दौलतनगर दि.0७:- माझ्या सातारा ते मरळी शटल सेवेची आणि मी
आयोध्येला का गेलो नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा सत्यजितसिंह पाटणकर मी
केलेल्या विकासकामांवर बोला.माझेमुळे मतदारसंघ विकासाच्या प्रवाहात आलाय आणि
येतोय, तुमच्या हातात देण्यासारखे काहीच नाही हे मतदारसंघातील जनतेनेही आता
चांगलेच ओळखले आहे. नुसतीच पोपटपंची करत बसलाय म्हणूनच तुमच्या पक्षाचे आणि गटाचे
नेतृत्व मानणारी अनेक गांवे ही माझेकडे रस्ता, पाणी, वीज या त्यांच्या मुलभूत गरजा
पुर्ण करुन घेणेकरीता विकासकामांच्या माध्यमातून येत आहेत.अनेक गांवानी विकासकामांच्या
जोरावर माझे नेतृत्व मानुन तुमच्या विचारांच्या गांवामध्ये माझे जंगी स्वागत केलेय
त्यामुळेच तुमचा पोटसुळ उठलाय आणि नको ते बेताल वक्तव्य तुम्ही सुरु केली आहेत.तुमच्या
बालिशपणाच्या बेताल वक्तव्यामुळेच तुमच्याकडे पाठ फिरवून ही जनता माझेकडे आलेली आहे.वाडयात
बसून निवडणूका जिंकल्याच्या गप्पा मारणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही जिकंलेल्या
पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका या जनशक्तीच्या नाहीतर धनशक्तीच्या
जोरावर जिंकल्या आहेत हे अवघा मतदारसंघ जाणतो असा प्रतिहल्ला आमदार शंभूराज देसाईंनी
केला आहे.
आमदार
शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे की,
विधानसभा निवडणूकीला अजुन बराच वेळ आहे हे मलाही
चांगलेच माहिती आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत तुमची अवस्था काय होणार आहे
हे मी सांगायला नको ते वेळ आल्यावर मतदारसंघातील जनताच तुम्हाला दाखवून
देईल.सत्यजितसिंह पाटणकर तुम्हीच निवडणूकीला समोर असणार असे भाकीत केले आहे
यावरुनच निवडणूकीचा निकाल काय लागणार आहे हे मतदारसंघातील जनतेलाही चांगलेच माहिती
आहे.२०१४ च्या निवडणूकीतही तुम्हीच समोर होता तेव्हा काय अवस्था झाली होती हे आपण
पाहिले आहे.पाटणकर पितापुत्रांचा नामोल्लेख करुन त्यांच्या नावाचे तुणतुणे
वाजवायला इथे कुणाला वेळ आहे. तुणतुणे तर तुम्ही वाजवताय माझ्या नावाचे म्हणूनच
जळी,स्थळी,काष्टी,पाषाणी पाटणकर पितापुत्रांना मीच दिसतोय आणि मी सातारा ते मरळी
शटल सेवा करीन नाहीतर पाटण ते सातारा शटल सेवा करीन तुमच्यासारखे लपून तर बसत नाही
मग तुमच्या पोटात का दुखतय? निवडणूकीत माझेसमोर कोण आहे याचा विचार मी कधीच केला
नाही.सत्यजितसिंह पाटणकर आपले पिताश्रींविरोधात मी एकदा नाही तर तीनवेळा निवडणूक
लढलो आहे.आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री असताना मी त्यांना घरी बसविले आहे.त्यामुळे
कुणी कुणाला धुळ चारलीय हे मी नव्याने सांगायला नको.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीला
वाडयातून बाहेर पडल्यावर काय करेन या अविर्भावात जर तुम्ही असाल तर येणाऱ्या
निवडणूकीला जनतेच्या दारात कोणत्या तोंडाने जाणार आहात याचा विचार पहिल्यांदा
करा.मी केलेली कोटयावधी रुपयांची विकासकामे घेवून जनतेच्या दारात मते मागायला
जाणार आहे.तुम्ही स्वत: या चार वर्षात जनतेला काय दिले आहे.तुमचे कतृत्व ते काय?
म्हणून जनतेने तुम्हाला मतदान का करायचे असा प्रश्न आता मतदारसंघातील जनतेला
पडलेला आहे.मतदारसंघातील जनताच त्यांचा लोकप्रतिनिधी कोण असावा हे ठरविणार आहे.
माझा उतावळेपणा काढण्यापेक्षा तुमचाच उतावळेपणा मतदारसंघातील जनतेच्या लक्षात येवू
लागला आहे.पार्टटाईम राजकारणी कोण आहे आणि जनतेच्या उपयोगी येणारा कोण आहे हे
मतदारसंघातील जनतेने ओळखले आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणूकीत १८८२४ मताधिक्क्याने
पराभव झाल्यानंतर त्याच चिरेंबदी वाडयातून बाहेर पडायला तुम्हाला तीन वर्षे लागली होती.२००९
ला माझा पराभव झाला तेव्हा तुमच्यासारखा तीन तीन वर्षे मी चिरेबंदी वाडयात बसून
नव्हतो पराभवाच्या दुसऱ्या दिवशी मी जनतेच्या दारात त्यांचे आभार मानायला गेलो
होतो.हे मतदारसंघातील जनतेने पाहिले आहे.तुम्ही पडल्यानंतर किती गावांत जावून
मतदारांचे आभार मानले हे सांगु शकता का ? तुमचा जनसंपर्क किती आहे हे मला
पाहण्याची गरजच नाही आणि तुम्हाला जनसंपर्क शिकवुन तुम्ही थोडेच शिकणार आहात
माझेकडून त्यामुळे नको ती वक्तव्य करुन सत्यजितसिंह पाटणकरांनी आपलेच हसे करुन
घेवू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. मी मतदारसंघात कोटयावधी रुपयांची कामे दिली
आहेत म्हणूनच मतदारसंघातील जनता माझा गाजावाजा करीत गांवामध्ये स्वागत करीत आहे.
तुम्ही काय दिले असते तर तुमचापण गाजावाजा जनतेने केला असता पण तुमच्या हातात
देण्यासारखे काहीच नाही हे जनताही चांगलेच ओळखते.जनतेचे काम करुन मी त्यांच्यावर उपकार
करीत नाही.आणि तसे जनतेलाही वाटत नाही त्यामुळे त्याचे आपण वाईट वाटून घेवू
नये. मतदारसंघातील जनता माझे कामाचे कौतुक करतेय हे पाहून तुम्हाला वाईट वाटणे
साहजिक आहे लोकप्रतिनिधींची कर्तव्य काय असतात हे तुम्हाला समजायला अजून बराच वेळ
आहे.
ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत
समितीच्या निवडणूकीचे तुणतुणे तुम्ही सारखे वाजवित आहात त्या निवडणूकीत तुमच्या
पक्षाचे उमेदवार कसे निवडून आले हे माझेपेक्षा तुम्ही आणि मतदारसंघातील जनताही
चांगलेच ओळखते. कुणी किती धनशक्तीचा वापर त्या त्या जिल्हा परिषद गटामध्ये केला
आणि त्याचा फायदा कसा पंचायत समितीच्या उमेदवारांना झाला आणि ते निवडून आले हे मी
सांगण्याची गरज नाही.हा विजय जनशक्तीचा नव्हता तो धनशक्तीचा होता.आणि
कारखान्याविषयी आपणांस अनेकदा सांगितले आहे दुसऱ्याचे वाकून पाहण्यापेक्षा स्वत:चे
झाकून ठेवलेले आधी पहा.जर नवीन कारखाना काढणारच नसाल तर त्या शेतकऱ्यांनी
गुंतवलेले पैसे तरी त्यांचे त्यांना परत दया आणि नको ती पत्रकबाजी करुन आमचा वेळ
घालविण्यापेक्षा जनतेच्या हिताकरीता काही करता येते ते युवा नेते म्हणून आधी पहा
असा सल्लाही आमदार शंभूराज देसाईंनी सत्यजितसिंह पाटणकरांना दिला आहे.
No comments:
Post a Comment