Tuesday 28 September 2021

अधिकाऱ्यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे.ना.शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते मल्हारपेठ,ता.पाटण येथील नवीन तलाठी कार्यालय इमारतीचे उद्घाटन.



दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-पाटण विधानसभा मतदारसंघ हा डोंगरी व दुर्गम अशा भागामध्ये वेग-वेगळया खोऱ्यांमध्ये वसलेला मतदारसंघ आहे.शासकीय अधिकाऱ्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी स्वतंत्र अशा इमारतीची सोय नसल्याने अधिकाऱ्यांसह येथील सामान्य जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. शासकीय काम चांगल्या पध्दतीने होण्यासाठी अधिकाऱ्यांना स्वतंत्र अशी इमारतीची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाकडून आपण नवीन तलाठी कार्यालय इमारतींकरीता निधी मंजूर करत या इमारतींचे कामांना सुरुवात करुन आज प्रत्यक्षात त्या तलाठी इमारतींमध्ये कार्यालयीन कामकाज सुरु होत असून शासकीय अधिकाऱ्यांनी आता सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे,असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी  केले.

               मल्हारपेठ,ता.पाटण येथे शासकीय कार्यालयीन इमारती बांधणे या योजनेतंर्गत मल्हारपेठ येथील तलाठी कार्यालय इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,प्रदिप पाटील,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,संचालक अशोकराव डिगे,आनंदराव चव्हाण,शशिकांत निकम,विजय जंबुरे,पांडूरंग नलवडे, बबनराव भिसे,सुनिल पवार,प्रा.विश्वनाथ पानस्कर,अध्यक्ष विजय शिंदे,राजकुमार कदम,जयवंत पानस्कर,जगन्नाथ पवार,पांडूरंग शिरवाडकर,रेखा भिसे, तेजश्री शेटे,तहसलिदार योगेश टोमपे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

               यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कराड-चिपळूण या राष्ट्रीय महामार्गावरील मल्हारपेठ या तालुक्याच्या मध्यवर्ती अशा बाजारपेठेच्या ठिकाणी मंडल अधिकारी व तलाठी  यांचे कार्यालयीन कामकाजासाठी महसूल विभागाचे तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकामासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करत या तलाठी कार्यालय इमारतीचे काम पुर्ण होऊन प्रत्यक्षात आज त्याचे उद्घाटन करत सर्व सोयीं-सुविधासह असलेल्या या  इमारतीमध्ये कार्यालयीन कामकाजास सुरुवात होईल.त्याचप्रमाणे नुकतेच मल्हारपेठ येथे नव्याने मंजूर झालेल्या पोलीस स्टेशन इमारतीचे व पोलीस कर्मचारी वसाहतीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम करुन या इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. मल्हारपेठ विभागामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सर्व वाडया व मल्हारपेठ बाजारपेठेचे गाव जोडण्याचे काम आपण केले. विकासाची प्रक्रिया हि सतत चालू राहणारी प्रक्रिया असते. कार्यकर्त्यांना एक विकासाच काम झाले की दुसरं काम हवं असतं आणि सातत्याने विकास कामांकडे लक्ष देणाऱ्या प्रतिनिधींकडून सातत्याने विकास कामे होण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा नेहमीच प्रयत्न सुरु असतो आणि या सर्वांच्या सांधिक प्रयत्नातूनच गावांमध्ये विविध विकास कामे मार्गी लागतात असे सांगत ते पुढे म्हणाले की,राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी सहा खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार देत वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी दिली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समतोल राखण्यासाठी विशेषतः राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते,पूल,पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी निधीची तरतूद करत सर्वांगणी विकास करण्याचा महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे. मात्र कोविड काळात राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाला.सध्या कोविड परिस्थितीत सुधारणा होत असल्याने नजीकच्या काळात राज्यातील विकासाच्या कामांची मोठ्या प्रमाणात घोडदौड सुरू राहील असे सांगत ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये तलाठी सजा असलेल्या ठिकाणी दोन ते चार गावांचा समावेश असल्याने या ठिकाणी  गावातील नागरिक हे त्यांचे वैयक्तिक कामांकरीता मंडलाधिकारी,तलाठी यांचेकडे येतात.तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र इमारती  नसल्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करत मल्हारपेठ, ऊरुल, नाडे,आडूळ,बहुले व तारळे या ठिकाणी नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींना निधी मंजूर करुन आणत सध्या या इमारतींची कामे सध्या पुर्णत्वाकडे गेली असल्याने या तलाठी कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याने यापुढे शासकीय अधिकाऱ्यांनी आता सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे असे शेवटी त्यांनी  प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.


No comments:

Post a Comment