राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक
योजनेतंर्गत सन २०१७-१८ करीता सुचविण्यात आलेल्या आठ रस्त्यांच्या
कामापैकी पहिल्या टप्प्यात चार रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने
मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या
ग्रामविकास विभागाने दि.२४ जानेवारी,२०१८
रोजी पारित केला असून चार रस्त्यांच्या कामांकरीता ७ कोटी ३३ लाख ५५ हजार रुपयांचा
निधी मंजुर केला असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली
आहे.
पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी
म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील
मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१७-१८ मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी आठ कामांचे प्रस्ताव शासनाच्या
ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात
आले होते. यातील पहिल्या टप्प्यात चार कामांना राज्य शासनाच्या
ग्राम विकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या चार रस्त्यांच्या कामांकरीता ७ कोटी
३३ लाख ५५ हजार रुपयांचा निधी मंजुर दिला आहे.यामध्ये वजरोशी
ते चिंचेवाडी रस्ता करणे १.६० किमी १ कोटी ०६ लाख ४९ हजार,
कंकवाडी बनपुरी ते कडववाडी बनपुरी रस्ता करणे ३.०० किमी २ कोटी ०४ लाख ४२ हजार, उरुल ते बोडकेवाडी रस्ता
करणे २.६० किमी १ कोटी ४७ लाख ८२ हजार व मारुल तर्फ पाटण ते वाजेगांव
रस्ता करणेकरीता ३.५० किमी २ कोटी ४० लाख ३० हजार रुपयांचा निधी
मंजुर करण्यात आला आहे तर या चारही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती
करणेकरीता अनुक्रमे ५ लाख ४९ हजार, १० लाख ९७ हजार, ७ लाख ८३ हजार व १० लाख २३ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून या कामांना
प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२४ जानेवारी,२०१८ रोजी पारित केला आहे या कामांच्या निविदा
लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल तर उर्वरीत चार रस्त्यांच्या कामांनाही
प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सुरु असून या
कामांनाही लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजुर होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी
पत्रकात म्हंटले आहे.
चौकट:- कोटींच्या आकडयाकरीता विरोधकांनी शासन निर्णय काढून पहावा.
मी जाहीर करीत असलेले कोटींचे आकडे खरे का खोटे आहेत हे तालुक्यातील
जनतेला चांगलेच माहिती आहेत. विरोधकांना
मात्र ते दिसत नाहीत चारच रस्त्यांच्या कामांकरीता ७ कोटी ३३ लाखांचा निधी मंजुर करुन
आणला आहे. विरोधकांना याची खात्री करावयाची असेल तर विरोधकांनी
दि.२४ जानेवारी,२०१८ रोजीचा ग्रामविकास
विभागाचा शासन निर्णय काढून पहावा. मी मंजुर करुन आणलेल्या कोटींच्या
निधीचे असे अनेक शासन निर्णय विरोधकांना शासन दफतरी पहावयास मिळतील असेही आमदार शंभूराज
देसाईंनी म्हंटले आहे.
No comments:
Post a Comment