दौलतनगर
दि.25(जनसंपर्क कक्ष,राज्यमंत्री कार्यालय):-राज्यमार्ग 148 नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे
शेणोली स्टेशन रोड या राज्य मार्गावरील पाटण विधानसभा मतदारसंघातील खराब झालेल्या हेळवाक
ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्रीय मार्ग निधी (सी.आर.एफ.)
योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात यावा.तसेच गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय
महामार्गावरील भाग पाटण ते संगमनगर (धक्का) या 13 कि.मी.अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या
कामाची फेर निविदा कार्यवाही करण्यात येऊन या रस्त्याचे काम तातडीने सुरु करुन कराड
ते पाटण या मार्गावरील अपूर्ण असलेली कामे तात्काळ पूर्ण करावित,अशी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे मागणी केली असल्याची माहिती गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत दिली
आहे.
पत्रकात ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले
की, पाटण विधानसभा मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाला
पर्यायी रस्ता म्हणून नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग वाठार रेठरे
शेणोली स्टेशन रस्ता या रस्त्याला राज्य मार्गाचा दर्जा मिळणेसाठी मी सातत्याने राज्य
शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर नवजा हेळवाक मोरगिरी गारवडे साजूर तांबवे काले विंग
वाठार रेठरे शेणोली स्टेशन रस्ता 148 क्रमांकाचा राज्य मार्गाचा दर्जा देण्यात आला.
सध्या हेळवाक मोरगिरी ते गारवडे या रस्त्यावर मोठया प्रमाणांत वाहनांची ये-जा सुरु
असते.माहे जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या राज्य मार्गाची प्रचंड दुरावस्था
झाली असून या मार्गावरुन प्रवास करताना वाहनधारकांसह प्रवाशांची दळण-वळणाची मोठी गैरसोय
होत असल्याने या राज्य मार्गावरील
हेळवाक ते मोरगिरी ते गारवडे या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय
मार्ग निधी (सी.आर.एफ.) योजनेतून भरीव निधी मंजूर करावा,अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग
मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे केली असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,पाटण विधानसभा
मतदारसंघातील गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर
आहे. परंतु याच राष्ट्रीय महामार्गावरील पाटण ते संगमनगर धक्का या भागातील रस्त्याचे
कामांस संबंधित कंपनीकडून अद्यापही सुरुवात केली नाही. या कामासाठी निविदा निश्चित
झालेल्या एल.एण्ड टी. कंपनीने पुर्णपणे काम बंद करत कंपनीची यंत्रसामुग्री अन्य ठिकाणी
स्थलांतरीत केली असल्याने अद्यापही पाटण ते संगमनगर धक्का या भागातील काम प्रलंबित
असल्याने या रस्त्याची मोठया प्रमाणांत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन
प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून प्रवाशांमध्ये
रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे गुहाघर चिपळूण कराड जत विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील
पाटण ते संगमनगर धक्का या भागातील 13 कि.मी. अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या कामाकरीता
निविदा निश्चित झालेली कंपनी जर हे काम करत नसले तर कामाची फेर निविदा करण्याची कार्यवाही
तातडीने करण्यात येऊन पाटण ते संगमनगर धक्का या 13 कि.मी. अपूर्ण राहिलेल्या रस्त्याच्या
कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी. तसेच या राष्ट्रीय महामार्गावरील कराड ते
पाटण रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामेही अपूर्ण
असल्याने या गावातील नागरीकांची दळणवळणाची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या राष्ट्रीय
महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गावांना पोहोच रस्त्यांचीही कामे पुर्ण करण्यात येऊन
या मार्गावरील मुख्य बाजारपेठांची तसेच वर्दळीची ठिकाणं असलेल्या मल्हारपेठ,नाडे व
पाटण या ठिकाणी तसेच राष्ट्रीय महामार्गावर ठिक-ठिकाणी मुख्य रस्त्याचे काम अद्यापही
प्रलंबित असून कराड चिपळूण जत विजापूर या राष्ट्रीय महार्गावरील कराड ते पाटणच्या दरम्यान
अपूर्ण असलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी,अशीही मागणी केली असल्याचे शेवटी
प्रसिध्दीपत्रकांत म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment