Friday 7 December 2018

डॉ.भारत पाटणकर व संघटनेचा तामकणे पाणी योजनेबाबत हेकेखोरपणा, जिल्हा प्रशासनाची भूमिका रास्त- आमदार शंभूराज देसाई.


डॉ.भारत पाटणकर व संघटनेचा तामकणे पाणी योजनेबाबत हेकेखोरपणा,
जिल्हा प्रशासनाची भूमिका रास्त- आमदार शंभूराज देसाई.


दौलतनगर दि.07:-  प्रकल्पग्रस्तांच्या नावाखाली नाथाची पाग येथील तामकणे ता.पाटण येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामामध्ये विनाकारण राजकारण आणले जात आहे.येथील स्थानिक राजकारण्यांनी आणि संघटनांनी येथील प्रकल्पग्रस्तांची ढाल करुन राजकारणात स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरु आहे.नाथाची पाग येथील उपलब्ध असणारे पाणी हे तामकणे गांवास देणेस येथील उध्दभव असणाऱ्या क्षेत्रातील जमिनमालकांने परवानगी दिली आहे. त्यानुसारच नाथाची पाग येथे या गांवाला पुरेल एवढे पाणी शिल्लक असून त्यातील पाणी तामकणे गावाला देणेसंदर्भात पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला आहे. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिेकारी यांचे व संबधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या याठिकाणच्या प्रत्यक्ष पहाणीवरुनच पालकमंत्री यांनीही नाथाची पाग येथील उपलब्ध असणारे पाणी हे तामकणे गावांस देण्याचे आदेश दिले आहेत.या गैर असे काहीच नाही डॉ.भारत पाटणकर आणि संघटनेचा तामकणे पाणी योजनेबाबत हेकेखोरपणा सुरु असून जिल्हा प्रशासनाची भूमिका रास्त आहे. डॉ.भारत पाटणकर आणि त्यांची संघटना पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत कसले राजकारण करताय ? असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी केला आहे.
               पत्रकात आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, नाथाची पाग येथे उपलब्ध असणारे पाणी हे येथील प्रकल्पग्रस्तांना देवूनही शिल्लक रहात असल्याने हे पाणी तामकणे येथील गांवास पिण्याकरीता देण्यात यावे असे संबधित पाणी पुरवठा विभागाने सांगितल्यानंतरच आमदार फंडातून या गांवास पिण्याच्या पाण्याची योजना देणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयानेही सर्व कागदपत्रांची तपासणी करुनच या योजनेकरीता मंजुरी दिली आहे. केवळ आडमुठेपणाचे धोरण राबवून तामकणे गावांस पाणीच मिळवून दयायचे नाही असा अट्टाहास आणि बालहट्ट येथील स्थानिक राजकारण्यांनी आणि संघटनेने येथील प्रकल्पग्रस्तांना वेटीस धरुन केला आहे हे पुर्णत: चुकीचे आहे. नाथाची पाग येथील पाणी या गांवास पिण्याबरोबर येथील प्रकल्पग्रस्त हे त्यांचे शेतीकरीताही वापरतात त्यातील पिण्याचे पाणी हे तामकणे गांवास दयायचे आहे आणि त्यास पाण्याचा उद्भव आहे त्या जमिनक्षेत्राच्या जमिनमालकाने लेखी संमतीदेखील दिली आहे. त्यास आडकाठी आणण्याचा विषयच येत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेत राजकारण आणणाऱ्यांकडून कुठला आदर्श घ्यायचा. दुष्काळी भागात लोकांना पाण्यासाठी मैलं न मैल जावे लागत आहे.आपल्या तालुक्यात पाणीच पाणी आहे परंतू केवळ राजकारणाच्या अट्टाहासापोटी आमदारांनी ही पाणी योजना दिली आहे तर ती कोणत्याही परिस्थितीत करुन दयायची नाही हा आडमुठेपणा ना स्थानिक राजकारण्यांना शोभत ना डॉ. भारत पाटणकर आणि त्यांच्या संघटनेला शोभत. याच मंडळींनी जाणिवपुर्वक नाथाची पाग येथील प्रकल्पग्रस्तांना भडकावले असून त्यांच्यावर राजकीय दबाव टाकून त्यांना न्यायालयापर्यंत जाणेसाठी भाग पाडले आहे ही बाब आता न्यायप्रविष्ठ झाली आहे. जिल्हा प्रशासनानेही या राजकारण्यांचा आणि संघटनेचा डाव काय आहे हे चांगलेच ओळखले आहे. ज्या प्रकल्पग्रस्तांनी महाराष्ट्राला पाणी दिले त्याच प्रकल्पग्रस्तांना या पाण्यासाठी न्यायालयात जाण्यास भाग पाडणे हे आपल्यासाठी लाजिरवाणे आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरुन तामकणे गावांतील ग्रामस्थ हे पिण्याचे पाणी इतरत्र पळवून नेत नाहीत तर नाथाचीपाग येथील प्रकल्पग्रस्तांना माणूसकीच्या नात्याने आणि हक्काने ते पाणी मागत आहेत पण तेही देण्यास येथील प्रकल्पग्रस्त तयार नाहीत ते ही दुसऱ्यांच्या सांगण्यावरुन ही बाब चुकीचे असून पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात कसले राजकारण करताय राजकारणच करायचे आहे तर उघडपणे करा. प्रकल्पग्रस्तांची ढाल करुन स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्यांना यातून काही साध्य होणार नाही असा टोलाही त्यांनी शेवठी लगाविला आहे.

No comments:

Post a Comment