Friday 24 September 2021

सातारा येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड इमारतीचे बांधकामाकरीता 2 कोटी 59 लक्ष निधी मंजूर. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई.

 

 

 दौलतनगर दि.24(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):- सातारा येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकामाचे प्रस्तावाला गृह विभागाने होमगार्ड आधुनिकीकरण या योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये 02 कोटी 59 लक्ष रुपयांचे खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली आहे.

              प्रसिध्दी पत्रकांत त्यांनी पुढे म्हंटले आहे की, जिल्हा समादेशक होमगार्ड,सातारा या कार्यालयाचे अधिनसस्त असलेल्या जिल्हा प्रशिक्षण केंद्र,होमगार्ड सातारा या प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम होण्याकरीता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या नंतर जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकामाचा प्रस्ताव शासनाचे गृह विभागाकडे तातडीने सादर करण्यात आला होता.त्यानुसार जिल्हा प्रशिक्षण केंद्र,होमगार्ड सातारा या इमारतीचे बांधकामाकरीता होमगार्ड आधुनिकीकरण योजनेअंतर्गत सन 2021-22 या वित्तीय वर्षामध्ये 02 कोटी 59 लक्ष रुपयांचे खर्चास प्रशासकीय मान्यता दिली असून या इमारतीकरीता आवश्यक असलेले अनुदान होमगार्ड आधुनिकीकरण योजनेअंतर्गत पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच सदर इमारतीचे बांधकामासाठी आवश्यक असणारा बांधकाम परवाना व इमारत नकाशाही होमगार्ड कार्यालयास प्राप्त झाले असल्याने त्यामुळे सातारा येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्डच्या इमारतीचे बांधकामास तातडीने सुरुवात करावी अशा सूचना पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिल्या असल्याने लवकरच सातारा या ठिकाणी जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड या इमारतीचे बांधकाम करण्यास सुरुवात होणार असून सातारा या जिल्हयाचे मध्यतवर्ती असलेल्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड इमारतीमुळे सातारा जिल्हयाच्या वैभवामध्ये भर पडणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी पत्रकांत दिली आहे.

2 comments:

  1. Home guard ko permanent karo kya unka prashikshan Kendra banaa rahe

    ReplyDelete
  2. Bechare 365 din Puri apni mehnat Apne hak ke liye apna Kam mang rahe hain aap unhen nahin de rahe

    ReplyDelete