Friday, 31 August 2018

कधीही न होणारे आमचे रस्ते केवळ आमदार शंभूराज देसाई यांचेमुळे मंजुर होवून पुर्ण झाले व होणार. रस्त्यांची कांमे पुर्ण झालेल्या व मंजुर झालेल्या पाटण तालुक्यातील ३७ गांवाकडून आमदार शंभूराज देसाईंचे विशेष आभार.





दौलतनगर दि.३१ :- पाटण तालुका डोंगरी, दुर्गम असून या तालुक्यातील अनेक गांवे आणि वाडयावस्त्या या डोंगरी भागात तर डोंगरपठारावर वसलेली आहेत.या गांवाना आणि वाडयावस्त्यांची वर्षानुवर्षे रस्ता ही मुलभूत गरज पुर्ण न  झाल्याने या गांवात ना सुविधा पोहचल्या ना, या गांवाचा वाडयावस्त्यांचा विकास झाला.रस्त्याअभावी अशी 40 हुन अधिक गांवे व या गावांना तसेच वाडयावस्त्यांना जोडणारी सुमारे ३० हुन अधिक अनेक गांवे वाडयावस्त्या या रस्ता या मुलभूत गरजेपासूनच वंचीत राहिली.मात्र डोंगरपठारावरच्या जनतेची रस्त्याची मुलभूत गरज ओळखली ती तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी. आमदार झाले झाले त्यांनी पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील गांवाना जोडणारे मुख्य रस्ते करण्याची धडक मोहिम हाती घेतली. त्यात त्यांना मोठे यश मिळाले असून पाटण तालुक्यातील डोंगरपठारावरील २० हुन अधिक गांवे व या गांवापर्यंत जाणारी १७ हुन अधिक अशी ३७ गांवे आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या निधीमधून जोडली गेली आहेत कधीही न होणारे आमचे रस्ते केवळ आमदार शंभूराज देसाई यांचेमुळेच मंजुर होवून पुर्ण झाले व होणार आहे अशा प्रतिक्रिया डोंगरपठारावरील गांवे व वाडया वस्त्यातील नागरिकांमधून व्यक्त होत असून ३७ गांवानी आमदार शंभूराज देसाईंच्या या कामगिरीबद्दल विशेष आभारही व्यक्त केले आहेत.
                  पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पहिल्या टर्ममध्ये माजी बांधकाम मंत्री यांच्या कार्यकालात ते बांधकाम मंत्री असतानाही अनुशेष राहिलेल्या १३० गांवाना प्राधान्याने रस्ते मिळवून देण्याचे काम केले होते तर दुस-यांदा आमदार झालेनंतर पाटण तालुक्यातील महत्वाचे रस्त्यांचे जाळे निर्माण करुन जनतेची ब-यांच वर्षाची दळणवळणाची सोय दुर करण्याचे काम हाती घेतले.गेली चार वर्षे ते आपल्या पाटण मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांना शासनाच्या तिजोरीतून विविध योजनांमधून कशाप्रकारे निधी आणता येईल याकडे लक्ष केंद्रीत करुन रस्त्यांच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येते.डोंगरी भागातील रस्त्यांची कामे तात्काळ मार्गी लावणेकरीता त्यांनी हक्काच्या आमदार फंडाबरोबर जिल्हा नियोजन विभागातून लहान रस्त्यांच्या कामांना तसेच मोठया रस्त्यांच्या कामांना केंद्रीय महामार्ग निधी, शासनाचा अर्थसंकल्प, नाबार्ड योजना,रस्ते व पुल दुरुस्ती कार्यक्रम तसेच २५१५ योजना,मुख्यमंत्री ग्रामसडक योजना,हरीत ऊर्जा विकास विभाग यांचेकडून कोटयावधी रुपयांचा निधी या कामांकरीता मंजुर करुन आणला आहे.सदरचा निधी मंजुर होणेकरीता त्यांचा सुरु असलेला सातत्याचा पाठपुरावा हा वाखणण्याजोगा आहे.मतदारसंघात विविध कामांच्या निमित्ताने फिरत असताना विभागातील रस्त्याची पहाणी केले की लगेच हा रस्ता कोणत्या योजनेत बसू शकतो या कामाला कसा निधी मंजुर करुन आणता येईल याचे धोरण ते स्वत:च ठरवितात आणि त्यादृष्टीने ते कामकाजाला सुरुवात करतात हे तालुक्यातील जनतेने अनेकदा पाहिले आहे आणि अनुभवले देखील आहे.त्यांनी गेल्या चार वर्षात मंजुर करुन आणलेल्या विविध योजनांच्या निधीमधून अनेक कामे मार्गी देखील लागली असून अनेक कामे मंजुर होवून प्रत्यक्ष कामांला सुरुवात होत आहेत.
                यामध्ये डोंगर पठारावरील हरीत ऊर्जा विकास व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आसवलेवाडी ते भालेकरवाडी ४.५०० किमी.गुरेघर ते पाचगणी रस्ता ९.२०० किमी,दिक्षी ते आटोली ८.५०० किमी,काहिर ते हुंबरणे ३.०० किमी,गोकूळ तर्फ पाटण ते काहिर ८.५०० किमी,खळे ते शिद्रुकवाडी 3.100 किमी, काढणे ते बागलवाडी 4.900 किमी,रासाठी ते गाढखोप 2.800 किमी हे 16 कोटी ३८ लक्ष रुपयांचे रस्ते पुर्ण झाले आहेत तर १ कोटी ७५ लक्ष रुपयांचे शिद्रुकवाडी गावपोहोच रस्ता 3.200 किमी रस्त्याचे काम सुरु झाले आहे.कंकवाडी बनुपरी ते कडववाडी 3.000 किमी,मारुल तर्फ पाटण ते बाजेगांव 3.500 किमी,दुसाळे पोहोच 2.400 किमी,गुढे ते शिबेवाडी वरची 3.200 किमी या कामांच्या निविदा पुर्ण झाल्या असून कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत. ही कामे ८ कोटी ४४ लक्ष १६ हजार रुपयांची आहेत.आंबेघर तर्फ मरळी ते पाळशी ३.५०० किमी,जुळेवाडी वाल्मिकी ते कदमवाडी 1.300 किमी,कसणी ते निगडे माईगंडेवाडी ८.००० किमी,निवी ते कसणी 4.५०० किमी ही कामे निविदास्तरावर असून ही कामे ६ कोटी ३५ लाख ६५ हजार रुपयांची आहेत.कडवे खुर्द ते वरची केळेवाडी 5.000 किमी,बनपेठ ते रोमणवाडी 3.500 किमी,म्हारवंड गावपोहोच 5.500 किमी या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही कामे ११ कोटी ३७ लक्ष २४ हजार रुपयांची आहेत. मंजुर झालेली कांमे ९१.१०० किमीची असून याकरीता ४४ कोटी ३० लक्ष ०७ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. कधीही न होणारे आमचे हे डोंगरपठारावरील रस्ते केवळ आमदार शंभूराज देसाई यांचेमुळेच पुर्ण झाले आहेत व होणारही आहेत अशी प्रतिक्रिया डोंगर पठारावरील गांवानी व्यक्त केली असून डोंगर पठारावरील या ३७ गांवाना रस्त्याची मुलभूत सुविधा मिळवून दिल्याबद्दल येथील जनता आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त करीत आहे.
चौकट:- ३३ गांवांना जोडणारे ८३.७०० किमीचे १९ रस्ते प्रस्तावित,मंजुरीच्या स्तरावर.
             मुख्यमंत्री ग्रामसडक व हरीत ऊर्जा विकास योजनेतून गणेवाडी पोहोच रस्ता 5.400 किमी,सडादाढोली ते महाबळवाडी 2.500 किमी,जळव खिंड ते जांभेकरवाडी 1.250 किमी, जंगलवाडी चाफळ पोहोच रस्ता 4.150 किमी,घोट ते बोर्गेवाडी 3.200 किमी,महिंद स्टॉप ते माथणेवाडी ते बोर्गेवाडी ते वरपेवाडी 3.300 किमी,काळगांव वेताळवस्ती ते मस्करवाडी 1.200 किमी,वर्पेवाडी गोकुळ तर्फ पाटण पोहोच रस्ता 1.500 किमी,पाचगणी ते नागवाणटेक 3.200 किमी, आटोली ते भाकरमळी रस्ता 1.500 किमी,जिंती मोडकवाडी ते सातर १०.०० किमी,घोट ते जन्नेवाडी 7.00 किमी,करपेवाडी ते टेटमेवाडी 4.00 किमी,लोटलेवाडी काळगाव ते डाकेवाडी ते कसणी 7.00 किमी,डावरी ते चोपडेवाडी ते भालेकरवाडी 2.500 किमी,गावडेवाडी ते खुडुपलेवाडी 3.00 किमी,सातेवाडी नाटोशी ते जाधववाडी 4.00 किमी,मान्याचीवाडी ते मोरेवाडी ते माटेकरवाडी ते वरपेवाडी 4.00 किमी,जुळेवाडी फाटा ते वाल्मिकी १५.०० किमी अशी ३३ गांवाना जोडणा-या ८३.७०० किमी रस्त्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली असून मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर आहेत.

Wednesday, 29 August 2018

एकाच वेळी ११८ गांवाच्या नळ पाणी पुरवठा योजना मंजुर होणे ही पाटण तालुक्याचे आतापर्यंतचे वाटचालीतील पहिलीच घटना. आमदार शंभूराज देसाई यांचेमुळे जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील गांवाचा समावेश.




दौलतनगर दि.२९ :- डोंगरी विभागाने वेढलेला पाटण तालुका. पाटण तालुक्यातील प्रमुख असणा-या कोयना वांग, उत्तरमांड, मोरणा व तारळे नदयांच्या दोन्ही बाजूची काही ठराविक गांवे व वाडया सोडल्या तर या तालुक्यातील बहूतांशी गांवे व वाडयावस्त्या या डोंगरपठारावर वसलेल्या आहेत.त्यामुळे येथील जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करणे हे क्रमप्राप्तच असल्याने त्या दृष्टीने येथे विकासाचे धोरण ठरवावे लागते.या तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी आमदार झालेपासून जनतेच्या मुलभूत गरजा पुर्ण करणे हा एककलमी कार्यक्रमच हाती घेतला आहे.मग त्यात डोंगरी भागातील गावांना जोडणा-या रस्त्यांची कामे असोत वा पिण्याच्या पाण्याच्या योजना असोत. ही कामे पुर्णत्वाकडे नेण्याकरीता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात. शासनाच्या विविध योजनांचा निधी आपल्या तालुक्यात कशाप्रकारे आणता येईल याकडे ते लक्ष केंद्रीत करतात.त्याचाच एक भाग पाहिला तर दोन चार दिवसापुर्वी राज्य शासनाने सातारा जिल्हयातील डोंगरी भागातील गांवांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांचा तयार केलेला आराखडा व त्यास दिलेली मंजुरी जाहीर केली असून जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील ११८ गांवाचा यामध्ये  समावेश आहे.एकाच वेळी ११८ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणे ही पाटण तालुक्याचे आतापर्यंतचे वाटचालीतील पहिलीच घटना असून तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांचेमुळेच जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील गांवाचा समावेश झाला आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.
                  सातारा जिल्हयातील पाटण तालुक्याकडे पाहिले की असे दिसून येते हा तालुका आठ गठामध्ये विखुरलेला तालुका असून प्रत्येक विभागात जायचे म्हंटले तर एक तरी डोंगर ओलांडून जावे लागते.पाटण तालुक्यात कोयना नदी ही प्रमुख नदी मानली जाते.तसेच वांग,उत्तरमांड,मोरणा आणि तारळे खो-यातील नदयांचाही समावेश होतो.नदयांकडेच्या दोन्ही बाजूची हिरव्या पट्टयातील काही ठराविक गांवे व वाडया सोडल्या तर या तालुक्यातील बहूतांशी गांवे व वाडयावस्त्या या डोंगरपठारावर वसलेल्या आपल्याला दिसून येतात.डोंगरपठारा वरील गांवाच्या आणि वाडयावस्त्यांच्या मुळच्या प्रमुख गरजा दोन,पहिली म्हणजे गांवाला, वाडीवस्तीला जोडणारा मुख्य रस्ता आणि दुसरे म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय.तालुक्याच्या विकासाकरीता डोंगरपठारावरील गांवाना त्यांच्या प्रमुख असणा-या या दोन मुलभूत गरजा दिल्याशिवाय तालुक्याचा विकास अशक्य आहे.याची पुरेपुर जाणिव या तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांना असल्यामुळे तालुक्याच्या आणि तालुक्यातील जनतेच्या विकासाच्या दृष्टीनेच त्यांच्या मुलभूत गरजांचा आराखडा त्‍यांनी तालुक्याचे आमदार म्हणून गत चार वर्षात तयार केला असून शासनाच्या विविध योजनांमधून रस्ता नसणा-या गांवाना,वाडयावस्त्यांना रस्ता मिळवून देणे,ज्या गांवात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे किंवा भासणार आहे तसेच ज्या गांवातील पिण्याच्या पाण्याच्या योजना कालबाह्य झाल्या आहेत त्या गांवाना आणि वाडयावस्त्यांना नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन देणे हा एककलमी कार्यक्रमच आमदार शंभूराज देसाई यांनी हाती घेतला असून शासनाच्या विविध योजनेत गरजेची आणि सुचविलेली कामे लवकरात लवकर पुर्णत्वाकडे कशी नेता येतील याकरीता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असल्याचे आणि त्यापध्दतीनेच त्यांचे कामकाज सुरु असल्याचे आपल्याला पहावयास मिळत आहे.
                 त्यातीलच एक भाग हा पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा आहे. तालुक्यातील ज्या डोंगरी गांवामध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे तसेच मधल्या पट्टयातील ज्या सकल गांवातील पिण्याच्या पाण्याच्या योजना कालबाह्य झाल्या आहेत त्या गांवाना आणि वाडयावस्त्यांना शासनाने नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन दयाव्यात याकरीता त्यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी मुहुर्त स्वरुप दिले असून ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी चारच दिवसापुर्वी सातारा जिल्हयातील डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातील टंचाईग्रस्त तसेच कालबाह्य झालेल्या नळपाणी पुरवठा योजना करणेकरीता राज्य शासनाने तयार केलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा यंदाच्या वर्षीचा आराखडा आणि त्याकरीता लागणा-या निधीची मंजुरी जाहीर केली असून यामध्ये आमदार शंभूराज देसाई यांच्या मागणीप्रमाणे पाटण तालुक्यातील एकूण ११८ गांवातील पाणी पुरवठा योजनांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समावेश करुन या ११८ योजनांच्या कामांकरीता एकूण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधीही मंजुर करण्यात आला आहे. आमदार शंभूराज देसाई यांच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्हयात सर्वात जास्त पाटण तालुक्यातील ११८ गांवाचा यामध्ये समावेश असल्याने एकाच वेळी ११८ गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांना मंजुरी मिळणे ही पाटण तालुक्याचे आतापर्यंतचे वाटचालीतील पहिलीच घटना म्हणावी लागेल.तालुक्याला कार्यक्षम लोकप्रतिनिधी मिळाल्यानंतर कशाप्रकारे शासनाच्या विविध योजनांचा निधी आपल्या तालुक्यात आणता येतो याचा प्रत्यय आमदार शंभूराज देसाई यांच्या रुपाने तालुक्यातील जनतेला आला व येत असल्याने एकाच वेळी सातारा जिल्हयात सर्वात जास्त म्हणजे ११८ गांवाना व वाडयावस्त्यांना नळ पाणी पुरवठा योजना मंजुर करुन आणलेबद्दल तालुक्यातील जनता आमदार शंभूराज देसाई यांना धन्यवाद देत आहे.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंचे लक्षवेदी सुचनेमुळे योजनांना मंजुरी.
             पाटण तालुक्यातील टंचाईग्रस्त व कालबाह्य नळपाणी पुरवठा योजना नव्याने करणेकरीता निधी मंजुर करावा यासाठी आमदार शंभूराज देसाईंनी गतवर्षी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेदी सुचनेवर आमदार देसाईंनी मागणी केलेल्या पाटण तालुक्यातील आवश्यक असणा-या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी देण्याचे आश्वासन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी दिले होते त्यानुसार या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे.आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या पाठपुराव्याचा हा परिपाक आहे..

Monday, 27 August 2018

शहीद जवान कै.गजानन मोरे यांचे १८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार शंभूराज देसाई यांचेकडून अभिवादन.





दौलतनगर दि.२७:- सन 1999 ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे आज दि. 27 ऑगस्ट रोजीचे 18 वे पुण्यस्मरण दिनानिमित्त पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिवर्षाप्रमाणे शहिद जवान कै.गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. शहिद जवान कै.गजानन मोरे यांचे वडीलांचे यावर्षी निधन झालेने यंदाच्या वर्षीचा पुण्यस्मरण दिनाचा कार्यक्रम आमदार शंभूराज देसाई यांचे उपस्थितीत अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे आणि उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी.ए.भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  प्रारंभी आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद जवान कै.गजाजन मोरे यांचे भूडकेवाडी ता.पाटण येथील शहीद स्मारकातील अर्धाकृती पुतळयाला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून अभिवादन करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण केले. अभिवादनानंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते शहीद स्मारक पुढील ध्वजारोहण करण्यात आला.याठिकाणी भुडकेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तसेच कडवे येथील माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर केले.त्यानंतर शहीद कै.गजानन मोरे यांचे वडील कै.पांडूरंग मोरे यांना उपस्थितांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.
               देशाच्या संरक्षणासाठी सातारा जिल्हयातील अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. यामध्ये सर्वाधिक जवान हे पाटण तसेच कराड तालुक्यातील आहेत. सन 1999 ला झालेल्या कारगील युध्दात शहिद झालेले पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील शहिद जवान कै.गजानन मोरे हे त्यातीलच एक. पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने प्रतिवर्षी आजच्या दिवशी शहिद जवान कै.गजानन मोरे यांचा स्मृतीदिन भुडकेवाडी या डोंगराळ व दुर्गम भागात साजरा करुन शहिद जवान कै. मोरे यांच्या स्मृतिला उजाळा दिला जातो. प्रतिवर्षी आमदार शंभूराज देसाई यांचे विनंतीवरुन जिल्हास्तरीय अधिकारी याठिकाणी उपस्थित राहून कै.मोरे यांना अभिवादन करतात.  
              कार्यक्रमास याप्रसंगी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक गजानन जाधव, सोमनाथ खामकर,बबनराव भिसे,माजी पंचायत समिती सदस्य बबनराव शिंदे, शिवदौलत सहकारी  बँकेचे संचालक अभिजित पाटील, राजेंद्र चव्हाण यांच्यासह विविध गावचे सरपंच,सदस्य कै.गजानन मोरे यांच्या मातोश्री श्रीमती चतुराबाई मोरे आणि त्यांचे कुटुंबिय यांची  प्रमुख उपस्थिती होती.


जनसुविधा योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायत कार्यालय व ८ गावांच्या स्मशानभूमि सुधारणा कामांना ६९.५० लाख रुपयांचा निधी मंजुर. कामांचे प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त - आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.२7 :- जिल्हा नियोजन समितीतंर्गत सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायतींना जन सुविधा पुरविणेसाठी देण्यात येणा-या विशेष अनुदानातून पाटण तालुक्यातील ४ ग्रामपंचायत कार्यालय व ८ गावांच्या स्मशानभूमि सुधारणा करण्याच्या कामांना ६९.५० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला असून या कामांचे प्रशासकीय मान्यता आदेशही प्राप्त करुन देण्यात आले असून लवकरच या कामांच्या निविदा प्रसिध्द होवून कामांना सुरुवात होईल अशी  माहिती आमदार शंभूराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
         आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकांत म्हंटले आहे, जिल्हा नियोजन समितीतंर्गत ग्रामपंचायतींना जनसुविधा व नागरी सुविधा पुरविणेसाठी प्रतिवर्षी अनुदान देण्यात येते. यंदाच्या वर्षी सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायतींना जनसुविधा पुरविणेसाठी पाटण तालुक्यातील चार ग्रामपंचायती व ८ गांवातील स्मशानभूमि सुधारणा करणे ही कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेतंर्गत या कामांना विशेष अनुदानातून ग्रामपंचायत कार्यालय बांधणेसाठी अनुक्रमे मौजे पवारवाडी कुठरे ग्रामपंचायतीस १०.०० लक्ष रुपये, धावडे ग्रामपंचायत कार्यालय १०.00 लक्ष, दुसाळे ग्रामपंचायत कार्यालय १०.०० लक्ष व मुळगांव ग्रामपंचायत कार्यालय ०८.०० लक्ष असे ३८ लक्ष रुपयांचा निधी ग्रामपंचायत कार्यालये बांधणेकरीता मंजुर करण्यात आला आहे तर ८ गांवातील स्मशानभूमि पोहोच रस्ते, निवारा शेड, स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे,स्मशानभूमिचे ठिकाणी पाण्याची टाकी उभारणे या कामाकरीता ३१.५० लक्ष रुपयांचा असे एकूण ६९.५० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. मौजे मोरेवाडी कुठरे येथे स्मशानभूमि पोहोच रस्ता करणे ४.०० लक्ष, मरळी येथे स्मशानभूमि निवारा शेड व स्मशानभूमि रस्ता करणे ५.०० लक्ष   आडूळपेठ येथे स्मशानभूमि व रस्ता सुधारणा करणे ४.०० लक्ष,कडववाडी (नानेगांव) स्मशानभूमि सुधारणा करणे ३.५० लक्ष, धुमुकवाडी (मुरुड) येथे स्मशानभूमि व पाण्याची टाकी ते स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे ३.०० लक्ष, झाकडे बौध्दवस्ती स्मशानभूमि रस्ता सुधारणा करणे ४.०० लक्ष, माणगांव येथे स्मशानभूमि बांधणे ४.०० लक्ष व पापर्डे येथे स्मशानभूमि सुधारणा करणे ४.०० लक्ष असा निधी मंजुर करुन देण्यात आला आहे. या कामांच्या प्रशासकीय मान्यता आदेशही संबधित यंत्रणेकडून प्राप्त करुन देण्यात आले असून मंजुर झालेल्या या  कामांना लवकरात लवकर सुरुवात करण्याचे आदेश संबधित विभागांना देण्यात आले असल्याचेही आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.


Saturday, 25 August 2018

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ६ मोठया रस्त्यांच्या कामांना १६ कोटी ३5 लक्ष रुपयांच्या निधीची शासनाची मंजुरी. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.२५ :- राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सन २०१८-१९ करीता सुचविण्यात आलेल्या पाटण तालुक्यातील सहा मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२३ ऑगस्ट, २०१८ रोजी पारित केला आहे.पाटण तालुक्यातील विविध भागातील सहा महत्वाच्या रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ३४ लाख ७७ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असून २१.७७० किलोमीटर रस्त्याची लांबी या निधीतून पुर्ण होणार असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील ग्रामीण आणि डोंगरी भागातील मोठया रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत प्रतिवर्षाप्रमाणे सन २०१८-१९ मध्ये आवश्यक असणारा निधी मंजुर करणेविषयी राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचेकडे विनंती करुन सहा कामांचे प्रस्ताव शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबधित यंत्रणेमार्फत सादर करण्यात आले होते.सदरच्या कामांना ग्रामीण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे सुचनेवरुन राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता देवून या सहा रस्त्यांच्या कामांकरीता १६ कोटी ३४ लाख ७७ हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीमधून २१.७७० किलोमीटर रस्त्याची लांबी पुर्ण होणार आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांमध्ये पाटण तालुक्यातील आंबळे घोट ते जुगाईवाडी रस्ता करणे ५.०० किमी ३ कोटी ०८ लाख ३७ हजार, कडवे खुर्द ते वरची केळेवाडी रस्ता करणे ५.०० किमी ४ कोटी ९६ लाख ९२ हजार, बहुले ते हावळेवाडी रस्ता करणे १.१५० किमी ९५ लाख ५४ हजार, तामकणे गावपोहोच रस्ता करणे ०१.०० किमी ६४ लाख ९० हजार, बनपेठ येराड ते रोमणवाडी रस्ता करणे ३.५०० किमी ०२ कोटी २० लाख ५९ हजार व म्हारवंड गावपोहोच रस्ता करणेकरीता ५.५०० किमी ३ कोटी ६८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर या सहाही कामांची पाच वर्षाकरीता नियमीत देखभाल दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे १९ लाख, १७ लाख ४२ हजार, ५ लाख ९६ हजार, ३ लाख ७६ हजार, १२ लाख ९७ हजार व २० लाख ८५ हजार रुपयांची तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने दि.२३ ऑगस्ट, २०१८ रोजी पारित केला आहे या कामांच्या निविदा लवकरच प्रसिध्द होवून या कामांना लवकरच सुरुवात होईल असेही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात म्हंटले असून सदरचे ग्रामीण भागातील अडचणीतील हे रस्ते पुर्ण करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या सहा गांवातील ग्रामस्थांनी आमदार शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील ११८ गांवाचा समावेश. एकूण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधी मंजुर. यंदाच्या वर्षी ७९ नवीन कामे मंजुर. आमदार शंभूराज देसाईंची माहिती.




दौलतनगर दि.२५ :- पाटण या डोंगरी आणि दुर्गम तालुक्यातील टंचाईग्रस्त तसेच कालबाह्य झालेल्या नळपाणी पुरवठा योजना करणेकरीता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचेकडे आवश्यक असणारा निधी मंजुर करणेकरीता केलेल्या मागणीनुसार पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांनी पाटण तालुक्यातील एकूण ११८ गांवातील पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत केला असून या ११८ योजनांच्या कामांकरीता एकण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात ७९ नवीन नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करुन या कामांना निधी मंजुर करण्यात आला  असल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
    पत्रकामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की, पाटण तालुक्यातील डोंगरी, दुर्गम आणि पठारावरील अनेक गांवे व वाडयावस्त्यांमधील नळ पाणी पुरवठा योजना या कालबाह्य झाल्या आहेत तर अनेक ठिकाणी नव्याने करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा समावेश हा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत करावा अशी आग्रही मागणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचेकडे केली होती. राज्य शासनाच्या पाणी पुरवठा विभागाने सन २०१७-१८ व २०१८-१९ असा संयुक्तपणे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचा आराखडा तयार केला होता.त्यामध्ये सन २०१७-१८ आर्थिक वर्षात पाटण तालुक्यातील ३९ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे तर सन २०१८-१९ आर्थिक वर्षात ७९ नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात येवून एकूण ११८ योजनांचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत समावेश करण्यात आला आहे. सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने ७९ नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनी मंजुरी देण्यात आली असून  या ११८ योजनांच्या कामांकरीता एकण २३ कोटी ५८ लक्ष १४ हजार रुपयांचा निधी मंजुर करुन देण्यात आला आहे. यामध्ये सन २०१८-१९ च्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या आराखडयात नव्याने मंजुर करण्यात आलेल्या ७९ गांवामध्ये पांढरेपाणी,जंगलवाडी चाफळ,कोळगेवाडी, मुट्टुलवाडी चौगुलेवाडी,नवजा कामरगांव,गलमेवाडी,बोर्गेवाडी घोट,फडतरवाडी घोट,चाफळ,काढोली,काहीर,काहीर वरची वस्ती,काळगांव, लोहारवाडी काळगांव,लोटलेवाडी काळगांव,कामरगांव,मानाईनगर कामरगांव, काठी,किल्लेमोरगिरी दलितवस्ती, मोगरवाडी कोजंवडे,मरळोशी,मस्करवाडी नं.१,शेडगेवाडी मस्करवाडी,जाधववाडी नाटोशी,नुने,पाचगणी, खडकचावाडा पाचगणी,पाळशी,रुवले,साईकडे,कोतावडेवाडी साखरी,शिद्रुकवाडी,तामिणे,ताईगडेवाडी तळमावले, सलतेवाडी वाझोली,भिलारवाडी,आटोली,मसुगडेवाडी पाडळोशी,पाडळोशी,तावरेवाडी पाडळोशी,गणेवाडी ठोमसे, उधवणे,बौध्दवस्ती झाकडे,आंबेघर तर्फ मरळी दलितवस्ती,आटोली बौध्दवस्ती,भारसाखळे,जौरातवाडी, चाफळ बौध्दवस्ती, चिटेघर, बौध्दवस्ती चोपदारवाडी, वर्पेवाडी गोकुळ, कडवे खुर्द बौध्दवस्ती, काळगांव बौध्दवस्ती, काळेवाडी काळगांव,केळोली बौध्दवस्ती,कुसरुंड मागासवर्गीय वस्ती, मंद्रुळकोळे, कुभांरवाडा मंदुळकोळे, मंदुळकोळे खुर्द,यादववाडी मंदुळकोळे,मानेगांव,मणेरी बौध्दवस्ती,मराठवाडी,मस्करवाडी नवीन वसाहत,पाटीलवाडी मस्करवाडी नं.१,मोगरमाळ म्हावशी,नावडी बौध्दवस्ती, निसरे, सडावाघापूर, साखरी बौध्दवस्ती,विठ्ठलवाडी शिरळ, शिंवदेश्वर बौध्दवस्ती, उरुल शिवाजीनगर, वेखंडवाडी, वेखंडवाडी खबालवाडी, वांझोळे, डोणीचावाडा व धामणी या ७९ गांवातील नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला आहे. एवढया मोठया संख्येने पाटण या डोंगरी तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत करुन सन २०१७-१८ व २०१८-१९ मधील आराखडयात करुन या ११८ गावातील नळ पाणी पुरवठा योजनांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन दिलेबद्दल आमदार शंभूराज देसाई यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.बबनराव लोणीकर यांचे आभार व्यक्त केले असून एवढया मोठया प्रमाणात अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची गैरसोय असणा-या गांवाना राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत निधी उपलब्ध झाल्याने या गांवाची पिण्याच्या पाण्याची गैरसोय दुर होण्यास फार मोठी मदत होणार असल्याने आपण यासंदर्भात अत्यंत समाधानी असल्याची प्रतिक्रियाही आमदार शंभूराज देसाईंनी पत्रकात व्यक्त केली आहे.
चौकट:- सातारा जिल्हयात सर्वाधिक जास्त ११८ नळ पाणी पुरवठा योजनांचा आराखडयात समावेश.
राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत सातारा जिल्हयातील एकूण ५६८ एवढया नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश करण्यात आला असून आमदार शंभूराज देसाईंच्या सातत्याच्या प्रयत्नामुळे पाटण तालुक्यातील ११८ इतक्या सर्वाधिक नळ पाणी पुरवठा योजनांचा समावेश राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत झाला आहे.




Friday, 24 August 2018

बांधकाम मंत्र्यांच्या काळात कराड चिपळूण रस्त्यावर दोन ठिकाणी टोल घेवूनही खड्डे मुजविले होते का? आमदार शंभूराज देसाईंनी बिनटोलचा रस्ता दिलाय, काम सुरु आहे, जरा धिर धरा. खड्यात झाडे लावणा-यांना देसाई गटाच्या पदाधिका-यांचा इशारा.



दौलतनगर दि.२४:- आमचे नेते पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांचेकडे पाठपुरावा करुन केंद्रीय महामार्ग योजनेतून प्रत्यक्षात एकूण ३२० कोटी रुपयांच्या मंजुर करुन आणलेल्या आणि प्रत्यक्षात रस्त्याच्या कामांस सुरुवात झालेल्या कराड चिपळूण या रस्त्यावर रस्त्याचे काम सुरु असताना पडलेल्या खड्डयात झाडे लावून स्टंटबाजी करणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो, तुमच्या बांधकाम मंत्र्यांच्या काळात याच रस्त्यावर दोन ठिकाणी टोल लावला होता.टोल घेवूनही त्यांना पडलेले खड्डे मुजविता आले नव्हते.हे तुम्हालाही माहिती आहे.तुमच्या नेत्यांप्रमाणे आमचे नेते नुसत्या घोषणा करीत नाहीत तर प्रत्यक्षात काम करुन दाखवितात म्हणूनच त्यांनी ३२० कोटी रुपयांचा बिनटोलचा रस्ता मंजुर करुन दिलाय,रस्त्याचे काम सध्या सुरु आहे,बिनटोलचा डांबरी नाही तर काँक्रीटचा रस्ता कसा असतो हे तुम्हाला लवकरच दिसेल.स्टंटबाजी आम्हालाही करता येते पण थोडा धीर धरा असा इशारा देसाई गटाच्या पदाधिका-यांनी निसरे येथे खड्डयात झाडे लावणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिला आहे.
            विहे,मल्हारपेठ, नाडे व अडूळ येथील देसाई गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,आमचे नेते पाटणचे लोकप्रिय आमदार शंभूराज देसाई यांना माजी बांधकाम मंत्र्यांप्रमाणे कोटयावधी रुपयांच्या केवळ घोषणा करण्याची सवय नाही तर कोटयावधी रुपयांचा निधी तालुक्यातील कामांना प्रत्यक्षात कसा मिळतो हे त्यांनी पाटण तालुक्याला आणि पर्यायाने विरोधकांनाही दाखवून दिले आहे.आमदार शंभूराज देसाई यांचे विशेष प्रयत्नामुळेच केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केंद्रीय महामार्ग योजनेतून कराड ते चिपळूण रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देवून ३२० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन दिला आहे. हा रस्ता डांबरीकरण नाहीतर काँक्रीटी करणाचा होणार आहे. त्याची लांबी सुमारे ६३ ते ६५ किलोमीटरची आहे. तालुक्याच्या माजी बांधकाम मंत्र्यांना राज्याचे कॅबिनेट बांधकाम मंत्री असतानाही एवढया लांबीच्या रस्त्याकरीता राहू दया परंतू १० ते १५ किलोमीटरच्या रस्त्याला काँक्रीटीकरण करणेकरीता सुध्दा राज्याच्या तिजोरीतून निधी आणता आला नाही व नव्हता.त्यांनी बांधकाम मंत्री असताना याच कराड ते चिपळूण रस्त्यावरील कराड ते नाडे या भागात २५ किलोमीटरचा केलेला रस्ता हा सरळमार्गाने तालुक्यातील जनतेच्या पदरात न टाकता बांधा,वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर तालुक्यातील जनतेच्या टोलच्या रुपाने मानगुटीवर बसविला होता.रस्ता २५ किलोमीटरचा आणि यात दोन ठिकाणी त्यांनी टोल लावला. हा कुठला न्याय. सर्वसामान्य जनतेकडून टोल वसूल करुनही माजी बांधकाम मंत्र्यांना त्या काळात रस्त्यावर पडलेले खड्डे मुजविते आले नव्हते.हे तालुक्याचे दुर्दैव होते.उलट आमदार शंभूराज देसाईंच्या प्रयत्नामुळे मंजुर झालेल्या ६५ मिलोमीटरच्या बिनाटोलच्या रस्त्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात देखील झाली आहे.बिनाटोलचा काँक्रीटीकरणाचा रस्ता कसा होणार हे आता तालुक्यातील जनतेला दिसू लागले आहे. हा फरक माजी बांधकाम मंत्री आणि विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांच्या कामातील असून केवळ घोषणा आणि आश्वासने देण्यात आमचे नेते वेळ घालवित नाहीत ते जनतेला दिलेल्या आश्वासनाची आणि घोषणांची कृती त्यांच्या प्रत्यक्ष कामांतून दाखवून देतात त्याचेच उदाहरण कराड चिपळूण हा कॉक्रीटींकरणाचा रस्ता आहे. नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती माजी बांधकाम मंत्र्यांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची झाली आहे.चांगल्या सुरु असलेल्या कामांत खोडा घातलाच पाहिजे ही लागलेली सवय राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची जाता जाणार नाही हे तालुक्यातील लोकांनाही चांगलेच माहिती आहे.रस्त्याच्या कामांस प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. मोठया प्रमाणात पाऊस पडत आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करताना रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत हे सर्वांनाच दिसत आहे. आमदार शंभूराज देसाईंनी सदरचे पडलेले खड्डे आठ दिवसात भरुन घेण्याच्या सुचना ठोसपणे संबधित कंपनीला आणि प्रशासनाला दिल्याही आहेत त्यानुसार खड्डे भरण्याचे कामही सुरु आहे.तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खड्डयात झाडे लावण्याची केलेली स्टटंबाजी ही निंदनीय असून स्टंटबाजी आम्हालाही करता येते पण जरा धीर धरा सगळे व्यवस्थित होईल. आमचे नेते तालुक्याचे लोकप्रिय आमदार याकरीता सक्षम आहेत तुम्ही विनाकारण याकरीता कष्ट घेण्यात वेळ घालवू नका असा इशारा निसरे येथे खड्डयात झाडे लावणा-या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देसाई गटाच्या पदाधिका-यांनी दिला आहे.पत्रकावर जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर,कारखान्याचे संचालक पांडूरंग नलवडे,विजयराव जंबुरे,शंभूराज युवा संघटनेचे विजय शिंदे,अमोल पाटील,हिंदूराव जंबुरे,संतोष कदम,अभिजित पवार,संदिप देसाई,अमोल चव्हाण,संरपच विष्णू पवार,धनाजी केंडे,विनायक शिर्के,संजय शिर्के, मानसिंग मोरे यांच्या सह्या आहेत.

सातत्याने होणा-या अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीला तातडीने मदत मिळावी. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दयावेत. आमदार शंभूराज देसाईंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मागणी.




दौलतनगर दि.२४:-पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत तीन महिन्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची भरपाई मतदारसंघातील शेतक-यांना तात्काळ मंजुर करावी याकरीता नुकसानीचे संयुक्तपणे पंचनामे करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागास  दयावेत व नुकसानग्रस्त शेतक-यांना विशेष बाब म्हणून तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाईंनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
                  मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये आमदार शंभूराज देसाईंनी म्हंटले आहे की,पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये गत माहे जून, जुलै व ऑगस्ट, 2018 या तीन महिन्यांमध्ये सलग सुमारे 70 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत मोठया प्रमाणांत अतिवृष्टी सुरु आहे. गेली तीन महिने अखंडपणे सुरु असलेल्या  अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान होवून पिकांची हानी झालेली आहे. सदरच्या अतिवृष्टीमुळे शेतामध्ये मोठया प्रमाणांत पाणी साठल्याने शेतातील पिके पुर्णत: कुजली  असून यामध्ये या हंगामातील विशेषत: सोयाबीन,हायब्रीड,भुईमुग,भात व ऊस या पिकांचे मोठया प्रमाणांत नुकसान झाले आहे. तर काही पिकांवर अतिवृष्टीमुळे कीडीचा प्रादुर्भावही झाला आहे.त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाटण विधानसभा मतदारसंघ हा मुळातच डोंगरी व दुर्गम भागातील अतिवृष्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. डोंगरी व दुर्गम भागातील शेतक-यांचे शेती हे एकमेव उदर-निर्वाहाचे साधन आहे. अल्पभूधारक शेतक-यांची मोठया प्रमाणात संख्या असून सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी कुटुंबांचे फार मोठया संख्येने आर्थिक नुकसान झाले आहे. सलग तीन महिने सततच्या कोसळणा-या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळणेकरीता तात्काळ या शेतीपिकांच्या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पंचनामे होवून या नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीची आर्थिक मदत मंजुर करणे गरजेचे आहे.त्याकरीता पाटण विधानसभा मतदारसंघातील महसूल व कृषी विभागास संयुक्तपणे या शेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आपण दयावेत व नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी असे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रामध्ये म्हंटले आहे. तर यासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेवून पाटण विधानसभा मतदारसंघात गत तीन महिन्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतक-यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणेकरीता आग्रही राहणार असल्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी पत्रकात म्हंटले आहे.


Thursday, 23 August 2018

आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते संजय गांधी योजनेतंर्गत पाच महिलांना ७५ हजार रुपयांचे अनुदान वाटप.


दौलतनगर दि.23 :- राज्य शासनाच्या  संजय गांधी योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील पाच महिलांना स्वातंत्र्य सैनिक दुखवटा निधी, स्वातंत्र्य सैनिक वैद्यकीय बील, राष्ट्रीय कुटुंब लाभ देयक या योजनांतंर्गत एकूण ७५ हजार रुपयांचे अनुदान पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते आज तहसिल कार्यालय,पाटण येथे वाटप करण्यात आले.
               यामध्ये अनुक्रमे स्वातंत्र्य सैनिक दुखवटा निधी योजनेंतर्गत श्रीमती खाशीबाई तुकाराम जमदाडे जमदाडवाडी यांना ५०००/- स्वातंत्र्य सैनिक वैद्यकीय बील योजनेंतर्गत श्रीमती वेणूताई संतराम पाटील नानेगांव खुर्द यांना १०,०००/- आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ देयक योजनेंतर्गत श्रीमती लता शिवाजी कांबळे,पाटण यांना २०,०००/- श्रीमती अर्पणा अरविंद गुरव,मोरगिरी यांना २०,०००/- व श्रीमती सुनिता रमेश कापसे,मंदुळकोळे खुर्द यांना २०,०००/- असे एकूण ७५,०००/- रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे, सदस्य सदानंद साळुंखे,बबनराव भिसे,संजय गांधी योजनेचे नायब तहसिलदार दत्तात्रय लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार शंभूराज देसाईंनी संजय गांधी योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील जास्तीत जास्त गरीब, निराधार कुटुंबातील व्यक्तींना या योजनेचा लाभ होणेकरीता समितीचे सदस्य तसेच तालुक्यातील महसूल विभागाचे प्रत्येक विभागांचे मंडलाधिकारी, तलाठी यांनी पुढाकार घेवून अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांना संजय गांधी योजनेतंर्गत अनुदान मंजुर करुन दयावे असे आवाहनही बोलताना केले.

Monday, 20 August 2018

वृक्ष लागवडीबरोबर वृक्ष जपण्याचेही काम करु या.- युवा नेते यशराज देसाई यशराज देसाई यांच्या हस्ते मरळी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.


      


                            

दौलतनगर दि. २०:  राज्य शासनाच्या वन विभागाने संपुर्ण राज्यामध्ये मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे.राज्यातील ३३ टक्के भूभाग वृक्षाखाली आणणे आवश्यक आहे.याकरीता वनविभागाच्या बरोबर विविध सामाजिक संस्था,शैक्षणिक विभाग,शाळा,महाविद्यालये,नगरपंचायती,ग्रामपंचायती याचेमार्फत सर्वत्र वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे.हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून केवळ वृक्षलागवड केली दाखविण्याकरीता वृक्षलागवड केल्याचे फोटो काढून प्रसिध्द करण्यापुरता हा उपक्रम हाती घेण्यात येवू नये तर वृक्ष लागवडीबरोबर लावलेल्या वृक्षाची जपणूक, त्याची वाढ होणकरीता काळजी घेण्याचेही काम सर्वांनी एकत्रित येवून करुया असे आवाहन युवा नेते यशराज देसाई यांनी केले आहे.
             मरळी ता.पाटण येथे मरळी ग्रामपंचायतीच्या वतीने दि.१४ ऑगस्ट रोजी १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला युवा नेते यशराज देसाई यांचे हस्ते वृक्षलागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालंदर पाटील,पंचायत समिती सदस्य संतोष गिरी,मरळी गावचे सरपंच राजाराम माळी,उपसरपंच विनोद कदम,संजय सणस,संतोष पाटसुते,विलास कदम,प्रशांत देसाई,पोलिस पाटील साईनाथ सुतार, ग्रामविकास अधिकारी गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
                 याप्रसंगी बोलताना युवा नेते यशराज देसाई म्हणाले, गत दोन वर्षामध्ये आपले संपुर्ण राज्यात प्रत्येकी २ कोटी व ४ कोटी वृक्षलागवड करण्याचे उदिष्ट राज्य शासनाच्या वन विभागाने केले होते तर यंदाच्या वर्षी एकूण १३ कोटी वृक्षलागवडीचे उदिष्ट शासनाने ठरविले आहे. हे आपण रोज वाचतो आहोत त्यानुसार राज्याच्या वनविभागाच्या बरोबरीने संपुर्ण राज्यातील विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक विभाग, शाळा, महाविद्यालये, नगरपंचायती,ग्रामपंचायती यांनी सहभाग घेवून वृक्षलागवड हा उपक्रम लोकचळवळ म्हणून आपण सर्वजण करीत आहोत.राज्य शासनाने आपल्या सर्वांच्या भल्यासाठीच वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून राज्य शासनाचा व शासनाच्या वन विभागाचा निर्धार पुर्णत्वाकडे नेणेकरीता वृक्षलागवडीचा उपक्रम केवळ दिखाव्यापुरता न होता. तो उपक्रम लोकचळवळीतून सर्वांनीच हाती घेण्याची आणि या वृक्षांची चांगल्या प्रकारे जपणूक करण्याची गरज आहे. सध्या झाडांची संख्या मोठया प्रमाणांत कमी झाली असल्याने सर्वांनाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळासारख्या आपत्तीला प्रतिवर्षी सामना करावा लागत असून पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याने आजही अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे.या सर्वातून मार्ग काढण्यासाठी शासनाने जनजागृती सुरु केली असून आपणही वृक्षलागवड करुन त्याचा एक भाग झालो आहोत. आज १५ ऑगस्टच्या पुर्वसंध्येला केवळ वृक्ष लावणे हा उपक्रम आपण करायचा नाही तर लावलेले वृक्ष चांगल्या प्रकारे जगले पाहिजे, वाढले पाहिजे याकरीता सर्वानीच प्रयत्न करायचे आहेत. आणि सर्वजण याकरीता प्रयत्नशील आहोत असे आपण मनाशी ठाम ठरवून भविष्यात आणखीन वृक्षांची लागवड करुन वृक्ष जगविण्यासाठी एकसंघ राहूया असेही आवाहन त्यांनी शेवठी बोलताना केले.उपस्थितांचे स्वागत माजी सदस्य जालंदर पाटील यांनी केले व आभार सरपंच राजाराम माळी यांनी मानले.


रविराज देसाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.



दौलतनगर दि.20 :- पाटण तालुक्याचे युवा नेते व मोरणा  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई यांचा वाढदिवस रविवार दि. 12 ऑगस्ट, 2018 रोजी मोठया उत्साहात साजरा झाला.सकाळी श्री गणेश व साईबाबांच्या देवदर्शनानंतर लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व. शिवाजीराव देसाई (आबासाहेब) यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर रविराज देसाई यांच्या सुविद्य पत्नी अस्मितादेवी देसाई यांनी औक्षण केले. यावेळी मॉसाहेब श्रीमती विजयादेवी देसाई, पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई,सौ.स्मितादेवी देसाई,चि.यशराज देसाई,जयराज देसाई, आदित्यराज देसाई, कु.ईश्वरी देसाई आणि रमेश देसाई यांच्यासह कुटुंबातील सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.       
                  वाढदिवसानिमित्त रविराज देसाई यांना दुरध्वनीवरुन सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंती छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले, आमदार आनंदराव पाटील, आमदार मकरंद पाटील, नगरसेवक निशांत पाटील, आनंदराव कणसे, समीर गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील, प्रकाश्‍ देसाई, माजी उपसभापती डी.आर.पाटील या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.तालुक्यातील तसेच सातारा शहरातील कार्यकर्ते व चाहत्यांनी त्यांना सातारा येथील शिवविजय या त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.कारखान्याचे चेअरमन अशोकराव पाटील, माजी चेअरमन दिलीपराव चव्हाण, शिवसेना पाटण तालुका संपर्कप्रमुख जयवंतराव शेलार, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश चव्हाण,शिवदौलत बँकेचे चेअरमन मिलिंद पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, जालिंदर पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार,आशिष आचरे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, संतोष गिरी,ॲङ डी.पी.जाधव,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भरत साळूंखे, शंभूराज युवा संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील,सचिव उत्तम मोळावडे, मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव डी. एम. शेजवळ,गुढेचे सचिन पाटील,मनोज मोहिते,नाना साबळे,संजय पाटील,अंकूश महाडिक,विजयराव मोरे,शिवाजीराव शेवाळे, टी.डी.जाधव, एकनाथराव जाधव,आप्पासाहेब मगरे, अब्दुलगणी इस्माईल चाफेरकर,बबन भिसे, जयवंतराव जानुगडे, दिपक गव्हाणे, शंकर गव्हाणे,नानासाहेब पवार, आनंदा मोहिते, गणेश भिसे, शरद देसाई, प्रा. विश्रांत कदम, उत्तमराव खराडे, अशोकराव खराडे, चेअरमन शंकर पाटील, महेश राजेमहाडीक, नारायण कारंडे, मरळीचे माजी सरंपच प्रवीण पाटील, विजयराव जंबुरे, अनिल निकम, अनिल खराडे, बाबाशेठ तांबोळी, दादासाहेब देसाई, बसाप्पा शिऊर, विकास गिरीगोसावी, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन जाधव, प्रा. यशवंतराव काळे,सोनवडे अशोकराव घाडगे,महादेव पाटील, रघुनाथ माटेकर, सचिन कदम, शिवाजीराव देसाई विद्यालयाचे मुख्याध्यापक के.जे.चव्हाण,न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ धावडेचे मुख्याध्यापक एस.व्ही.रेवडे, यांच्यासह न्यू इंग्लिश नाटोशी, विजयादेवी देसाई ज्यूनिअर व सिनिअर कॉलेज,आय.टी.आय. व पॉलिटेक्निक कॉलेजचे शिक्षक,कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.


Sunday, 19 August 2018

पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्रमंडळाने केली कै.रोहन तोडकर याचे कुटुंबियांना आर्थिक मदत. रविराज देसाई यांचे हस्ते सुपुर्द केला आर्थिक मदतीचा धनादेश.



दौलतनगर दि.1८ :-  मराठा आरक्षणासाठी राज्यामध्ये आंदोलनाचे रान पेटले असताना मुंबईतील दंगलीमध्ये बळी गेलेल्या पाटण तालुक्यातील खोणोली गावच्या २१ वर्षीय कै.रोहन तोडकर या युवकाच्या कुटुंबिंयाना आधार देणेकरीता पाटण तालुका सातारा मित्र मंडळाचेवतीने मित्र मंडळाचे व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई यांचे हस्ते कै. रोहन तोडकर याचे वडील श्री. दिलीप तोडकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला.
         नवी मुंबई येथील कोपरखैरणे येथे नोकरीकरीता गेलेल्या रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचा झालेल्या मृत्यूमुळे तोडकर कुटुंबावर मोठा आघात झाला असून घरीची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने आपल्या कुटुंबाच्या उदर-निर्वाहासाठी मुंबई येथे नोकरीला गेलेला  घरातला कमवता एकुलता एक मुलाच्या  अचानक जाण्याने तोडकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी या कुटुंबांला मुख्यमंत्री यांचे आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन या कुटुंबाला दिले असून सदरची मदत मिळणेकरीताचा प्रस्ताव लवकरात लवकर मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे पाठविणेकरीता आमदार शंभूराज देसाई यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. येत्या दोन तीन दिवसात हा प्रस्ताव मुख्यमंत्री यांचे कार्यालयाकडे पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान या तोडकर कुटुंबियांची पाटण तालुका सातारा रहिवाशी मित्र मंडळाचे व मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई व मित्र मंडळातील पदाधिकारी यांनी कुटुंबिंयाची खोनोली येथे जावून प्रत्यक्ष भेट घेतली व या कुंटुंबातील सदस्यांचे त्यांनी सात्वंन केले. तसेच पाटण तालुका सातारा रहिवाशी  मित्रमंडळाच्यावतीने  रविराज देसाई यांचे हस्ते कै. रोहन तोडकर याचे वडील  श्री. दिलीप तोडकर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देऊन तोडकर कुटुंबियांना मदतीचा हात देण्यात आला आहे. यावेळी पाटण तालुका सातारा रहिवाशी मंडळातील अनिल निकम, अनिल खराडे, देवानंद चव्हाण, रघुनाथ मगर, तुकाराम मोळावडे, अविनाश मोरे, शंकर मोरे, नरेंद्र शेलार, चंद्रकांत निकम, दत्तात्रय कुंभार, भरत साळुंखे, प्रकाश नेवगे, जयदिप पाटील, बळवंत तोडकर,उमेश पवार या प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

Friday, 17 August 2018

आमदार शंभूराज देसाईंचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालयात महामॅरेथॉन बैठका. विविध विषयांवर चर्चा व तातडीने निर्णय.




दौलतनगर दि.18:  गुरूवार दिवस पाटण तालुक्यातील तहसिल कार्यालयात महामॅरेथॉन बैठकांचा ठरला.पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली यादिवशी तहसिल कार्यालयात पाटण तालुक्यातील विविध विषयासंदर्भात महामॅरेथॉन बैठका पार पडल्या.विविध विषयावंर आमदार शंभूराज देसाईंनी चर्चा करुन यावर तातडीने निर्णयही घेतले.यामध्ये प्रामुख्यांने कराड चिपळूण रस्त्याचे सुरु असलेले काम या कामामुळे नागरिकांना आणि प्रवाशाना होणा-या अडचणी व रस्त्यांवर कराड ते घाटमाथा पर्यंत पडलेले मोठमोठे खड्डे संदर्भात सविस्तर अशी चर्चा झाली यावर येत्या आठ दिवसात रस्त्यावर पडलेले खड्डे भरुन घेण्याच्या तसेच रस्त्याच्या कामांस गती देण्याच्या सुचना करीत नुसते हो ला हो नको तर रिर्झल्ट दाखवा, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जा असा गर्भीत इशाराच आमदार शंभूराज देसाईंनी राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना बैठकीत दिला.
               गुरूवार आमदार शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तहसिल कार्यालयात कराड चिपळूण रस्त्याचे सुरु असलेले कामांच्यासंदर्भात व यामुळे जनतेला निर्माण होणा-या अडचणींच्या संदर्भात तसेच तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांचा आढावा,स्वच्छ भारत अभियानातंर्गत पाटण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात करावयाच्या उपाययोजना आणि पाटण येथील बसस्थानकाच्या कामांस लवकरात लवकर सुरुवात करणेसंदर्भात बैठका आयोजीत करण्यात आल्या होत्या. आमदार देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे चार तास या बैठका याठिकाणी पार पडल्या.यावेळी विविध बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय उत्तुरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता कांडगांवे,उपअभियंता पन्हाळकर,एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर घोष,बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजाराम खंडागळे, नाईक,घोडके,तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे, लपा जिल्हास्तर उपअभियंता अविनाश पदमाळे,शाखा अभियंता बंगे,श्रीमती गायकवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी वाघ, तालुका आरोग्य अधिकारी दिपक साळुंखे,पाणी पुरवठा शाखा अभियंता खाबडे,एस.टी महामंडळ बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती अडसूळ,पाटण आगार व्यवस्थापक निलेश उथळे या अधिका-यांची तसेच महसूल विभागाचे सर्व मंडला धिकारी, तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
               आमदार शंभूराज देसाईंनी वरीलप्रमाणे विविध विषयांचा आढावा या बैठकांमधून घेतला.कराड चिपळूण रस्त्याच्या सुरु असलेल्या कामांसंदर्भात व या कामामुळे नागरिकांना तसेच प्रवाशांना जाणवणा-या अडीअडचणीसंदर्भात आमदार शंभूराज देसाईंनी बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांना चांगलेच खडसावले. कराड ते घाटमाथा मार्गावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. येत्या आठ दिवसात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे भरुन घ्या. आठदिवसानंतर काहीएक एैकले जाणार नाही. कंपनीच्या विरोधात वरीष्ठाकडे तक्रार करुन नोटीशी देण्याची वेळ आणू नका. नुसते हो करतो हे अजिबात चालणार नाही मोठया प्रमाणात यंत्रणा लावा मला रिर्झल्ट हवा आहे.आठ दिवसात रिर्झल्ट दिसायला हवा असा इशाराच त्यांनी बैठकीत दिल्यानंतर येत्या आठ दिवसात या मार्गावरील खड्डे भरुन घेत असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे संबधित अधिकारी आणि एल ॲन्ड टी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी सांगितले.त्यांनतर विभागवार त्यांनी पाटण तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेतंर्गत सन २०१७-१८ मध्ये करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला तसेच सन २०१८-१९ मध्ये जी कामे प्रस्तावित केली आहेत त्या कामांची आजची स्थिती काय आहे हेही आमदार शंभूराज देसाईंनी जाणून घेतले.पावसाळा संपताच या कामांना सुरुवात करण्याच्या सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. डोंगरपठारावरील गांवामध्ये पावसाळयाचे पाणी अडले पाहिजे याकरीता जलयुक्त शिवार योजनेतंर्गत आपण गतवर्षी केलेल्या कामांतून किती प्रमाणात पाणी अडले याचीही माहिती त्यांनी अधिकारी यांना विचारली व या योजनेतंर्गत डोंगंरपठारावरील कामांना प्रथम प्राधान्य दयावे असेही त्यांनी सुचित केले.लघू पाटबंधारे विभाग,वनविभाग,पाणी पुरवठा विभाग व कृषी विभागाने केलेल्या कामांची माहिती त्यांच्या त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड करावी जेणेकरुन केलेली कामे जनतेपर्यंत पोहचतील असे सांगून त्यांनी शहरी व ग्रामीण भागात आज मोठया प्रमाणात रस्त्यांच्या बाजूला कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्वच्छ भारत अभियांनातंर्गत विविध उपाययोजना ग्रामीण आणि शहरी भागांना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांच्या बाजूला टाकण्यात येणारा कचरा आरोग्याला धोका निर्माण करणारा असून यासंदर्भात महसूल आणि ग्रामविकास विभागाने तात्काळ अशा जागांची पहाणी करुन कच-यांची विल्हेवाट लावणेसंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी.ज्या गावांच्या लगत अशाप्रकारे कचरा टाकण्यात येत आहे त्या गावांमध्ये यासंदर्भात जनजागृती करावी अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.त्यानंतर पाटण बसस्थानकाचे कामांस पहिल्या टप्प्यात १.७० कोटी व आता २.४४ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.कामाचे भूमिपुजन होवून दोन महिने उलटले काम का सुरु नाही ? निधीची काही अडचण नसताना पावसाचे कारण सांगून कामाला विलंब लागत असल्याचे सांगणे चुकीचे आहे.तात्काळ या कामांना सुरुवात करा. प्रथम बसस्थानकात पडलेले खड्डे भरण्याकरीता या कामात समाविष्ट असणारे काँकीटचे काम हाती घ्यावे व त्यानंतर इमारतीचे काम हाती घ्यावे असेही आमदार देसाईंनी यावेळी सांगितले.उपस्थितांचे आभार तहसिलदार रामहरी भोसले यांनी मानले.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या माध्यमातून कामांचा तातडीने निपटारा.

             महामॅरेथॉन बैठका संपल्यानंतर तहसिल कार्यालयात वैयक्तीक कामांकरीता आलेल्या सुमारे दोनशेहून अधिक लोकांनी आपल्या समस्या आमदार शंभूराज देसाईंच्या निदर्शनास आणून दिल्या व त्यांच्या माध्यमातून आपल्या कामांचा तातडीने निपटारा करीत तहसिल कार्यालयातील अधिका-याकडून त्या समस्या सोडवून घेतल्या.


आमदार शंभूराज देसाईंनी केली पुरपरिस्थितीची पहाणी. आमदार मतदारसंघात अलर्ट. अधिकारीवर्गही तत्पर.




दौलतनगर दि. १७:  पाटण तालुक्यात पावसाचा जोर कायम असून तालुक्यातील कोयना धरणातून गेली दोन दिवस ५० हजारहून अधिक क्युकेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात असल्यामुळे कोयना नदीवरील मुळगांव येथील पुल पाण्याखाली गेला आहे. मुसळधार कोसळणा-या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक मोठया प्रमाणात होत आहे. दि.१६ व १७ ऑगस्ट रोजी प्रतिदिन अनुक्रमे ५०४२० व ४९९४३ क्युकेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्रातील पाण्यामुळे मुळगांव पुल दि.१६ रोजी रात्रीच पाण्याखाली गेला असल्यामुळे तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई हे मतदारसंघात रात्रीपासून अलर्ट असून त्यांनी आज सकाळी पाण्याखाली गेलेल्या मुळगांव पुलाची व तालुक्यातील पुरपरिस्थितीची पहाणी केली.आमदार शंभूराज देसाईंच्या या अलर्टपणामुळे तालुक्यातील प्रशासन व प्रशासकीय अधिकारीही तत्पर असून पहाणी दौ-यात अधिकारीवर्गही आमदार देसाई यांचेसमवेत उपस्थित होता.
             कोयना धरणातून मोठया प्रमाणात सोडण्यात येणा-या पाण्यामुळे पाटण तालुक्यातील कोयना नदीकाठच्या पाटण,जमदाडवाडी, मंद्रुळहवेली व नावडी या गावांना पाण्याचा धोका निर्माण होतो. सध्या कोयना नदीपात्रात पावसाच्या पाण्याबरोबर कोयना धरणातून सोडण्यात येणा-या ५० हजारहून अधिक क्युकेक्स पाण्याचा विसर्ग असल्यामुळे कोयना नदीपात्र तुंडुब भरुन वहात आहे. मुळगांव पुल पाण्याखाली गेला असल्याचे वृत्त मिळताच त्यांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पोलिस निरिक्षक भापकर यांना दुरध्वनीवरून पाटण, जमदाडवाडी, मंद्रुळहवेली व नावडी याठिकाणी कुठे नदीपात्रातील पाणी आले आहे काय? याची पहाणी महसूल आणि ग्रामविकास यंत्रणेने तातडीने करावी अशा सुचना रात्री १०.०० वाजताच अधिका-यांना दिल्या.मुळगांव पुल वगळता कुठेही पाणी आले नसल्याची माहिती आमदार शंभूराज देसाईंना अधिका-यांकडून देण्यात आल्यानंतर त्यांनी सकाळी मुळगांव पुलाची अधिका-यांना घेवून पहाणी केली व मुळगांव पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरेकेटींग लावून पुलाचा मार्ग बंद करण्याच्या सुचना पोलीस यंत्रणा व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिका-यांना दिल्या. पोलीस निरीक्षक भापकर यांना याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्याच्याही सुचना आमदार देसाईंनी दिल्या. त्यानुसार याठिकाणी दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
             पहाणी दौरा झालेनंतर आमदार शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली पाटण विश्रामगृह याठिकाणी तालुकास्तरीय अधिका-यांची बैठक झाली या बैठकीत निर्माण होणा-या पुरपरिस्थितीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने आमदार शंभूराज देसाईंनी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या. यावेळी पाटण पोलीस स्टेशनला ४९ पोलीस कर्मचारी यांच्या नियुक्त्या असून केवळ ३७ कर्मचारी आहेत. १२ कर्मचारी नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे पोलीस निरीक्षक भापकर यांनी सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना दुरध्वनीवरुन येथील पुरपरिस्थितीची माहिती देवून पाटण पोलीस स्टेशनला आवश्यक कर्मचारी देणेबाबत तसेच येथील अधिकारी यांना बाहेरील बंदोबस्त न लावणेबाबतही कल्पना दिली यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ यापुढे पाटण येथील पोलीस अधिकारी कुठेही बंदोबस्ताकरीता न पाठविण्याचे आणि पाटण पोलीस स्टेशनला आवश्यक पोलीस मनुष्यबळ तसेच आज दुपारपर्यंत जादा पोलीस यंत्रणा पाठविण्याचे आश्वासन आमदार शंभूराज देसाईंना दिले.आज पारसी दिनाची सुट्टी असली तरी सर्व अधिकारी या परिस्थितीची पहाणी करण्याकरीता आमदार शंभूराज देसाई यांच्या सोबत तत्परतेने हजर होते. आपतकालीन कक्षामध्ये सक्षम मंडलाधिकारी यास बोलावून घेवून तालुक्यातील इतर ठिकाणच्या परिस्थितीचाही अहवाल घ्यावा अशा सुचना आमदार शंभूराज देसाईंनी तहसिलदार यांना दिल्या व तालुक्यातील म्हारवंड, बाटेवाडी, जिमनवाडी, मसुगडेवाडी पाडळोशी येथील कडयाखालच्या गांवातील घरांची पावसाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने माहिती घेतली.तर मोठा पाऊस कोसळत असल्यामुळे वाटोळे,घाणबी,मरड भिकाडी,काठी अवसरी,पांढरेपाणी,आटोली,पाचगणी याठिकाणी लाईट जाण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना दिल्या. आमदार शंभूराज देसाई यांचेसोबत पहाणी दौ-यामध्ये पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले,पाटण पोलिस निरिक्षक भापकर,पाटणचे मंडलाधिकारी,तलाठी, गटविस्तार अधिकारी,सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे सर्व शाखा अभियंता हे शासकीय अधिकारी व पाटण शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट:- आमदार शंभूराज देसाईंच्या आदेशामुळे शासकीय यंत्रणा रात्रीपासूनच अलर्ट.

                            मुळगांव पुल पाण्याखाली गेल्याची बातमी मिळताच तातडीने रात्री आमदार शंभूराज देसाईंनी प्रातांधिकारी, तहसिलदार,पाटण पोलीस निरीक्षक यांना दुरध्वनीवरुन तात्काळ पुलाच्या ठिकाणी पोहचून येथील दोन्ही बाजू वाहतूकी करीता बंद करण्याच्या सुचना दिल्या.दोन दिवस ते वैयक्तीक कामासाठी बाहेरगांवी दौ-यावर जाणार होते तो दौरा रद्द करुन आमदार शंभूराज देसाईंनी दुसरेदिवशी सकाळी मुळगांव पुल गाठणे व तालुक्यातील पुरपरिस्थितीचा आढावा घेणे पसंत केले.आमदार शंभूराज देसाईंच्या आदेशामुळे रात्रीपासूनच शासकीय यंत्रणा तालुक्यात अलर्ट होती

Tuesday, 14 August 2018

100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते ओटी भरण व जलपुजन. धरणातून १९०४१ क्युसेक्स पाण्याचा आमदार शंभूराज देसाईंचे हस्ते विसर्ग.



दौलतनगर दि.१4 :- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणा-या कोयना धरणातील शिवसागर जलाशयामध्ये मंगळवार दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी १०१.१३ टीएमसी पाणीसाठा झाला असून 100 टीएमसी हून अधिक पाणीसाठा झालेल्या कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन पाटण तालुक्याचे उत्कृष्ट संसदपटु आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते सकाळी १०.१० वा. करण्यात आले.धरणातील शिवसागर जलाशयाचे  ओटीभरण व जलपुजन केल्यानंतर लगेचच धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते एकूण १९०४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला.
           यावेळी कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.एकूण 105 टीएमसी पाणीसाठा क्षमता असणा-या कोयना धरणात दि. 14 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
               प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण करणा-या कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये दि.14 ऑगस्टला सकाळीच 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा ओलाडूंन १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी दि.३० ऑगस्ट रोजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी उत्कृष्ट संसदपटु  आमदार शंभूराज देसाई यांचे शुभहस्ते शिवसागर जलाशयातील या जलाशयाचे  ओटी भरण आणि जलपुजन करण्यात आले होते.यंदा १५ दिवस अगोदर परंपरेनुसार कोयना धरणाच्या भिंतीच्या आतील बाजूस आमदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते कोयना शिवसागर जलाशयाचे विधिवत पुजन करण्यात आले व त्यानंतर आमदार शंभूराज देसाई यांचे हस्ते व त्यांचे सोबत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलाशयात खणनारळाची ओटी सोडून जलाशयाचे पुजन व ओटीभरण करण्यात आले.
          याप्रसंगी प्रतिक्रिया देताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, प्रतिवर्षी दि.15 ऑगस्टला 100 टीएमसी पाणीसाठयाचा टप्पा पुर्ण होतो गतवर्षीच १०० टीएमसी पाणीसाठा होणेकरीता दि.३० ऑगस्ट पर्यंत कालावधी लागला होता. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस १५ दिवस अगोदर कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने आज सकाळपर्यंत १०० हुन अधिक पाणीसाठयाचा टप्पा ओलांडून आतापर्यंत कोयना धरणात १०१.१३ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.१०० टीएमसी पाणीसाठा झालेनंतर प्रतिवर्षी परंपरेनुसार कोयना धरणातील शिवसागर जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची पंरपरा आहे.पाटण तालुक्यातील तमाम जनतेने मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यामुळे राज्यातील सर्वात मोठया आपले कोयना धरणातील जलाशयाचे जलपुजन व ओटीभरण करण्याची संधी मला गेली चार वर्षे मिळत आहे मी स्वत:ला खुप भाग्यवान समजत असून ही संधी मला मिळवून देणा-या पाटण तालुक्यातील तमाम जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो. कोयना धरण बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर,कोयना धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील, उपअभियंता मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी व व्यवस्थापन कोयना धरणाच्या संदर्भात २४ तास कार्यरत आहेत. तसेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीकाठच्या गांवामध्ये दक्षता घेण्याचे कार्य उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे,तहसिलदार रामहरी भोसले हे अधिकारी व त्यांच्या देखरेखीखाली महसूल प्रशासन कार्यरत आहे. कोयना धरणातील पाण्यामुळे अवघा महाराष्ट्र प्रकाशमान होत असून शेतीकरीताही या पाण्याचा चांगला वापर होत असल्याचे सांगून ते म्हणाले कोयना धरण आपले तालुक्यात आहे हे आपले सर्वांचे भाग्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना व्यक्त केली.कोयना धरणातील शिवसागर जलाशयातील ओटी भरण व जलपुजन कार्यक्रमानंतर आमदार शंभूराज देसाई यांनी कोयना धरण प्रकल्पाचे अधिका-यांसमवेत कोयनानगर येथे बैठक घेतली. या बैठकीमध्ये कोयना धरण प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी विविध विषयांवर अधिकारी यांचेबरोबर चर्चा केली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व ज्या काही समस्या शासन दरबारी प्रलंबीत आहेत त्या सोडविण्यासाठी वेळप्रसंगी मुख्यमंत्री यांची वेळ घेवून या समस्यांचे आपण निरसण करु अशी ग्वाही त्यांनी अधिका-यांना दिली.याप्रसंगी शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील,धोंडीराम भोमकर, माजी पंचायत समिती सदस्य हरीश भोमकर,संचालक बबनराव भिसे,प्रदीप पाटील,शैलेंद्र शेलार,दिलीप सकपाळ  या प्रमुख पदाधिकारी व कोयना धरण व्यवस्थापनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.



Saturday, 11 August 2018

मराठा क्रांती आंदोलनाच्या निमित्ताने भूकंपग्रस्त दाखले व भूकंपनिधीसाठी आमदार शंभूराज देसाईंनी केलेल्या आंदोलनाच्या आठवणी जाग्या.





काल संपुर्ण राज्यामध्ये राज्यातील सकल मराठा समाजाने मराठा आरक्षणाकरीता व विविध मागण्याकरीता मराठा ठिय्या आंदोलने करुन संपुर्ण महाराष्ट्र बंद आंदोलन केले.सातारा जिल्हयाच्या सर्व तालुक्यात मोठया प्रमाणात शांततेच्या मार्गाने मराठा ठिय्या आंदोलने पार पडली.पाटणच्या मराठा ठिय्या आंदोलनात पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचा सक्रीय सहभाग हा लक्षवेदी ठरला.सातारा जिल्हयात हजारो मराठा नागरिकांना सोबत घेवून अत्यंत शांततेच्या मार्गाने व शिस्तबध्दपणांने ठिय्या आंदोलन करणारे ते एकमेव आमदार ठरले.या मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार शंभूराज देसाईंनी याअगोदर पाटण याठिकाणीच पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांच्या दाखल्यांकरीता तसेच कोयना भूकंप निधी मिळणेकरीता अत्यंत शिस्तप्रिय भूमिकेतून दोन दोन दिवस केलेल्या आंदोलनांच्या आठवणी तालुक्यातील जनतेमध्ये जाग्या झाल्याचे पहावयास मिळाले.
              एखादया आंदोलनात वा मोर्चात शिस्तबध्दपणा कसा असावा तसेच शिस्तीचे पालन कसे करावे हे शिकावे तर पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांच्याकडून.सर्वसामान्य जनमानसात उठबस करणारा हा नेता किती नेतृत्वसंपन्न आहे याचे दर्शन घडले ते काल झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या ठिय्या आंदोलनामध्ये.आमदार शंभूराज देसाई यांच्या सहभागामुळे तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सुमारे दोन ते अडीच हजार सकल मराठा समाजातील युवक,नागरिक नवारस्ता याठिकाणी जमले आणि आमदार शंभूराज देसाई यांच्या समवेत ठिय्या आंदोलनात सहभागी होणेकरीता पाटणला येवून त्यांनी पाटण जुना स्टॅन्ड ते तहसिल कार्यालय असे अत्यंत शांतपणे पायी गेले.आमदार शंभूराज देसाईंबरोबर पायी चालणा-या सर्वच युवकांमध्ये एकप्रकारचा उत्साह व शिस्तबध्दपणा पाहायला मिळाला. ठिय्या आंदोलनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळयाचे दर्शन घेवून ठिय्या आंदोलन करणारे आमदार शंभूराज देसाई यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करीत मराठा आरक्षणासंदर्भातील तसेच इतर काही मागण्या त्यांनी शासनापर्यंत पोहचविण्याकरीता आम्ही मराठा लोकप्रतिनिधी यांनी विधानसभा या सर्वोच्च सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसे प्रयत्न केले आहेत ही भूमिका अत्यंत शांतपणे मराठा समाजापुढे मांडली.त्यांनी मांडलेली भूमिका तालुक्यातील सकल मराठा समाजाला ऊर्जा देणारी ठरली.
दरम्यान यापुर्वी आमदार शंभूराज देसाईंनी तालुक्यातील जनतेला बरोबर घेवून तालुक्याच्या ठिकाणी केलेली आंदोलने असो वा सलग तीन तीन दिवस केलेले आमरण उपोषण असो किंवा इतर जनहितार्थ काढलेले मोर्चे असोत हे नेहमीच लक्षवेदी ठरले आहेत.यामध्ये महत्वाचे मानले जाणारी दोन आंदोलने पाटण तालुक्याच्या कायमस्वरुपी लक्षात राहणारी आहेत त्यामध्ये  पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना त्यांचे हक्काचे भूकंपाचे दाखले मिळवून देणेकरीता केलेले आंदोलन तसेच त्यांनी सन २००४ ते २००९ या आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये तालुक्यातील कोयना धरणाच्या वीजनिर्मितीमधून पाटण तालुक्याला मिळणारा कोयना भूकंप निधी वाढवून मिळणेकरीता केलेले प्रयत्न आणि प्रतिवर्षी ३५ टक्कयाप्रमाणे तालुक्याला मिळणारा ५ कोटी रुपयांचा मंजुर करुन आणलेला निधी जो आघाडी शासनाने दुसरीकडे वळविला तो तालुक्यातील ७९ गावातींलच कामांना मिळणेकरीता जीवावर बेतणारे त्यांनी केलेले तीन दिवसीय आमरण उपोषण हे अविस्मरणीय असून सलग तीन दिवस या आमरण उपोषणाकरीता ते तहसिल कार्यालया समोर तालुक्यातील जनतेच्या बरोबर बसले होते.आज ते मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने तहसिल कार्यालयासमोरच्या मंडपात मराठा आरक्षणाकरीता आमदार शंभूराज देसाई यांना बसलेले पाहून त्यांच्या आमरण उपोषणाच्या आठवणी तालुक्यातील जनतेच्या मनात जाग्या झाल्या.तालुक्यातील जनतेच्या हिताकरीता त्यांनी केलेल्या या आंदोलनाच्या आणि आमरण उपोषणांच्यांमुळे पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना त्यांचे हक्काचे भूकंपग्रस्तांचे दाखले मिळाले आणि प्रतिवर्षी कोयना भूकंप निधी जो त्यांनी शासनाकडून वाढवून आणला तो पाटण तालुक्यातील विविध विकासकामांकरीता मिळत आहे.शंभूराज देसाईंचा आंदोलनातील आणि उपोषणातील शिस्तबध्द पणाने असलेला सहभाग आणि त्यांच्या सोबत उपोषणात असो वा आंदोलनात सहभागी होण्याचा तालुक्यातील जनतेचा उत्साह व नेत्यांनी घालून दिलेले शिस्तीचे धडे हे तालुक्याच्या दृष्टीने अनेकदा फलदायी ठरले असून आता तर ते आमदार आहेत सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यासाठी त्यांनी आंदोलनामध्ये घेतलेला सहभाग हा नक्कीच पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाकरीता फलदायी ठरणार असल्याची चर्चा कालपासून पाटण तालुकयात सुरु असून मराठा ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी यापुर्वी केलेल्या आंदोलनाच्या व उपोषणाच्या चर्चा यानिमित्ताने करीत जुन्या आठवणींना तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये उजाळा मिळाल्याचे दिसून आले.