शासनाकडे सातत्याने
केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गंत पाटण
तालुक्यातील वांग मराठवाडी,तारळी,मोरणा गुरेघर या तीन धरणप्रकल्पांचा पंतप्रधान कृषी सिचंन योजनेत समावेश
झाला आहे ही बाब पाटण तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.तर तालुक्यातील
उत्तरमांड धरणप्रकल्पाचे काम पुर्णत्वाकडे गेले आहे.पंतप्रधान कृषी सिचंन योजनेत
वांग मराठवाडी,तारळी,मोरणा गुरेघर या
धरण प्रकल्पातील कामांना सन २०१९ पर्यंत पुर्णत: दयावयाची आहे त्यामुळे कृष्णा
खोरे विकास महामंडळातंर्गत धरणप्रकल्पातील शासनाकडे आपण मागणी केलेल्या कामांना
संबधित यंत्रणांनी गती दयावी व प्रकल्पग्रस्तांचे तसेच येथील शेतक-यांच्या शेतीला
पाणी देणेसंदर्भातील प्रश्न अधिका-यांनी प्राधान्याने लक्ष घालून सोडवावेत अशा
सुचना आमदार शंभूराज देसाई यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या वरीष्ट अधिका-यांना
दिल्या.
आमदार शंभूराज
देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण शासकीय विश्रामगृह याठिकाणी कृष्णा खोरे विकास
महामंडळाच्या सातारा पाटबंधारे प्रकल्पांच्या वरीष्ठ अधिका-यांची बैठक आयोजीत
करण्यात आली होती याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.याप्रसंगी
सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता विजयराव घोगरे,तारळी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नाडे,वांग मराठवाडी व मोरणा गुरेघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता घोडके,
उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी
भोसले, उपअभियंता दाभाडे, गरुड
यांच्यासह सातारा पाटबंधारे व लघू पाटबंधारे सातारातंर्गत सर्व अधिकारी यांची
प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आमदार
शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गंत वांग मराठवाडी,तारळी, मोरणा गुरेघर,उत्तरमांड व महिंद धरणप्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे असणारे प्रश्न व
त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात अधिका-यांना सुचना देत एकएका विषयावर सविस्तर
आढावा घेत या प्रश्नाविषयी तसेच मागण्यासंदर्भात करुन घ्यावयाचे निर्णय यावर
अधिका-यांना सुचना केल्या. यामध्ये मौजे शितपवाडी,जानुगडेवाडी,मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द या चार गावे ही महिंद धरणाच्या
कार्यक्षेत्रात येत आहेत मात्र या चार गांवाचा चुकीचा समावेश वांग मराठवाडी धरण
प्रकल्पात केला असल्याने येथील शेतक-यांवर अन्याय होत आहे. हा समावेश चुकीचा झाला
असून येथील शेतक-यांच्या जमिनींचे भूसंपादन करु नये असे लेखी पत्र अधिक्षक अभियंता
यांनी महसूल विभागाला तातडीने देण्यात यावे असे सांगत वांग मराठवाडी प्रकल्पातील
६१ प्रकल्पग्रस्तांना तडसर ता.कडेगांव जि.सांगली याठिकाणी पुनर्वसनाकरीता जमिनी
देण्याचे शासनाने मान्य केले आहे मात्र येथील शेतकरी न्यायालयात गेल्याने ही बाब
न्यायप्रविष्ट झाली आहे.या ६१ प्रकल्पग्रस्तांना तडसर येथील जमिन पुनर्वसनाकरीता
मिळत नसेल तर वरसरकून एकूण २७९ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता शासनाने मंजुरी
दिली आहे त्यामध्ये या ६१ प्रकल्पग्रस्तांचे येथील गावठाणाची संमती घेवून पुनर्वसन
करावे. तारळी धरण प्रकल्पातील ५० मीटर वरील जमिन क्षेत्राला पाणी देणेसंदर्भात
शासनाने दि.०८.१२.२०१६ रोजी तत्वत: मान्यता दिली आहे या कामांस प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भातील
प्रस्ताव शासनाकडे अंतिम टप्प्यात आहे दोनच दिवसापुर्वी मुख्यमंत्री यांची मी
प्रत्यक्ष भेट घेवून या कामांस तात्काळ प्रशासकीय मान्यता देणेसंदर्भात शासनाचे
जलंसपदा,वित्त व नियोजन विभागास सुचना कराव्यात अशी मागणी केली
आहे.अधिक्षक अभियंता यांनी याचा पाठपुरावा जलसंपदा विभागाकडे करावा असे सुचित करुन
त्यांनी मोरणा गुरेघर धरण प्रकल्पातील डाव्या बाजुच्या शेतक-यांना पाणी देणेसंदर्भात
तसेच येथील शेतक-यांच्या घेण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्यासंदर्भात विचारणा
केली असता भूसंपदानाचे काम युध्दपातळीवर सुरु असून महसूल विभागाच्या सहकार्याने
येथील शेतक-यांना त्यांच्या जमिनींचा मोबदला देण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे
अधिका-यांनी यावेळी सांगितले तर उजव्या बाजूस कॅनॉलएैवजी येथील शेतक-यांना उपसा जलसिचंन
योजनांच्या माध्यमातून पाणी देणेसंदर्भात ड्रोनसर्व्हे करण्याचे काम पुर्ण झाले
आहे.तांत्रिक बाबी तपासून उपसा जलसिचंन योजनांच्या माध्यमातून पाणी देणेसंदर्भातील
प्रस्तावही आपले सुचनेनुसार जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. असेही
अधिका-यांनी आमदार देसाईंना या बैठकीत सांगितले.आमदार शंभूराज देसाईंनी बैठकीत
उत्तरमांड धरण प्रकल्पातील माथणेवाडी येथील ४३ व कडववाडी येथील ६
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित केला असता प्रातांधिकारी यांनी
प्रत्यक्ष स्थळपहाणी केली असून विशेष बाब म्हणून या खातेदारांचे पुनर्वसन करण्यास
शासनाने मान्यता देणे आवश्यक आहे तशाप्रकारचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे असे
सांगितले तर महिंद धरण प्रकल्पातील मौजे चौगुलेवाडी येथील पुर्नवसित गावठाणातील
नागरी सुविधांची कामे अपुरी आहेत सदरची कामे करण्याची निविदाही प्रसिध्द झाली आहे
तात्काळ या कामांस सुरुवात करुन या गावठाणांस आवश्यक असणा-या नागरी सुविधा पुर्ण
करुन दयाव्यात अशाही सुचना आमदार शंभूराज देसाईंनी यावेळी संबधित अधिका-यांना देत
पाटण तालुक्यातील धरणप्रकल्पातील शासनाकडे आपण मागणी केलेल्या कामांना शासनाने
आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिला आहे आवश्यकता आहे ती संबधित यंत्रणांनी या
कामांना गती देण्याची ती गती सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळातंर्गत सर्व
यंत्रणांनी दयावी असे आमदार शंभूराज देसाई शेवठी म्हणाले.
No comments:
Post a Comment