझे हस्ते ठेवण्यात आला याचा मला अभिमान आहे. पाटण तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी लवकरात लवकर मराठा समाजाचे दाखले काढून ठेवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी मराठा समाजाचे दाखले मिळालेल्या युवकांनी आमदार शंभूराज देसाई, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले यांचे आभार मानले.

Wednesday 19 December 2018

पिण्याच्या पाण्यासाठी तामकणेतील महिलांचा मोर्चा. योजना मंजूर होऊनही काम सुरु नाही, काम तातडीने सुरु न केल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा.


                  पिण्याच्या पाण्यासाठी तामकणेतील महिलांचा मोर्चा.
योजना मंजूर होऊनही काम सुरु नाही,
काम तातडीने सुरु न केल्यास बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा.
                  


दौलतनगर:-१9 - आमदार शंभूराज देसाई यांचे स्थानिक विकास निधीतून त्यांनी मंजूर करुन दिलेली नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करावी, या मागणीसाठी तामकणे ता. पाटण येथील ग्रामस्थांनी व महिलांनी मोठया संख्येने सोमवारी पाटण तहसिल कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात मंजुर असणारे पाणी पुरवठयाचे काम तातडीने सुरु करा अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी व महिलांनी दिला आहे.
             प्रांरभी पाटण येथील झेंडा चौक ते तहसिल कार्यालय असा धडक मोर्चा काढत तामकणे गावातील ग्रामस्थ व महिलांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तहसिलदार रामहरी भोसले यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, तामकणे गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांनी व महिलांनी एकत्रित येवून तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडे पाणी योजनेची मागणी केली. आमदार शंभूराज देसाई यांनी तात्काळ आमचे पाण्याचे गांभीर्य ओळखून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरची योजना करणेकरीता प्रत्यक्ष पहाणी करुन अहवाल मागवला.संबंधित पाणी पुरवठा विभागाने नाथाची पाग येथून तामकणे गावच्या हद्दीतील उद्भभवातून या गावास पाणी  योजना करता येईल असा अहवाल दिल्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी सन 2015-16 मध्ये त्यांचे स्थानिक विकास निधीतून तामकणे गांवास ग्रॅव्हीटी नळ पाणी पुरवठा योजनेसाठी सहा लाख रुपये निधी मंजूर केला. या कामाचा कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. परंतू कोणाच्या तरी राजकीय व्देषापोटी या कामात जाणिवपूर्वक अडथळा आणला जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे सदरच्या मंजुर योजनेचे काम लवकरात लवकर सुरु करावे याकरीता आम्ही हा मोर्चा काढला आहे. वास्तविक नाथाची पाग येथे ज्या ठिकाणी पाण्याचा उद्भभव आहे ते ठिकाण तामकणे गावच्या हद्दीत आहे. ते कुळातील असून त्या संदर्भात जमीन क्षेत्राचे संमतीपत्र येथील जमीन मालकाने दिले आहे. दुर्देवाने सध्या संमती देणारी व्यक्ती मयत झाली आहे. गेल्या 11 वर्षापुर्वी आम्ही ग्रामस्थ हे पाणी पिण्याकरीता वापरत होतो गत ११ वर्षांपासून आमच्या गावावरील डोंगरातून येणाऱ्या डोंगंरातून ओघळीतून येणाऱ्या पाण्याचा वापर आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी करीत आहोत. यामुळे आमचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. नाथाची पाग येथील पाणी नाथाची पाग व तामकणे या दोन्ही गावाला पुरेल एवढे असल्याने आम्ही ग्रामस्थांनी या योजनेची मागणी केली आहे.नाथाची पाग येथील ग्रामस्थ पिण्याचे पाणी आम्हास पिण्यासाठी न देता शेतीकरीता वापरत आहेत हे अन्यायकारक आहे.
            दरम्यान सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन हे पाणी नाथाची पाग गावाला पुरेल असा अहवाल दिला आहे. तसेच योजना तात्काळ सुरु करण्याचे आदेश दिले असताना काम अद्याप सुरु करण्यात आले नाही.डोंगरातील ओघळीतून  येणाऱ्या पाण्यामुळे ग्रामस्थांचे तसेच आमचे मुलाबाळांचे आरोग्यास होणारा धोका ओळखून मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरु करावे, अन्यथा सर्व ग्रामस्थ व महिला बेमुदत उपोषण करु असा इशारा निवेदनात दिला आहे.निवेदनावर दोनशेहून अधिक ग्रामस्थांच्या व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Tuesday 11 December 2018

दि.11 डिसेंबर,1967 च्या भूकंपात मृत झालेल्यांना तालुक्याच्या वतीने तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात आमदार शंभूराज देसाईंनी वाहिली श्रध्दाजंली.



दि.11 डिसेंबर,1967 च्या भूकंपात मृत झालेल्यांना तालुक्याच्या वतीने तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात
 आमदार शंभूराज देसाईंनी वाहिली श्रध्दाजंली.


दौलतनगर:-११ --- पाटण तालुक्यात दि.11 डिसेंबर, 1967 रोजी महाप्रलयकारी झालेल्या भूकंपाला आज ५१ वर्षे पुर्ण झाली असून या प्रलयकारी भूकंपात मृत झालेल्या सर्व व्यक्तींना पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात श्रध्दाजंली वाहिली.यावेळी त्यांचेसमवेत पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, यांच्यासह शासकीय सर्व अधिकारी कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
                      श्रध्दाजंली वाहताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,दि.11 डिसेंबर, 1967 रोजी आपले पाटण तालुक्यात महाप्रलयकारी भूकंप झाला या भूकंपाला आज ५१ वर्षे पुर्ण होत असताना या प्रलयकारी भूकंपाच्या आठवणी आजही आपल्या मनात ताज्या आहेत. या प्रलयकारी भूकंपात पाटण तालुक्यातील शेकडो निष्पाप व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले.दि.11 डिसेंबरची पहाट या विभागातील जनतेकरीता दुर्दैवी अशी काळपहाट ठरली.भूकंपात मृत झालेल्या सर्व निष्पाप व्यक्तींना श्रध्दाजंली अर्पण करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.पाटण मतदारसंघाचा प्रथम नागरिक म्हणून मी मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने दि.11 डिसेंबरच्या महाप्रलयकारी भूकंपात मृत झालेल्या सर्वांना श्रध्दाजंली अर्पण करतो. या भूकंपात प्राण गमवावे लागलेल्या तसेच नुकसान झालेल्या भूकंपबाधितांच्या कुटुंबियांना आधार मिळावा याकरीता तालुक्याचे भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुरु केलेले भूकंपग्रस्तांचे दाखले हे मध्यतंरीच्या काळात मिळणे बंद झाले होते तो निर्णय आपण सातत्याने प्रयत्न करुन शासनाकडून डिसेंबर, २०१५ मध्ये करुन घेतला. आज त्याचा लाभ या भूकंपबाधितांच्या वारसांना होत आहे असेही ते म्हणाले.यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांनीही 1967 च्या भूकंपात मृत झालेल्यांना श्रध्दाजंली वाहिली.