महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहे.ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने पहिल्यांदा लोकांचा लोकनेता म्हणून पदवी बहाल
केली ते आदरणीय,वंदनीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा आज दि.10
मार्च रोजी 110 वा जयंती सोहळा दौलतनगर,ता.पाटण येथे “महाराष्ट्र
दौलत” या लोकनेतेसाहेब
यांचे शताब्दी स्मारकामध्ये मोठया दिमाखात साजरा होत आहे.आजच्या
११० व्या जयंती सोहळयाच्या निमित्ताने...
आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात मोठया आदबीने घेतले जाते. त्यांच्या तोलामोलाचे अनेक राजकारणी महाराष्ट्रात होऊन गेले
परंतु महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळविलेले लोकनेतेसाहेब यांना
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आजही विसरलेली नाही आणि विसरणार नाही. महाराष्ट्रातील त्यांच्या अलौकीक कार्यामुळे दौलत महाराष्ट्राची म्हणूनही त्यांचा नामोउल्लेख केला जातो.महाराष्ट्राची
दौलत असणारे लोकनेतेसाहेब यांचे “महाराष्ट्र दौलत” नावाने चिरंतन शताब्दी स्मारक त्यांचे कर्म व जन्मभूमित लोकनेतेसाहेबांचे नातू राज्याचे नवनिर्वाचीत गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आमदार असताना राज्य
शासनाकडून १० कोटी रुपये खर्चून उभारले आहे.राज्याचे मंत्री झालेनंतर त्यांनी याच
शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता राज्य शासनाकडून वाढीवचा १५
कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला आहे.लोकनेतेसाहेब यांच्या
नावाला शोभेल असेच शताब्दी स्मारक त्यांचे कर्म आणि जन्मभूमित उभारले असून याचा
लोकनेतेप्रेमी व पाटण मतदारसंघातील जनतेला सार्थ
अभिमान आहे.
राज्याचे
माजी गृहमंत्री लोकनेतेसाहेब यांना महाराष्ट्रातील जनतेने राज्याचे आदर्श मंत्री व सर्वसामान्य लोकांचा लोकनेता
म्हणून जे मानाचे स्थान दिले त्या स्थानाचा मान राखत त्यांनी आयुष्यभर राज्यातील
गोरगरीबांची सेवा केली. सर्वसामान्यांची श्रध्दा जाणून
घेत आपल्या मंत्रीपदाच्या काळात
त्यांनी केलेले कार्य राज्याच्या विकासाला दिशादर्शक देणारे ठरले असून ते अतुलनीय
आहे.याची अनेक उदाहरणे आहेत.लोकनेतेसाहेब यांना महाराष्ट्रातील लोकांनी मनापासून आपला लोकनेता मानले होते
व आहे.
लोकांनी लोकनेत्यांना लोकनेता ही दिलेली पदवी महाराष्ट्रातील पहिली पदवी होती व आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई
यांच्या काळात राज्याच्या राजकारणात तोलामोलाचे अनेक नेते होऊन गेले.लोकनेत्यांचे कार्यच एवढे मोठे आहे त्यामुळे
त्यांच्या कार्याचा महाराष्ट्रातील जनतेला आजही विसर पडलेला नाही आणि तो कधीही
पडणार नाही म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव आज सर्वत्र सुरु
असल्याचे दिसून येते.
एखाद्या
लौकीक प्राप्त व्यक्तीचा उध्दार त्याची तिसरी पिढी करते असे म्हंटले जाते,त्याचप्रमाणे आपल्या आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा गौरव आणि त्यांच्या
विचारांचा जागर त्यांचे नातू राज्याचे
गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाईसाहेब हे आजही ३६ वर्षापुर्वी लोकनेतेसाहेबांचा असणारा
दरारा आणि राज्याच्या राजकारणावरील वचक व त्यांनी महाराष्ट्रातील जनतेकरीता
केलेल्या तोलामोलाच्या कार्यानुसार त्याच तोलामोलाप्रमाणेच पाटण मतदारसंघात करीत
आहेत.
सन २०१० हे लोकनेतेसाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे
करण्याचा निर्णय शंभूराज देसाईसाहेब यांनी आमदार नसताना घेतला आणि संपुर्ण महिनाभर हे जन्मशताब्दी वर्ष साजरे
करण्यात आले.लोकनेतेसाहेबांना
अभिवादन करण्याकरीता महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतून विविध मान्यवर हे लोकनेत्यांच्या जन्मभूमित आले होते.या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने लोकनेतेसाहेबांचे आचरविचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य त्या काळात झाले.शंभूराज देसाईसाहेब यांनी त्याकाळात राबविलेले उपक्रम पाहून
राज्यातील विविध राजकीय मान्यवरांनी आपल्या आजोबांचा सातत्याने जागर करणारा नातू
महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही या शब्दात शंभूराज देसाईसाहेब यांच्या निर्णयाचे व कार्याचे कौतुक
केले होते.
आपल्या
आजोबांनी केलेल्या अतुलनीय कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी याकरीता लोकनेतेसाहेबांच्या कर्म आणि जन्मभूमित
राज्य शासनाकडून
चिरंतन असे शताब्दी स्मारक उभारावे ही
मुळ संकल्पना शंभूराज देसाईसाहेबांची होती ती संकल्पना त्यांनी सत्यात उतरली.गृहराज्यमंत्री झाल्या झाल्या राज्याच्या अर्थसंकल्पात शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांचा समावेश करुन या कामांस १५ कोटी रुपयांचा वाढीवचा निधी राज्य शासनाकडून
मंजुर करुन घेतला.महाराष्ट्राची दौलत आणि पाटण विधानसभा मतदारसंघाचा स्वाभिमान
असणाऱे लोकनेतेसाहेब यांचे “महाराष्ट्र दौलत” हे शताब्दी स्मारक म्हणजे नामदार
शंभूराज देसाईसाहेब यांचा राजकीय,सामाजीक जीवनातील मैलाचा दगड असून असे चिरंतन स्मारक संपुर्ण
महाराष्ट्रात कुठेही पहावयास मिळत नाही.लोकनेतेसाहेबांचे
कार्य या शताब्दी स्मारकाच्या माध्यमातून पहाण्याची संधी महाराष्ट्रातील
लोकनेतेसाहेब प्रेमी जनतेला मिळत आहे.याचा सर्वांनाच मनस्वी आनंद होत असून लोकनेतेसाहेबांचे 1१० व्या
जयंती सोहळयानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने त्यांना भावपुर्ण विनम्र
अभिवादन...!
मिलिंद माळी,विशेष कार्यासन अधिकारी.
No comments:
Post a Comment