दौलतनगर दि.१३:- दि.०६
मार्च रोजी राज्याचे अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी सन २०२०-२१ चा
अर्थसंकल्प विधानपरिषदेत सादर केला होता.या आठवडयात सलग दोन दिवस या अर्थसंकल्पावर
सर्वसाधारण चर्चा विधानपरिषदेमध्ये सुरु होती.सुमारे ३० पेक्षा जास्त विरोधी व
सत्ताधारी पक्षाच्या विधानपरिषद सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेवून विविध
मागण्या अर्थसंकल्पावर केल्या.या मागण्या तसेच सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांची
उत्तरे देण्याची जबाबदारी वित्तराज्यमंत्री म्हणून ना.शंभूराज देसाईंच्या वर
होती.मागण्यावरील चर्चेचा आणि उत्तराचा कालचा शेवठचा दिवस होता.सकाळी १० वा सुरु
झालेल्या मागण्या रात्री ११ वा.संपल्या. १० ते १५ मिनीटांचा अपवाद वगळता सलग १३
तास सभागृहातील कामकाज सुरु होते.सलग १३ तास अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई
सभागृहात उपस्थित होते.अर्थसंकल्पावरील मागण्यांची उत्तरे देण्याची त्यांची पहिलीच
वेळ असताना देखील त्यांनी सदस्यांच्या मागण्यांना समाधानकारक उत्तरे देवून
सभागृहातील सदस्यांची मने जिंकली.त्यांच्या उत्तरावेळी सभागृहात कोणताही गदारोळ न
होता मागण्या केलेल्या सदस्यांचे त्यांच्या उत्तरातून त्यांनी समाधान केले.
यावेळी अर्थसंकल्पावरील मागण्यांना उत्तर देताना
अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या चरणी यंदाचा अर्थसंकल्प ठेवून राज्यातील जनतेच्या आणि
शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प वित्तमंत्री ना.अजित पवार आणि मी विधीमंडळात
मांडला असून छत्रपती शिवाजी महाराज यांना अपेक्षित असणारे शासन आम्ही राज्याचे
लाडके मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालवित आहोत.नरवीर
कै.तानाजी मालुसरे यांच्या जन्मगांवी त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी विधानपरिषद
विरोधी पक्षनेते यांनी त्यांच्या भाषणात केली त्यावर उत्तर देताना ना.देसाईंनी
नरवीर कै.तानाजी मालुसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहकार्याने
हिंदूराज्य स्थापनेत मोलाचे सहकार्य केले आहे याचा सर्वांनाच अभिमान असून त्यांच्या
जन्मगावी त्यांचे भव्य असे स्मारक व्हावे याकरीता स्मारकाचा आराखडा मागवून घेवून
या आर्थिक वर्षात ०५ कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत देण्यात येईल तसेच वाढीवचा
काही निधी लागल्यास त्यावर शासन निर्णय घेईल असे घोषित करीत असल्याची घोषणा करुन
त्यांनी मा.स्व.बाळासाहेब ठाकरेसाहेब माजी सैनिक व सैनिकांच्या विधवा पत्नी
मालमत्ता कर माफ योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्यातील अडीच लाख माजी सैनिक व सैनिक
विधवा पत्नी यांच्या घरांचा मालमत्ता कर हा ग्रामविकास व नगरविकास विभागामार्फत
परिपुर्ती करुन माफ करण्यात येईल असल्याचेही जाहीर केले.तसेच मालेगांव जि.नाशिक
येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहूरी अंतर्गत कृषी विज्ञान संकुल निर्माण करुन
शासकीय कृषी महाविद्यालय,शासकिय कृषी उद्यानविद्या महाविद्यालय व शासकिय अन्न
तंत्रज्ञान महाविद्यालय शासनामार्फत स्थापन करण्यात येईल त्याकरीता आवश्यक असणारा
निधी शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगितले.अनेक सदस्यांनी मांडलेल्या
प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेत, शासनामार्फत विविध मागण्या मान्य करणेकरीता
त्यांनी स्वतंत्र्य बैठका घेण्यासंदर्भाने स्वतंत्र्यपणे घोषणा केल्या.
चर्चेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्यांच्या
मागण्या कशाप्रकारे राज्य शासनाकडून पुर्ण करता येतील याचा आढावाच अर्थराज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या अर्थसंकल्पावरील उत्तराच्या भाषणामध्ये दिला. सदस्यांच्या
प्रश्नांना सडेतोड व समर्पक अशी उत्तर देत सदस्यांचे समाधान होईपर्यंत त्यांच्या
प्रश्नांची सोडवणूक ना.देसाईंनी त्यांच्या अर्थसंकल्पावरील मागण्यांच्या
उत्तरामध्ये केले.अर्थसंकल्पावरील मागण्यांवर बोलणाऱ्या प्रत्येक सदस्यांच्या
मागण्या त्यांचे प्रश्न ना.शंभूराज देसाई हे सभागृहात टिपून घेत होते.विधानपरिषदेचे
सभापती,उपसभापती यांनीही प्रत्येक सदस्यांना तुम्ही बोला,अर्थराज्यमंत्री सभागृहात
उपस्थित आहेत ते तुमचे प्रश्न,तुमच्या मागण्या लिहून घेत आहेत,त्यांच्या
उत्तरामध्ये आपल्या प्रश्नांची सोडवणूक ते नक्कीच करतील असा विश्वास प्रथमत:च विधानपरिषदेचे
सभापती,उपसभापती या दोघांनी विधानपरिषदेतील सदस्यांना दिला.
ना.शंभूराज देसाईंनी
अर्थसंकल्पाचे आणि अर्थसंकल्पावरील मागण्याचे उत्कृष्ट सादरीकरण करुन मागण्या
करणाऱ्या सर्व सदस्यांचे त्यांच्या नावानिशी त्यांनी केलेल्या मागण्यांचा उल्लेख
करुन सदस्यांचे समाधान होणारी समर्पक अशी उत्तरे त्यांच्या भाषणामध्ये दिल्याने
विधानपरिषदेतील सदस्यांनी त्यांचे सभागृहात कौतुक केले. राज्याचे मुख्यमंत्री
ना.उध्दवजी ठाकरेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीचे सरकार राज्यातील
जनतेच्या व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असून सभागृहात सादर केलेला यंदाचा
अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा आहे त्यात त्रुटी काढण्यासारखे काहीच नाही
म्हणूनच विरोधी सदस्यांनीही यावर समाधान व्यक्त केले असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पावरील
मागण्यांच्या उत्तरामध्ये शेवठी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment