Tuesday 31 March 2020

मतदारसंघातील बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींना मतदारसंघात सन्मानांची वागणूक बाहेरगांवाहून आले म्हणून कोणताही दुजाभाव नाही. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे आवाहन.



                 
              दौलतनगर दि.३१ :- पाटण मतदारसंघात ५० हजारांहून जादा नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.कोरोना आजाराच्या कठीण परिस्थितीत बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना दुजाभाव करुन त्यांची हेळसांड करण्यात येत असल्याचे काही विघ्नसंतोषी लोकांकडून विनाकारण सोशल मिडीयावर पसरविले जात आहे अशा अफवांवर पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेने विश्वास ठेवू नये.आपल्या मतदारसंघाची ही संस्कृती नाही.बाहेरगांवाहून आलेल्या ५० हजारांहून नागरिकांना मतदार संघातील प्रत्येक गांवामध्ये सन्मानांचीच वागणूक दिली जात असून कोणताही दुजाभाव केला जात नाही. बाहेरगांवच्या व्यक्तींना आपल्या व आपल्या परिवारांच्या आरोग्यासाठी आरोग्यांची तपासणी करुन घ्या याकरीता सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. बाहेरगांवचा अनोळखी व्यक्ती कोणी गावात शिरु नये म्हणूनच अनेक गांवानी गावामध्ये प्रवेशबंदी केली आहे याचा गैरअर्थ काढण्यात येत असून अशा हुल्लडबाज विघ्नसंतोषींना गावकऱ्यांनीच गावांमध्ये एकता दाखवून धडा शिकवावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.
                     महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजाराने हाहाकार माजविला आहे.राज्यामध्ये कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या कालपर्यंत सुमारे २२० च्या वर गेली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे. कोरोना आजाराचा सामना करण्याकरीता केंद्र तसेच राज्यस्तरावरुन सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत.आपले पाटण मतदारसंघातही कोरोना आजारासंदर्भात उपाययोजना करुन दक्षता घेण्याचे काम तालुका प्रशासनाच्या व सर्वांच्या वतीने सुरु आहे. पाटण मतदारसंघात ५० हजारांहून जादा नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.तर बहूतांशी नागरिक हे केंद्राने आणि राज्याने शासकीय नियम कडक केल्याने तसेच संपुर्ण देशामध्ये संचारबंदी,जमावबंदी व २१ दिवसांचे लॉकडाऊन केल्यामुळे  मुंबई, पुणे तसेच बाहेरगांवी अडकून पडले आहेत त्यांना प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने अडचणीत सापडलेल्यांना दिलासा देणे त्यांना अडचणीतून बाहेर काढणे याकरीता मी स्वत: प्रयत्न करीत आहे.कोरोना आजारामुळे सर्वांचीच गैरसोय झाली आहे अशा कठीण परिस्थितीत आहे तिथेच राहणे योग्य असून बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांना त्यांच्या व त्यांच्या परिवाराच्या आरोग्यासाठी तात्काळ मतदारसंघातील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन मी करीत आहे. बाहेरगांवच्या नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा तालुका प्रशासनाचा, आमचा व संबधित गांवकऱ्यांचा प्रयत्न असून बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांनीही गावकऱ्यांना व प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी जिल्हाबंदी,तालुकाबंदी करण्यात आली आहे. तर अनेक गांवानीही त्यांच्या सुरक्षितेकरीता बाहेरच्या अनोळखी व्यक्तींना गावबंदी केली आहे मात्र याचा गैरअर्थ काढण्यात येत असून काही विघ्नसंतोषी लोक हे बाहेरगांवाहून आलेल्यांना गांवात बंदी करण्यात आली असल्याच्या अफवा विनाकारण पसरवित आहेत. मतदारसंघातील त्या त्या गांवात बाहेरुन आलेल्या नागरिकांना गावात येवू नका असे कोणीच म्हणत नाही उलट त्यांच्या व त्यांच्यासोबत आलेल्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आरोग्याची तपासणी करुन घ्या याकरीता गावकरीच आग्रही राहत आहेत.बाहेरगांवाहून आलेल्यांना पाटण मतदारसंघातील गावांमध्ये प्रवेशबंदी नाहीतर कोणी अनोळखी व्यक्ती गांवात येवू नये व कोरोनाची लागण होवू नये याकरीता गावकरी दक्षता घेत आहेत याचा गैरअर्थ कोणी काढू नये आणि अशाप्रकारे कोणी चुकीच्या अफवा विनाकारण समाजामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरवित असेल तर अशा विघ्नसंतोषी व हुल्लडबाजांना गावकऱ्यांनी तसेच बाहेरगांवाहून आलेल्यांनी धडा शिकवावा असेही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे.



पोलीसांचे मनोबल वाढविण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचा दुचाकीवरुन सातारा शहरात फौजफाटा बाजूला ठेवून एकटयाचाच फेरफटका.




                 

              
दौलतनगर दि.३१ :- कोरोना आजाराने हाहाकार माजविला असल्याकारणाने गंभीर आणि अडचणीच्या काळाचा सामना करण्याकरीता व नागरिकांना कोरोना आजारापासून दुर ठेवणेकरीता देशातील, राज्यातील,शहरातील आणि गावागांवातील पोलीस यंत्रणा ही आपला जीव मुठीत धरुन आपल्या सर्वांच्या सुरक्षितेकरीता रस्त्यावर उभी राहून काम करीत आहेत.ही यंत्रणा रस्त्यावर कार्यरत आहे म्हणूनच आपण सर्वजण सुरक्षित आहोत या जाणिवेतून राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आज राज्यातील पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याकरीता संचारबंदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करुन त्यांच्या सुरक्षेकरीता असणारा सर्व फौजफाटा बाजूला ठेवून सातारा शहरात दुचाकीवरुन एकटयानेच फेरफटका मारुन सातारा शहरातील संचारबंदीची ठिकठिकाणी पहाणी केली व कार्यरत पोलीस यंत्रणेची आरोग्याची चौकशी करीत त्यांना सतर्क राहण्याच्या सुचना करीत त्यांचे मनोबल वाढविले तर काहीठिकाणी हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीसांना त्यांनी कडक शब्दात समजही दिली.
              भारत देशासह,इतर देशामध्ये तसेच अनेक राज्यामध्ये कोरोना आजाराने थैमान घातले असल्यामुळे देशाचे पंतप्रधान यांनी संपुर्ण देशामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन करुन सर्व संचारबंदी व जमावबंदी केली आहे. संचारबंदीच्या काळात सर्वत्र बंद ठेवण्यात आले असून कोरोना आजारापासून दुर ठेवणेकरीता व संचारबंदीचे योग्य पालन होणेकरीता संपुर्ण देशभरात पोलीस यंत्रणा सुरक्षेसाठी रस्त्यावर कार्यरत आहेत. आपला जीव मुठीत धरुन ही पोलीस यंत्रणा २१ दिवसांचे लॉकडाऊनच्या काळात चोख बंदोबस्त व शासनाच्या नियमांचे पालन करण्याकरीता दिवसरात्र झटत आहे. या पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याची खऱ्या अर्थाने गरज असून ही गरज ओळखली ती राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी.कठीण परिस्थितीत पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज सकाळी त्यांच्या सुरक्षेकरीता असणारा सर्व फौजफाटा बाजूला ठेवला आणि घरातील दुचाकी बाहेर काढून कुणालाही बरोबर न घेता संचारबंदीच्या काळात सर्व नियमांचे पालन करीत दुचाकीवरुन सातारा शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताच्या ठिकाणी थांबून प्रत्यक्ष पहाणी केली. सुमारे ०१ तास त्यांनी दुचाकीवरुन संपुर्ण सातारा शहरातील बंदोबस्तांची पहाणी करताना त्याठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस यंत्रणेला काही अडचण आहे का? याचीही त्यांनी आर्वजुन चौकशी करीत बंदोबस्त बजाविताना स्वत:ची काळजी घ्या असे सर्वांना सांगत पोलीस यंत्रणेला धीर देण्याचे काम करण्याबरोबर सतर्क राहण्याच्या सुचना त्यांनी केल्या तर काही ठिकाणी बंदोबस्तात त्यांना काही पोलीस हलगर्जीपणा करीत असल्याचेही आढळून आले त्यावेळी त्यांनी त्यांच्या असणाऱ्या कडक भाषेत अशा हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीसांना समजही देण्याचे काम केले. आपल्या विभागाचे पोलीस दिवसरात्र कोरोना आजाराचा सामना करण्याकरीता रस्त्यावर झटत आहेत त्यांची काळजी घेणे जसे यंत्रणेचे काम आहे तसेच राज्याचा गृहमंत्री म्हणून आपलेही काम आहे याच जाणिवेतून त्यांनी सातारा शहरातील पोलीस यंत्रणेची काळजी घेणेकरीता हा फेरफटका मारला असल्याचे सांगून गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा शहरात आज दुचाकीवरुन मारलेला फेरफटका सातारा शहरातील पोलीस यंत्रणेचे मनोबल वाढविणारा तर ठरलाच पंरतू राज्यातील पोलीस यंत्रणेचेही मनोबल वाढविणारा ठरला असून राज्याला सह्दयी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या रुपाने लाभले आहेत अशी भावनाही सातारा शहरातील पोलीस विभागात निर्माण झाली असल्याचे पहावयास मिळाले.सातारा शहरात दुचाकीवरुन फेरफटका मारत असताना काही बाहेरगांवाहून आलेले वयस्कर नागरिकही त्यांना रस्त्यावर भेटले त्यावेळी त्याठिकाणी थांबून त्या वयस्कर व्यक्तींना कुठुंन आला? काय काम होते? कसली अडचण तर नाही ना? असेल तर हा माझा नंबर आहे अडचण असेल तर फोन करा असे सांगून स्वत:ची काळजी घ्या अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे टाळा अशीही विनंती ना.शंभूराज देसाईंनी भेटलेल्या सर्वांना या दुचाकीच्या फेरफटक्यामध्ये केली.गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दुचाकी वरुन मारलेल्या फेरफटक्याची संपुर्ण सातारा शहरात चर्चा एैकावयास मिळत होती.

Monday 30 March 2020

बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येकांने स्वत:ची आरोग्य तपासणी करुन घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे बाहेरगांवाहून आलेल्या नागरिकांना जाहीर आवाहन.



                               दौलतनगर दि.३० :-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणू बाधित व्यक्तींची संख्या सुमारे २०० च्या वर गेली असून दिवसेंदिवस यामध्ये वाढच होत आहे.पाटण मतदारसंघात मोठया संख्येने नागरिक मुंबई,पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने तात्काळ तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही.अशा सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत परंतू आपली आरोग्य तपासणी करुन घेण्याची जबाबदारी ही बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येकाची आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणेकरीता सर्दी, ताप, खोकला याची काही लक्षणे दिसताच तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आरोग्य तपासणी करुन घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे जाहीर आवाहन गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी केले आहे.
            कोरोना आजाराच्या दक्षतेसाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आज आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे बैठकीच्या माध्यमातून पाटण मतदारसंघात बाहेरगांवाहुन आलेल्या प्रत्येक नागरिकांना हे आवाहन केले आहे.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
         कोरोना आजारापासून मुक्तता मिळणेकरीता राज्यामध्ये देशामध्ये सर्वच स्तरावरुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.बाहेरील देशातून,राज्यातून तसेच मुंबई,पुणे शहरातून मोठया प्रमाणांत नागरिक आपल्या पाटण मतदारसंघात आले असून याची नोंद मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यामार्फत करण्यात आली आहे तसेच संबधित विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत बाहेरगांवाहून आलेल्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला आहे का ? याची माहितीही घेतली जात आहे. अशी कोणी व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर तात्काळ उपचारही करण्यात येत आहेत. बाहेर गांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तींने आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे जाणवू लागल्यास तात्काळ आपण स्वत: व आपल्या कुटुंबिंयाची आरोग्य तपासणी ही जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून करुन घ्यावी तसेच सर्दी,ताप,खोकला ही लक्षणे जाणवत असूनही कुणी यासंदर्भात निष्काळजीपणा करु नये आपल्या स्वत:च्या तसेच कुटुंबियांच्या व पर्यायाने गावांतील व्यक्तींच्या आरोग्याकरीता आपल्याला जाणवत असलेल्या आजाराची माहिती प्रशासनातील कोणत्याही अधिकारी,कर्मचारी यांचेकडे दयावी जेणेकरुन आपल्यांला त्यांची तपासणी करुन त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देता येतील. बाहेरुन आलेला प्रत्येक व्यक्ती हा आजारीच आहे असे काही नाही परंतू कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव लक्षात घेता आपल्या व आपल्या कुटंबियांच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण आरोग्य तपासणी करुन घेणे यात गैर असे काहीच नाही. आपणच आपले रक्षक असून आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची दक्षता ही ज्याची त्याने घ्यावयाची आहे. आपल्याला मुंबई, पुणे शहरातून सुरक्षित आपले गावी येता आले आहे. गावापर्यंत सुरक्षित आलोच आहोत तर गांवातही सुरक्षित राहूया याकरीता ही आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे ती तपासणी बाहेर गांवाहून आलेल्या प्रत्येकांनी करुन घ्यावी असे मी बैठकीच्या माध्यमातून सर्वांनाच आवाहन करीत असल्याचे सांगून ना.शंभूराज देसाईंनी कोरोनासंदर्भात पाटण मतदारसंघात करावयाच्या इतर उपाययोजना संदर्भात उपस्थित सर्व अधिकारी यांना सुचना केल्या.
चौकट:- ना.शंभूराज देसाईंनी अचानक दिली मल्हारपेठ आरोग्य केंद्राला भेट.
            कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना सतर्क राहण्याच्या सुचना करण्यात आल्या असून आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी खरोखरच सतर्क आहेत का ?  हे पाहण्याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी अचानक पाटण मतदारसंघातील मल्हारपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली त्यावेळी सर्व यंत्रणा ही सज्ज व सतर्क असल्याचे दिसून आले.

संचारबंदीच्या काळात २४ बाय ७ गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई अलर्ट. “कोयना दौलत” मधून वर्क फॉर्म होम.



                 
              दौलतनगर दि.३०:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो आजाराचा वाढता पार्दुभाव लक्षात घेता संपुर्ण देशात सुरु असलेली संचारबंदी व जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसले तरी राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे संचारबंदीच्या काळातही २४ बाय ७ अलर्ट असून सातारा येथील कोयना दौलत निवासस्थान मधून त्यांचे वर्क फॉर्म होम सुरु आहे.संचारबंदीच्या काळात आपल्या मतदारसंघासह राज्यातील परिस्थितीचा ते “स्टे होम” करीत आढावा घेत आहेत.कोरोना संदर्भातील जनतेच्या समस्या सोडविताना व प्रशासनाला अलर्ट राहणेकरीता सुचना देतांनाचे कोयना दौलत निवासस्थानाच्या पुढील कट्टयावर काही काळ विरंगुळा म्हणून बसलेले गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाले असून “मंत्री असावा तर असा” अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यामधून सोशल मिडीयावर उमटत आहेत.
            भारत देशासह अनेक देशामध्ये कोरोना आजाराने मोठे थैमान घातले आहे.देशाचे पंतप्रधान यांनी संपुर्ण भारत देशामध्ये २१ दिवसांचे लॉकडाऊन करुन सगळया राज्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनीही महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजारासंदर्भात दक्षता घेणेकरीता ठोस अशी पाऊले उचलली आहेत.सातारा जिल्हयातही कोरोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून शासनाच्या आदेशावरुन अनेक ठिकाणी नाकाबंदी व बाहेरच्या लोकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.कोरोनाचा सामना करणेकरीता सर्वच स्तरावरुन योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून यामध्ये सातारा जिल्हा प्रशासनासह जिल्हयातील लोकप्रतिनिधींनीही याकरीता पुढाकार घेतला आहे.संचारबंदीच्या काळात घरात थांबून लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात या आजारासंदर्भातील उपाययोजनेकरीता व मतदारसंघातील जनतेकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.
                सातारा जिल्हयातील पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्यावर राज्याचे गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी आहे.त्यांनी राज्यामध्ये २१ दिवसांची संचारबंदी लागू होण्यापुर्वीच कोरोना आजारासंदर्भात उपाययोजना करण्याकरीता आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघात तालुका प्रशासनाच्या तीन तीन वेळा बैठका घेवून तालुका प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सुचना केल्या आहेत. तर प्रतिरोज ते तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून दुरध्वनीवरुन कोरोनासंदर्भातील घडामोडींचा आढावा घेत आहेत. २१ दिवसांची संचारबंदी व ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच जिल्हाबंदी असल्यामुळे मुंबई,पुणे या शहरात मोठया प्रमाणात अडकून पडलेल्या मतदारसंघातील जनतेला दिलासा देणेकरीता तसेच त्यांची आहे त्याच ठिकाणी सोय करणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे २४ बाय ७ कसोशीने प्रयत्न करीत आहेत. संचारबंदीच्या काळात घरी राहण्याच्या सुचना असल्या तरी जनतेची आपल्यावर असणारी जबाबदारी न झटकता ते हिरीरीने घरातूनच त्यांना येणारे सर्व फोन स्विकारुन जनतेला या काळात आवश्यक ती मदत करीत असल्याचे दिसून येत आहे.सातत्याने घरात बसून कंटाळा आला की थोडा वेळ घराच्या पुढील कट्टयावर विरुंगळा म्हणून बसले तरी येणारे सर्व फोन स्विकारुन जनतेचे प्रश्न एैकून त्यावर तोडगा काढत त्यांना मदत करण्याचे काम ना.शंभूराज देसाईंकडून सुरु असून असेच घराच्या कट्टयावर बसून फोनवरुन जनतेचे प्रश्न सोडवितांना व प्रशासनाला कोरोनासंदर्भात अलर्ट राहण्याच्या सुचना देतानाचे एक छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात प्रसारित झाले असून “मंत्री असावा तर शंभूराज देसाईंसारखा” अशा प्रतिक्रिया हे छायाचित्र पाहून सोशल मिडीयावर सर्वसामान्यामधून उमटू लागल्या आहेत.            


Sunday 29 March 2020

ना.शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून 16 बौध्दवस्त्यांमधील विकासकामांना 1.50 कोटींचा निधी मंजुर.

                
दौलतनगर दि.29:- सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत पाटण विधानसभा मतदारसंघातील 16 बौध्दवस्त्यामधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निधी मंजुरीचा शासन निर्णय दि.26 मार्च,2020 रोजी पारित केला आहे. 
                 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात पाटण  विधानसभा मतदारसंघातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या ग्रामीण भागातील वस्त्यांकरीता आवश्यक विकासकामांना प्राधान्यक्रमाने निधी मंजुर होणेकरीता राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे व विभागाचे मंत्री यांचेकडे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील 16 गांवातील बौध्दवस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांची विकासकामे प्रस्तावित केली होती त्यानुसार राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2019-20 या आर्थिक वर्षात पाटण विधानसभा मतदारसंघातील 16 गांवातील बौध्दवस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. मंजुर झालेल्या कामांमध्ये मरळी बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, आवर्डे बौध्दवस्ती व मातंगवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, मरळोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, गोकूळ तर्फ पाटण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, आटोली बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, नाटोशी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, आडूळ गावठाण बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, केरळ बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा व गटर काम करणे- 10 लक्ष,  रासाटी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष,  कसणी बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष,  सावरघर बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष,  कुशी पुनर्वसन आवर्डे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 06 लक्ष, चिंचेवाडी वजरोशी बौध्दवस्ती रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष, तामिणे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष,आंबवणे येथे बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 10 लक्ष,  ढोकावळे, बौध्दवस्ती अंतर्गत रस्ता सुधारणा करणे- 04 लक्ष असे एकूण 1 कोटी 50 लक्ष रुपयांची कामे मंजुर करण्यात आली आहेत. मंजुर कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात करण्याच्या सुचना ना.शंभूराज देसाईंकडून संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून वाढीवच्या 15 बौध्द व मातंग वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांच्या कामांना वाढीवचा 1 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मिळणेकरीताची कामे प्रस्तावित करण्यात आली असून या कामांनाही आवश्यक असणारा निधी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मंजुर होईल असा विश्वास ना.शंभूराज देसाईंनी व्यक्त केला आहे.

Saturday 28 March 2020

लॉकडाऊनमुळे वृत्तपत्र मिस करतोय, बातम्या वाचनांच्या सवयीमुळे मोबाईलवर ऑनलाईन अंकातील बातम्याचे वाचन. ना.शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया.


                 

                          
दौलतनगर दि.28:-कोरोना आजाराने सर्वत्र अक्षरश: तैमान घातले असून  या आजारापासून दक्षता घेणेकरीता सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत.21 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सर्वंत्र संचारबंदी,जमावबंदी करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.या आजारापासून दक्षता घेण्याच्या दृष्टीने सर्वच वृत्तपत्रांनीही त्यांच्या वृत्तपत्रांची छपाई न करता आपली वृत्तपत्रे ही ऑनलाईन प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रोज सकाळी उठल्यानंतर पहिले सर्वच वृत्तपत्र वाचण्याची रोजची सवय असल्यामुळे आता ही छपाईची वृत्तपत्रे येणे बंद झाल्यामुळे वृत्तपत्रांना मिस करीत असून गत तीन चार दिवसापासून आता मोबाईलवरच ऑनलाईन बातम्यांचे वाचन करीत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
                      कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये याकरीता ज्या ज्या उपाययोजना करणे शक्य आहे त्या त्या उपाययोजना करण्याचे काम केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु आहे.या उपाययोजनांमध्ये सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना हा आजार भयंकर असून याचा सामना करण्याकरीता ही संचारबंदी करण्यात आली असून 21 दिवसाच्या लॉकडाऊन मुळे वृत्तपत्रांची छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांनीही आपला रोजचा अंक छपाई न करता तो ऑनलाईन प्रसिध्द करण्याचे धोरण राबविले आहे. विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन ही वृत्तपत्रे ऑनलाईन जगभरातल्या बातम्या प्रसिध्द करीत असले तरी वृत्तपत्र वाचनाचा एक वेगळाच आनंद असतो.माझा दिवस हा मी कुठेही असलो तरी त्याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व वृत्तपत्राचे वाचन करुनच होतो.कितीही घाईगडबड असली तरी मी सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचनाला मी प्राधान्य देतो. गत तीन चार दिवसापासून छपाईची वृत्तपत्रे येणे बंद झाले असले तरी मी माझे वाचन बंद केले नाही बातम्या वाचनाच्या सवयीमुळे मी माझ्या मोबाईलवर ऑनलाईन सर्व वृत्तपत्रांच्या ई पेपरचे वाचन करुन बातम्या वाचण्याचा आनंद घेत आहे. मात्र छपाईच्या वृत्तपत्राला मी या चार दिवसात खुप मीस केले असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.




गृहराज्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे “ तिला ” सुखरुप घरी पोहचता आले. ना.शंभूराज देसाईंच्या फोनमुळे चुकलेली मुलगी तिच्या कुटुंबात सुखरुप


                 
              दौलतनगर दि.28:-  कोरोना आजारापासून सुरक्षा मिळणेकरीता मुंबई, पुणे शहरातून आपआपल्या गांवी मिळेल त्या वाहनांने पोहचण्याचे अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत.आपल्या सुरक्षितेकरीता असाच मिळेल त्या वाहनांने घरी पोहचण्याचा प्रयत्न सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील एका 22 वर्षीय मुलीने केला आणि गांवी पोहचण्याएैवजी चुकुन ती पोहचली सोलापुर जिल्हयामध्ये.21 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सगळीकडे बंद असल्या मुळे आता घरी पोहचायचे कसे? असा प्रश्न पडलेल्या त्या मुलीने थेट राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनाच फोन लावला आणि आपली हकीकत सांगून मला माझे गांवी नेण्याची व्यवस्था करा अशी विनंती केली.ना.शंभूराज देसाईंनी विलंब न लावता तात्काळ सोलापुर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावला आणि त्या मुलीला तिच्या घरी आणणेकरीता तिचे कुंटुंबातील व्यक्तीला सोलापुरला पाठवित आहे तिला सुखरुप तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दयावे असे सुचित केले.गृहराज्यमंत्र्यांच्या एका फोनमुळे तातडीने या हालचाली झाल्याने ती मुलगी एवढया कठीण परिस्थितीत तिच्या लुगडेवाडी ता.पाटण या गांवी तिच्या कुटुंबामध्ये सुखरुप पोहचली आहे.
                महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूने अक्षरश: तैमान घातले असून राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित व्यक्तींमध्ये वाढच होत आहे. नोकरीनिमित्त, कामानिमित्त,रोजगारानिमित्त ग्रामीण भागातील अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह मुंबई, पुणे शहरामध्ये वास्तव्यास आहेत तर अनेक उच्चशिक्षीत मुले-मुली मुंबई,पुणे शहरामधील मोठमोठया कंपन्यामध्ये नोकरी करीत आहेत.कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने आपल्या सुरक्षितते करीता मुंबई,पुणे शहरातून बाहेर पडून आपल्या गांवाकडे जाण्याकरीता या सर्वांची धडपड सुरु आहे. 21 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सर्वंत्र संचारबंदी,जमावबंदी असल्यामुळे वाहने बंद करण्यात आली आहेत.अत्यावश्यक सेवांच्या वाहनामधून मिळेल तसे आपआपल्या घरी पोहचण्याचा प्रयत्न करणाऱ्यामध्ये मुंबई येथे नोकरीनिमित्त असणाऱ्या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील लुगडेवाडी येथील एक 22 वर्षीय मुलगी तिच्या सुरक्षेकरीता मुंबईहून मिळेल त्या वाहनांने लुगडेवाडी या सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील गांवाकडे येण्यास निघाली परंतू घाईगडबडीत मिळेल त्या वाहनात बसल्यामुळे ती गावाकडे पोहचण्याएैवजी ती पोहचली सोलापुर जिल्हयातील सांगोला तालुक्यातील गौडवाडी गांवात. आता या गावांतून आपल्या गावी कसे पोहचायचे असा प्रश्न पडलेल्या त्या मुलीस या गांवातील ललिता सिताराम होवळ या महिलेने माणूसकीतून तिच्या घरात आसरा दिला.ही बाब त्या मुलीने आपल्या कुटुबांला फोनवरुन सांगितली आणि लगेच आपल्याच तालुक्याचे आमदार हे राज्याचे गृहमंत्री आहेत आपल्याला त्यांचा आधार नक्कीच मिळेल म्हणून धाडसाने तिने थेट गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनाच फोन लावला आणि मी या गांवात कशी पोहचले याची हकीकत सांगून मला माझे घरी पोहचविण्याची व्यवस्था करा अशी विनंती केली. गृहराज्यमंत्र्यांनीही तिचा फोन ठेवताच तातडीने सोलापुर जिल्हयाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना फोन लावला आणि चुकलेली मुलगी सोलापूर जिल्हयातील कोणत्या गांवात कोणाकडे राहिली आहे याची माहिती देत पाटण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे पत्र तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे देवून गाडी पाठवून देत आहे त्या मुलीस तातडीने तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दयावे असे सांगितले.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही तात्काळ त्याठिकाणच्या पोलीस निरीक्षकाला त्या मुलीस शोधून काढण्याचे तसेच तिला तिचे कुटुंबातील व्यक्ती आल्यानंतर ताब्यात देण्याचे सुचना केल्याने मुलीच्या भावाने तात्काळ सोलापुरातील सांगोला तालुक्यातील गौडवाडी गाव गाठले आणि आपल्या बहिणीला ताब्यात घेत आसरा देणाऱ्या त्या महिलेचे आभार मानले.आणि आपली मुलगी सुखरुप आपल्या घरी पोहचविण्याकरीता तातडीने हालचाली गतीमान करणारे राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंचे त्या संबधित मुंलीने आणि तिच्या कुटुंबिंयानी विशेष आभार मानले.

Thursday 26 March 2020

गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर वाय पल्सची सुरक्षा केली कमी. शासकीय ताफयामध्ये चार पैकी एकच गाडी. सुरक्षेतील पोलीस आवश्यक बंदोबस्तात तैनात.



                 
              दौलतनगर दि.२६:-  कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संपुर्ण राज्यामध्ये कोरोनाचा फैलाव होवू नये याकरीता संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे.सोमवारी मुख्यमंत्री यांनी संचारबंदीचा निर्णय जाहीर करताच राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना राज्याकडून पुरविण्यात आलेल्या वाय पल्सच्या सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटाची तसेच अंगरक्षांची सुरक्षा कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला व आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस सुरक्षा त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्ताकरीता तैनात करणेकरीता पाठवून दिली आहे.त्यांच्या शासकीय ताफयामध्ये सध्या चार गाडयांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीस यंत्रणा त्यांनी सुरक्षेकरीता बरोबर ठेवली आहे.ना.शंभूराज देसाईंच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
                  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना आजाराच्या संदर्भात दक्षता व काळजी घेणेकरीता सर्वच स्तरावरुन कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर याचा जादा प्रमाणात राज्यामध्ये फैलाव होवू नये याकरीता जे जे निर्णय घेणे आवश्यक आहेत ते ते निर्णय राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे घेत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून जनतेने मोठया प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येवू नये यासाठी संपुर्ण राज्यामध्ये संचारबंदी व जमावबंदी करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री यांनी सोमवारी दि.२३ रोजी दुपारी जाहीर केला.
                 दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंना गृहराज्यमंत्री म्हणून त्यांच्या सुरक्षेकरीता राज्य शासनाने वाय पल्स ही सुरक्षा तैनात केली आहे.यामध्ये वाय पल्सच्या सुरक्षेमधील मुंबई तसेच पुणे येथील विशेष सुरक्षा गटाचे पथक तैनात करण्यात आले आहे तर त्यांना वाय पल्स सुरक्षा असल्याने त्यांच्या शासकीय ताफयामध्ये पायलट व एसस्कॉर्ट सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी संचारबंदीचा व जमावबंदीचा निर्णय सोमवारी दि.२३ रोजी जाहीर करताच गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांना पुरविण्यात आलेली वाय पल्स सुरक्षेमधील विशेष सुरक्षा गटातील पोलीस यंत्रणा तसेच त्यांच्या सोबत शासकीय ताफयामध्ये असणारी पोलीस यंत्रणा, अंगरक्षकामधील पोलीस संख्या कमी  करण्याचा निर्णय घेतला व आपल्या सुरक्षेकरीता तैनात करण्यात आलेली पोलीस यंत्रणा त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संचारबंदी तसेच जमावबंदी मध्ये बंदोबस्ताकरीता जिथे पोलीस विभागाला आवश्यक आहे त्याठिकाणी त्यांनी सोमवारी दि.२३ रोजी सायंकाळीच तैनात करणेकरीता पाठवून दिली आहे.त्यांच्या शासकीय ताफयामध्ये असणाऱ्या चार गाडयांपैकी केवळ एकच गाडीतील पोलीस यंत्रणा ते सध्या शासकीय दौऱ्यामध्ये वापरत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी २१ दिवसांचे संपुर्ण देशामध्ये लॉकडाऊन केले असल्याने ना.शंभूराज देसाईंनी शासकीय दौरेही कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याने आपल्या सुरक्षेकरीता एवढया मोठया फौजफाटयाची काही गरज नसून गरज आहे ती कोरोना आजारांला पायबंद करण्याकरीता ठिकठिकाणी देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची त्यामुळे आपली सुरक्षा कमी करुन जनतेची सुरक्षा करणेकरीता ही यंत्रणा कामी यावी याकरीता त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुढील तीन महिन्याचे आगाऊ धान्य देण्याचा शासनाचा निर्णय गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंची माहिती. पोलीस विभागाने विनाकारण कुणाला मारहाण करु नये - गृहराज्यमंत्री ना.देसाईंचे आदेश.



                 
              दौलतनगर दि.२६:-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो आजाराचा वाढता पार्दुभाव लक्षात घेता जनतेला सुरु असलेली संचारबंदी व जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने राज्यातील सर्व विभागातील जनतेला कोरोनाच्या पार्श्वभूमिवर पुढील तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून आपले पाटण विधानसभा मतदारसंघातील पुरवठा विभागाने तात्काळ त्यांचेकडे सदरचे तीन महिन्यांचे धान्य आलेनंतर त्याचे वाटप करावे अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी यांना देवून संचारबंदीच्या काळात हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दया मात्र काही कामानिमित्त दोनचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांना विनाकारण पोलीस विभागाने मारहाण करु नये अशा सुचना पोलीस महासंचालकांना कालच दिल्या आहेत त्याचे पालन पोलीस विभागाने करावे असे आदेशही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिले.
            कोरोना आजारासंदर्भात शासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या संचारबंदी व जमावबंदीसंदर्भात आपले होमपीच असणाऱ्या पाटण विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेणेकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज तिसऱ्यांदा तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे माहिती देत काही आवश्यक सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव,सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी,नायब तहसिलदार थोरात यांची उपस्थिती होती.
             या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी उपस्थित अधिकाऱ्यांना राज्यामध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमिवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदी व जमावबंदीमध्ये जनतेला काही अडचणी येत आहेत त्यामध्ये काही विभागामध्ये स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपले हॉस्पीटल बंद ठेवल्याने येथील ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांनी स्थानिक खाजगी डॉक्टरांनी आपली हॉस्पीटल सुरु ठेवून हॉस्पीटलला आलेल्या रुग्णांवर उपचार करण्याचे बंधनकारक केले आहे.जे खाजगी डॉक्टर उपचार करणार नाहीत अशांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत.तशा सुचना पाटण मतदारसंघातील सर्व खाजगी हॉस्पीटलमधील डॉक्टरांना देण्यात याव्यात.व शासनाच्या सुचनांनुसार अशा खाजगी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.
              त्याचबरोबर राज्यामध्ये संचारबंदी व जमावबंदीमुळे जनतेला बाहेर पडता येत नसल्याने राज्यातील जनतेला पुढील तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्याची मागणी कालच राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेकडे दुरध्वनीवरुन केली असता त्यांनी ही मागणी तातडीने मान्य करीत त्यानुसार तात्काळ निर्णयही घेतला व तसे आदेशही राज्य शासनाच्या संबधित विभागाला त्यांनी दिले आहेत.लवकरच याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना प्राप्त होतील त्यानुसार तातडीने आपले पाटण विधानसभा मतदारसंघात मतदारसंघातील जनतेला रेशनिंग दुकानदारांच्या माध्यमातून आगाऊ तीन महिन्यांचे धान्यवाटप करण्याची कार्यवाही पुर्ण करुन घ्यावी अशा सुचना प्रांताधिकारी यांना दिल्या.
             तर गटविकास अधिकारी यांनी त्यांचे विभागाकडील ग्रामसेवकांमार्फत गांवातील,वाडयावस्त्यांमधील सर्व गल्लीबोळामध्ये कोरोनाची दक्षता घेण्याच्या दृष्टीने रोगनाशक औषधांची फवारणी करुन घेण्याच्या सुचना ग्रामसेवकांना दयाव्यात असे सांगून पाटण मतदारसंघासह सातारा जिल्हयामध्ये संचारबंदीच्या काळात काही कामानिमित्त दोनचाकीवरुन प्रवास करणाऱ्यांना विनाकारण पोलीस विभागाच्या बंदोबस्ताकरीता असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काठीने मारहाण करण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही कारण नसताना रस्त्यावर दुचाकीवरुन हुल्लडबाजी करणाऱ्यांना चोप दया परंतू विनाकारण कुणाला मारहाण करु नका यासंदर्भातही मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांचेशी बोलणे झाले असता तशा सुचना राज्याचे पोलीस महासंचालक यांना मी कालच दिल्या आहेत आपल्या मतदारसंघात त्या सुचनांचे पोलीस विभागाने तात्काळ पालन करावे असे सक्त आदेश देवून पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने कोरोनाच्या पार्श्वभूमिवर स्वत:ची आणि स्वत:च्या परिवाराची काळजी घेण्याचे जाहीर आवाहनही त्यांनी बैठकीच्या माध्यमातून केले आहे.



Tuesday 24 March 2020

कोरोनोपासून बचावासाठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंकडून मतदारसंघातील सर्व विभागात केले 10 हजार मास्कचे वाटप. ना.शंभूराज देसाईंनी या उपक्रमातून जपली सामाजीक बांधीलकी.



                 

              
दौलतनगर दि.24:- महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूने अक्षरश: तैमान घातले असून राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनो बाधित व्यक्तींमध्ये वाढच होत आहे.पाटण विधानसभा मतदारसंघातील मुंबई,पुणे या शहरात असणारे बहूतांशी नागरिक हे आपआपल्या गांवी आले आहेत.कोरोनो आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून आपल्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेणेकरीता राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईंनी मतदारसंघातील जनतेला स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्या टप्प्यात 10 हजार मास्कचे वाटप करण्यात आले असून ना.शंभूराज देसाईंचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गावोगांवी,खेडयापाडयात जावून वयोवृध्द नागरिकांना,महिलांना,युवकांना या मास्कचे वाटप केले. कोणतेही संकट आले तरी येणाऱ्या संकटाला न डगमगता आपल्या कर्मभूमितील जनतेला आधार देण्याची भूमिका ना.शंभूराज देसाईंनी नेहमीच जपली आहे.मास्कचे वाटप करुन त्यांनी या उपक्रमातून पुन्हा एकदा सामाजीक बांधिलकी, माणूसकी जपली आहे.
           गत पाच,सहा महिन्यापुर्वी पाटण मतदारसंघातील जनतेवर अतिवृष्टीचे व महापुराचे संकट आले होते. या संकटातून मतदारसंघातील जनतेला बाहेर काढण्याकरीता,त्यांना आधार देणेकरीता ना.शंभूराज देसाईंनी पुढाकार घेवून या महाकाय संकटातून मतदारसंघातील जनतेला दिलासा दिला होता. अहोरात्र मतदारसंघात तळ ठोकून त्यांनी महापुरात अडकलेल्यांना स्वत: जेसीबीतून,नावेतून,बोटीतून जावून नागरिकांना,महिलांना,लहान मुला बाळांना बाहेर काढण्याचे काम केले होते तर ज्यांची घरे अतिवृष्टीमुळे कोसळली आहेत त्यांना या काळात निवारा देण्याचे काम त्यांनी केले तर अनेक दानशुरांकडून अगदी धान्यांपासून,कपडे,पांघरुण ते घरगुती वापराच्या भांडयापर्यंतची सर्व मदत मागवून घेवून ती मतदारसंघातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम तळमळीने सलग दीड महिना त्यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीच्या झालेल्या नूकसानीची भरपाई मिळवून देण्याकरीता शासनदरबारी त्यांनी प्रयत्न करुन ही मदत शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यास मोलाचा हातभार लावला.
            गत महिन्याभरात कोरोनो या आजाराचे भलेमोठे संकट सर्वांसमोर उभे राहिले आहे. देशाबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचा फैलाव वाढू लागला असून यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वच स्तरावरुन मोठया प्रमाणात प्रयत्न केले जात असून कोरोनो आजाराचा फैलाव आपल्या मतदारसंघाकडे होवू नये याकरीता गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व शासकीय यंत्रणाही सतर्क ठेवली असून कोरोनोच्या पार्श्वभूमिवर मतदारसंघातील जनतेने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणेकरीता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांचेकडून सातत्याने करण्यात येत आहे.मतदारसंघात कोरोनो आजाराच्या संदर्भातील आढावा घेण्याबरोबर मतदारसंघातील जनता हा माझा परीवार आहे या परिवाराची काळजी घेणे माझे कर्तव्य आहे याकरीता ते शासकीय यंत्रणांच्या सातत्याने बैठका घेवून यावर उपाययोजना करण्याकरीता सर्व यंत्रणांना वेळोवेळी सुचित करीत आहेत.
          कोरोनोच्या पार्श्वभूमिवर केवळ बैठका घेवून ते थांबले नाहीत तर मतदारसंघातील जनतेच्या आरोग्याची काळजी व दक्षता घेणेकरीता त्यांनी पुढाकार घेतला असून स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने पहिल्या टप्प्यात 10  हजार मास्क खरेदी करीत त्यांनी आपले पदाधिकारी,कार्यकर्ते यांचेमार्फत आज मतदारसंघातील प्रत्येक विभागातील गावोगांवी, खेडयापाडयात जावून मतदारसंघातील जनतेला 10 हजार मास्कचे वाटप केले असून वाढीव मास्कचीही मागणी स्व.शिवाजीराव देसाई चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मास्कच्या उपलब्तेनुसार याची खरेदी करुन वाढीवच्या मास्कचे वाटप मतदारसंघातील प्रत्येक विभागात करण्यात येणार आहे. आज पाटण मतदारसंघातील जनतेला कोरोनोच्या पार्श्वभूमिवर ना.शंभूराज देसाईंकडून वाटप करण्यात आलेल्या मास्कच्या संदर्भात पाटण मतदारसंघातील जनतेने ना.शंभूराज देसाईंना धन्यवाद दिले असून संकटे येतात आणि जातात त्यात टिकते ती माणुसकी,सामाजीक बांधीलकी हाच संदेश ना.शंभूराज देसाईंनी या उपक्रमातून दिला असून स्वत:ची आणि स्वत:च्या परीवाराची काळजी घ्या असे आवाहनही ना.शंभूराज देसाईंनी पाटण मतदारसंघासह महाराष्ट्र राज्यातील जनतेला केले आहे.



Monday 23 March 2020

बाहेरगांवाहून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करुन घ्या. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सुचना व जनतेला आवाहन.



                 
              दौलतनगर दि.२३:-  महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनो विषाणूचे सुमारे ७५ विषाणू बाधित लोक आढळून आले असून दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे.त्यामुळे प्रत्येक नागरिकांने स्वत:ची आणि त्यांच्या परिवाराची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.पाटण विधानसभा मतदारसंघात मोठया संख्येने नागरिक हे मुंबई, पुणे तसेच बाहेर गांवाहून आपआपल्या गांवी आले आहेत.बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी जेणेकरुन कोणताही धोका निर्माण होणार नाही.अशा सक्त सुचना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या व बाहेरुन आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपली आरोग्य तपासणी तातडीने करुन घ्यावी व आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी बाहेरगांवाहुन आलेल्या प्रत्येक नागरिकांना केले आहे.
            कोरोनो आजाराचे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून कालच संपुर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचे पालन झालेनंतर सातारा जिल्हयात या पार्श्वभूमिवर कोरोनो विषाणूचा फैलाव वाढू नये याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी,सातारा यांनी कलम १४४ लागू केले आहे.यासंदर्भात तसेच कोरोनो आजाराच्या दक्षते साठी गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालय याठिकाणी आज पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात आली.याप्रसंगी त्यांनी वरीलप्रमाणे सुचना केल्या.बैठकीस प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार समीर यादव,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात,गटविकास अधिकारी मीना साळुंखे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.बी.पाटील,पाटण ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत यादव, सपोनि तृप्ती सोनवणे,पाटण नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक परदेशी यांची उपस्थिती होती.
        या बैठकीमध्ये गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांचेकडून प्रारंभी पाटण मतदारसंघात बाहेरील देशातून,राज्यातून तसेच मुंबई,पुणे शहरातून किती व्यक्ती आल्या आहेत याची माहिती घेतली.यामध्ये बाहेरील देशातून २० तर मुंबई,पुणे या शहरासह इतर शहरातून मोठया प्रमाणांत नागरिक मतदारसंघात आले असल्याची माहिती समोर आली.पाटण मतदारसंघात बाहेरुन मुंबई,पुणे शहरातून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.त्यामुळे तालुका प्रशासनाने गांभीर्याने याची काळजी घेणे गरजेचे आहे.असे सांगत ना.देसाईंनी महसूल विभागाचे मंडलाधिकारी,तलाठी तसेच ग्रामविकास विभागाचे ग्रामसेवक व पोलीस यंत्रणेने संबधित गावचे पोलीस पाटील यांच्यामार्फत त्या त्या गांवामध्ये बाहेरगांवाहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करुन टप्प्या टप्प्याने तालुका प्रशासनातील आरोग्य विभागाने अशा व्यक्तींची तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी. आशा संव्यसेविका, तसेच आरोग्य विभागाच्या यंत्रणेकडून केवळ बाहेरील व्यक्तींना सर्दी, खोकला आहे का?  अशी विचारणा केली जात आहे या तपासणी बरोबर डिजीटल थर्मामीटरचा वापर करुन अशा व्यक्तींना ताप आहे का याचीही खात्री करुन घ्यावी. गत १५ दिवसात बाहेरील गांवाहून आलेल्या प्रत्येक नागरिकांने आपल्या स्वत:च्या व गावांतील इतरांच्या आरोग्यासाठी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून आपली तपासणी करुन घ्यावी. व आरोग्य विभागाला तसेच तालुका प्रशासनाला सहकार्य करावे. आपली स्वत:ची व आपल्या परिवाराची तसेच गावातील नागरिेकांची काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे अद्यापपर्यंत पाटण मतदारसंघात कोणाही व्यक्तीमध्ये कोरोनो विषाणू बाधितची काही लक्षणे आढळून आली नाहीत ही बाब आनंदाची असल्याचे सांगून त्यांनी महसूल यंत्रणेमार्फत मंडलाधिकारी,तलाठी,कोतवाल तसेच पंचायत समितीमार्फत विस्तार अधिकारी,ग्रामसेवक,पोलीस यंत्रणेमार्फत पोलीस पाटील यांना गावा गांवामध्ये जावून जनजागृती करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या तसेच कालच संपुर्ण देशामध्ये जनता कर्फ्यूचे पालन झाले मात्र आज मोठया प्रमाणात लोक रस्त्यावर आहेत. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी,सातारा यांनी संपुर्ण सातारा जिल्हयामध्ये कलम १४४ लागू केले आहे. पाटण मतदारसंघातील सर्व पोलीस स्टेशनच्या यंत्रणांनी तसेच ग्रामसेवकांनी सतर्क राहून ५ पेक्षा अधिक लोक एकत्र येणार नाहीत याकरीता गावोगांवी ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून स्पीकरव्दारे आवाहन करावे. अशा सुचना उपविभागीय पोलीस अधिकारी व गटविकास अधिकारी यांना केल्या.अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पीटल,मेडीकल, अन्न, दुध, फळे,भाजीपाला व किराणा घेणेकरीता मोठया प्रमाणात गर्दी होत आहे तसेच दुचाकीवरुन युवकही मोठया प्रमाणावर रस्त्यावर फिरताना दिसत आहेत यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे त्याकरीता अत्यावश्यक सेवेमध्ये हॉस्पीटल,मेडीकल यांच्या व्यतिरिक्त दुध,फळे, भाजीपाला व किराणा आणणेकरीता नागरिकांना सकाळची वेळ ठरवून देणेबाबतही सुचना करण्यात याव्यात याकरीता जिल्हाधिकारी,सातारा यांना सुचित करणार असल्याचेही त्यांनी शेवठी बैठकीत सांगितले.