मोरगिरी
ते गारवडे रस्त्यांच्या कामांकरीता केंद्रीय मार्ग निधीमधून 68.60 कोटी निधी
देणार.
केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरीनी दिली आमदार शंभूराज
देसाईंना ग्वाही.
गुहाघर-चिपळूण-कराड-जत-विजापूर हा
रस्ता कराड चिपळुण रस्त्याला जोडणारा पाटण मतदारसंघातील प्रमुख राज्यमार्ग असून
अनेकदा पावसाळयामध्ये हा रस्ता बंद झालेनंतर याला पर्यायी म्हणून नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे
असा रस्ता अस्तित्वात आहे. या मार्गाला राज्यमार्ग असा दर्जा दयावा अशी मागणी
सातत्याने करीत होतो त्यास राज्य शासनाने नुकतेच १४८ क्रमांकाचा राज्यमार्ग म्हणून
मान्यता दिली आहे.या राज्यमार्गाची सुधारणा करणेकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध
करुन दयावा अशी मागणी सातत्याने मी केंद्रीय रस्ते व ग्रामीण विकास मंत्री
ना.नितीन गडकरी यांचेकडे करीत होतो कालही सातारा येथील कार्यक्रमात या रस्त्याच्या
सुधारणा करणेच्या कामांस निधी दयावा अशी आग्रही मागणी केली तेव्हा ना.नितीन गडकरी
यांनी या मार्गावरील भाग मोरगिरी ते गारवडे या रस्त्यांच्या २० कि.मी अंतराच्या सुधारण्याच्या
कामांस केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ) योजनेतून लवकरच निधी उपलब्ध करुन दिला जाईल
अशी ग्वाही दिली असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे
दिली आहे.
पत्रकात त्यांनी म्हंटले आहे
केंद्रीय रस्ते व ग्रामीण विकास मंत्री ना.नितीन गडकरी हे दि.23 रोजी सातारा येथे
विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळयाकरीता आले असताना समारंभस्थळी ना.गडकरी
यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नवजा-हेळवाक-मोरगिरी-गारवडे राज्यमार्ग १४८ या
रस्त्यांच्या सुधारणाकामी या आर्थिक वर्षात निधी उपलब्ध करुन दयावा अशी लेखी मागणी
केली त्यावर ना.गडकरी यांनी केंद्रीय
मार्ग निधी (सी.आर.एफ) योजनेतून मोरगिरी ते गारवडे या २० कि.मी रस्त्यास केंद्रीय
मार्ग निधी (सी.आर.एफ) योजनेतून आवश्यक असणारा 68.60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
करुन देणेत येईल असे सांगण्यात आले. दरम्यान सार्वजनीक बांधकाम विभाग सातारा यांनी
आपण मागे सुचना दिल्याप्रमाणे या रस्त्यांचा अंदाजपत्रकासह प्रस्ताव सत्वर आपले
केंद्रीय मार्ग व रस्ते विभागाकडे सादरही केला आहे. ही बाब मी ना.नितीन गडकरी
यांचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लवकरच हा निधी या रस्त्याच्या कामांस
देण्यात येईल असे सांगितले.एवढा मोठा निधी मंजुर करीत असलेबद्दल मी ना.नितीन गडकरी
यांचे आभार व्यक्त केले असल्याचेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment