Wednesday 29 September 2021

प्रामाणिकपणे जनता व पक्षाची केलेल्या सेवेमुळेच राज्यमंत्री म्हणून पाच महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी. गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई नावडी,वेताळवाडी येथील विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

 


दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-सन 2014 ते 2019 या कालावधीत पाटण विधानसभा मतदारसंघ हा विकास कामांच्याबाबतीत आघाडीवर होता, जादाचा निधी जादाची विकास कामे आणण्याचे काम या पाच वर्षाच्या काळात केले.सन 2019 ची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले.लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पश्चात त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मंत्रीपद मिळाले.मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेमुळे मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. प्रामाणिकपणे जनतेची,पक्षाची सेवा करण्याचे काम केले.त्यामुळे मंत्रीमंडळातील महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळाली असल्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले.

               ते नावडी नविन वसाहत येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर वेताळवाडी ते नावडी रस्ता डांबरीकरण भुमीपुजन,अंगणवाडी इमारत व बौध्दवस्तीमधील अभ्यासिका इमारतीचे उद्घाटन, या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.यावेळी रविराज देसाई,जि.प.सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,अॅड. बाबुराव नांगरे,अॅड.डि.पी.जाधव,विजय जंबुरे,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष सरपंच विजय शिंदे,कारखान्याचे व्हा.चेअरमन राजाराम पाटील, संचालक  बबनराव भिसे  शशिकांत निकम,धनाजी केंडे,मानसिंगराव नलवडे,सरपंच विष्णू पवार,सोनाईचीवाडीचे संतोष कदम ठोमसेचे बजरंग माने यांचेसह नावडी, वेताळवाडी, मल्हारपेठ, आबदारवाडी, गिरेवाडी, ठोमसे, सोनाईचीवाडी,विहे परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.तत्पुर्वी ग्रामपंचायत वतीने सरपंच सुभाष नलवडे,शरद पाटील,सतीश पवार यांनी भव्य पुष्प हार घालून स्वागत केले. हनुमान सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे वतीने चेअरमन व संचालक सुदाम पवार,अशोक लोंढे,फेडरेशनचे अध्यक्ष बबनराव नलवडे , सोसायटीचे संचालक मंडळ,गणेश  मंडळाने ,युवक मंडळाचे बाजीराव पवार यांनी सत्कार केला.

              यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी गृहमंत्री  पदाच्या कालावधतीत केलेल्या कार्यामुळे पाटण तालुक्याची ओळख महाराष्ट्रात  झाली .एक करारी गृहमंत्री म्हणून आजही त्यांना ओळखले जाते. मंत्री म्हणून त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे त्यांच्या कार्याची आजही ओळख आपल्याला देतात.त्याचप्रमाणे तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने  महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकनेत्यांचे  राजकीय  वारसदार म्हणून व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांनी त्याच गृहमंत्री पदासह अन्य महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिल्याने  तालुक्याच्या विकासाठी चांगली संधी मिळाल्याचे सांगत मंत्री शंभुराज देसाई विकास कामावर बोलताना म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये  वित्त व नियोजन राज्यमंत्री म्हणून विधान परिषदेत शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधून अर्थसंकल्प मांडला.त्यावेळी डोंगरी भागाचा विकासाचा अर्थसंकल्प म्हणून कौतुक झालं.परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी करते समयी  अडचणी आल्या.कोरोना महामारीने सर्व उद्योग धंदे बंद पडले. अनेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर गदा आली.कोविड मुळे संपूर्ण राज्यात घालण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे राज्य शासनाला सुमारे एक लाख कोटी रुपयांचा महसूलात तूट आली.सहाजिकच मग विकास कामे करताना राज्याचा महसूल खूप कमी जमा झाल्याने विकास कामे करताना काही निर्बंध आले.पण या अडचणीच्या काळात फक्त राज्यातील कृषी क्षेत्र टिकून होते.राज्‍य शासनाने लॉकडाऊनच्या काळात शेती व शेतीपूरक कामांवर कोणतीही बंधन न लादता शेती उत्पादनाशी निगडीत सर्व प्रक्रिया सुरु ठेवल्याने कोविड सारख्या महामारीमध्ये कृषी उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर येत असून काही महिन्यांच्या कालावधीत मतदारसंघातील प्रलंबित असलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव निधीची तरतूद करणार असल्याने या पुढील काळात कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात प्राधान्यक्रमाने विकास कामांची मागणी करा.या विकास कामांना कसलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यानी शेवटी दिली.

ना.शंभूराज देसाई यांचेमुळे बाधितग्रस्तांची होणार निवासाची सोय. अतिवृष्टीमुळे बाधित भूस्खलनग्रस्तांचे तात्पुरत्या निवाऱ्यासाठी कोयनानगर येथे 150 खोल्या तयार.


दौलतनगर दि.29(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- माहे जुलै महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावात भुस्खलन होऊन घरे बाधित झाली होती. या गावातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून दाटीवाटीने कोयनानगर येथील माध्यमिक व प्राथमिक शाळेत तात्पुरत्या स्वरुपात रहात होते.या आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी कोयनानगर येथील शासकीय वसाहतीमधील १५० मोडकळीस आलेल्या खोल्यांची दोन महिन्यात तातडीने दुरुस्ती करुन पहिल्या टप्प्यात 90 आपत्तीग्रस्त कुटुंबियांचे या खोल्यात येत्या दोन दिवसांत तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचेमुळे बाधितग्रस्तांची निवाऱ्याची सोय होणार आहे.

                   अतिवृष्टीमुळे कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या गावांत भूस्खलन होवुन आपत्तीचा डोंगर काळ बनुन गावांवर कोसळला होता. यामध्ये मिरगाव मधील ११, ढोकावळे येथील 5 तर हुंबरळी येथील 1 अशी १७ घरे जमीनदोस्त झाली होती. यामुळे या तीन गावांचे अस्तित्व धोक्यात आले होते. या तीन गावांतील सर्व ग्रामस्थांना कोयनानगर,चाफेर,मिरगाव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत तर हुंबरळी येथील लोकांना पर्यटन महामंडळ व खाजगी मालकाच्या रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर दुरध्वनीवरुन याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना दिली.अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधितग्रस्तांची तातडीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन देण्यास महाविकास आघाडीच्या सरकारचे प्राधान्य राहणार असल्याचे सांगीतले होते.तसेच या कालावधीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोयनानगर येथील वसाहतीतील निवासी इमारतींची पाहणी करुन दुरुस्ती करण्याच्या सुचना केल्या होत्या.त्यानुसार कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील १५० मोडकळीस आलेल्या खोल्या दुरूस्त करून त्या खोल्यांमध्ये आपत्तीग्रस्तांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन या दुरुस्तीचे कामासाठी तातडीने मान्यता घेऊन मोडकळीस आलेल्या खोल्या तातडीने नव्या स्वरूपात उभारण्याचे काम युध्द पातळीवर सुरु होते. दोन महिन्यांच्या कालावधीत सगळ्यांना हेवा वाटेल अशा सर्व सोयींनीयुक्त टुमदार १५० खोल्या कोयनानगर येथे तयार झाल्या आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर आपत्तीग्रस्त व सध्या कोयनानगर व चाफेर-मिरगांव येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेत राहणाऱ्या मिरगाव, ढोकावळे या गावातील आपत्तीग्रस्तांना येथे स्थलांतरीत करण्यात येणार आहे.ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून आपत्तीग्रस्त लोकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याचा विषय निकाली निघाला आहे. कोयनानगर येथील कोयना वसाहतीमधील १५० खोल्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. दोन महिन्यात १५० खोल्या उभ्या राहिल्या आहेत. या खोल्यांमध्ये मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी या आपत्तीग्रस्त गावातील बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे.मिरगाव येथील बाधित आपत्तीग्रस्त, कोयनानगर येथील नेताजी सुभाषचंद्र हायस्कुल या तर ढोकावळे येथील आपत्तीग्रस्त न्यु इंग्लिश स्कुल चाफेर, मिरगाव या विद्यालयात दोन महिन्यापासून वास्तव्यास आहेत. येत्या चार ऑक्टोबरपासुन दीड वर्षापासुन बंद असलेली सर्व विद्यालये सुरु होत आहेत. विद्यालय सुरु करण्यासाठी या विद्यालयात असणारे आपत्तीग्रस्त अन्यत्र स्थलांतरीत करणे गरजेचे आहे.तात्पुरते निवासस्थान पूर्ण झाल्याने आपत्तीग्रस्तांचे या निवासस्थानी तात्पुरते स्थलांतर करण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली आहे. शाळा सुरु होण्यापूर्वी शाळा मोकळ्या करून देण्यात येण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या तीन गावाच्या तात्पुरत्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने आराखडा तयार केला आहे. आपत्तीग्रस्त असणाऱ्या या तीन गावातील पहिल्या टप्प्यात 90 बाधित कुटुंबियांना प्रथम प्राधान्याने या खोल्या दिल्या जाणार असून अतिवृष्टीमुळ बाधित झालेल्या कुटुंबियांची निवाऱ्याची सोय ना. शंभूराज देसाई यांनी केल्याबद्दल बाधितग्रस्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

  

Tuesday 28 September 2021

मंद्रुळहवेली विकास सेवा सोयायटीचे काम आदर्शवत.ना.शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोयाटी असा नामकरण सोहळा संपन्न.


 दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- ग्रामीण भागातील विकास सेवा सोसायट्या हया शेतकऱ्यांसाठी आर्थिक पुरवठा करणारऱ्या संस्था असून या संस्थामध्ये चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांचेकडून शेतकरी हिताचे निर्णय झाल्यानंतर या संस्था नावारुपास येत असतात.मंद्रुळहवेली विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासत चांगले काम केले असून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. या  विकास सोसायटीने सभासदांचे विश्वासास पात्र राहून सभासद हिताचे निर्णय घेतले असून मंद्रुळ हवेली विकास सेवा सोयायटीचे काम आदर्शवत असल्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी  म्हंटले आहे.

                  मंद्रुळहवेली,ता.पाटण विकास सेवा सोसायटीचे लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी असा नामकरण सोहळा कार्यक्रम ना. शंभूराज देसाई शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, संचालक अशोकराव डिगे,आनंदराव चव्हाण,सुनिल पवार,विश्वनाथ पानस्कर,विजय शिंदे,जयवंत पानस्कर,जगन्नाथ पवार, पांडूरंग शिरवाडकर, मंद्रुळ हवेली विकास सेवा सोसायटी चेअरमन अविनाश चव्हाण, व्हा.चेअरमन अलका दिनकर चव्हाण व संचालक मंडळ,सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

                  ना. देसाई पुढे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी  गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध कार्यकारी सेवा सोसायटया स्थापन केल्या आहेत.शेतकऱ्यांना शेतीपुरक अशा गोष्टी करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार या सोसायटया शेतकरी सभादांना माफक व्याजदारामध्ये कर्ज पुरवठा आर्थिक सहाय्य करत असतात. तसेच कमी व्याजदराने विकास सेवा सोसायटीने दिलेल्या कर्जाची परत फेड ही वार्षिक असल्याने शेतकऱ्यांसाठी याचा फायदाही होतो.परंतु सभासदांना दिलेल्या कर्जा नियममित परतफेड झाल्यास संस्थेचा फायदा होऊन संस्थेची प्रगती होण्यास याचा मोठा हातभार लागतो.त्याचपध्दतीने मंद्रुळहवेली विकास सेवा सोसायटीनेही सभासदांच्या हितासाठी चांगले निर्णय घेऊन सभासदांचे हित जोपासण्यास प्राथमिकता दिली आहे, हि बाब निश्चितच कौतुकास्पद असून इतर सहकारी संस्थांना आदर्शवत अशी आहे.चांगल्या चाललेल्या या सहकारी संस्थेने लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी असे नामकरण सोहळा आज संपन्न होत असताना निश्चितच आनंद होत होत असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा नातू म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे. भविष्यामध्ये या संस्थेस काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत लागल्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देत मंद्रुळहवेली विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासत चांगले काम केले असून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. या  विकास सोसायटीने सभासदांचे विश्वासास पात्र राहून सभासद हिताचे निर्णय घेतले असून मंद्रुळ हवेली विकास सेवा सोयायटीचे काम आदर्शवत असल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी असे नामकरण केल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भरत देसाई यांनी मानले.

अधिकाऱ्यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे.ना.शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते मल्हारपेठ,ता.पाटण येथील नवीन तलाठी कार्यालय इमारतीचे उद्घाटन.



दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम अशा भागामध्ये वेग-वेगळया खोऱ्यांमध्ये वसलेला मतदारसंघ आहे.शासकीय अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी स्वतंत्र अशा इमारतीची सोय नसल्याने अधिकाऱ्यांसह येथील सामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शासकीय काम चांगल्या पध्दतीने होण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वतंत्र अशी इमारतीची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आपण नवीन तलाठी कार्यालय इमारतींकरीता निधी मंजूर करत या इमारतींचे कामांना सुरुवात करुन आज प्रत्यक्षात त्या तलाठी इमारतींमध्ये कार्यालयीन कामकाज सुरु होत असून शासकीय अधिकाऱ्यांनी आता सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  केले.

               मल्हारपेठ,ता.पाटण येथे शासकीय कार्यालयीन इमारती बांधणे या योजनेतंर्गत मल्हारपेठ येथील तलाठी कार्यालय इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,प्रदिप पाटील,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,संचालक अशोकराव डिगे,आनंदराव चव्हाण,शशिकांत निकम,विजय जंबुरे,पांडूरंग नलवडे, बबनराव भिसे,सुनिल पवार,प्रा.विश्वनाथ पानस्कर,अध्यक्ष विजय शिंदे,राजकुमार कदम,जयवंत पानस्कर,जगन्नाथ पवार,पांडूरंग शिरवाडकर,रेखा भिसे, तेजश्री शेटे,तहसलिदार योगेश टोमपे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

               यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कराड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील मल्हारपेठ या तालुक्याच्या मध्यवर्ती अशा बाजारपेठेच्या ठिकाणी मंडल अधिकारी व तलाठी  यांचे कार्यालयीन कामकाजासाठी महसूल विभागाचे तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकामासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करत या तलाठी कार्यालय इमारतीचे काम पुर्ण होऊन प्रत्यक्षात आज त्याचे उद्घाटन करत सर्व सोयीं-सुविधासह असलेल्या या  इमारतीमध्ये कार्यालयीन कामकाजास सुरुवात होईल.त्याचप्रमाणे नुकतेच मल्हारपेठ येथे नव्याने मंजूर झालेल्या पोलीस स्टेशन इमारतीचे व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम करुन या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मल्हारपेठ विभागामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सर्व वाडया व मल्हारपेठ बाजारपेठेचे गाव जोडण्याचे काम आपण केले. विकासाची प्रक्रिया हि सतत चालू राहणारी प्रक्रिया असते. कार्यकर्त्यांना एक विकासाच काम झाले की दुसरं काम हवं असतं आणि सातत्याने विकास कामांकडे लक्ष देणाऱ्या प्रतिनिधींकडून सातत्याने विकास कामे होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा नेहमीच प्रयत्न सुरु असतो आणि या सर्वांच्या सांधिक प्रयत्नातूनच गावांमध्ये विविध विकास कामे मार्गी लागतात असे सांगत ते पुढे म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी सहा खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार देत वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी दिली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समतोल राखण्यासाठी विशेषतः राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते,पूल,पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी निधीची तरतूद करत सर्वांगणी विकास करण्याचा महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. मात्र कोविड काळात राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाला.सध्या कोविड परिस्थितीत सुधारणा होत असल्याने नजीकच्या काळात राज्यातील विकासाच्या कामांची मोठ्या प्रमाणात घोडदौड सुरू राहील असे सांगत ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये तलाठी सजा असलेल्या ठिकाणी दोन ते चार गावांचा समावेश असल्याने या ठिकाणी  गावातील नागरिक हे त्यांचे वैयक्तिक कामांकरीता मंडलाधिकारी,तलाठी यांचेकडे येतात.तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती  नसल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करत मल्हारपेठ, ऊरुल, नाडे,आडूळ,बहुले व तारळे या ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींना निधी मंजूर करुन आणत सध्या या इमारतींची कामे सध्या पुर्णत्वाकडे गेली असल्याने या तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याने यापुढे शासकीय अधिकाऱ्यांनी आता सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे असे शेवटी त्यांनी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.


Sunday 26 September 2021

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध. ना.शंभूराज देसाई ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थित नाडोली येथे विविध विकास कामांची भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

                               

 दौलतनगर दि.26(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सध्या विकास कामे करताना जरी काही निर्बंध येत असले तरी राज्याची आर्थिक स्थित पुर्वपदावर येत असून राज्यातील ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावण्याची राज्य शासनाची प्राथमिकता असून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याने ग्रामीण भागातील जनतेने आपापसातील मतभेद विसरून त्याचा लाभ घ्यावा,असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केले.

               मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नाडोली,ता.पाटण पोहोच रस्ता सुधारणा करणे या 02 कोटी 16 लक्ष रुपये निधी मंजूर असलेल्या रस्त्याच्या व नाडोली,ता.पाटण येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे असा संयुक्त विकास कामांचा भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांचेसमवे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,प्रदिप पाटील,संचालक बबनराव भिसे,संपतराव सत्रे,पांडूरंग शिरवाडकर,सरपंच सौ.सिमा लोहार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,विष्णू पवार,प्रकाश पवार,दादासो पवार,शंकर डिगे,दिपक कदम,संतोष भिसे,अरविंद पवार,मच्छिंद्र लोहार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे पानस्कर, नाडोली ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्याच्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या सहा खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार दिला.त्यातच वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी दिली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाचे धोरण पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे.राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समतोल राखण्यासाठी राज्याच्या अर्थ खात्याने अर्थसंकल्पात तरतूद केली असून विशेषतः राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते,पूल,पिण्याच्या पाण्याच्या योजना यांचा समावेश आहे. मात्र कोविड काळात राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाला. मात्र सध्या कोविड परिस्थितीत सुधारणा होत असल्याने नजीकच्या काळात राज्यातील विकासाच्या कामांची मोठ्या प्रमाणात घोडदौड सुरू राहील,असा विश्वास व्यक्त करून आज माझेवर राज्याच्या सहा खात्यांची तसेच वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी माझे लक्ष आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघावरच राहणार आहे. मी संपुर्ण महाराष्ट्रभर राज्याचा राज्यमंत्री म्हणून जरी मला फिरावे लागले तरी माझे सगळे लक्ष हे आपल्या पाटण मतदारसंघातील जनतेपाशीच राहणार आहे. ज्या मतदारांच्या आशिर्वादाने आपण राज्यमंत्री झालो त्या जनतेच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य देणेकरीता माझे प्रयत्न राहणार आहेत. मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणेकरीता मी कटीबध्द आहे अशी ग्वाही देत राज्यातील आघाडी सरकार  ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याने ग्रामीण जनतेने आपापल्या मधील मतभेद विसरून याचा लाभ घेतला पाहिजे.नाडोली गावच्या विकासासाठी सध्या सव्वादोन कोटी रुपयांची कामे सुरू केली आहेत.अजून ही निधी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.मात्र गावांतील आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने एकसंघ  राहणे, हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सर्व ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. तरच खऱ्या अर्थाने आपल्या गावात विकासाचा मोठा डोंगर उभा राहील,अशी अपेक्षा ही मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विजय पवार यांनी केले तर आभार अरविंद पवार यांनी मानले.

चौकट: रस्ता टिकण्यासाठी अवजड वाहनांना मर्यादा घालणे गरजेचे..!

             नाडे ते नाडोली या दोन ते सव्वादोन किलोमीटर च्या रस्त्यासाठी शासनाने तब्बल दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.या रस्त्यावरील अवजड वाहतुकीसाठीही काही मर्यादा आहेत. मात्र असे असताना खडी क्रॅशर मालक आणि ग्रामस्थ यांच्या संगनमताने या रस्त्यावरून अवजड वाहने ने आण करण्यासाठी ही काही मर्यादा तसेच निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे सांगत रस्त्याचे काम दर्जेदार करुन तो रस्ता टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Saturday 25 September 2021

राज्यमार्ग नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी केंद्रीय मार्ग निधी मंजूर करावा. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांची मागणी

 

दौलतनगर दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रोड या राज्य मार्गावरील पाटण विधानसभा मतदारसंघातील खराब झालेल्या हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा.तसेच गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील भाग पाटण ते संगमनगर (धक्का) या 13 कि.मी.अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामाची फेर निविदा कार्यवाही करण्यात येऊन या रस्त्याचे काम तातडीने सुरु करुन कराड ते पाटण या मार्गावरील अपूर्ण असलेली कामे तात्काळ पूर्ण करावित,अशी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे मागणी केली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

              पत्रकात ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी रस्ता म्हणून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळणेसाठी मी सातत्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता 148 क्रमांकाचा राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आला. सध्या हेळवाक मोरगिरी ते गारवडे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहनांची ये-जा सुरु असते.माहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली असून या मार्गावरुन प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने या राज्य मार्गावरील हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेतून भरीव निधी मंजूर करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे केली असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. परंतु याच राष्ट्रीय महामार्गावरील पाटण ते संगमनगर धक्का या भागातील रस्त्याचे कामांस संबंधित कंपनीकडून अद्यापही सुरुवात केली नाही. या कामासाठी निविदा निश्चित झालेल्या एल.एण्ड टी. कंपनीने पुर्णपणे काम बंद करत कंपनीची यंत्रसामुग्री अन्य ठिकाणी स्थलांतरीत केली असल्याने अद्यापही पाटण ते संगमनगर धक्का या भागातील काम प्रलंबित असल्याने या रस्त्याची मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रवाशांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील पाटण ते संगमनगर धक्का या भागातील 13 कि.मी. अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामाकरीता निविदा निश्चित झालेली कंपनी जर हे काम करत नसले तर कामाची फेर निविदा करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येऊन पाटण ते संगमनगर धक्का या 13 कि.मी. अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी. तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते पाटण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामेही अपूर्ण असल्याने या गावातील नागरीकांची दळणवळणाची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गावांना पोहोच रस्त्यांचीही कामे पुर्ण करण्यात येऊन या मार्गावरील मुख्य बाजारपेठांची तसेच वर्दळीची ठिकाणं असलेल्या मल्हारपेठ,नाडे व पाटण या ठिकाणी तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिक-ठिकाणी मुख्य रस्त्याचे काम अद्यापही प्रलंबित असून कराड चिपळूण जत विजापूर या राष्ट्रीय महार्गावरील कराड ते पाटणच्या दरम्यान अपूर्ण असलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी,अशीही मागणी केली असल्याचे शेवटी प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.


Friday 24 September 2021

सातारा येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड इमारतीचे बांधकामाकरीता 2 कोटी 59 लक्ष निधी मंजूर. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 

 

 दौलतनगर दि.24(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सातारा येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकामाचे प्रस्तावाला गृह विभागाने होमगार्ड आधुनिकीकरण या योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये 02 कोटी 59 लक्ष रुपयांचे खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

              प्रसिध्दी पत्रकांत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, जिल्हा समादेशक होमगार्ड,सातारा या कार्यालयाचे अधिनसस्त असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्र,होमगार्ड सातारा या प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम होण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या नंतर जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकामाचा प्रस्ताव शासनाचे गृह विभागाकडे तातडीने सादर करण्यात आला होता.त्यानुसार जिल्हा प्रशिक्षण केंद्र,होमगार्ड सातारा या इमारतीचे बांधकामाकरीता होमगार्ड आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये 02 कोटी 59 लक्ष रुपयांचे खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून या इमारतीकरीता आवश्यक असलेले अनुदान होमगार्ड आधुनिकीकरण योजनेअंतर्गत पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच सदर इमारतीचे बांधकामासाठी आवश्यक असणारा बांधकाम परवाना व इमारत नकाशाही होमगार्ड कार्यालयास प्राप्त झाले असल्याने त्यामुळे सातारा येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्डच्या इमारतीचे बांधकामास तातडीने सुरुवात करावी अशा सूचना पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिल्या असल्याने लवकरच सातारा या ठिकाणी जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकाम करण्यास सुरुवात होणार असून सातारा या जिल्हयाचे मध्यतवर्ती असलेल्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड इमारतीमुळे सातारा जिल्हयाच्या वैभवामध्ये भर पडणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पत्रकांत दिली आहे.

कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे ना.अजितदादा पवार यांचे बैठकीत निर्देश. ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश.

 


दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कोयना धरण उभारणीमध्ये कोयना धरण प्रकल्पांतर्गत बाधित प्रकल्पग्रस्तांचा मोठा त्याग असून कोयना धरण उभारणीसाठी त्यांनी आपली कुटुंबे ही पुनर्वसित ठिकाणी स्थलांतरीत केली.परंतु प्रकल्पग्रस्ताना द्यावयाच्या जमीनींसह पुनर्वसित ठिकाणी पुरवावयाच्या नागरी सुविधां आणि प्रलंबित प्रश्नांसदर्भात आयोजित केलेल्या बैठकीमध्ये कोयना प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश ना. अजितदादा पवार यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिले असल्याने ना.शंभूराज देसाई यांचे पाठपुराव्याला यश येऊन लवकर या प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

              उमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे अध्यक्षतेखाली आयोजित कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसना संदर्भात मंत्रालय मुंबई या ठिकाणी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई सातारा येथून व्हीसीद्वारे,जलसंपदा मंत्री जयंत पाटील,अप्पर मुख्य प्रधान सचिव नितीन करीर,मदत पुनर्वसन सचिव असीम गुप्ता यांच्यासह जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य वन संरक्षक तिवारी तसेच संबंधित सर्व विभागाचे अधिकारी बैठकीस उपास्थित होते.

               यावेळी ना.देसाई पुढे म्हणाले की,कोयना परिसर हा निर्सगाने नटलेला नयनरम्य परिसर असून कोयना परिसरात वेगवेगळ्या गावात विविध नैसर्गिक धबधबे अस्तित्वात आहेत. यापैकी ओझर्डे धबधब्याचे पर्यटन विकास निधीमधून शुशोभिकरणही करण्यात आले होते. परंतु जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सदर शुशोभिकरणाचे ठिकाणच्या जमिनीचे भूस्खलन होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यामुळे ओझर्डे धबधब्यासह कोयना परिसरातील विविध पर्यटन स्थळांच्या पुर्नबांधणीसाठी निधीची ही आवश्यकता असल्याचे निदर्शास आणून देत कोयना प्रकल्पग्रस्त व सहयाद्री व्याघ्र प्रकल्पातील बाधित स्थानिकांना घेऊन निसर्ग पर्यटनाच्या योजना राबवण्यात येऊन या माध्यमातून तेथील  प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल.तसेच रासाटी,गोकूळ,शिवंदेश्वर व हेळवाक या गावांतील जमीन ही कोयना प्रकल्पासाठी संपादित केल्या असून या जमिनीवर कोयना प्रकल्पात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची निवासस्थाने तसेच शासकीय कार्यालयांच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. परंतु संपादित केलेल्या जमिनी हया जलाशयामध्ये बुडीत गेल्या नसल्याने या बाधित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनही मिळाली नाही. त्यामुळे या बांधित गावांतील प्रकल्पग्रस्तांवर मोठया अन्याय झाला असल्याचे ना.देसाईंनी निदर्शनास आणून देत या प्रकल्पग्रस्तांना संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यामध्ये पर्यायी जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्यानंतर कोयना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या रासाटी, गोकूळ, शिवंदेश्वर व हेळवाक या गावांतील बाधित प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिन देण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी बैठकीमध्ये देऊन कोयना प्रकल्पग्रस्तांचे संकलंन रजिस्टर प्रमाणित करुन तातडीने पुन्हा सर्व्हे करून प्रकल्पग्रस्तांना नव्याने पुनर्वसनासाठी पात्र ठरवून प्रकल्पग्रस्तांची संख्या व जमिनीचे क्षेत्र निश्चित करुन प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपासाठी कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात येऊन अतिरिक्त वाटप केलेल्या जमिनींची माहिती घेण्यात यावी. तसेच प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या नागरी सुविधा उपलबध करुन देण्यासोबत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना महावितरणमध्ये प्राधान्याने नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच, कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश याबैठकीप्रसंगी दिले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी दिली.दरम्यान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा संदर्भात विविध 19 मुद्द्यावर या बैठकीत  चर्चा करण्यात आली.

गावच्या सर्वांगिन विकासासाठी एकजूट कायम ठेवावी-मा.यशराज देसाई. मा.यशराज देसाई यांचे हस्ते कवरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व अंगणवाडी इमारत उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कवरवाडी गाव हे नेहमीच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठीशी  ठामपणे उभे राहिले असल्याने आज आपण त्यांचे प्रयत्नातून मंजूर झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करत विकासाची कामे मार्गी लावून गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हातभार लागला आहे.प्रत्येक निवडणुकीमध्ये ना.देसाई यांचे नेतृत्व मानत मताधिक्य देऊन विकासात्मक विचारधारा जोपासण्याचे काम आपण सर्वजण करत असून यापुढेही कवरवाडी गावाचा सर्वांगिन विकास होण्यासाठी आपली अशीच एकजूट कायम ठेवावी,असे आवाहन मा.यशराज देसाई यांनी केले.

             पिंपळगाव(कवरवाडी),ता.पाटण येथील जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व डोंगरी विकास निधीमधून पूर्ण झालेल्या अंगणवाडी इमारत उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पांडूरंग शिरवाडकर,सरपंच अधिकराव कवर,उपसरपंच उत्तम कवर,किसनराव कवर,उत्तम मोळावडे,किसन कवर,रमेश गुदळे,कुंडलिक कवर,जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता जाधव यांच्यासह कवरवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

            यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाई यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान देऊन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली.काही कालावधी झाल्यानंतर कोविड 19 चा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला आपणां सर्वांना सामोरे जावे लागले. कोविड 19 या संकटाला सामोरे जात असताना ना.शंभूराज देसाई यांनी समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करुन वेळ प्रसंगी कोविड बाधित गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील नागरीकांना आधार देण्याचे काम केले.तसेच वेळो वेळी शासकीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन कोविड चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी  प्रयत्नशील राहिले.त्यातच जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होऊन जिवीत हानीसह रस्ते,साकव पूल,नळ योजना,सार्वजनिक इमारती यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले.नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्ते झालेल्या नुकसानीची तातडीने पुनर्बांधणीचे काम हाती घेऊन प्राधान्याने दळण-वळण सुरळीत करत बाधित गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ना.शंभूराज देसाई प्रयत्नशील असून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,कवरवाडी गावाच्या एकजूटीची पहिल्यापासून या विभागामध्ये वेगळी ओळख असून अडचणीच्या काळात या गावाने नेहमीच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम  केले आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये या गावाने नाडे पंचायत समिती गणामध्ये प्रथम क्रमांकाचे मताधिक्य दिले असल्याने ना.देसाई यांनीही विकास कामांमध्ये झुकते माप दिले आहे. आज भूमिपूजन झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे काम दर्जेदार करावे.कारण गावाची सर्व विकास कामे जेथून केली जातात तो महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेली ग्रामपंचायत इमारतही चांगली होणे गरजेचे असून गावामध्ये विकासाची कामे राबविताना ग्रामपंचयतीचे पदाधिकारी यांनी भविष्यातील गावाचा विस्तार लक्षात घेऊन योग्य नियोजन करुन राबवावित.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ मोठी विकासाची कामे मार्गी लावताना आता निधीची मर्यादा आहेत. ना. देसाई यांचा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास कामांची भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी उपस्थित राहून गावा-गावात जनसंपर्क आहे.परंतु राज्याच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी तसेच वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने आज आपण हे कार्यक्रम करत असलो तरी उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याकरीता गावाची एकजूट कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारीही वाढली असल्याचे मा. यशराज देसाई यांनी शेवटी सांगीतले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,किसनराव कवर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार प्रकाश कवर यांनी मानले.


Saturday 18 September 2021

राज्य सरकार सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम-ना.शंभूराज देसाईं लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची ऑनलाईन ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

                                                        


               

दौलतनगर दि.18 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- शेतकऱ्यांच्या उसाला एफ.आर.पी प्रमाणे  योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी  साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे याबाबत केंद्रसरकार का निर्णय घेत नाही ?असा सवाल उपस्थित करून देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनेच मदत करणे गरजेचे आहे,असे मत राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.दरम्यान राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम पणे असल्याचे ही ना.शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

                लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली “महाराष्ट्र दौलतलोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन पार पडली. यावेळी त्यांच्यासमवेत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, युवानेते यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण,आनंदराव चव्हाण,सोमनाथ खामकर, गजानन जाधव,शशिकांत निकम,संपतराव सत्रे,पांडूरंग नलवडे,बाळासो शेजवळ,राजेंद्र गुरव,संचालिका सौ. विश्रांती  जंबुरे, दिपाली पाटील,बशीर खोंदू,भरत साळूंखे,विजय पवार,संतोष गिरी, सुरेश पानस्कर, प्रकाशराव जाधव,यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शिवदौलत बँकेच्या तारळे,पाटण व ढेबेवाडी या शाखांमधून सभासद शेतकरी ऑनलाईन पध्दतीने या सभेस उपस्थिती राहिले.

               यावेळी बोलताना ना.शंभूराज देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातील च नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफ.आर.पी. प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे. याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफ.आर.पी.चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी साठी जबाबदार आहे.परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.त्यातच राज्याच्या वीज वितरण विभाग सध्या विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याने ज्या कारखान्यांनी वीज तयार केली आहे ती वीज कारखान्याकडे तशीच आहे.परिणामी वीज विक्री अभावी कारखान्याचे वीज उत्पन्न करणारे प्लांट  सध्या बंद आहेत .त्यामुळे राज्यातील कारखान्यांचे को जनरेशन प्लांट मध्ये कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत मात्र सध्या इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना वाव आहे कारण पेट्रोल मध्ये यापूर्वी केवळ ५टक्के इथेनॉल वापरण्यासाठी परवानगी होती ती आता २० टक्के वापरण्यावर केंद्र सरकार विचार करीत असल्याचे ही त्यांनी स्पष्ट करत ना. देसाई पुढे म्हणाले,राज्यातील आघाडी सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे अशी ग्वाही देवुन मंत्री देसाई म्हणाले  प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.प्रमाणे शेतकऱ्या ऊसाचा दर देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले,लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई यांचे योगदानतून साकारलेल्या या सहकारी संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी सर्व ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकविलेला संपूर्ण ऊस या कारखान्यास गळीतास घालून सहकार्य करावे तसेच ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे,असेही यावेळी बोलताना म्हणाले.

चौकट :-पाटण मतदारसंघात पाणंद रस्त्यांसाठी पायलट प्रोजेक्ट राबविणार

         पाटण तालुक्यात शेत शिवारामध्ये अनेक पाणंद रस्ते अस्तित्वात असून या रस्त्यावरुन ऊस वाहतूक करताना सभासद शेतकरी यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून तालुक्यात असणारे पाणंद रस्त्यांची कामे होण्यासाठी सभासदांकडून सातत्याने मागणी होत आहे. दरम्यान राज्यातील पांणंद रस्त्यांना मोठा निधी देऊन या रस्त्यांचा विकास करण्यासंदर्भात राज्य सरकार विचाराधीन आहे. लवकरच या संदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे,असे झाल्यास मोठया प्रमाणांत पाणंद रस्ते करण्याकरीता सातारा जिल्ह्यातील पाटण मतदार संघात पहिला पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविला जाईल,अशी ग्वाही मंत्री शंभुराज देसाई यांनी यावेळी दिली.

चौकट; तर त्यांचे सभासदत्व रद्द होणार..!

        जे ऊस उत्पादक  सभासद शेतकरी कारखान्याची सवलतीची साखर घेऊन,कारखान्याचे इतर सर्व लाभ घेऊन ही आपल्या क्षेत्रात पिकलेला शंभर टक्के ऊस आपले देसाई कारखान्याला घालत नसतील अथवा त्यांच्या शंभर टक्के पिकलेल्या ऊसापैकी थोडा जरी ऊस बाहेर गेला तरी त्या सभासदाला संचालक मंडळ खुलासा मागतील आणि हा खुलासा समाधानकारक नसेल केवळ साखरेचे कार्ड बंद न करता कारखान्याचे संचालक मंडळाला त्या सभासदाचे सभासदत्व रद्द करणेचा अधिकार राहील असा महत्त्व पूर्ण ठराव देसाई कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने संमत करण्यात आला.

चौकट. नाडे येथे बहुउद्देशिय कृषी संकुल तर आणि मरळी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश

          लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री वाशिम जिल्हा यांच्या संकल्पनेतून शेतमालाची विक्री व्यवस्था, प्रतवारी व पॅकिंग सुविधाआणि पुर्वशितकरण सुविधा इत्यादीसाठी वाशिम येथे साकार झालेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे बहुउद्देशिय कृषी संकुल वाशिमचे धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये बहुउद्देशिय कृषीसंकुलाची उभारणी करणेचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. मंत्री देसाई यांच्या या दूरदृष्टीकोनातून पाटण तालुक्यातील नाडे येथे बहुउद्देशिय कृषी संकुल आणि मरळी येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश केल्याबद्दल मंत्री देसाई यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा परिषद सदस्य विजय पवार यांनी मांडला.

     दरम्यान या सभेत विषय पत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यामध्ये, कारखाना क्षेत्रात पेट्रोल पंप लवकरच उभा राहणार,ऊस तोडेल त्याला ऊस तोड मजुरी दिली जाणार,ऊस बाहेर घालणाऱ्या सभासदांबाबत कठोर निर्णय आदींचा समावेश असून कारखान्याची ५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

Thursday 16 September 2021

पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथा रस्त्याचे काम तातडीने सुरु करा. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईं यांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सुचना.

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- गत तीन महिन्यामध्ये सातत्याने पडलेल्या पावसामुळे कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथ्यापर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची गैरसोय होत असल्याने कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील उर्वरीत राहिलेल्या पाटण मतदारसंघातील  संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या एकूण 13.100 किमी रस्त्याचे डांबरीकरणाचे  16.85 कोटी तसेच पाटण ते संगमनगर या 14 कि.मी.रस्त्याचे दुरुस्तीचे 02 कोटी रुपयांचा निधी मंजूर असलेली दोन्ही कामे तातडीने सुरु करण्याच्या सुचना गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महार्गाच्या अधिकाऱ्यांना बैठकीमध्ये केल्या.

         कराड ते चिपळूण राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व प्रलंबित कामाच्या संदर्भात आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीस राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता संतोष शेलार हे नांदेड येथून तर अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधिक्षक अभियंता आवटी, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे,पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व इतर संबंधित अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय,सातारा येथून तर एल.अँड टी. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी परेश हे मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठकीस उपस्थित होते.

                 प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे की, कराड चिपळूण रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून या रस्त्याच्या कामांस आवश्यक असणारा निधी मंजुर करावा अशी मागणी सर्वप्रथम केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे सातत्याने मागणी केल्यानंतर या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मागील पंचवार्षिकमध्ये मिळाला. यामध्ये कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करणेच्या कामांचा समावेश होता.कराड ते संगमनगर धक्का रस्त्याचे काँक्रीटीकरण कामांकरीता आवश्यक असणारा निधी उपलब्ध झाल्यानंतर कराड ते पाटणपर्यंत रस्त्याचे काम पुर्णत्वाकडे गेले असून काही ठिकाणी काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करणेच्या कामाकरीता आवश्यक असणारा निधी मंजुर होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री ना.नितीन गडकरी यांनी 13.100 किमी लांबीच्या पक्कया डांबरीकरणाच्या या रस्त्याकरीता 16.85 कोटी रुपयांचा निधी मंजूरही केला.पाटण तालुक्यातमध्ये गत तीन महिन्यापासून सुरु असलेल्या पाऊस विशेषत: माहे जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटण,संगमनगर धक्का ते घाटमाथा पर्यंतच्या रस्त्याची मोठया प्रमाणांत दुरावस्था होऊन रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले असल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारक तसेच प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय होत असल्याने लोकांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे मंजूर असलेली दोन्ही कामे लवकर सुरुवात करण्याकरीता मंत्रालयीन स्तरावर यासंदर्भात राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.त्यानंतर संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामाची निविदा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी प्रसिध्द करुन या कामासाठी ठेकेदार निश्चित करुन दि.19 जुलै 2021 रोजी कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. तसेच पाटण ते संगमनगर या 14 कि.मी. रस्त्याच्या 02 कोटी 02 लाख रुपयांच्या दुरुस्तीच्या कामाचाही कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. त्यामुळे पाटण ते संगमनगर रस्ता दुरुस्तीचे व संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे डांबरीकरणाचे कामांस दहा दिवसांत तातडीने सुरुवात करावी अशा सुचना मुख्य अभियंता यांना केल्यानंतर मुख्य अभियंता यांनीही दहा दिवसाचे आत संगमनगर धक्का ते घाटमाथा या रस्त्याचे काम सुरु करणार असल्याचे सांगीतले. तसेच पाटण ते संगमनगर या रस्त्याचे मजबुतीकरणाचे 13 किमीचे काम एल.एन्ङटी. कंपनी करणार नसेल तर तात्काळ नव्याने मंजूरी घेऊन दुसऱ्या कंपनीकडून हे काम लवकरात लवकर पुर्ण घेण्याच्याही सूचना यावेळी बैठकीत दिल्या असल्याने लवकरच या कामांस सुरवात होऊन या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची व प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल असे त्यांनी शेवटी म्हंटले आहे. 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व शिवदौलत बँकेची ऑनलाईन पध्दतीने शनिवार दि. 18 मार्च रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा.

 

दौलतनगर दि.16(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-:दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 51 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र दौलत लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर,ता.पाटण या ठिकाणी शनिवार दि18 सप्टेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वा. व शिवदौलत सहकारी बँकेची 20 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मल्हारपेठ, ता.पाटण या ठिकाणी दुपारी 01.00 वा.लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग समुहाचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे गृह(ग्रामीण)  राज्यमंत्री  ना. शंभूराज देसाई यांचे प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेकरीता मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई (दादा),युवा नेते मा. यशराज देसाई (दादा) व सर्व संचालक मंडळ हे उपस्थित राहणार आहेत.

             कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करुन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना व शिवदौलत सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा हया ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असून या दोन्ही वार्षिक सर्वसाधारण सभांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता शिवदौलत बँकेच्या तारळे,पाटण व ढेबेवाडी या शाखांमध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून संबंधित वार्षिक सभांचे वेळेमध्ये कारखान्याचे व बँकेच्या सभासदांना ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली असून या ठिकाणी कारखान्याचे व बँकेच्या सभासदांनी उपस्थित रहावे.तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे सर्वसाधारण सभेकरीता ज्या सभासदांना ऑनलाईन पध्दतीने सभेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी कारखान्याचे www.maralisugar.com या वेबसाईटवरती प्रसिध्द करण्यात आलेल्या लिंकव्दारे या सभेत ऑनलाईन उपस्थित राहता येणार आहेत. तर शिवदौलत सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेकरीता उपस्थित राहण्यासाठी सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज किंवा ईमेल आय.डी.व्दारे लॉगईन व पासवर्ड पाठविणत येणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास देसाई व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकांत दिली आहे.




Tuesday 14 September 2021

राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी साताऱ्यात नगरपालिकेने उभारलेल्या पर्यावरणपूरक कृत्रिम तळयात केले श्री गणेश विसर्जन.


दौलतनगर दि.13(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-आज गौरी विसर्जनादिवशी गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे सातारा नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करुन राज्यातील जनतेनेही यंदा व यापुढेही कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक श्री. गणेशमुर्तींचे विर्सजन करावे,असा संदेश दिला आहे.यावेळी युवा नेते यशराज देसाई(दादा) हे उपस्थित होते.

              सातारा येथे नगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तळयात पर्यावरणपुरक असे पारंपारिक श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करताना राज्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, आमचे घरातल्या गणरायाचं प्रथेप्रमाणे गौरी ज्या दिवशी जातात त्या दिवशी विसर्जन होत असते त्याप्रमाणे घरगुती पध्दतीने मी माझ्या घरातल्या गणरायाचे आज माझे परीवारासह उपस्थित राहून याठिकाणी सातारा नगरपालिकेने तयार केलेल्या गणेश विसर्जनाच्या कृत्रीम हौदामध्ये श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन केलेले आहे. गणेश चतुर्थी पासून घरातले सर्व धार्मिक सोपस्कार आम्ही सर्व परिवाराने मिळून एकत्र पार पाडले. गत वर्षापासून कोरेानाचा संसर्ग असल्यामुळे खुप मोठे कार्यक्रम कुणालाच करता आले नाहीत.परंतु तरी सुध्दा विधी मार्ग शास्त्रपरंपरेप्रमाणे आपण सगळयांनी आपआपल्या घरी हा गणेशोत्सव साजरा केला आहे. मी सातारा नगरपालिकेने श्री.गणेशमुर्ती विर्सजनाकरीता जे कृत्रिम तळयाच नियोजन केले आहे त्याठिकाणी माझे घरचे श्री.गणेशमुर्तीचे पर्यावरणपुरक असे विर्सजन केले आहे. सातारा नगरपालिकेने अतिशय चांगल नियोजन केलेले आहे. पर्यावरणाच रक्षण करण्यासाठी अशा पध्दतीने तयार केलेल्या कृत्रिम तळयामध्ये श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन करणं योग्य आहे. श्री.गणरायाला आज सातव्या दिवशी मानानं अनेकांनी निरोप दिलेला आहे.अकराव्या दिवशीही पर्यावरण पुरक असेच श्री.गणेशमुर्तीचे विसर्जन राज्यातील जनतेने करावे, असे आवाहन करुन गणपती बाप्पा राज्यावर आलेलं हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर करा आणि पुढच्या वर्षी लवकर या यावर्षी कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे श्री.गणेशोत्सवानिमित्त जे उत्सव करणे बाकी राहीले आहेत तो उत्सव याच्यापेक्षा दुप्पट आनंदात पुढच्या वर्षी साजरा करण्याची संधी श्री.गणरायाने आम्हा सर्वांना दयावी,अशी मी गणराया चरणी प्रार्थना केली असल्याचे गृह व वित्तराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना सांगितले.