शासनाकडे
केलेल्या विशेष प्रयत्नातून पाटण मतदारसंघातील 39 गावांना
०५
कोटी रुपयांचा निधी मंजूर. दि. १९ डिसेंबर, २०१८ रोजी शासन निर्णय पारित.
आमदार
शंभूराज देसाई.
पाटण विधानसभा मतदारसंघातील विविध
गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी विविध
विकास कामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक
वर्षामध्ये विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करुन दयावा अशी मागणी राज्याचे
मुख्यमंत्री यांचेकडे केली होती त्यानुसार मुख्यमंत्री यांनी पाटण मतदारसंघातील
एकूण ३९ विविध विकासकामांना ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती
आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली असून सदरचा निधी मंजुर करुन
दिल्याबद्दल आमदार शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामीण
विकास राज्यमंत्री ना.दादाजी भूसे यांचे आभार मानले आहेत.
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकांत त्यांनी म्हंटले आहे,पाटण विधानसभा
मतदारसंघातील ३९ गावांतील अंतर्गत रस्ते,पोहोच रस्ते,सभामंडप व ग्रामपंचायत
कार्यालय इत्यादी विविध विकासकामांकरीता सन २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये विशेष
बाब म्हणून निधी मंजूर होणेबाबत दि.०३.०९.२०१८ रोजीचे पत्रानुसार मागणी केलेली
होती. त्यानुसार सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस
यांनी शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभाग यांचेकडील दि.१९ डिसेंबर,२०१८
रोजीचे शासन निर्णया नुसार एकूण ३९ विविध विकास कामांकरीता ०५ कोटी रुपयांचा निधी
मंजूर केला आहे. मंजूर झालेल्या विकासकामामध्ये मल्हारपेठ येथील
कराड पाटण रस्ता ते वनारसे हॉस्पीटल रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १५.०० लाख,आडूळ
गावठाण अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे १५.०० लाख,आडूळ पेठ, अंतर्गत रस्ता
खडीकरण, डांबरीकरण १५.०० लाख,डफळवाडी (मणदुरे),अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण.१५.००
लाख,ढोरोशी जोतिर्लिंग मंदिर रस्ता खडी, डांबरीकरण १०.००लाख, मालदन अंतर्गत रस्ता
खडी,डांबरीकरण १५.०० लाख,कोळगेवाडी (चौगुलेवाडी), अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.००
लाख, गुढे काळगाव रस्ता ते अलीकडची धामणी रस्ता खडी,डांबरीकरण करणे. १०.०० लाख,चेणगेवाडी
(सळवे), पोहोच रस्ता खडी,डांबरीकरण. १०.०० लाख,चिखलेवाडी (कुभारगाव) चव्हाणवाडी
अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, बांबवडे, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.००
लाख,माजगाव, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १५.०० लाख, जानुगडेवाडी, अंतर्गत रस्ता
खडी,डांबरीकरण १५.०० लाख,काढोली चिरंबे, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख,
चिरंबे मणेरी, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, दौलतनगर (निसरे), अंतर्गत
रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, चाफेर मणेरी पोहोच रस्ता खडी.,डांबरीकरण ०७.००
लाख, मणेरी, तळीये पुर्व अंतर्गत रस्ता खडी.,डांबरीकरण ०७.०० लाख,
जमदाडवाडी,अंतर्गत रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख,वेखंडवाडी, अंतर्गत रस्ता
खडीकरण,डांबरीकरण १५.००लाख,सुतारवस्ती (झाकडे),पोहोच रस्ता खडी, डांबरीकरण २०.०० लाख,उधवणे,पोहोच
रस्ता खडीकरण,डांबरीकरण १५.०० लाख, कळंत्रेवाडी कुंभारगाव,अंतर्गत रस्ता
खडी,डांबरीकरण १५.०० लाख, कुठरे, अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण १०.०० लाख, धायटी,
येथे सभामंडप बांधणे ०८.०० लाख, आंब्रुळे, येथे ०२ शाळा खोल्या इमारतींचे बांधकाम
१५.०० लाख, कुसरुंड, येथे ०२ शाळा खोल्या इमारतींचे बांधकाम १५.०० लाख, कवडेवाडी,
येथे ०१ शाळा खोली इमारतींचे बांधकाम ०७.०० लाख व पाटण मतदारसंघातील कराड
तालुक्यातील म्होप्रे गावपोहोच रस्ता खडी डांबरीकरण ३०.०० लाख, भोळेवाडी, अंतर्गत
रस्ता खडी,डांबरीकरण २०.०० लाख,केसे नविन गावठाण अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण २०.००
लाख,वस्ती साकुर्डी, भवानीचौक ते जोतिर्लिंग मंदिर रस्ता खडी,डांबरीकरण २०.०० लाख,
कळंबेमळा (पश्चिम सुपने), येथील अंतर्गत रस्ता खडी.डांबरीकरण करणे.१०.०० लाख,थोरात
मळा (पश्चिम सुपने),येथील अंतर्गत रस्ता खडी,डांबरीकरण ०८.००लाख, सुपने अंतर्गत
रस्ता खडी डांबरीकरण १०.०० लाख, बेलदरे,अंतर्गत रस्ता खडी डांबरीकरण १०.०० लाख,
डेळेवाडी येथे सभामंडप बांधणे ०८.०० लाख,उत्तर तांबवे, येथे सभामंडप बांधणे ०८.००लाख,
आरेवाडी, येथे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे ०७.०० लाख या विकासकामांचा
समावेश असून या कामांना एकूण ०५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासंदर्भात
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून या कामांच्या
तातडीने निविदा प्रसिध्द कराव्यात अशा
सुचना दिल्या आहेत लवकरच या विविध विकासकामांना सुरुवात होणार असल्याचेही आमदार
शंभूराज देसाईंनी शेवठी पत्रकात म्हंटले आहे.
Thanks Saheb
ReplyDelete