दौलतनगर दि.22 :- दौलतनगर
मरळी ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठा करणाऱ्या
ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या हिताला प्राधान्य देत कारखान्याने हंगाम 2020-21 मध्ये
गाळप केलेल्या संपूर्ण ऊसाची एफआरपीनुसार प्रतिटन रु.2807/- प्रमाणे उर्वरीत राहिलेली
277 रुपये ही रक्कम गुरुवार दि.21.10.2021 रोजी वर्ग केली आहे. मा.यशराज देसाई यांनी
बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर केले प्रमाणे कारखान्याने एफआरपीनुसार सर्वच्या
सर्व 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खाती अदा केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन
अशोकराव पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकांव्दारे दिली आहे.
पत्रकांत
पुढे म्हंटले आहे की, दौलतनगर ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 चे गळीत
हंगामात 02 लाख
33 हजार 326 मे.टन इतके ऊसाचे गाळप करुन 11.91% सरासरी
साखर उताऱ्यांने 02 लाख 78 हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कारखान्याचे सन
2020-21 चे गळीत हंगामातील ऊसबिलाची एफआरपी रक्कम प्र.मे.टन रुपये 2807/- इतकी आहे.एफआरपीप्रमाणे एकूण गळीताच्या ऊसबिलाची प्र.मे.टन
रक्कम रुपये 2530 प्रमाणे होणारी रक्कम यापूर्वीच ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. महाराष्ट्र
राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली मा.यशराज देसाई व
सर्व संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे हिताचे धोरण राबवित असून कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन
कार्यक्रमप्रसंगी मा.यशराज देसाई यांनी जाहिर केलेप्रमाणे आठ दिवसाच्या आत उर्वरित
एफआरपीप्रमाणे शिल्लक असणारी 277 रुपये प्रमाणे होणारी रुपये 06 कोटी 47 लाख रक्कम
कारखान्याने गुरुवार दि. 21.10.2021 रोजी ऊस पुरवठादारांच्या बँक खाती वर्ग केलेली
आहे. कोविड महामारीतून उद्योगधंदे सावरत असताना,बाजारपेठांमधील खरेदी विक्री पुर्वपदार
येत असून वेळोवेळी साखर विक्री दरामध्ये झालेला
बदल,कामगारांची देणी,वाहतुक खर्च,वित्तीय कर्जाची उपलब्धता आदी अनेक आव्हांनांना तोंड
देत एफआरपीची उर्वरित रक्कम सभासदांना देण्यासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
यांचे मार्गदर्शनाखाली युवानेते यशराज देसाई व कारखाना व्यवस्थापनाने निधीची उपलब्धता
करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2020-21 च्या गळीत हंगामातील
100 टक्के एफआरपी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली आहे.लोकनेते बाळासाहेब
देसाई सहकारी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक सभासद,शेतकरी यांनी संबंधित
बँकेच्या शाखांशी संपर्क साधावा असे सांगत सन 2021-22 चे गळीत हंगामाची आवश्यक ती सर्व पुर्व
तयारी झालेली आहे. लवकरच गळीत हंगाम शुभारंभ झाल्यानंतर कारखान्याचे गळीत हंगामास पुर्ण
क्षमतेने सुरुवात होईल.यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी मजूर यंत्रणेचे नियोजन करण्यात
आले आहे.त्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस लोकनेते
बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला गळीतास देऊन सन 2021-22 चा गळीत हंगाम यशस्वी
करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन शेवटी पत्रकांत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment