Tuesday 28 September 2021

मंद्रुळहवेली विकास सेवा सोयायटीचे काम आदर्शवत.ना.शंभूराज देसाई. ना.शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोयाटी असा नामकरण सोहळा संपन्न.


 दौलतनगर दि.28(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- ग्रामीण भागातील विकास सेवा सोसायट्या हया शेतकऱ्यांसाठी आर्थिक पुरवठा करणारऱ्या संस्था असून या संस्थामध्ये चेअरमन,व्हा.चेअरमन व संचालक मंडळ यांचेकडून शेतकरी हिताचे निर्णय झाल्यानंतर या संस्था नावारुपास येत असतात.मंद्रुळहवेली विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासत चांगले काम केले असून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. या  विकास सोसायटीने सभासदांचे विश्वासास पात्र राहून सभासद हिताचे निर्णय घेतले असून मंद्रुळ हवेली विकास सेवा सोयायटीचे काम आदर्शवत असल्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी  म्हंटले आहे.

                  मंद्रुळहवेली,ता.पाटण विकास सेवा सोसायटीचे लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी असा नामकरण सोहळा कार्यक्रम ना. शंभूराज देसाई शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, संचालक अशोकराव डिगे,आनंदराव चव्हाण,सुनिल पवार,विश्वनाथ पानस्कर,विजय शिंदे,जयवंत पानस्कर,जगन्नाथ पवार, पांडूरंग शिरवाडकर, मंद्रुळ हवेली विकास सेवा सोसायटी चेअरमन अविनाश चव्हाण, व्हा.चेअरमन अलका दिनकर चव्हाण व संचालक मंडळ,सभासद आदी मान्यवर उपस्थित होते.

                  ना. देसाई पुढे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी  गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विविध कार्यकारी सेवा सोसायटया स्थापन केल्या आहेत.शेतकऱ्यांना शेतीपुरक अशा गोष्टी करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार या सोसायटया शेतकरी सभादांना माफक व्याजदारामध्ये कर्ज पुरवठा आर्थिक सहाय्य करत असतात. तसेच कमी व्याजदराने विकास सेवा सोसायटीने दिलेल्या कर्जाची परत फेड ही वार्षिक असल्याने शेतकऱ्यांसाठी याचा फायदाही होतो.परंतु सभासदांना दिलेल्या कर्जा नियममित परतफेड झाल्यास संस्थेचा फायदा होऊन संस्थेची प्रगती होण्यास याचा मोठा हातभार लागतो.त्याचपध्दतीने मंद्रुळहवेली विकास सेवा सोसायटीनेही सभासदांच्या हितासाठी चांगले निर्णय घेऊन सभासदांचे हित जोपासण्यास प्राथमिकता दिली आहे, हि बाब निश्चितच कौतुकास्पद असून इतर सहकारी संस्थांना आदर्शवत अशी आहे.चांगल्या चाललेल्या या सहकारी संस्थेने लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी असे नामकरण सोहळा आज संपन्न होत असताना निश्चितच आनंद होत होत असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा नातू म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे. भविष्यामध्ये या संस्थेस काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मदत लागल्यास आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देत मंद्रुळहवेली विकास सेवा सोसायटीने नेहमीच सभासदांचे हित जोपासत चांगले काम केले असून सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. या  विकास सोसायटीने सभासदांचे विश्वासास पात्र राहून सभासद हिताचे निर्णय घेतले असून मंद्रुळ हवेली विकास सेवा सोयायटीचे काम आदर्शवत असल्याचे सांगत लोकनेते बाळासाहेब देसाई विकास सेवा सोसायटी असे नामकरण केल्याबद्दल सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार भरत देसाई यांनी मानले.

No comments:

Post a Comment