Friday 29 October 2021

महाविकास आघाडीचे सरकार देसाई कारखान्याच्या पाठीशी ठाम-गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा 48 वा गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न.

 



दौलतनगर दि.9(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- राज्यातील  साखर उद्योगाची परिस्थिती  सध्या अडचणीत असून ही लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील आहे.त्यामुळे या पुढे ही देसाई कारखान्याने पारदर्शक कारभार करून  आपले उद्दिष्ट पार करून पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार देसाई कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील,अशी ग्वाही राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.दरम्यान कारखाना कार्यक्षेत्रातील बाहेर जाणाऱ्या ऊसाची गंभीर पणे दखल घेऊन त्यासाठी कारखान्याने गोपनीय यंत्रणा उभी करावी,अशा सूचनाही गृहराज्यमंत्री देसाई यांनी दिला.

       ते दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ मधील 8 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.निवृत्ती बाळकू कर्पे करपेवाडी, श्री. सदाशिव पांडूरंग चव्हाण विहे, श्री. यशवंत रामचंद्र तोळसणकर सळवे, श्री. विष्णू शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, श्री. बापूराव दगडू शिवदास माजगाव,श्री.शशिकांत महादेवशिंदे कोरिवळे,श्री.सर्जेराव यशवंत चव्हाण आवर्डे,श्री.रंगराव बाळू जाधव मेंढोशी,श्री.लक्ष्मण आबा जामदार नावडी, श्री.भाऊसो पांडूरंग सुर्वे वाडीकोतावडे, श्री. तुकाराम धोंडीबा डफळे येराड या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई,चि.आदित्यराज देसाई,चेअरमन अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,ॲङमिलिंद पाटील,शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,संचालक पांडूरंग नलवडे,सोमनाथ खामकर,गजानन जाधव,शशिकांत निकम,अशोकराव डिगे, विजय जंबुरे देशमुख,बबनराव भिसे,विकास गिरी,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,दादा जाधव,सुरेश पानस्कर, पंजाबराव देसाई,भरत साळूंखे,अभिजित पाटील,सर्व संचालक मंडळ,पदाधिकारी व कार्यकर्ते,कारखाना अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

       ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातीला सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात    लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयनानदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.

    मात्र पाणी,बियाणे,चोवीस तास वीज यासाठी मदत कारखान्याची आणि शासनाची घेऊन  जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणार्याची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाने दिवाळी पूर्वी बैठक घेऊन बाहेर जाणाऱ्या ऊसा संदर्भात गांभीर्यपूर्वक नियोजन करावे.त्यासाठी कारखान्याने गोपनीय यंत्रणा उभी करून विशेष मोहीम आखली पाहिजे तरच त्याचे योग्य परिणाम दिसतील अशा सूचना ही त्यांनी यावेळी कारखान्याच्या प्रशासन यंत्रणा आणि संचालक मंडळाला देऊन हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सर्वोत्परी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

चौकट: 'मरळी साखरेला परदेशात मागणी'

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या पारदर्शक कारभार आणि उत्कृष्ट नियोजन यामुळे आजही जागतिक बाजारात 'मरळी साखरे'चा दर्जा उत्कृष्ठ असून परदेशी बाजारपेठेत  'मरळी साखरेला चांगली मागणी असल्याचे सांगून हा दर्जा असाच टिकवून ठेवावा अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

 चौकट: केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका..!

          केंद्र सरकारने साखर कारखान्यांनी दिलेल्या जादा ऊस दरावर कारखान्याचा नफा लावण्यात आलेल्या  इन्कम टॅक्स मूळे  आज पर्यंत राज्यातील कारखान्यांच्या डोक्यावर  कोट्यवधी रुपयांचा इन्कम टॅक्स ची तलवार लटकत होती.यासंर्भात नागपूर येथे अधिवेशनादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही राज्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटून राज्यातील तमाम कारखान्याच्या डोक्यावरील इन्कम टॅक्स ची टांगती तलवार कमी करण्याची मागणी केली होती.त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे दिसत असून यामुळे राज्यातील कारखान्यांना  निश्चितच 'इन्कम टॅक्स' पासून दिलासा मिळेल असे मत  व्यक्त करून केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली असल्याचे त्यांनी सांगीतले.

निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच सत्तेत मानाचं स्थान- ना.शंभूराज देसाई. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर मारुल हवेली ते दिवशी बुद्रुक रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 



 दौलतनगर दि.9(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- पाटण मतदारसंघामध्ये राजकीय वाटचाल करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागला, संघर्ष करावा लागला.असे असतानाही गावा-गावांमध्ये निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते यांची मजबूत फळी प्रत्येक गावांमध्ये निष्ठेने काम करत होती.काही वेळा पराभव झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना नाहक त्रासही झाला,पण कार्यकर्ते न डगमगले नाहीत,त्यांनी नाहक त्रास सहन केला. पण मनामध्ये संघटनेबाबतची निष्ठा कायम ठेवली.तालुक्यामध्ये गावा-गावांत असलेल्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मानाचं स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

              ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मारुलहवेली ते दिवशी बुद्रुक या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी  बोलत होते.यावेळी कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲङ मिलिंद पाटील, ॲङडी.पी.जाधव, ॲङबाबूराव नांगरे,अधिक पाटील,संचालक पांडूरंग नलवडे,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,दादा जाधव,बाळासो सुर्यवंशी,अशोक सुर्यवंशी,सखाराम पाटील,बबनराव सुर्यवंशी,व्ही.जी.डोंगरे,बाळासो डोंगरे,प्रशांत चव्हाण,आनंदा पाटील, हणमंत सुर्यवंशी,श्रीमंत डोंगरे, टी.पी.कदम, एकनाथ गवळी, रामभाऊ महापूरे,प्रल्हाद महापुरे,भगवान महापुरे,राजाभाऊ सुर्यवंशी,पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती.

                   ना. देसाई पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रगती होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. त्यांनी तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात वसलेल्या गावे व वाडया-वस्त्यामधील सामान्य माणसांच्या उन्नतीसाठी व प्रगतीकरीता मंत्रीपदाच्या कालावधीत अनेक धाडसी निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावल पाहिजे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न होता. त्याकाळात नोकरीसाठी बाहेरगावी जाण्याची पध्दत होती,मिळेल त्या ठिकाणी मोल मजुरी करायची आणि कुटुंबाचा उदर-निर्वाह करण्याची मानसिकता माणसांच्यामध्ये होती.त्यामुळे खेडो-पाडयात शिक्षणाच्या सुविधा झाल्या पाहिजेत, त्याचबरोबर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातातून शेतकरी समृध्द झाला पाहिजे ही दूरदृष्टीचा त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई यांची होती. कोयना नदीवर 25 उपसा जलसिंचन उभारल्या.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून या उपसा योजनांना मदत करुन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या उन्नतीकरीता स्व.लोकनेते साहेब व स्व. शिवाजीराव देसाई(आबासाहेब) यांनी त्या काळात प्रयत्न केला असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये पहिल्यापासून आपण संघर्ष केला. दिवशी बुद्रुक सारख्या गावाचा विचार केला तर कै.शिवराम पाटील (नाना) व कै.प्रेमनाथ पाटील (तात्या) हे ज्येष्ठ कार्यकर्ते या गावांमध्ये संघटना टिकवण्याचे व वाढविण्याचे प्रामाणिक काम करत होते. निवडणूकींमध्ये पराभव झाला की या मंडळींना नाहक त्रास दिला जायचा,पण हे कार्यकर्ते डगमगले नाहीत. त्यांनी निष्ठा कायम ठेवली. परंतू दिवशी हे गाव विकासापासून वंचित का राहिलं याचाही सामान्य जनतेने विचार करणे गरजेचे आहे.सन 2004 साली आमदार झाल्यानंतर विरोधी बाकावर असतानाही 250 कोटींची विकास कामे केली. सन 2014 ते 2019 याकाळात 1800 कोटींची विकास कामे केली. त्यासाठी विकासाची दूर दृष्टी ठेवून काम करण्याची तळमळ असावी लागते.सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादने कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे सन 2019 साली पुन्हा आमदार झालो,मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृतवाखाली  राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देत महत्त्वाच्या पाच खात्यांची जबाबदारी आपल्यावर पडली. माझ्या कारकिर्दीतील पहिला अर्थसंकल्प विधान परिषदेमध्ये सादर केला. त्यानंतर कोविड 19 या आजारामुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले. असे असले तरी पहिल्या टाळेबंदीच्या काळात गृहविभागाची जबाबदारी 13 तर दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्हयांमध्ये दौरा केला. जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस कर्मचारी यांचे कामाचे ठिकाणी जाऊन त्यांच्या अडचणींची विचारपूस केली, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न केला.मंत्री झाल्यानंतर जनतेच्याही अपेक्षा वाढल्याआहेत,त्याही अपेक्षा जबाबदारीने पूर्ण करण्याचं काम यापुढील काळात करायचे आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, ज्या सामान्य शिवसैनिकांमुळे,पदाधिकारी व कार्यकर्त्यांमुळे आपण या पदापर्यंत पोहोचलो आहे,त्या शिवसैनिकांना व कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण ठेवली आहे.मंत्रीपद हे लोकांची काम करण्यासाठी असून कार्यकर्त्यांनी जमिनीवर राहून सामान्य जनतेचे प्रयत्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. आपल्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे संस्कार असून त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा जोपासत सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याठी तसेच गावा-गावांतील विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी वित्त राज्यमंत्री म्हणून आपल्या मतदारसंघाला विकास निधीमध्ये नेहमीच यापुढे झुकते माप दिले जाईल.तसेच दिवशी गावातील प्रलंबित विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जाईल,अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली.प्रास्ताविक दादा जाधव,स्वागत आप्पासो राक्षे यांनी केले तर आभार जालिंदर डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमास दिवशी बुद्रुकसह आस-पासच्या गावातील,विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday 28 October 2021

शिवशंभू सहकारी दूध संघाकडून दुध उत्पादकांची दिवाळी गोड. म्हैशीचे दुधासाठी प्रति लिटर 1.30 रुपये तर गायीसाठी 60पैसेप्रमाणे बोनस रक्कम बँक खाती वर्ग.

 

 

दौलतनगर दि.8: दौलतनगर,ता.पाटण येथील शिवशंभू सहकारी दूध संघाने सन २०२०-२१ मध्ये दुध पुरवठा केलेल्या दुध उत्पादकांना म्हैसीचे दुधासाठी प्रतिलिटर 1.30 रुपये तर गायीच्या दुधासाठी 60 पैसेप्रमाणे होणारी बोनसची रक्कम दूध संस्था तसेच दूध सेंटरचे चालकांच्या बँक खाती वर्ग केली आहे. शिवशंभू दूध संघाने कार्यक्षेत्रामधील इतर दूध संघांच्या तुलनेत सर्वोच्च बोनस देत दिवाळीपूर्वी  बोनसची रक्कम बँक खाती वर्ग केली असल्याने शिवशंभू सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांची  दिवाळी गोड होणार आहे.महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज  देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळ यांनी संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना चांगला बोनस देऊन दूध उत्पादकांच्या फायद्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवशंभू दूध संघाचे चेअरमन अधिकराव पाटील यांनी सांगीतले आहे.

         प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले आहे की, शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने नुकताच दूध शितकरण प्रकल्प कार्यान्वित केला असून त्यामुळे दैनंदिन दूध संकलनामध्ये मोठया प्रमाणांत वाढ होत आहे. शेतकरी हे शेतीला जोड म्हणून गायी-म्हैशींचे पालन करुन दूधाचे उत्पादन घेत असतात. उत्पादित केलेल्या दूधाला चांगला दर मिळावा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्याच्या अपेक्षेला खरे करुन शिवशंभू दूध संघ हा दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना आतापर्यंत चांगला दर देऊन त्यांचे आर्थिक जिवनमान उंचवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज  देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळाने दूध उत्पादकांना आणखी जादा दर देण्याकरीता दौलतनगर,ता.पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवशंभू दूध संघाचा शितकरण प्रकल्प उभारला असून या शितकरण प्रकल्पाची 15 हजार लिटर एवढी क्षमता आहे. शितकरण प्रकल्पामुळे दूधाचे नुकसान होण्याचे प्रमाण कमी  झाले असून वेळेत या दूधावर प्रक्रिया होत असल्याने  दूध उत्पादकांना दुधाच्या गुणवत्तेनुसार चांगला दर मिळत आहे.त्यामुळे शिवशंभू दूध संघाचे दैनंदिन दूध संकलनामध्ये वाढ झाली आहे.लवकरच शिवशंभू दूध संघाचा दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्रकल्प उभारणार असून दुग्धजन्य पदार्थ उत्पादन करणार आहे. त्यामुळे तालुकयातील दूध उत्पादक यांचेसह नव्याने दूध उत्पादन व्यवसायमध्ये येणाऱ्या युवा उद्योजकांना यामुळे प्रेरणा मिळेल व जास्तीत जास्त दूध उत्पादन होईल तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगत तालुक्यातील इतर दूध संघाच्या तुलनेत जादा दर आणि बोनस देऊन दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरला आहे. दुध पुरवठा केलेल्या दुध उत्पादकांना म्हैसीचे दुधासाठी प्रतिलिटर 1.30 रुपये तर गायीच्या दुधासाठी 60 पैसेप्रमाणे होणारी बोनसची रक्कम दूध संस्था तसेच दूध सेंटरचे चालकांच्या बँक खाती वर्ग केली असून तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या संघाला जास्तीत जास्त दूध घालून सहकार्य करावे,असे आवाहन चेअरमन अधिकराव पाटील यांनी शेवटी पत्रकांत केले आहे.

 

Wednesday 27 October 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचा नामदार शंभूराज देसाई व ज्येष्ठ ११ सभासदांच्या हस्ते शुक्रवार दि.२९ ऑक्टोंबर रोजी गळीताचा शुभारंभ - अशोकराव पाटील चेअरमन

दौलतनगर दि.7(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- दौलतनगर, ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा सन २०२१-२२ मधील 8 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ समारंभ शुक्रवार दि. २९ ऑक्टोंबर,२०२१ रोजी सकाळी 09.30 वा. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. स्मितादेवी शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवा नेते मा.यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद यांचे शुभहस्ते कारखाना कार्यस्थळ,दौलतनगर,ता.पाटण येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

                 पत्रकात म्हंटले आहे की,या वर्षीच्या गळीत हंगामातील गळीताकरीता मागील हंगामाच्या जवळपास कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील ऊसाची नोंद झाली असून कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस गळीताचे उद्दीष्ट कारखाना व्यवस्थापनाने ठेवले आहे. चालु गळीत हंगामाची पुर्वतयारी पुर्ण झाली असून गाळप हंगाम पुर्ण क्षमतेने होण्याच्या दृष्टीने कारखान्यातील सर्व कामकाज पुर्णत्वाकडे गेले आहे. कारखान्याने ऊस तोडणी व वाहतूकीकरीता पुरेसे तोडणी मजुर व वाहनांचे करार पुर्ण केलेले असून कारखान्याकडे करार केलेली सर्व ऊस तोडणी व वाहतूक तोडणी मजुर यंत्रणा कारखाना कार्यक्षेत्रात दाखल झाली आहे.यंदाचाही गळीत हंगाम कारखान्याचे सभासद,ऊस उत्पादक शेतकरी यांचे सहकार्यातून यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करीत या गळीत हंगामाचा शुभारंभ हा प्रतिवर्षाप्रमाणे कारखान्याचे ज्येष्ठ ११ सभासद श्री.निवृत्ती बाळकू कर्पे करपेवाडी, श्री. सदाशिव पांडूरंग चव्हाण विहे, श्री. यशवंत रामचंद्र तोळसणकर सळवे, श्री. विष्णू शंकर पानस्कर मंद्रुळहवेली, श्री. बापूराव दगडू शिवदास माजगाव,श्री.शशिकांत महादेवशिंदे कोरिवळे,श्री.सर्जेराव यशवंत चव्हाण आवर्डे,श्री.रंगराव बाळू जाधव मेंढोशी,श्री.लक्ष्मण आबा जामदार नावडी, श्री.भाऊसो पांडूरंग सुर्वे वाडीकोतावडे, श्री. तुकाराम धोंडीबा डफळे येराड या ज्येष्ठ 11 सभासदांचे शुभहस्ते व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्मितादेवी शंभूराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई व युवा नेते यशराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असून या गळीत हंगाम शुभारंभानिमित्त कारखान्याचे संचालक शशिकांत मोहनराव निकम व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली शशिकांत निकम यांचे शुभहस्ते सत्यनारायण महापुजा आयोजीत केलेली आहे. तरी या समारंभास कारखान्याचे सर्व सभासद,ऊस उत्पादक शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी शुक्रवार दि. २९ ऑक्टोंबर,२०२१ रोजी  सकाळी 09.30 वा. बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही चेअरमन अशोकराव पाटील यांनी शेवठी पत्रकात केले आहे.

Thursday 21 October 2021

लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याने अदा केली 100 टक्के एफआरपी. एफआरपीचे उर्वरीत 277 रु.प्रमाणे 06 कोटी 47 लक्ष रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा.

 

 

दौलतनगर दि.22 :- दौलतनगर मरळी ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन रु.2807/- प्रमाणे उर्वरीत राहिलेली 277 रुपये ही रक्कम गुरुवार दि.21.10.2021 रोजी वर्ग केली आहे. मा.यशराज देसाई यांनी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर केले प्रमाणे कारखान्याने एफआरपीनुसार सर्वच्या सर्व 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.

             पत्रकांत पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत हंगामात 02 लाख 33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन 2020-21 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन रुपये 2807/- इतकी आहे.एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची प्र.मे.टन रक्कम रुपये 2530 प्रमाणे होणारी रक्कम यापूर्वीच ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज देसाई व सर्व संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे हिताचे धोरण राबवित असून कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी मा.यशराज देसाई यांनी जाहिर केलेप्रमाणे आठ दिवसाच्या आत उर्वरित एफआरपीप्रमाणे शिल्लक असणारी 277 रुपये प्रमाणे होणारी रुपये 06 कोटी 47 लाख रक्कम कारखान्याने गुरुवार दि. 21.10.2021 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग केलेली आहे. कोविड महामारीतून उद्योगधंदे सावरत असताना,बाजारपेठांमधील खरेदी विक्री पुर्वपदार येत असून वेळोवेळी साखर विक्री दरामध्ये झालेला बदल,कामगारांची देणी,वाहतुक खर्च,वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड देत एफआरपीची उर्वरित रक्कम सभासदांना देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते यशराज देसाई व कारखाना व्यवस्थापनाने निधीची उपलब्धता करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 च्या गळीत हंगामातील 100 टक्के एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक सभासद,शेतकरी यांनी संबंधित बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत  सन 2021-22 चे गळीत हंगामाची आवश्यक ती सर्व पुर्व तयारी झालेली आहे. लवकरच गळीत हंगाम शुभारंभ झाल्यानंतर कारखान्याचे गळीत हंगामास पुर्ण क्षमतेने सुरुवात होईल.यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला गळीतास देऊन सन 2021-22 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन शेवटी पत्रकांत करण्यात आले आहे.

Wednesday 20 October 2021

गोकूळ वर्पेवाडी पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करुन केली वचनपूर्ती.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत वर्पेवाडी गोकूळ तर्फ पाटण पोहोच रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.




दौलतनगर दि.2१(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गोकूळ वर्पेवाडीचे काम गत एक ते दिड वर्षापूर्वी मंजूर झाले आहे. मात्र संपूर्ण राज्यावर कोविड सारख्या आजाराचे संकट होते आणि त्यामुळेच विकास कामे थांबली होती. आता नव्याने कामे सुरु झाली असून पहिल्या टप्प्यातच गोकूळ वर्पेवाडीच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. येणाऱ्या काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून गोकूळ वर्पेवाडी पोहोच रस्त्याचे भूमिपूजन करुन या गावातील ग्रामस्थांनी केलेली मागणी पुर्ण होत करत वचनपूर्ती केली, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

                 ते गोकूळ वर्पेवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या वर्पेवाडी पेाहोच रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी  बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदू, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू,माजी पंचायत समिती सदस्य नथूराम कुंभार,किसन गालवे,गणेश भिसे, सरपंच निता गालवे,उपसरपंच संजय आसवले,सदस्या स्नेहल गालवे,काहिर सरपंच लक्ष्मी शिंदे,पांडूरंग तांदळे,धावडे सरपंच दत्ता अवघडे,वाडीकोतावडे सरपंच सिंधुताई विचारे,नाटोशी सरपंच अविनाश कुंभार,उदय देसाई,कोकीसरे उपसरपंच शामराव पवार,राजेंद्र कदम, आंबेघर सरपंच शंकर कोळेकर,दिनकर कोळेकर,किसन बोत्रे,महादेव कचरे,आनंदा मोहिते,सुनील खामकर,राहूल कदम,सुरेश कदम यांची  प्रमुख उपस्थिती  होती.

                याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, एक दिड वर्षापूर्वी वर्पेवाडी येथील ग्रामस्थांनी रस्त्यांची प्राधान्याने मागणी  केली  होती.कारण यापूर्वी ज्यांच्या पाठी मागे उभे राहिला,त्यांनी निवडणुकीपुरती केवळ आश्वासने दिले.थातूर मातूर काम करुन लोकांची दिशाभूल करत खोटी आश्वासने देऊन केवळ झुलवत ठेवण्याचे काम जाणिवपूर्वक काही मंडळींनी केले.पण वर्पेवाडी रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न काही मार्गी लागला नाही.जेव्हा ही गोष्ट वर्पेवाडी ग्रामस्थांच्या लक्षात आली तेव्हा सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन रस्त्याची एकमुखी मागणी केली. विचार करुनच विकास कामांचा शब्द माझ्याकडून दिला जातो आणि काहीही  झाले तरी दिलेला शब्द,आश्वासन पूर्ण करतो.आपण लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे विचारांचा वारसा जपणारा असून जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली विकास कामे या डोंगरी व दुर्गम भागामध्ये मार्गी लागण्याचा यापुढे कायम प्रयत्न राहणार आहे. त्यामुळेच आज आपण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या वर्पेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करत असून या कामाला येत्या आठ दिवसांत प्रत्यक्ष सुरुवात करुन हे रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, वर्पेवाडी ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी  सुटणार असून येथील ग्रामस्थांना दिलेला शब्द आज पुर्ण केला असल्याने ग्रामस्थांनीही आता विचार करणे गरजेचे आहे. कारण मागणी केलेली कामे जर मार्गी लागत असतील तर निश्चितच गावातील ग्रामस्थांची जबाबदारी वाढली आहे.लोकप्रतिनिधी म्हणून गावातील उर्वरित राहिलेली कामे मार्गी लावण्याचा यापुढे प्रयत्न करणार असल्याने ग्रामस्थांनीही निवडणूकीच्या काळातील अपप्रवृत्तींना थारा देऊ नये. दोन वर्षात वर्पेवाडी गावाकरीता दोन कामे मंजूर केली.तसेच मंजूर केलेली कामे पुर्ण झाल्यानंतर उर्वरित कामेही मार्गी लावणार असल्याने यापुढे विकासाच्या कामाला महत्त्व द्यावे असे आवाहन करुन सामान्य जनतेने मतदान केल्याने तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर राज्यमंत्री म्हणून मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळाली.त्यामुळे डोंगरी व दुर्गम भागातील मुलभूत विकासाच्या कामांना लागणारा निधी राज्याचा वित्त राज्यमंत्री म्हणून मोरणा विभागाला दिला जाईल असेही यावेळी ना.देसाई यांनी सांगीतले.आभार दत्ता गालवे यांनी केले तर आभार किसन गालवे यांनी मानले.

चौकट : ना.शंभूराज देसाई यांनी वर्पेवाडीच्या महिलांना दिले नळ पाणी  पुरवठा योजनेच्या मंजूरीचे पत्र.

           विधानसभा निवडणूकीच्या अगोदर वर्पेवाडी येथील ग्रामस्थांनी पोहोच रस्त्याची मागणी केली होती. तर या गावातील महिलांना नळ  पाणी  पुरवठा  योजनेचीही मागणी केली होती. वर्पेवाडी पोहोच रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम मंजूर केले.तर नळ योजनेचे कामासाठी स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता. वर्पेवाडीच्या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी महिलांना आग्रही मागणी केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या मंजूरीचे पत्र ना. देसाई यांनी उपस्थित महिलांना दिल्याने रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमामध्ये वर्पेवाडी येथील महिलांनी मागणी केलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे कामाचे मंजूरीचे पत्र दिल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी ना.देसाई यांचे आभार मानत धन्यवाद दिले.

Saturday 16 October 2021

विकास कामांमध्ये राजकारण न करता गावा-गावांत जास्तीत जास्त कामे मार्गी लागणे गरजेचे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर मणदुरे ते निवकणे रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून गत पंचवार्षिकमध्ये मतदार संघामध्ये जास्तीत जास्त विकास कामांना निधी मंजूर करुन सर्व विकास कामे मार्गी लागण्याचा प्रयत्न आपण केला.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून यापुढे मतदारसंघात विविध विकास कामांना भरघोस निधी  मंजूर होईल. अजूनही गावा-गावांत विविध विकास कामांची मागणी होत असल्याने गावच्या सर्वांगीण विकास होण्याच्यादृष्टीने गावां-गावांतील विविध विकास कामांमध्ये कसलेही राजकारण न करता जास्तीत जास्त विकास कामे मार्गी लागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले.

               ते मुख्यमंत्री  ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या मणदुरे ते निवकणे या रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, माजी पंचायती समिती सभापती सौ.मुक्ताबाई माळी,सुरेश जाधव,वाय.के.जाधव,बबन माळी,भरत साळूंखे,बबनराव भिसे,विजय जंबुरे,संजय निकम,विलास कुराडे,अशोक पवार,कृष्णत यादव,विजय कदम,संजय जाधव,प्रशांत पाटणकर,अनिल पाटणकर,वसंत पाटणकर,भरत पाटणकर,संतोष पाटणकर,किसन सावंत,अनिल यादव,विश्वास जाधव,दिनकर जाधव,लक्ष्मण जाधव,अशोक जाधव,रामचंद्र सपकाळ यांचेसह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की, पाटण तालुक्यातील निवकणे गावाला प्रसिध्द असे श्री जानाईदेवीचे मंदिर असून प्रसिध्द असे मोठे धार्मिक स्थान आहे. श्री जानाई देवीच्या यात्रेला आजू-बाजूच्या दोन तीन राज्यातील भाविक भक्त मोठया प्रमाणांत प्रतिवर्षी येथे येत असतात.यात्रेनिमित्त मोठी गर्दी येथे असते. अनेक भाविक जे यात्रेसाठी नेहमी येथे येतात.  मणदुरे विभागातील महत्त्वाचा असलेल्या मणदुरे ते निवकणे रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी गेली तीन ते चार वर्षापासून या गावातील व विभागातील पदाधिकारी  व कार्यकर्त्यांची रस्त्याचे काम सुरु करण्याची कायम मागणी करुन त्यांचा सातत्याचा पाठपुरावा सुरु होता. आज मणदुरे ते निवकणे या रस्त्यासाठी  01 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर करत या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम होत आहे. बऱ्याच वर्षापासून या गावाची असणारी रस्त्याची मागणी आज पूर्ण झाली,असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळत आहे. गत दिड दोन वर्षामध्ये कोविड संसर्गामुळे निधीची मर्यादा आल्याने या रस्त्याचे काम सुरु होण्यासाठी विलंब झाला.परंतु आपली कामाची पध्दतच वेगळी आहे एखाद्या विकास कामाचं भूमिपूजन केलं की ते काम प्रत्यक्षात सुरु करायच आणि ते काम पूर्ण करायचं,अशीच आहे. विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेऊन काही मंडळींकडून या रस्त्याचे कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला गेला. लोकांच्यामध्ये गैरसमज करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. पण आज आपण याच रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करुन प्रत्यक्ष कामांस सुरुवात करत असल्याने या मंडळींना आपण प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले असल्याने अशा लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे. यापुढे विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून चांगले संघटन करण्यासाठी  कार्यकर्त्यांनी  एकत्र येणे गरजेचे आहे. सन 2004 ते 2009 या कालावधीत मणदुरे गावातील मागासर्वीय वस्तीकरीता साकव पूलाचे काम पूर्ण केले.पण हे काम करताना अनेक अडचणी आल्या.जाणिवपूर्वक विकास कामे होऊ नयेत यासाठी काही मंडळींकडून प्रयत्न केले गेले. परंतु गावातील महत्त्वाची अंतर्गत रस्ता, पोहोच रस्ता, नळ योजना, साकव व वळण बंधारा अशी कामे झाली पाहिजेत.याचा उपयोग हा संपूर्ण गावातील ग्रामस्थांसाठी होणार आहे. पण काही लोकांना आपल्या कामांची ॲलर्जी आहे. असे असले तरी विकास कामे करताना कोणतेही राजकारण आपण करत नाही.विधानसभा निवडणूकीला किती मतदान झाले याचा विचार विकास कामे देताना कधीच केला नाही.जनतेला विकास कामांसाठी जो शब्द दिला तो पुर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी त्या दूर करुन ती कामे पुर्णत्वाकडे नेण्याचे काम केले.पण सामान्य जनतेसाठी आवश्यक असलेली कामे झाली पाहिजेत यासाठी विकास कामांमध्ये राजकारण न आणता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ती जास्तीत जास्त कशी मार्गी लागतील यासाठी  पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी शेवटी सांगीतले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखानाच्या कर्मचाऱ्यांना 'यशराज देसाई' यांच्याकडून दिवाळी भेट 'कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना ११ टक्के बोनस,गाळप उद्दीष्ट साध्य झाल्यास प्रोत्साहनपर बक्षीस देणार'

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखाना हा सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठीच सदैव प्रयत्नशील राहून कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस कारखान्यास गळीतास घालून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन करून ही संस्था नावारुपाला आणण्यासाठी सभासद शेतकरी यांच्याबरोबर कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग आहे. त्यासाठी यावर्षी देसाई कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना ११ टक्के बोनस जाहीर करून या गळीत हंगामामध्ये दिलेली उद्दिष्टे अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी वेळेत पूर्ण केल्यास त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा युवा नेते यशराज देसाई यांनी केले.

                 ते दौलतनगर,ता.पाटण याठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे 48 व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,चि.जयराज देसाई, शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष जयवंतराव शेलार, कारखान्याचे अध्यक्ष अशोकराव पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील,माजी अध्यक्ष डॉ. दिलीपराव चव्हाण,ॲड.मिलिंद पाटील,गजानन जाधव,सोमनाथ खामकर,शशिकांत निकम,आनंदराव चव्हाण,अशोक डिगे,पांडूरंग नलवडे,बबनराव भिसे, सौ.विश्रांती विजय जंबुरे,सौ.दिपाली पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,संतोष गिरी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. 

                यशराज देसाई पुढे म्हणाले,केंद्र सरकारचे सहकारी साखर कारखानदारी आणि साखरे बाबतचे उदासीन धोरण आहे.  परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाची एफ.आर.पी. देण्यात  अडचणी निर्माण झाल्या. सातारा जिल्ह्यात मोजक्याच कारखान्यांनी शंभर टक्के एफ.आर.पी. दिली आहे.यासंदर्भात देशातील सहकार क्षेत्रातील जाणते नेतृत्व असणारे आदरणीय शरद पवार साहेबांनी सुद्धा कारखान्यावर आर्थिक बोजा पडू नये यासाठी एफ.आर.पी.ची कारखान्यांनी  तीन टप्प्यात द्यावी अशा सूचना केल्या आहेत.लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्यानेही  ९० टक्के एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. केवळ १० टक्के देणे बाकी आहे. मात्र ती ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही  जमा केली जाईल, असे स्पष्ट करून यशराज पुढे म्हणाले राज्यातील सहकारी साखर उद्योग सध्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चालला असून सहकारी साखर कारखाने शंभर टक्के शासनाच्या नियमाचे पालन करूनच  कारखाने चालवावे लागतात. लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे कार्यक्षेत्र पाहिल्यानंतर निम्माहून अधिेक क्षेत्र हे डोंगंरी भागात आहे. कोयना नदीकाठी अल्प प्रमाणात ऊसाचे कार्यक्षेत्र आहे. संपुर्ण पाटण तालुक्यातील ऊसाची लागवड पाहिली तर तीन ते साडेतीन लाख मे.टनाच्या वर जात नाही. ही वस्तूस्थिती असताना देखील आपले कारखान्याने कारखान्याच्या सभासंदाना व ऊस उत्पादक शेतक-यांना इतर मोठया कारखान्यांच्या बरोबरीने प्रतिवर्षी दर दिला आहे.या वर्षीचा गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाकडून आवश्यक ती सर्व कामे पुर्णत्वाकडे गेली असून ऊस तोडणी मजूर भरतीचे पुर्ण क्षमतेने नियोजन करण्यात आले असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, जाणीवपूर्वेक बाहेरच्या काऱखान्याला ऊस घालणाऱ्याची शेतकऱ्यांची मानसिकता बदलली पाहिजे. बाहेर जाणार ऊस थांबवण्यासाठी संचालक मंडळाबरोबर सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतक-यांनी व सभासदांनी कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्यांना न घालता नोंद केलेला संपुर्ण ऊस हा आपलेच लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास गळीताकरीता देवून गळीत हंगाम य़शस्वी करण्यासाठी सर्व शेतकरी व सभासदांनी प्रयत्न करावेत,असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.

Thursday 14 October 2021

ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत कामे मार्गी लागणार पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना 1.50 कोटी रुपयांचा निधी वितरित.

 


दौलतनगर दि.14(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द  मातंगवस्तीतील अंतर्गत रस्ते सुधारणा करण्याचे  विविध विकास कामांना निधी मंजूर होण्यासाठी  राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार या विभागाकडून पाटण तालुक्यातील 16 गांवातील बौध्द व मातंगवस्तीमध्ये रस्त्यांची सुधारणा करण्याच्या विकास कामांना ०१.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पारित केला होता.मंजूर केलेली विकास कामे मार्गी लावण्याकरीता या कामांना नुकताच निधी वितरीत करण्यात आला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पाटण तालुक्यातील मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती  गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे कार्यालयाचेवतीने प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे. 

                    प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे की, सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील बौध्द  मातंगवस्तीतील अंतर्गत रस्त्यांची सुधारणा करण्याच्या  विविध विकासकामांना आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार पाटण तालुक्यातील 16 गावांतील विविध विकासकामांना ०१.50 कोटी रुपयांचा निधी मंजुर करत  निधी मंजुरीचा शासन निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.26 मार्च, २०२० रोजी पारित केला आहे. परंतु राज्यामध्ये कोविड संसर्गामुळे विकास कामे मार्गी लावताना काही मर्यादा आल्याने या मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना निधी वितरित करण्यात आला नव्हता. राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या पुर्वपदावर येत असल्याने विकास कामांना निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरु झाल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत मंजूर असलेल्या विकास कामांना निधी वितरित करण्यात आला असल्याचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने नुकताच पारित केला आहे. या शासन निर्णयानुसार पाटण तालुक्यातील मागासवर्गीयवस्तीमधील समावेश असणारी कामे मरळी येथे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आवर्डे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, मरळोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, गोकूळ तर्फ पाटण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आटोली बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,नाटोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख,आडूळ गावठाण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, केरळ बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा व गटर काम 10 लाख, रासाटी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, कसणी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, सावरघर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, कुशी पुनर्वसन आवर्डे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 06 लाख,चिंचेवाडी वजरोशी बौध्दवस्ती रस्ता सुधारणा 10 लाख,तामिणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, आंबवडे येथे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 10 लाख, ढोकावळे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा 04 लाख अशा एकूण मंजूर 16 कामांकरीता 01.50 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत मंजूर असलेल्या मागासवर्गीय वस्तीमधील विकास कामांच्या  निविदा प्रक्रिया करण्याची करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या असून मागासवर्गीय वस्त्यांमधील विकास कामांना लवकर सुरुवात होणार असल्याचे पत्रकांत शेवटी म्हंटले आहे.