दौलतनगर दि.28:-कोरोना आजाराने सर्वत्र अक्षरश: तैमान घातले असून या आजारापासून दक्षता घेणेकरीता सर्वोत्तोपरी प्रयत्न केले जात आहेत.21 दिवसाच्या लॉकडाऊनमुळे सर्वंत्र संचारबंदी,जमावबंदी करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.या आजारापासून दक्षता घेण्याच्या दृष्टीने सर्वच वृत्तपत्रांनीही त्यांच्या वृत्तपत्रांची छपाई न करता आपली वृत्तपत्रे ही ऑनलाईन प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला आहे. रोज सकाळी उठल्यानंतर पहिले सर्वच वृत्तपत्र वाचण्याची रोजची सवय असल्यामुळे आता ही छपाईची वृत्तपत्रे येणे बंद झाल्यामुळे वृत्तपत्रांना मिस करीत असून गत तीन चार दिवसापासून आता मोबाईलवरच ऑनलाईन बातम्यांचे वाचन करीत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी दिली आहे.
कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये याकरीता ज्या ज्या उपाययोजना करणे शक्य आहे त्या त्या उपाययोजना करण्याचे काम केंद्र तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून सुरु आहे.या उपाययोजनांमध्ये सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोना हा आजार भयंकर असून याचा सामना करण्याकरीता ही संचारबंदी करण्यात आली असून 21 दिवसाच्या लॉकडाऊन मुळे वृत्तपत्रांची छपाई करणाऱ्या वृत्तपत्रांनीही आपला रोजचा अंक छपाई न करता तो ऑनलाईन प्रसिध्द करण्याचे धोरण राबविले आहे. विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन ही वृत्तपत्रे ऑनलाईन जगभरातल्या बातम्या प्रसिध्द करीत असले तरी वृत्तपत्र वाचनाचा एक वेगळाच आनंद असतो.माझा दिवस हा मी कुठेही असलो तरी त्याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व वृत्तपत्राचे वाचन करुनच होतो.कितीही घाईगडबड असली तरी मी सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचनाला मी प्राधान्य देतो. गत तीन चार दिवसापासून छपाईची वृत्तपत्रे येणे बंद झाले असले तरी मी माझे वाचन बंद केले नाही बातम्या वाचनाच्या सवयीमुळे मी माझ्या मोबाईलवर ऑनलाईन सर्व वृत्तपत्रांच्या ई पेपरचे वाचन करुन बातम्या वाचण्याचा आनंद घेत आहे. मात्र छपाईच्या वृत्तपत्राला मी या चार दिवसात खुप मीस केले असल्याचे ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.
No comments:
Post a Comment