दौलतनगर दि.२6:- स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी पाटण तालुक्यातील
पाटण आणि सातारा या जिल्हयाच्या मध्यावर्ती डोंगरपठारावर वसलेल्या वरची केळेवाडी
या गांवास रस्ता नव्हता तो रस्ता युतीच्या राज्य शासनाने नव्याने सुरु केलेल्या
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून मंजुर करुन देवून या रस्त्याचा प्रश्न तालुक्याचे
आमदार शंभूराज देसाई यांच्यामुळे मार्गी लागला.काल या रस्त्याचे भूमिपुजन आमदार
शंभूराज देसाईंच्या हस्ते पार पडले.यावेळी वरची केळेवाडी गावातील ग्रामस्थांनी आणि
महिलांनी व युवकांनी भूमिपुजन कार्यक्रमाप्रसंगी अक्षरक्ष: गावामध्ये दिवाळीच
साजरी केली.या
रस्त्याच्या ५ किलोमीटरच्या कामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी ५ कोटी १४ लाख ३४
हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे.
सन 2018-19 च्या मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतंर्गत आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या मौजे कडवे खुर्द ते
वरची केळेवाडी ता.पाटण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई
यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमास माजी पंचायत
समिती सदस्य बबनराव शिंदे,लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे संचालक
गजानन जाधव,सेामनाथ खामकर,बबनराव भिसे,शिवदौलत बँकेचे संचालक अभिजीत पाटील, संजय
देशमुख,माणिकशहा पवार,विजय पवार फौजी,कडवे खुर्द सरपंच रविंद्र सपकाळ,उपसरपंच
गुलाबराव सपकाळ, शिवसेना तारळे उपविभाग प्रमुख धनाजी लिंगाळे,चिन्मय कुलकर्णी,तानाजी
सपकाळ फौजी,विजय सपकाळ,शंकर सपकाळ,खाशाबा सपकाळ,अंकुश सपकाळ,पांडुरंग सपकाळ,बापू
सपकाळ शेठ,महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था उपअभियंता विलास पानस्कर,शाखा
अभियंता मासेरे,या रस्त्याचे काम करणारे ठेकेदार महेश पाटील आदी प्रमुख पदाधिकारी
यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते तसेच केळेवाडी सुधार समितीचे सर्व सदस्य यांची
मोठया संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली तरी वरची केळेवाडी या
गावांस रस्ता नव्हता ही वस्तूस्थिती आहे.आपल्या तालुक्यात विरोधकांच्या रुपाने
राज्याचे सार्वजनीक बांधकाम खाते सलग पाच वर्षे मिळाले होते. आज त्यांचे चिरंजीव
आमच्या दादांनी हे केले,आमच्या दादांनी ते केले अशा बतावण्या करीत आहेत. त्यांना
सलग २१ वर्षे आमदार आणि ५ वर्षे राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री असताना त्यांना
वरची केळेवाडी येथील रस्ता करता आला नाही हे दुर्दैव आहे. आज या वाडीचे एकूण मतदान
पाहिले तर केवळ १६७ आहे यातील मला किती पडते व विरोधकांना किती पडते याचा विचार मी
केला नाही. कडवे
खुर्द ते वरची केळेवाडी या ५ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामांसाठी मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतून ५ कोटी १४ लाख ३४ हजार रुपयांचा निधी मंजुर दिला. अशाप्रकारचे
पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील अनेक गांवाचे आणि वाडयावस्त्यांचे प्रलंबीत आणि
दुर्लक्षित राहिलेले रस्ते या चार वर्षाच्या आमदारकीच्या काळात मी मंजुर केले अनेक
रस्त्यांची कामेही मार्गी लागली.आज या रस्त्याचे भूमिपुजन झाले उद्यापासून या
रस्त्याचे काम सुरु होईल.कधीही न होणारा हा रस्ता उद्यापासून सुरु होतोय हे पाहून
या वाडीतील ग्रामस्थांनी,महिलांनी आणि युवकांनी माझे वाडीमध्ये जंगी स्वागत करुन
वाडीमध्ये दिवाळीचा सणच साजरा केला याचे मला आत्मीक समाधान आहे.गतवेळी विरोधी
पक्षाचा आमदार असताना २१७ कोटी रुपयांचा विकास या तालुक्यात केला. यावेळी
सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना जिल्हयाच्या निधीबरोबर राज्याच्या
तिजोरीतून आपल्या मतदार संघातील प्रलंबीत राहिलेल्या विकासकामांना खेचून आणण्यात
मला या चार वर्षात चांगले यश मिळाले आहे. म्हणूनच जे माजी आमदारांना करता आले नाही
ते आपण या चार वर्षात साध्य करुन दाखविले आहे. तालुक्याच्या प्रंलबीत कामांसाठी
मरळीत बसून मला निधी मिळाला नाही त्याकरीता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा
लागला आणि तो पाठपुरावा सातत्याने केल्यानेच एवढा मोठा निधी तालुक्यात आला आहे.केळेवाडी
ग्रामस्थांनीही हा निधी किती प्रयत्नातून मंजुर झाला हे पाहून येणाऱ्या विधानसभा
निवडणूकीत वाडीत जी एकी केली आहे ती कायमस्वरुपी ठेवावी असे आवाहनही त्यांनी शेवठी
बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत संपत सपकाळ यांनी तर रुपेश यादव यांनी आभार
मानले.
चौकट:-
सिंहासनाधिश्वर हिंदूस्थानात एकच होवून गेले ते छत्रपती शिवाजी महाराज.
तालुक्याचे माजी आमदार
यांचा आज अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे.वाढदिवसाचे किती गुणगाण गाऊन घ्यावे
यालाही मर्यादा आहेत.आजच्या एका वृत्तपत्रात माझे वाचनात माजी आमदारांना सिंहासनाधिश्वर
संबोधण्यात आले आहे.हिंदुस्थानात एकच सिंहासनाधिश्वर होवून गेले ते म्हणजे छत्रपती
शिवाजी महाराज.आता आपले माजी आमदार यांना सिंहासनाधिश्वर संबोधणे व छत्रपती शिवाजी
महाराज यांची बरोबरी करणे कितपत योग्य आहे? सरदार मंडळीनी सरदारांसारखेच रहावे,सिंहासनावर
बसलेल्या मान्यवरांची बरोबरी करु नये असा टोलाही त्यांनी आपल्या भाषणात पाटणकरांना
लगाविला.
No comments:
Post a Comment