Saturday 28 April 2018

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचेवरील श्रध्देला बुवाबाजी म्हणणा-या पवारांनी तालुक्याच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. आमदार शंभूराज देसाईंचा आमदार अजित पवारांना इशारा.


आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई हे आमचे दैवत आणि तालुक्याचे भाग्यविधाते आहेत.त्यांनी तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अतुलनीय योगदान दिले आहे.म्हणूनच तालुक्यातील जनतेबरोबर महाराष्ट्रातील जनतेची लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर श्रध्दा आहे तालुक्यातील जनता घरातील देव्हा-यात लोकनेतेसाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करते. लोकनेतेसाहेबांच्या पुजनाला १५ दिवसापुर्वी राष्ट्रवादीच्या झालेल्या हल्लाबोल मोर्चात राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी बुवाबाजी म्हंटले आहे.आमदार अजित पवार माझे मित्र असले तरी माझे त्यांना परत जाहीर आवाहन आहे. त्यांनी तुमच्या पुर्वजांनी कोणते योगदान दिले आहे हे पहिल्यांदा तपासून पहावे.जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा डल्लाबोल करणा-यांनी परत तालुक्यात येताना लोकनेतेसाहेब यांच्याविषयी भाष्य करु नये आम्ही तर ते सहन करणारच नाही पंरतू तालुक्यातील जनताही हे सहन करणार नाही.लोकनेतेसाहेब यांचे श्रध्देला बुवाबाजी म्हणणा-या पवारांनी तालुक्याच्या उद्रेकाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. आणि यात मध्ये मध्ये त्यांच्या पक्षाचे पाटणच्या माजी आमदारांच्या सुपुत्रांनी नाक खुपसु नये असा इशारा आमदार शंभूराज देसाईंनी आमदार अजित पवार आणि सत्यजितसिंह पाटणकर यांना दिला.
मारुल तर्फ पाटण याठिकाणी आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत मारुल तर्फ पाटण ते बाजेगांव रस्त्याचे तसेच सन २०१७-१८ चे जिल्हा नियोजन समितीच्या विशेष घटक योजनेतंर्गत मारुल तर्फ पाटण बौध्दवस्ती व शेळकेवस्ती अश्या दोन साकव पुलांचे भूमिपुजन करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड.मिलींद पाटील, संचालक अशोकराव पाटील, सुनिल पवार,पंचायत समिती माजी सदस्य हरीष भोमकर,शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र पाटील,पांडूरंग बेबले,दिलीप सकपाळ, नथूराम सावंत,कारखाना संचालक बबनराव भिसे,राजेंद्र गुरव,शैलेंन्द्र शेलार,उपअभियंता विलास पानस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले,पाटणच्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात पाटणच्या माजी आमदारांनी आणि त्यांच्या सुपुत्रांनी राज्यातले राष्ट्रवादीचे मातब्बर मंडळी माझेविरोधात बोलण्यासाठी पाटणला आणली होती. या मोर्चात पाटणकरांचे नेते आमदार अजित पवार यांनी पाटणकरांना बरे वाटावे म्हणून माझेवर काहीतरी टिका केल्याचे मला समजल्यानंतर अजितदादा मला तोंड उघडायला लावू नका, असे आवाहन मी त्यांना केले होते. यात मध्येच माजी आमदारपुत्रांनी तोंड घातले आणि मला तोडं उघडाच म्हणून आवाहन केले त्यांचाही समाचार मी घेतला परंतू माझे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आवाहन आहे.मी माझे तोंड उघडायला केव्हाही तयार आहे. वाडयात बसून पत्रकबाजी करण्यापेक्षा जनतेच्या समोरासमोर या. ठिकाण तुमचे वेळ तुमची प्रश्न तुमचे आणि उत्तरे माझी. असे अनेकदा आवाहन मी पाटणकर पितापुत्रांना दिले आहे पण निष्क्रीय पाटणकर पितापुत्र माझे आवाहन स्विकारत नाहीत. आणि मला आवाहन देण्याएवढे माजी आमदारांचे सुपुत्र अजुन मोठे झाले नाहीत.सत्यजितसिंह पाटणकरांनी या तालुक्याच्या हितासाठी कोणते योगदान दिले आहे ते त्यांनी जाहीरपणे सांगावे. गेल्या तीन वर्षात कामे झाली का नाही हे तालुक्यातील जनता उघडया डोळयांनी पहात आहे. २०१४ च्या निवडणूकीला मतदारांना मते मागून गेलेले सत्यजितसिंह पाटणकर २०१९ ची विधानसभा निवडणूक १ वर्षावर येवून ठेपली आहे. वाडयातून जरा बाहेर पडा आणि तालुक्यातल्या कानाकोप-यात फिरा म्हणजे कुठे कुठे आणि कशी कशी विकासकामे झाली आहेत हे तुमच्या लक्षात येईल.जनतेला देण्यासारखे स्वत:च्या हातात काही नाही त्यामुळे हे पाटणकर मंडळी सैरभैर झाले आहेत.काहीतरी टिका करायची आणि जनतेमध्ये बुध्दीभेद करायचा एवढाच काही तो उद्योग सध्या सुरु आहे. आज याच मारुल तर्फ पाटण गांवामध्ये मारुल तर्फ पाटण ते बाजेगांव हा २ कोटी ४० लाखांचा रस्ता मंजुर केला,बौध्दवस्ती आणि शेळकेवस्तीचे ४७ लाखांचे दोन पुल मंजुर केले,गतवर्षी शेळकेवस्तीचा रस्ता केला,यमकरवस्तीचा सभामंडप केला,मारुलच्या मंदीरास संरक्षक कठडा करुन दिला कोयना पुनर्वसित निधीमधून या गावाला रस्ता करुन दिला.काही भाग अपुरा आहे त्यास निधी मंजुर आहे.तर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता व या समाजकरीता समाजमंदीर ही कामे यावर्षी प्रस्तावित केली आहेत. ही संगळी कामे पाहिली तर सुमारे ४ कोटी १ लाख ३० हजार रुपयांची कामे एकटया मारुल तर्फ पाटण मध्ये गेल्या साडेतीन वर्षात केली आहेत.जनतेला ही कामे दिसत आहेत. पाटणकरांनी डोळे झाकलेत त्याला आपण काय करणार.असा उपरोधिक टोलाही त्यांनी शेवटी बोलताना लगाविला. हरीष भोमकर, अशोकराव पाटील, जयवंतराव शेलार यांची याप्रसंगी भाषणे झाली यावेळी उपस्थितांचे स्वागत दिलीप संकपाळ यांनी केले.

No comments:

Post a Comment