दौलतनगर दि.०6:-महाराष्ट्राचे
पोलादी पुरुष माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे दौलतनगर,ता.पाटण येथील
शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी रुपये 1499.98 लक्ष एवढया
रक्कमेच्या सादर केलेल्या अंदाजित किंमतीस वित्त विभाग व नियोजन विभागाने
कामांच्या आराखडा व अंदाजपत्रकाचे प्रस्तावांस प्रशासकीय मान्यता दिली असल्याचा
शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून दि. 05 मार्च, 2020 रोजी पारित केला
असल्याची माहिती गृह,वित्त व नियोजन राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी दिली
आहे.
राज्यमंत्री नामदार शंभूराज देसाई
यांनी म्हंटले आहे,महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते
बाळासाहेब देसाईसाहेब यांचे कर्म आणि जन्मभूमित लोकनेतेसाहेब यांचे सन २०१० चे
जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भव्य असे शताब्दी स्मारक उभारण्याचा आपण
सर्वांनी संकल्प केला होता.आपल्या सर्वांचा संकल्प माझे
सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने पुर्ण केला असून सन २०१५ मध्ये दौलतनगर ता.पाटण
येथे लोकनेतेसाहेब यांचे जन्मभूमित हे शताब्दी स्मारक उभारण्याकरीता मान्यता देवून
राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात १० कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता.सदर शताब्दी स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम दौलतनगर येथे दिमाखात उभे असून या
शताब्दी स्मारकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या स्मृती जिवंत
ठेवण्याचे काम आपण केले आहे. लोकनेतेसाहेब यांचे चिरंतन स्मारक म्हणून या
शताब्दीकडे पाहिले जात असून “महाराष्ट्र दौलत” या नावाने उभे राहिलेल्या या स्मारकामध्ये ग्रामीण भागातील मुलांना एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करता यावा याकरीता चांगली डिजीटल अभ्यासिका आपण उभारली आहे.
शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या
कामांस राज्य शासनाने वाढीवचा १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करावा अशी मागणी आपली
राज्य शासनाकडे होती. राज्याचा अर्थ खात्याचा मंत्री म्हणून माझी निवड झालेनंतर
तात्काळ लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या
टप्प्याचे बांधकामास आवश्यक असणारा १५ कोटी रुपयांचा निधी मिळावा याकरीता शासनाकडे
पाठपुरावा केला त्यानुसार दोन महिन्याच्या आतच महाविकास आघाडीच्या शासनाला १००
दिवस पुर्ण होत असताना राज्य शासनाने दौलतनगर,ता.पाटण येथे माजी गृहमंत्री लोकनेते
बाळासाहेब देसाई यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी
रुपये 1499.98लक्ष एवढया रक्कमेच्या सादर केलेल्या अंदाजित किंमतीस वित्त विभाग व
नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचा शासन निर्णय ही सामान्य
प्रशासन विभागाकडून दि. 05 मार्च, 2020 रोजी पारित केला आहे. दि.१० मार्च २०२०
रोजी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची ११० जयंती दौलतनगर येथे साजरी होत आहे.
११० व्या जयंती कार्यक्रमापुर्वी राज्य शासनाने शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या
टप्प्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिल्याचा अत्यानंद आहे. या दुसऱ्या
टप्प्याच्या शताब्दी स्मारकामध्ये भव्य असे ऑडिटोरिय तसेच एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. चा अभ्यासिकेमध्ये अभ्यास
करण्याकरीता येणाऱ्या ग्रामीण भागातील मुला- मुलींचे वसतीगृह
उभारण्याचा आमचा मानस आहे. महाविकास आघाडीच्या शासनाने लोकनेते बाळासाहेब
देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामांकरीता प्रशासकीय
मान्यता दिल्याबदृल राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे, अर्थमंत्री
ना.अजितदादा पवार यांचे मी आभार व्यक्त करतो असेही ना.शंभूराज देसाईंनी म्हंटले
आहे.
चौकट:- राज्याच्या अर्थसंकल्पात
शताब्दी स्मारकाच्या कामांस भरीव निधीची तरतूद.
सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मी विधानपरिषदेमध्ये दि.०६ मार्च
रोजी सादर केला असून या अर्थसंकल्पामध्ये सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता ३५ कोटी
रुपयांच्या निधीची तरतूद राज्यातील महान व्यक्तींच्या स्मारकांकरीता केली आहे
यातून लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे शताब्दी स्मारकाच्या दुसऱ्या
टप्प्याच्या कामांस भरीव अशी निधीची तरतूद केली असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी
सांगितले.
No comments:
Post a Comment