Friday 24 September 2021

गावच्या सर्वांगिन विकासासाठी एकजूट कायम ठेवावी-मा.यशराज देसाई. मा.यशराज देसाई यांचे हस्ते कवरवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व अंगणवाडी इमारत उद्घाटन कार्यक्रम संपन्न.

दौलतनगर दि.24 (जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- कवरवाडी गाव हे नेहमीच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठीशी  ठामपणे उभे राहिले असल्याने आज आपण त्यांचे प्रयत्नातून मंजूर झालेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन करत विकासाची कामे मार्गी लावून गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हातभार लागला आहे.प्रत्येक निवडणुकीमध्ये ना.देसाई यांचे नेतृत्व मानत मताधिक्य देऊन विकासात्मक विचारधारा जोपासण्याचे काम आपण सर्वजण करत असून यापुढेही कवरवाडी गावाचा सर्वांगिन विकास होण्यासाठी आपली अशीच एकजूट कायम ठेवावी,असे आवाहन मा.यशराज देसाई यांनी केले.

             पिंपळगाव(कवरवाडी),ता.पाटण येथील जनसुविधा योजनेअंतर्गत मंजूर ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन व डोंगरी विकास निधीमधून पूर्ण झालेल्या अंगणवाडी इमारत उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पांडूरंग शिरवाडकर,सरपंच अधिकराव कवर,उपसरपंच उत्तम कवर,किसनराव कवर,उत्तम मोळावडे,किसन कवर,रमेश गुदळे,कुंडलिक कवर,जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता जाधव यांच्यासह कवरवाडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

            यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ना.शंभूराज देसाई यांना मंत्रीमंडळामध्ये स्थान देऊन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली.काही कालावधी झाल्यानंतर कोविड 19 चा संसर्ग वाढल्याने लॉकडाऊन सारख्या परिस्थितीला आपणां सर्वांना सामोरे जावे लागले. कोविड 19 या संकटाला सामोरे जात असताना ना.शंभूराज देसाई यांनी समाजातील प्रत्येक घटकाला काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न करुन वेळ प्रसंगी कोविड बाधित गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील नागरीकांना आधार देण्याचे काम केले.तसेच वेळो वेळी शासकीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन कोविड चा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी  प्रयत्नशील राहिले.त्यातच जुलै महिन्यामध्ये मोठया प्रमाणांत अतिवृष्टी होऊन जिवीत हानीसह रस्ते,साकव पूल,नळ योजना,सार्वजनिक इमारती यांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले.नुकसान झालेल्या सार्वजनिक मालमत्ते झालेल्या नुकसानीची तातडीने पुनर्बांधणीचे काम हाती घेऊन प्राधान्याने दळण-वळण सुरळीत करत बाधित गावांचे पुनर्वसन करण्यासाठी ना.शंभूराज देसाई प्रयत्नशील असून सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,कवरवाडी गावाच्या एकजूटीची पहिल्यापासून या विभागामध्ये वेगळी ओळख असून अडचणीच्या काळात या गावाने नेहमीच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे काम  केले आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये या गावाने नाडे पंचायत समिती गणामध्ये प्रथम क्रमांकाचे मताधिक्य दिले असल्याने ना.देसाई यांनीही विकास कामांमध्ये झुकते माप दिले आहे. आज भूमिपूजन झालेल्या ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे काम दर्जेदार करावे.कारण गावाची सर्व विकास कामे जेथून केली जातात तो महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेली ग्रामपंचायत इमारतही चांगली होणे गरजेचे असून गावामध्ये विकासाची कामे राबविताना ग्रामपंचयतीचे पदाधिकारी यांनी भविष्यातील गावाचा विस्तार लक्षात घेऊन योग्य नियोजन करुन राबवावित.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मोठ मोठी विकासाची कामे मार्गी लावताना आता निधीची मर्यादा आहेत. ना. देसाई यांचा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास कामांची भूमिपूजन किंवा उद्घाटनासाठी उपस्थित राहून गावा-गावात जनसंपर्क आहे.परंतु राज्याच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी तसेच वाशिम जिल्हयाचे पालकमंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असल्याने आज आपण हे कार्यक्रम करत असलो तरी उर्वरित विकास कामे मार्गी लावण्याकरीता गावाची एकजूट कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारीही वाढली असल्याचे मा. यशराज देसाई यांनी शेवटी सांगीतले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,किसनराव कवर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार प्रकाश कवर यांनी मानले.


No comments:

Post a Comment