Sunday 26 September 2021

ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध. ना.शंभूराज देसाई ना.शंभूराज देसाई यांचे उपस्थित नाडोली येथे विविध विकास कामांची भूमिपूजन कार्यक्रम संपन्न.

                               

 दौलतनगर दि.26(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सध्या विकास कामे करताना जरी काही निर्बंध येत असले तरी राज्याची आर्थिक स्थित पुर्वपदावर येत असून राज्यातील ग्रामीण भागातील विकास कामे मार्गी लावण्याची राज्य शासनाची प्राथमिकता असून ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असल्याने ग्रामीण भागातील जनतेने आपापसातील मतभेद विसरून त्याचा लाभ घ्यावा,असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी केले.

               मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत नाडोली,ता.पाटण पोहोच रस्ता सुधारणा करणे या 02 कोटी 16 लक्ष रुपये निधी मंजूर असलेल्या रस्त्याच्या व नाडोली,ता.पाटण येथे दत्त मंदिरासमोर सभामंडप बांधणे असा संयुक्त विकास कामांचा भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांचेसमवे मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,प्रदिप पाटील,संचालक बबनराव भिसे,संपतराव सत्रे,पांडूरंग शिरवाडकर,सरपंच सौ.सिमा लोहार, शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,विष्णू पवार,प्रकाश पवार,दादासो पवार,शंकर डिगे,दिपक कदम,संतोष भिसे,अरविंद पवार,मच्छिंद्र लोहार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अजित पाटील,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे पानस्कर, नाडोली ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, उपसरपंच पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

               ना.शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी राज्याच्या गृह (ग्रामीण),वित्त,नियोजन,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,पणन या सहा खात्यांचा राज्यमंत्री म्हणून कार्यभार दिला.त्यातच वाशिम जिल्हयाचा पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी दिली आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विकासाचे धोरण पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे.राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील समतोल राखण्यासाठी राज्याच्या अर्थ खात्याने अर्थसंकल्पात तरतूद केली असून विशेषतः राज्यातील ग्रामीण भागातील रस्ते,पूल,पिण्याच्या पाण्याच्या योजना यांचा समावेश आहे. मात्र कोविड काळात राज्यातील विकासकामांवर त्याचा परिणाम झाला. मात्र सध्या कोविड परिस्थितीत सुधारणा होत असल्याने नजीकच्या काळात राज्यातील विकासाच्या कामांची मोठ्या प्रमाणात घोडदौड सुरू राहील,असा विश्वास व्यक्त करून आज माझेवर राज्याच्या सहा खात्यांची तसेच वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असली तरी माझे लक्ष आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघावरच राहणार आहे. मी संपुर्ण महाराष्ट्रभर राज्याचा राज्यमंत्री म्हणून जरी मला फिरावे लागले तरी माझे सगळे लक्ष हे आपल्या पाटण मतदारसंघातील जनतेपाशीच राहणार आहे. ज्या मतदारांच्या आशिर्वादाने आपण राज्यमंत्री झालो त्या जनतेच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य देणेकरीता माझे प्रयत्न राहणार आहेत. मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणेकरीता मी कटीबध्द आहे अशी ग्वाही देत राज्यातील आघाडी सरकार  ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध असल्याने ग्रामीण जनतेने आपापल्या मधील मतभेद विसरून याचा लाभ घेतला पाहिजे.नाडोली गावच्या विकासासाठी सध्या सव्वादोन कोटी रुपयांची कामे सुरू केली आहेत.अजून ही निधी देण्यासाठी मी कटिबद्ध आहे.मात्र गावांतील आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी एकजुटीने एकसंघ  राहणे, हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सर्व ग्रामस्थांचे कर्तव्य आहे. तरच खऱ्या अर्थाने आपल्या गावात विकासाचा मोठा डोंगर उभा राहील,अशी अपेक्षा ही मंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विजय पवार यांनी केले तर आभार अरविंद पवार यांनी मानले.

चौकट: रस्ता टिकण्यासाठी अवजड वाहनांना मर्यादा घालणे गरजेचे..!

             नाडे ते नाडोली या दोन ते सव्वादोन किलोमीटर च्या रस्त्यासाठी शासनाने तब्बल दोन कोटी रुपये मंजूर केले आहेत.या रस्त्यावरील अवजड वाहतुकीसाठीही काही मर्यादा आहेत. मात्र असे असताना खडी क्रॅशर मालक आणि ग्रामस्थ यांच्या संगनमताने या रस्त्यावरून अवजड वाहने ने आण करण्यासाठी ही काही मर्यादा तसेच निर्बंध घालणे गरजेचे असल्याचे सांगत रस्त्याचे काम दर्जेदार करुन तो रस्ता टिकण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment