तालुक्यातील
प्रत्येक विभागात गत पाच वर्षात न होवू शकलेल्या विकासकामांचा धडाका गत तीन वर्षात
तालुक्यात सुरु असल्याने आपल्या विरोधांतील सर्वांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. हातात देण्यासारखे काही नसल्याने जनतेपुढे कोणत्या
तोंडाने जायचे हा प्रश्न पडलेल्यांकडून आता जनतेची दिशाभूल कशी करता येईल याकडे त्यांचा
मोठा कल असल्याचे दिसून येत आहे.गावांचा विकास साधायचा असेल तर
दिशाभूलीचे राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील तसेच प्रामुख्याने या विभागातील जनतेने
विकास करणा-यांच्या पाठीशी ठाम उभे रहावे असे आवाहन आमदार शंभूराज
देसाई यांनी केले आहे.
उधवणे ता.पाटण येथे शासनाच्या रस्ते व पुल दुरुस्ती गट
ब अंतर्गत निधीतून मंजुर झालेल्या उधवणे गाव पोहोच रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रमप्रसंगी
ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
रविराज देसाई,शिवदौलत बँकेचे चेअरमन ॲड मिलींद पाटील,पंचायत समितीचे माजी उपसभापती डी.आर.पाटील,पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई,सदस्या सौ.सिमा मोरे,कारखान्याचे
माजी कामगार संचालक टी.डी.जाधव,
कामगार सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव शेवाळे,एकनाथ जाधव,सचिन जाधव, आप्पासाहेब
मगरे, बबनराव भिसे, डी.के. साळुंखे, रामभाऊ साळुंखे,
विलास साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, बाळासाहेब शिर्के,बाबूराव शिर्के,युवराज कांबळे,दिलीप साळुंखे, प्रकाश
साळुंखे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी.टी.ढेरे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना
आमदार शंभूराज देसाई म्हणाले,उधवणे गावात
निवडणूकीपुर्वी आल्यानंतर या गावाला जोडणा-या रस्त्याची काय अवस्था
होती.यापुर्वी पहिल्या टप्प्यात आपण येथील रस्त्याचे काम मार्गी
लावले आणि आज गावात जाणा-या रस्त्याचे भूमिपुजन होत आहे.अशाप्रकारची कामे तालुक्यात प्रत्येक ठिकाणी सुरु आहेत.शेजारच्या गावात डोकावून पाहिले तरी आपल्याला अशी अनेक कामे मार्गी लागत असल्याचे
दिसून येईल.जनतेचा प्रलंबीत राहिलेला विकास मार्गी लावणेकरीता
शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करुन शासनाच्या विविध योजनांमधून आपण या विकासकामांना
आवश्यक असणारा निधी मंजुर करुन आणत आहे. आपल्या विरोधकांना सुरु
असलेला हा विकास दिसत नाही. जुनी कामे कोणती आणि नवीन सुरु असलेली
कामे कोणती यातील फरक त्यांच्या लक्षात येत नाही. जुन्या कामांना
दुरुस्ती करायला लाखो रुपयांचा निधी शासन देत नाही एवढेही त्यांच्या ध्यानात येत नाही
हे तालुक्याचे दुर्दैव असून हातात असताना देण्यासारखे भरपुर काही होते परंतू या विभागातील
अनेक गांवे विरोधकांनी केवळ राजकीय व्देषापोटी विकासापासून वंचीत ठेवली आहेत याची अनेक
उदाहरणे याठिकाणी देता येतील. असे सांगून ते म्हणाले,गत पाच वर्षात न होवू शकलेल्या विकासकामांचा धडाका गत तीन वर्षात तालुक्यात
सुरु असल्याने आपल्या विरोधकांकडून निवडणूक दोन वर्षावर राहिली असल्यामुळे दिशाभूलीच्या
राजकारणाला सुरुवात केली आहे.विरोधकांचे हे दिशाभूलीचे राजकारण
जनतेच्या चांगले लक्षात आले आहे. ही निवडणूक ते ती निवडणूक जनतेच्या
दारात येणा-यांना जनतेला विकासाचे देण्यासारखे काही नसल्याने
आता त्यांच्याकडून हा उद्योग सुरु असून निवडणूक काळातही अशाप्रकारे जनतेमध्ये दिशाभूल
करण्यास विरोधक मागेपुढे पहाणार नाहीत त्यामुळे तालुक्यातील विविध विभागातील पदाधिका-यांनी याकरीता जागृत राहणे गरजेचे आहे. आपण जनतेच्या
डोळयाला दिसेल अशी कामे विविध विभागात मार्गी लावत आहोत. आपण
गत तीन वर्षात केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहचविणाची जबाबदारी ही कार्यकर्ते व पदाधिकारी
यांची आहे.विकासाच्या मुद्दयावर आपण येणा-या विधानसभा निवडणूकी करीता मतदारांच्या दारात मते मागण्याकरीता जाणार आहोत.
गत तीन वर्षात तालुक्यात झालेला विकास हा मागील पाच वर्षात नक्कीच झाला
नसून येणा-या दोन वर्षात प्रलंबीत राहिलेला विकास पुर्ण करण्याकरीता
मी तालुक्याचा आमदार म्हणून कटीबध्द आहे. त्यामुळे दिशाभूलीच्या
राजकारणाला थारा न देता तालुक्यातील जनतेने विकास करणा-यांच्या
पाठीशी आपली ताकत उभी करुन विकासाची ताकत विरोधकांना दाखवून दयावी असे आवाहनही आमदार
शंभूराज देसाईंनी शेवठी बोलताना केले. उपस्थितांचे स्वागत रामभाऊ
साळुंखे यांनी केले तर बाबूराव साळुंखे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment