Thursday 6 December 2018

दौलतनगरला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. मदार शंभूराज देसाईंनी वाहिली आदराजंली.





     
     भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत दौलतनगर,ता.पाटण येथे त्यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करुन आदराजंली वाहून विन्रम अभिवादन करण्यात आले.
     यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचचे  मरळी, चोपदारवाडी गावातील बौध्द समाजातील सर्व कार्यकर्ते,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,माजी सदस्य बशीर खोंदू,जालंदर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील विविध संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
    यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,फक्त वही-पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुध्दीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे,शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण ही शिकवण देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला मोठी शिकवण दिली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या पुस्तकामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या भारताची अर्थव्यवस्था कशा प्रकारची असावी याविषयीची धारणा त्यांनी मांडली आहे.देशाची सर्व सुसाधने सामान्य लोकांच्या हितासाठी वापरली गेली पाहिजेत असे घटनेमधील प्रस्तावनेत आणि मार्गदर्शक तत्वामध्ये लिहले आहे हे डॉ.बाबासाहेब यांचे फार मोठे योगदान आहे.त्यांनी संविधांनातून सगळयांना आर्थिक न्याय मिळाला पाहिजे अशी मांडणी केली आहे.त्यांनी लिहलेल्या राज्यघटनेवर आपण सर्वजण काम करीत आहोत. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ वा महापरिनिर्वाण दिन साजरा होत असून महामानव असणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांचे ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने आदराजंली वाहून मी विन्रम अभिवादन करतो असे आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment