Saturday 29 December 2018

१९८३ पासून गोळाबेरीज करुन माजी आमदारांची विकासकामे शुभेच्छांच्या फलकावर. तुलना तुमच्या पाच वर्षाची आणि माझे चार वर्षातील कामांची करा. आमदार शंभूराज देसाईंचा टोला.





दौलतनगर दि.२९:- आमच्या कार्यकर्त्यांनी माझे वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देताना केवळ शुभेच्छा नाहीतर त्या त्या गांवामध्ये माझे माध्यमातून जी कांमे झाली त्याचा पुरावाच शुभेच्छांच्या फलकावर टाकण्याचे काम केले तीच री माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी ओढली असून माजी आमदारांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस कार्यक्रम होत असताना जे आमच्या कार्यकर्त्यांनी केले तेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले परंतू त्यांच्या आणि माझे कार्यकर्त्यांची विचारसरणी पाहिली तर मी केवळ या चार वर्षात केलेल्या कामांची माहिती माझे  शुभेच्छांच्या फलकावर दिसेल उलट बाजूला माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी सन १९८३ पासून २०१४ पर्यंत केलेल्या कामांची गोळाबेरीज करुन शुभेच्छा फलकावर टाकली आहेत १९८३ पासूनची कामे टाकण्याची वेळ पाटणकरांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर का आली? मी पोकळ घोषणा करीत नाही तर प्रत्यक्षात कामे करतो असा टोला आमदार शंभूराज देसाईंनी पाटणकर पितापुत्रांना लगाविला आहे.
सन 2018-19 च्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत आमदार शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या ढोरोशी फाटा ते घोट ते जुगाईवाडी ता.पाटण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या रस्त्याच्या कामांकरीता आमदार शंभूराज देसाईंनी ३ कोटी २७ लक्ष ३७ हजार रुपये एवढी रक्कम मंजुर केली आहे.याप्रसंगी कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, लोकनेते बाळासाहेब देसाई सह साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव,सेामनाथ खामकर,बबनराव भिसे, शिवदौलत बँकेचे संचालक अभिजीत पाटील,संजय देशमुख,माणिकशहा पवार,विजय पवार फौजी,घोट सरंपच मधुकर आरेकर,उपसरपंच सागर सोनवले, तुकाराम सावंत, पतंग सावंत,मारुती सावंत, रघूनाथ सावंत, विलास सावंत,धोंडीराम सावंत,तानाजी सावंत,अशोक सावंत,शंकर सावंत,शंकर चव्हाण,किसन साळुंखे,शंकर सावंत, बाळू सावंत,सभांजी फडतरे या प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते यांची मोठया संख्येने उपस्थित होती.
 याप्रसंगी बोलताना आमदार देसाई म्हणाले,माजी आमदारांना स्वत:चा अमृतमहोत्सव साजरा करताना त्यांचे मागील पाच वर्षात मतदारसंघातील जनतेच्या डोळयाला दिसेल असे एकही काम करता आले नाही त्यामुळेच त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सन १९८३ पासून केलेल्या कामांचे फोटो टाकून शुभेच्छा देण्याची वेळ आली आहे. आमच्या दादांनी डोंगराएवढा विकास केला असे सांगणारे त्यांचे सुपुत्र, दादांनी जर डोंगराएवढा विकास केला असता तर तालुक्यात विकासाचा एवढा अनुशेष का शिल्लक राहिला असता, सन २००९ ते २०१४ या काळात आपण अल्पशा मतांनी पराभूत झालो त्यावेळी पाटणकर आमदार होते आणि त्यांचेच पक्षाचे सरकार सत्तेत होते, २००९ पासून पुढील पाच वर्षात त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सरकारकडून तालुक्यासाठी किती निधी आणला आणि २०१४ पासून गत साडेचार वर्षात मी युतीच्या सत्तेत असणाऱ्या सरकारकडून किती निधी आणला हे मतदारसंघातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे.माजी आमदार पाटणकर त्यांच्या सरकारकडून त्या पाच वर्षात आवश्यक असणारा निधी तालुक्यासाठी आणण्यास अयशस्वी झाल्यानेच मी आणलेल्या निधीवर पाटणकर पितापुत्रांचा पोटसुळ उठला आहे.माझे त्यांना जाहीर आवाहन आहे की,माजी आमदार पाटणकरांनी २००९ ते २०१४ या काळात आणलेल्या निधीची माहिती पाटण मतदारसंघातील जनतेला दयावी. तुलनाच करायची आहे तर पाच वर्षातील कामांची करा. आम्हीही सत्तेत नसताना तत्कालीन शासनाकडून तसेच सहकार परिषदेचा अध्यक्ष असताना तत्कालीन मंत्रीमहोदयांकडून लाखो रुपयांचा निधी तालुक्यात आणला तर २००४ ते २००९ या काळात आमदार असताना २१७ कोटी रुपयांचा निधी विरोधी पक्षाचा आमदार असताना आणला पण त्या कामांचे फलक माझे कार्यकर्त्यांनी वाढदिवसाला लावले नाहीत तर या साडेचार वर्षातील कामांचे फलक लावले आहेत हा तुमच्या आणि माझे कामांमधील फरक आहे. तुमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गोळाबेरीज करुन फलकावर टाकलेली कामे जनतेच्या चांगलेच लक्षात आले आहे त्यामुळे ओढूनताणून आम्हीही काहीतरी केले असे पाटणकरांनी दाखविण्याची काही गरज नसल्याची टिकाही आमदार देसाईंनी शेवठी बोलताना केली. उपस्थितांचे स्वागत रणजित शिंदे यांनी तर भानुदास शिंदे यांनी आभार मानले.
चौकट:- एका दिवसात ९ कोटींची भूमिपुजने.
माजी आमदारांना आणि त्यांच्या सुपुत्रांना तालुक्यातील जनतेला काहीतरी दाखविण्याकरीता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक कोटी रुपयांचा निधी दोन वर्षापुर्वी दिला होता. परंतू मी एका दिवसात ९ कोटी रुपयांच्या कामांची भूमिपुजन करीत आहे. पाटणकर वाढदिवसात मग्न असताना तालुक्याचे आमदार ९-९ कोटींची भूमिपुजने करीत आहे हे तालुक्यातील जनतेला चांगलेच ओळखले आहे.

No comments:

Post a Comment