२०१९
चा आमदार, गावागावात झालेली विकासकामे पाहून निवडा.
आमदार
शंभूराज देसाईंचे धडामवाडी केरळ गांवातील भूमिपुजन कार्यक्रमात जनतेला आवाहन.
दौलतनगर दि.२0:- मतदारसंघाचा
आमदार हा मतदारसंघातील जनतेची सुखदुख्: जाणणारा आमदार पाहिजे मतदारसंघातील जनतेला
त्यांच्या मुलभूत सुविधा मिळवून देण्याकरीता त्या आमदारांनी आपली आमदारकीची राजकीय
ताकत वापरली पाहिजे नाहीतर आपल्याकडे एकदा मते मागून गेलेले परत पाच वर्षे
आपल्याकडे फिरकण्याचे नावच घेत नाहीत मग जनतेचे प्रश्न सुटणार तरी कसे याचा विचार
मतदारांनी करणे आवश्यक आहे.ही निवडणूक ते ती निवडणूक आपल्या दारात येणाऱ्यां पुढाऱ्यांना
पाच वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय केले? हा प्रश्न मतदारांनी विचारणे गरजेचे
आहे.२०१४ च्या निवडणूकीत मी मते मागायला आलेनंतर मतदारांना दिलेल्या आश्वासनांची
७० ते ८० टक्के पुर्तता या तालुक्याचा आमदार म्हणून मी केली आहे.त्यामुळे येणाऱ्यां
२०१९ चा आमदार हा पाटण तालुक्यातील जनतेने त्यांच्या गांवामध्ये झालेल्या
विकासकामे पाहूनच निवडावा असे आवाहन आमदार शंभूराज देसाईंनी केले असून धडामवाडी
केरळ या गावाच्या विकासासाठी आपण कायम झुकते माप दिले आहे आणि यापुढेही देणार
असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सन 2019-20 च्या जिल्हा
वार्षिक आराखडयातून मंजूर झालेल्या मौजे धडामवाडी (केरळ), ता. पाटण येथे वळण
बंधारा बांधणे या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात
आले.याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमास शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ
मिलिंद पाटील, संचालक वाय. के. जाधव, पी. डी.घाडगे,माजी पंचायत समिती सदस्य सुरेश
जाधव,कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,माजी संचालक मधुकर भिसे,बापूराव सावंत,लक्ष्मण
संपकाळ,दादा जाधव,अजय पवार,शिवाजी सुतार,विष्णू लोहार,गोविंद लोहार आदी प्रमुख
पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना आमदार देसाई
म्हणाले,विधानसभेच्या असो वा इतर कोणत्याही निवडणुकीत कोणत्या गावातून किती मते
मिळाली,याचा विचार न करता जिथे गरज आणि मागणी आहे,तिथ तिथ विकास कामे पोचविण्याचा
दृष्टिकोन माझा पूर्वीपासूनच आहे.विधानसभेच्या निवडणूकीदरम्यान येथील ग्रामस्थांनी
अंतर्गत तसेच स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत माझेकडे मागणी केली होती
ग्रामस्थांना हा रस्ता लवकरात लवकर केला जाईल असे आश्वासन मी दिले होते.सन 2015-16
चे माझे स्थानिक विकास निधीमधून 07 लक्ष रुपयांचा निधी येथील कामांसाठी दिला हे
काम पुर्ण झाले. आता वळण बंधारा बांधणे या
कामाकरीता 13.39 लाख रुपयांचा निधी मंजुर केला आहे.तेही काम लवकरात लवकर
सुरु होईल असे सांगून ते म्हणाले कोणतीही
निवडणूक आली की अनेकजण अचानक उगवतात.जनतेचा बुध्दीभेद करतात.पोळी भाजत
नाही,म्हंटल्यावर शेवटच्या चार दिवसांत चिरीमिरीचा वापर करतात.अनेक वर्षे
तालुक्यात विरोधकांकडून अशी दुकाने मांडली गेली आहेत.येणाऱ्या निवडणूकीत ही
अशाचप्रकारे दुकाने मांडली जातील परंतू या खेपेला आपल्याला त्यांची हि दुकाने
येथील मतदारांनीच बंद करावी लागतील.आम्ही विकास केला असे सांगणारे माजी आमदार
यांना तब्बल २१ वर्षे सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि काही वर्षे मंत्री राहण्याची
संधी मिळाली होती त्या माजी आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांच्या हक्काच्या
मतदारसंघातील विविध प्रलंबीत विकासकामे मार्गी लावता आली नाहीत माजी आमदारांच्या
आणि माझ्या आमदारकीची फक्त पाच वर्षांच्या कारकिर्दीची तुलना मतदारसंघातील मतदारांनी
करावी,जो विकास कामांमध्ये सरस ठरेल त्यानेच तालुक्याचे नेतृत्व करावे, अशी भूमिका
आता जनतेनेच घ्यायला पाहिजे, जे सत्ता असताना काही करु शकले नाहीत, ते आता हातात
काहीच नसताना कसला विकास करणार आहेत ? जनतेसमोर जायला त्यांच्याकडे कोणताही मुद्दा
राहिलेला नाही.असा टोलाही त्यांनी शेवठी बोलताना लगाविला उपस्थितांचे स्वागत चंद्रकांत
कदम यांनी तर हणमंत कदम यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment