दि.11 डिसेंबर,1967 च्या
भूकंपात मृत झालेल्यांना तालुक्याच्या वतीने
तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात
आमदार शंभूराज
देसाईंनी वाहिली श्रध्दाजंली.
दौलतनगर:-११ --- पाटण तालुक्यात
दि.11 डिसेंबर, 1967 रोजी महाप्रलयकारी
झालेल्या भूकंपाला आज
५१ वर्षे पुर्ण
झाली असून या
प्रलयकारी भूकंपात मृत
झालेल्या सर्व व्यक्तींना
पाटण मतदारसंघाचे आमदार
शंभूराज देसाई यांनी
पाटण तहसिल कार्यालयाच्या
प्रांगणात श्रध्दाजंली वाहिली.यावेळी त्यांचेसमवेत
पाटणचे उपविभागीय अधिकारी
श्रीरंग तांबे,तहसिलदार
रामहरी भोसले, पोलीस
निरीक्षक उत्तम भापकर, यांच्यासह शासकीय
सर्व अधिकारी व
कार्यकर्ते यांची मोठया
संख्येने उपस्थिती होती.
श्रध्दाजंली वाहताना
आमदार शंभूराज देसाई
म्हणाले,दि.11 डिसेंबर, 1967 रोजी आपले
पाटण तालुक्यात महाप्रलयकारी
भूकंप झाला या
भूकंपाला आज ५१
वर्षे पुर्ण होत
असताना या प्रलयकारी
भूकंपाच्या आठवणी आजही
आपल्या मनात ताज्या
आहेत. या
प्रलयकारी भूकंपात पाटण
तालुक्यातील शेकडो निष्पाप
व्यक्तींना आपले प्राण
गमवावे लागले.दि.11 डिसेंबरची पहाट
या विभागातील जनतेकरीता
दुर्दैवी अशी काळपहाट
ठरली.भूकंपात
मृत झालेल्या सर्व
निष्पाप व्यक्तींना श्रध्दाजंली
अर्पण करणे हे
आपल्या सर्वांचे आद्य
कर्तव्य आहे.पाटण
मतदारसंघाचा प्रथम नागरिक
म्हणून मी मतदारसंघातील
तमाम जनतेच्या वतीने
दि.11 डिसेंबरच्या महाप्रलयकारी
भूकंपात मृत झालेल्या
सर्वांना श्रध्दाजंली अर्पण
करतो. या
भूकंपात प्राण गमवावे
लागलेल्या तसेच नुकसान
झालेल्या भूकंपबाधितांच्या कुटुंबियांना आधार
मिळावा याकरीता तालुक्याचे
भाग्यविधाते लोकनेते बाळासाहेब
देसाई यांनी सुरु
केलेले भूकंपग्रस्तांचे दाखले हे
मध्यतंरीच्या काळात मिळणे
बंद झाले होते
तो निर्णय आपण
सातत्याने प्रयत्न करुन
शासनाकडून डिसेंबर, २०१५
मध्ये करुन घेतला. आज त्याचा
लाभ या भूकंपबाधितांच्या
वारसांना होत आहे
असेही ते म्हणाले.यावेळी उपविभागीय
अधिकारी श्रीरंग तांबे
यांनीही 1967 च्या भूकंपात
मृत झालेल्यांना श्रध्दाजंली
वाहिली.
No comments:
Post a Comment