दौलतनगर दि.१४:- महाराष्ट्र
राज्यातील महिला सर्वच बाबतीत सुरक्षित राहणेकरीता राज्याच्या गृहविभागाने ठोस
उपाययोजना केल्या असून महिलांच्या सुरक्षिततेला गृहविभागामार्फत प्राधान्य
देण्यासाठी संपुर्ण गृहविभागाने नियोजन केले आहे. राज्यातील गृहविभागाने महिलांच्या
सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश राज्यातील गृहविभागातील सर्व पोलीस
अधिकाऱ्यांना दिले आहेत.राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरीता
राज्याचे महाविकास आघाडी शासनाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे व
शासनातील आमचा गृहविभाग हा कायम प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही राज्याचे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी विधानपरिषदेमध्ये दिली.
अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या शेवठच्या दिवशी विधानपरिषद सभागृहामध्ये विरोधी पक्षामार्फत
मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या
गृहविभागावरील मागण्यांच्या संदर्भात उत्तर देताना ना.शंभूराज देसाईंनी
वरीलप्रमाणे ग्वाही दिली.
अंतिम
आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,
महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामध्ये
दिशा कायदा आणणेकरीता याच अधिवेशनात महाविकास आघाडी शासनाचे नियोजन होते पंरतू
कोरोनाच्या भितीमुळे अधिवेशनाचा एक आठवडा रद्द करण्याचा निर्णय शासनाने तसेच
विधिमंडळाने घेतला असून महाराष्ट्र राज्यामध्ये दिशा कायदा आणणेकरीता राज्य
शासनाने विशेष अधिवेशन बोलवून या विशेष अधिवेशनात हा दिशा कायदा संमत करावा
याकरीता आमचा आग्रही प्रयत्न राहणार आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित
राखण्याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे,गृहमंत्री ना.अनिल देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे शासन व शासनाचा आमचा गृहविभाग कायम
प्रयत्नशील राहणार आहे.तशा प्रकारच्या सुचना गृहविभागातील सर्व पोलीस
अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.ठोस उपाययोजनेतून आणि गृहविभागाच्या योग्य नियोजनामुळे
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त
केला
तसेच पोलीस वसाहती व कार्यरत पोलीस
वसाहतींच्या दुरुस्तीसंदर्भातही प्रश्न मांडण्यात आला यावर त्यांनी सन २०२०-२१ चे
अर्थसंकल्पात पोलिसांचे वसाहतीकरीता चांगली तरतुद करण्यात आली आहे.राज्यातील
गृहविभागातील पोलीस अधिकारी,कर्मचारी यांना शासनामार्फत योग्य सुविधा मिळाव्यात, त्यांना
राहणेकरीता घरे मिळावित याकरीता राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे हे स्वत:
आग्रही आहेत. त्यामुळे आम्ही नक्कीच राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना
पोलीस वसाहतीच्या माध्यमातून न्याय मिळवून देवू असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर
राज्यामध्ये बांगलादेशी व्यक्तींच्या मोठया प्रमाणात घुसखोरी झाल्या असल्याचाही
मुद्दा विरोधी पक्षाकडून मांडण्यात आला त्याला उत्तर देताना ना.देसाई म्हणाले गत
चार वर्षात राज्यामध्ये घुसखोरी केलेल्या ३,४३१ बांगलादेशी व्यक्तींवर ६६० गुन्हे
दाखल करण्यात आले असून त्यातील सुमारे ६०६ आरोपींना महाराष्ट्र राज्यातून परत पाठविण्यात आले आहे. मुंबईतील आळणारा
परिसरात सापडलेल्या ३ बांगलादेशीवर गृहविभागामार्फत कारवाई करण्यात आली असून
साकीनाका या परिसरात सापडलेल्या २२ बांगलादेशीमध्ये १० महिला व १२ पुरुष असून
त्यांचेकडे तेथील स्थानिक ग्रामपंचायतीचे रहिवाशीचे दाखले मिळून आले आहेत ते दाखले
कशाप्रकारे देण्यात आले याची चौकशी सुरु असून बांगलादेशींना ग्रामपंचायतीचे बोगस
दाखले देणाऱ्या ग्रामपंचायतीच्या संबधित पदाधिकारी,अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
करण्याचे आदेशही संबधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे सांगून त्यांनी
अंतिम आठवडा प्रस्तावावर विधानपरिषद सदस्यांनी मांडलेल्या अनेक योग्य सुचनावर शासन
व शासनाचा गृहविभाग गांभीर्यपुर्वक विचार करेल असे सांगितले.दरम्यान विधान परीषदेचे
विरोधी पक्षनेते यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधी बाजूच्या सदस्यांनी
मांडलेल्या प्रत्येक प्रश्नांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या
उत्तरामध्ये स्पर्श करीत प्रत्येक प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिल्याबद्दल विरोधी
पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहराज्यमंत्री ना. देसाईंचे सभागृहात अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment