Thursday 20 December 2018

आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण तहसिलमध्ये मराठा दाखल्यांच्या वितरणाचा शुभारंभ. वितरणासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवावा.


आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाटण तहसिलमध्ये मराठा दाखल्यांच्या वितरणाचा शुभारंभ.
वितरणासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवावा.


दौलतनगर दि.२0:- मराठा आरक्षण जाहीर झालेनंतर आज पहिल्यांदाच पाटण तहसिलदार कार्यालयाच्या प्रांगणात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते पाटण उपविभागीय कार्यालयाच्या वतीने मराठा समाजाच्या दाखल्याचे वितरण करण्यात आले.आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते पाच ते सहा मराठा समाजातील युवकांना प्रातिनिधीक स्वरुपात दाखल्याचे वितरण करुन सदरचे दाखले देण्याचा शुभारंभ करण्यात आला.मराठा समाजाच्या दाखल्यांसाठी उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करावे व लवकरात लवकर मागणी होईल त्याच दिवशी मराठा समाजाचे दाखले उपविभागीय कार्यालयाने दयावेत अशा सुचनाही आमदार शंभूराज देसाईंनी केल्या.
               मराठा समाजाचे दाखल्यांचे प्रातिनिधीक स्वरुपातील वितरण तहसिल कार्यालयात केल्यानंतर आमदार शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बबनराव भिसे,नानासो पवार,बबनराव माळी,आयेशा सय्यद विजयराव देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.
                  यावेळी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,शासनाने नोकरीची महाभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. या महाभरतीमध्ये आपले मतदारसंघातील मराठा समाजातील युवकांना या दाखल्यांचा लाभ व्हावा याकरीता उपविभागीय कार्यालयात मराठा दाखला देणेसंदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करुन ही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख करावी व लवकरात लवकर मागणी होईल त्याच दिवशी मराठा समाजाचे दाखले उपविभागीय कार्यालयाने दयावेत तसेच भूकंपाच्या दाखल्यांची मागणी नोकर महाभरतीच्या अनुषंगाने मोठया प्रमाणात आपले तालुक्यात होणार आहे त्यामुळे तहसिल तसेच उपविभागीय कार्यालयानेही भूकंपाच्या दाखले देण्याची प्रक्रिया जलग गतीने ठेवावी असेही आमदार शंभूराज देसाईंनी सांगितले.
                मराठा समाजाचे दाखले देण्याची प्रक्रिया मंडलनिहाय मेळावे आयोजीत केल्यास जास्तीत जास्त मराठा समाजातील युवकांना सदरचे दाखले लवकरात लवकर मिळतील. मराठा समाजाचे दाखले देण्याची प्रक्रिया उपविभागीय कार्यालयात सुरु करण्यात आली असून याचा शुभारंभ माझे हस्ते ठेवण्यात आला याचा मला अभिमान आहे. पाटण तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी लवकरात लवकर मराठा समाजाचे दाखले काढून ठेवावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी मराठा समाजाचे दाखले मिळालेल्या युवकांनी आमदार शंभूराज देसाई, उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment