दौलतनगर दि.१०:-महाराष्ट्राचे पोलादी पुरुष स्व.लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये केलेले कार्य सांगण्याएवढा मी मोठा नाही,स्व.लोकनेतेसाहेब
यांचे कार्य अवघा महाराष्ट्र जाणून आहे. स्व.लोकनेतेसाहेब यांनी राज्याचे विविध
खात्याचे मंत्री म्हणून केलेले कार्य अजरामर आहे.दुरदृष्टी लाभलेले नेते
स्व.साहेबांच्या रुपाने आपल्या मतदारसंघाला नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्र राज्याला
लाभले हे आपल्या सर्वांचे भाग्य असून डोंगरी आणि दुर्गम भागात वसलेल्या आपल्या
पाटण तालुक्याला देशाच्या नकाशावर नेण्याचे कार्य त्यांनी केले आहे. आपल्या
मतदारसंघात लोकनेतेसाहेब यांच्या कार्याला शोभेल असे कार्य आपल्या सर्वांचे लाडके
नेते राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत त्यांच्या
मार्गदर्शनाखाली लोकनेतेसाहेब,स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु असणाऱ्या विविध
संस्थां नावारुपास आणण्याचे कार्य या संस्थामधील पदाधिकारी, विश्वस्तांनी करावे
हीच खरी लोकनेतेसाहेब यांच्या जयंतीदिनी श्रध्दाजंली ठरणार असल्याची भावना युवानेते
यशराज देसाई यांनी व्यक्त केली आहे..
दौलतनगर ता.पाटण येथे लोकनेते बाळासाहेब
देसाई शताब्दी स्मारकाच्या “महाराष्ट्र दौलत” सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याचे
माजी गृहमंत्री स्व.लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांच्या ११० व्या जयंती सोहळयाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी
ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज
देसाई,जयराज देसाई,लोकनेते बाळासाहेब देसाई सह.साखर कारखान्याचे चेअरमन अशोकराव
पाटील,माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हा.चेअरमन राजाराम पाटील,शिवसेना
जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलींद पाटील,माजी उपसभापती
डी.आर.पाटील,माजी विरोधी पक्षनेते डी.पी.जाधव,लोकनेतेसाहेब यांच्याबरोबर कार्य
केलेले कै.सौ. वत्सलादेवी देसाई हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक के.एल.चव्हाण,चाफळ,पाटण
प्रांताधिकारी श्रीरंग तांबे,प्रभारी तहसिलदार समीर यादव,गटविकास अधिकारी श्रीमती
मीना साळुंखे यांच्यासह लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहातील
विविध संस्थाचे पदाधिकारी, जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य व लोकनेतेप्रेमी
कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रारंभी युवा नेते यशराज देसाई,रविराज
देसाई यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या
पुर्णाकृती पुतळयास पुष्पचक्र अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना यशराज
देसाई म्हणाले,स्व.लोकनेतेसाहेब यांनी पाटण तालुक्याचा कायापालट केला. राज्याच्या
महत्वाच्या खात्यांचे करारी मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य संपुर्ण
महाराष्ट्र राज्याला परिचीत आहे. त्यांच्या कार्याचे छोटसं
प्रतिबंध म्हणून गृहराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी मागील पंचवार्षिक मध्ये आमदार असताना राज्य शासनाच्या
निधीतून लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे भव्य असे चिरंतन स्मारक उभे केले. शताब्दी
स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासही त्यांनी राज्य शासनाकडून निधी मंजुर करुन
आणला. लोकनेते साहेब यांच्या नावाने सुरु असलेल्या विविध संस्था नावारुपास
आणण्याचे कार्य ना.शंभूराज देसाईसाहेब करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
लोकनेतेसाहेब यांच्या नावाला व कार्याला शोभेल असे कार्य या संस्थामधील पदाधिकारी,
विश्वस्थांनी करणे गरजेचे आहे.लोकनेतेसाहेब,स्व.आबासाहेब यांच्या नावाने सुरु
असणाऱ्या संस्था चांगल्या चालविणे आपले सर्वांचे कर्तव्य असून या
दोन महान नेत्यांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करीत असताना खऱ्या अर्थाने हीच
श्रध्दांजली ठरणार आहे अशा भावना व्यक्त करुन ते म्हणाले, मंत्री
झालेनंतर अनेक नेत्यांचा मतदारसंघातील जनतेशी जनसंपर्क कमी होतो परंतु ना.शंभूराज
देसाईसाहेबांचा जनसंपर्क कमी झाला नाही,उलट त्यामध्ये वाढच झाली असून त्यांनी
त्यांच्या कार्याचा चढता आलेख ठेवला आहे याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे.
याप्रंसगी रविराज देसाई,जयवंतराव शेलार,माजी मुख्याध्यापक के.एल.चव्हाण यांनी
मनोगते व्यक्त केली. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवड झालेली कु.सई मनोज मोहिते
हिने लोकनेतेसाहेब यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या. उपस्थितांचे स्वागत
अशोकराव पाटील यांनी केले व आभार पांडूरंग नलवडे यांनी मानले. कार्यक्रमास लोकनेते
बाळासाहेब देसाई सह.उद्योग समुहातील सर्व संस्थाचे अधिकारी,कर्मचारी मोठया
संख्येने उपस्थित होते.
चौकट :- स्व.लोकनेते
यांना गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा येथे केले विनम्र अभिवादन.
राज्याचे
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने मुंबईकडे तातडीने जावे लागल्यामुळे
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सातारा येथील शिवदौलत सहकारी बँकेच्या
शाखेमध्ये स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन
त्यांच्या ११० जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी त्यांच्यासमवेत पाटण
तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment