दौलतनगर दि.२8: दौलतनगर,ता.पाटण येथील शिवशंभू सहकारी
दूध संघाने सन २०२०-२१ मध्ये दुध पुरवठा केलेल्या दुध उत्पादकांना म्हैसीचे दुधासाठी
प्रतिलिटर 1.30 रुपये तर गायीच्या दुधासाठी 60 पैसेप्रमाणे होणारी बोनसची रक्कम
दूध संस्था तसेच दूध सेंटरचे चालकांच्या बँक खाती वर्ग केली आहे. शिवशंभू दूध संघाने
कार्यक्षेत्रामधील इतर दूध संघांच्या तुलनेत सर्वोच्च बोनस देत दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम बँक खाती वर्ग केली असल्याने शिवशंभू
सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाला दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादकांची दिवाळी गोड होणार आहे.महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज
देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळ यांनी संघाला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना
चांगला बोनस देऊन दूध उत्पादकांच्या फायद्याचा निर्णय घेतला असल्याचे शिवशंभू दूध संघाचे
चेअरमन अधिकराव पाटील यांनी सांगीतले आहे.
प्रसिध्दीपत्रकांत पुढे म्हंटले
आहे की, शिवशंभू दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने नुकताच दूध शितकरण प्रकल्प कार्यान्वित
केला असून त्यामुळे दैनंदिन दूध संकलनामध्ये मोठया प्रमाणांत वाढ होत आहे. शेतकरी हे
शेतीला जोड म्हणून गायी-म्हैशींचे पालन करुन दूधाचे उत्पादन घेत असतात. उत्पादित केलेल्या
दूधाला चांगला दर मिळावा ही दूध उत्पादक शेतकऱ्यांची अपेक्षा असते. त्याच्या अपेक्षेला
खरे करुन शिवशंभू दूध संघ हा दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना आतापर्यंत चांगला
दर देऊन त्यांचे आर्थिक जिवनमान उंचवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे. गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज
देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळाने दूध उत्पादकांना आणखी जादा दर देण्याकरीता
दौलतनगर,ता.पाटण या तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवशंभू दूध संघाचा शितकरण प्रकल्प
उभारला असून या शितकरण प्रकल्पाची 15 हजार लिटर एवढी क्षमता आहे. शितकरण प्रकल्पामुळे दूधाचे नुकसान होण्याचे
प्रमाण कमी झाले असून वेळेत या दूधावर प्रक्रिया
होत असल्याने दूध उत्पादकांना दुधाच्या गुणवत्तेनुसार
चांगला दर मिळत आहे.त्यामुळे शिवशंभू दूध संघाचे दैनंदिन दूध संकलनामध्ये वाढ झाली
आहे.लवकरच शिवशंभू दूध संघाचा दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचा प्रकल्प उभारणार असून दुग्धजन्य
पदार्थ उत्पादन करणार आहे. त्यामुळे तालुकयातील दूध उत्पादक
यांचेसह नव्याने दूध उत्पादन व्यवसायमध्ये येणाऱ्या युवा उद्योजकांना यामुळे
प्रेरणा मिळेल व जास्तीत जास्त दूध उत्पादन होईल तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष
रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे सांगत तालुक्यातील इतर दूध संघाच्या
तुलनेत जादा दर आणि बोनस देऊन दूध उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरला
आहे. दुध पुरवठा केलेल्या
दुध उत्पादकांना म्हैसीचे दुधासाठी प्रतिलिटर 1.30 रुपये तर गायीच्या दुधासाठी 60 पैसेप्रमाणे होणारी बोनसची रक्कम
दूध संस्था तसेच दूध सेंटरचे चालकांच्या बँक खाती वर्ग केली असून तालुक्यातील
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या संघाला जास्तीत जास्त दूध घालून सहकार्य करावे,असे
आवाहन चेअरमन अधिकराव पाटील यांनी शेवटी पत्रकांत केले आहे.
No comments:
Post a Comment