दौलतनगर दि.०६:-महाराष्ट्र
राज्याचे गृह व अर्थ,नियोजन राज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी आज महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाचा सन २०२०-२१ या
आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पामध्ये आपले
होमपिच असणाऱ्या सातारा जिल्हयाच्या पदरात झुकते माप त्यांनी टाकले असून सातारा
येथे नविन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करणेकरीता,पाचगणी महाबळेश्वर पर्यटनाला
चालना देणेकरीता विकास आराखडा मंजुरी,सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज
संग्रहालयाकरीता निधी देण्याबरोबर डोंगरी तालुक्याच्या विकासासह पाटण विधानसभा
मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टीने धोरणात्मक असे निर्णय घेत सातारा जिल्हयाच्या पदरात
भरघोस असा निधी मंजुर करुन घेत आवश्यक तेवढया निधीची तरतूद करुन घेण्यास अर्थराज्यमंत्री
म्हणून ते यशस्वी झाले आहेत.
“घार हिंडे आकाशी,चित्त तिचे
पिलापाशी” या म्हणीप्रमाणे सातारा
जिल्हयाचे सुपुत्र व राज्याचे नवनिर्वाचित गृह व अर्थ,नियोजन राज्यमंत्री
ना.शंभूराज देसाईंनी आज राज्याचे अर्थराज्यमंत्री या नात्याने महाराष्ट्र
विधानपरिषदेमध्ये महाराष्ट्र शासनाचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प
सादर केला.सुमारे ०१ तास ११ मिनींटे सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या सातारा
जिल्हयाला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी
अनेक वर्षापासून राजकीय नेत्यांच्या केवळ आश्वासनावर अवलंबून राहिलेले सातारा
येथील नविन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यास व सन २०२१-२२ पासून सदरचे
साताऱ्याचे नविन वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना
करण्याचे शासनाचे नियोजन असल्याची जाहीर घोषणा सभागृहात केली. तसेच सातारा येथील
छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयास रुपये १२ कोटी उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित
असल्याचे सांगून पाचगणी महाबळेश्वर येथे पर्यटनाला चालना मिळणेकरीता विकास
आराखडयाला १०० कोटी रुपये इतका नियतव्यय राखीव ठेवण्यात आला असल्याचे त्यांनी
जाहीर केले.नविन वैद्यकीय महाविद्यालय,छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय,पाचगणी
महाबळेश्वर विकास आराखडयामुळे सातारा जिल्हयाच्या वैभवात वाढच होणार असून
जिल्हयाच्या सुपुत्रांने जिल्हयाला या निर्णयामुळे न्याय मिळवून दिल्याची भावना
सबंध सातारा जिल्हयातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.अर्थराज्यमंत्री म्हणून
विधानपरिषदेमध्ये अर्थसंकल्प मांडत असताना सातारा जिल्हयातील जनतेच्या हिताच्या
दृष्टीने घोषणा करीत असताना ना.शंभूराज देसाईंनी इंचभर छाती फुगवून सातारा या डोंगरी
जिल्हयाला राज्याच्या अर्थसंकल्पात मानाचे स्थान मिळवून दिले आहे.
आपण ज्या मतदारसंघातून राज्याचे नेतृत्व करतो तो पाटण
विधानसभा मतदारसंघ ज्याप्रमाणे डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघ आहे तशाच प्रकारे
सातारा जिल्हयातील इतर मतदारसंघही डोंगरी आणि दुर्गम मतदारसंघ आहेत ही भावना मनी
बाळगून त्यांनी राज्याचे अर्थराज्यमंत्री या नात्याने डोंगरी तालुक्याच्या
हिताच्या दृष्टीने तसेच डोंगरी भागाच्या विकासाकरीता व डोंगरी तालुक्यातील
प्रलंबीत कामे गतीने पुर्ण करण्याची आवश्यकता ओळखून आवश्यक असणारा निधी राज्याच्या
अर्थसंकल्पातून मंजुर करण्याची भूमिका घेतली आणि डोंगरी तालुक्याच्या विकासाकरीता
पहिल्यांदाच सुमारे ९५ कोटी रुपयांचा नियतव्यय यंदाच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित
केला.तर परिवहन महामंडळाच्या जुन्या बस बदलून सुमारे १६०० नवीन बस विकत घेण्यात
येणार असून यातील जास्तीत जास्त बस व मिनीबस सातारा जिल्हयातील डोंगरी तालुक्यात
विभागून देण्याकरीता प्रयत्नशील असून अत्याधुनिक बसस्थानके उभारण्यासाठीही निधी
देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातील शेतकरी यांना न्याय
देण्याबरोबर ना.शंभूराज देसाईंनी त्यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या
विकासाच्या दृष्टीनेही अर्थसंकल्पामध्ये भरीव असा नियतव्यय मंजुर करुन घेतला आहे
यामध्ये पाटण येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुपातंर करुन या
रुग्णालयामध्ये १०० खाटांचे सुसज्ज असे रुग्णालय करण्यास मंजुरी घेतली आहे.तसेच पाटण तालुक्यातील तीन धारी
धबधबा,रामघळ धबधबा,घाटमाथा ते हुंबरळी वॉकींग ट्रॅक,केमसे नाका वॉकींग ट्रॅक या
पर्यटन स्थळांनाही निधी मंजुर करुन घेतला आहे.थोर व्यक्तींच्या
स्मारकांची कामे पुर्ण करणे यातून त्यांनी महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर ता.पाटण येथील
शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाकरीताही निधी मंजुर करुन घेतला
आहे.याची प्रशासकीय मान्यताही शासनाने तात्काळ दिली आहे.
माहे जुलै-ऑगस्ट,२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व
पुरपरिस्थितीमुळे तसेच ऑक्टोंबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या मदतीची वाट न पहाता राज्य शासनाने
त्यांच्या स्वत:च्या निधीतून शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली असल्याचे
सांगून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
मागील दोन वर्षापासून शेतीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंद होते ती वीजजोडणी
करण्याची कार्यवाही सुरु करण्याचे धोरण त्यांनी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केले आहे.तसेच राज्यातील विधीमंडळ सदस्यांच्या आमदार फंडामध्ये ०१
कोटीची वाढ करुन एका वर्षाला ०३ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात येत असल्याची
घोषणा करुन विधीमंडळ सदस्यांना सुखद असा धक्का दिला असून पाटण
विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचेकडे असणाऱ्या वित्त व
नियोजन विभागामुळे त्यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनहितार्थ अनेक कामे
राज्याच्या अर्थसंकल्पातून मंजुर होणेकरीता प्रस्तावित केली असून अर्थराज्यमंत्री
म्हणून या सर्व कामांना कालबध्द मंजुरी घेणेकरीता मी कटीबध्द असून मी विधानपरिषदेमध्ये
सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेश असून राज्यातील शेतकरी वर्गापासून सर्व
जनतेला न्याय देणारा असल्याची प्रतिक्रिया ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
No comments:
Post a Comment